पंकजा मुंडे, बावनकुळे यांचं मंत्रिमंडळात कमबॅक, नितेश राणेंना लॉटरी, संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर

महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबरला पार पडणार आहे. आता या शपथविधी सोहळ्याला कोणकोणते मंत्री शपथ घेणार यांची नावे समोर आली आहेत.

पंकजा मुंडे, बावनकुळे यांचं मंत्रिमंडळात कमबॅक, नितेश राणेंना लॉटरी, संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर
महायुती
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 11:49 AM

Maharashtra CM Swearing Ceremony : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक आठवडा उलटला आहे. मात्र तरी अद्याप सरकारची स्थापना झालेली नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना मुख्यमंत्री कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. एकीकडे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा संपता संपत नसताना दुसरीकडे महायुतीत मुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपदावरुन वाद सुरु आहे. पण आता हे वाद संपल्याचे पाहायला मिळत आहे. कारण महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबरला पार पडणार आहे. आता या शपथविधी सोहळ्याला कोणकोणते मंत्री शपथ घेणार यांची नावे समोर आली आहेत.

येत्या गुरुवारी 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत याच दिवशी भाजपचे १० ते १५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नुकतंच त्यांची नावे समोर आली आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शपथ घेणाऱ्या या मंत्र्यांमध्ये जेष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश असणार आहे. यात चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रभात लोढा, अतुल सावे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संजय कुटे या आमदारांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागणार आहे. मात्र अद्याप या नावांबद्दल अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रात्री उशिरा एक ट्वीट केले होते. यात त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा कधी होणार याबद्दलची संपूर्ण माहिती दिली होती. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी विश्वगौरव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार

तर दुसरीकडे या शपथविधी सोहळ्यापूर्वी महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून दरेगावमध्ये आराम करण्यासाठी गेलेले महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा मुंबईमध्ये परतणार आहेत. ते मुंबईत परतल्यानंतर काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक करणार आहेत. या बैठकीत एकनाथ शिंदे महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.
काळजीवाहू CM गायब,अमावस्या-पौर्णिमेला कोणती शेती?,आदित्य ठाकरेंचा टोला
काळजीवाहू CM गायब,अमावस्या-पौर्णिमेला कोणती शेती?,आदित्य ठाकरेंचा टोला.
पाणी जपून वापरा... मुंबईसह 'या' भागात आजपासून 5 दिवस पाणीकपात
पाणी जपून वापरा... मुंबईसह 'या' भागात आजपासून 5 दिवस पाणीकपात.
'लाडकी बहीण'वरून आढावांचा सवाल, 'महिलांना भाऊबीज म्हणत मग स्वतःच्या..'
'लाडकी बहीण'वरून आढावांचा सवाल, 'महिलांना भाऊबीज म्हणत मग स्वतःच्या..'.
पुन्हा मतमोजणी? EVM वर शंका अन् या 24 उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे धाव
पुन्हा मतमोजणी? EVM वर शंका अन् या 24 उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे धाव.
शपथविधी ठरला, फडणवीस CM होणार पण गृहखात्यावरून टक्कर अन् 2 नंबरची लढाई
शपथविधी ठरला, फडणवीस CM होणार पण गृहखात्यावरून टक्कर अन् 2 नंबरची लढाई.
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण.
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान.
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी.