राज्यात थंडीची लाट, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद; तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

सध्या मुंबई, पुणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा यांसह ठिकठिकाणी तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या तापमान हे २० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे.

राज्यात थंडीची लाट, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद; तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
थंडीमुळे शेकट्या पेटण्यास सुरुवात झाली
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 12:08 PM

Maharashtra Cold Weather Update : महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चांगलाच खाली येताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने अंदमानातील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. सध्या मुंबई, पुणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा यांसह ठिकठिकाणी तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या तापमान हे २० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. तर दुसरीकडे विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईसह पुणे गारठले

मुंबईत सध्या थंडीची तीव्रता वाढली आहे. सध्या मुंबईत पहाटेच्या वेळी अंगाला झोंबणारी थंडी जाणवत आहे. मुंबईतील पारा १६ अंश सेल्सिअस पर्यंत घसरला. त्यामुळे मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी जाणवायला सुरुवात झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पुण्यात कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे पुणेकर गारठले आहेत. पुण्यातील पारा 8 अंशांवर पोहोचला आहे. पुण्यातील बहुतांश परिसरात 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पुणे शहरासह राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे.

पुण्यातील काही भागात किमान तापमान पुन्हा १० अंशांखाली गेले आहे. पुण्यातील हवेली, माळीण, दौंड आणि शिवाजीनगर परिसरातील किमान तापमान ९ अंशांखाली नोंदवले गेले आहे. मागील चार दिवसांपासून हवामानातील बदल आणि निरभ्र आकाश यामुळे किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे पारा १० अंशापर्यंत खाली आला. गेल्या २४ तासांत पारा दोन ते तीन अंशांनी घट असून पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

नाशिकमध्ये थंडीचा कडाका 

नाशिकच्या निफाडमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका कायम पाहायला मिळत आहे. ओझर HAL येथे 3.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 5.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. थंडीचा जोर वाढल्याने उब मिळवण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. नाशिकमध्ये कडाक्याची थंडी कायम असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नागपूरसह विदर्भातील तापमानात घट

तसेच नागपुरात आज 7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान विदर्भात सर्वात कमी तापमान असल्याचे सांगण्यात आले आहे. एकीकडे नागपुरात राजकीय पारा वाढला असताना तापमानाचा पारा मात्र घसरला आहे. यामुळे नागपूरकर थंडीचा सामना करत आहेत. त्यासोबतच गोंदियामध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात कमी 7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसात पारा तीन अंशाने घसरला आहे. यामुळे जिल्ह्यात हुडहुडी कायम पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गोदिंयातील तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यंदा तापमान रेकॉर्ड मोडणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

परभणी गारठली

सध्या उत्तरेकडे थंड वारे वेगाने वाहत आहे. यामुळे राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. अनेक शहरातील तापमान हे १० अंशाच्या खाली गेले आहे. काल राज्यात नगरमध्ये सर्वात कमी ६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. तर पुण्यातील एनडीए भागात ८ अंश तापमान नोंदवले गेले. यामुळे पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. सध्या परभणीतही तापमानात घट झाली आहे. परभणीत ४.०१ तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे परभणी गारठली आहे. वाढलेल्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहे. सकाळी सकाळी नागरिक मफलर आणि कोट असा पेहराव करताना दिसत आहे. थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.

जळगावात थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार

जळगावमध्येही यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. किमान तापमान ७ अंशापर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी जळगाव शहराचा पारा ७.९ अंशापर्यंत खाली आला होता. आयएमडी या शासकीय हवामान विभागाने ही नोंद घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून थंडीची कडाक्याची लाट पसरली असून, रात्रीच्या तापमानात सातत्याने घट होत जात आहे. जळगावमध्ये ठिकठिकाणी नागरिक थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

जळगावात दोन दिवसांपासून जिल्ह्यात वाऱ्यांचा वेग देखील वाढला आहे. जळगाव शहरात शनिवारी व रविवारी देखील ९ ते ११ किमी प्रतितास या वेगाने वारे वाहत असलेले पहायला मिळाले. किमान तापमानासह कमाल तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे दिवसाही काही प्रमाणात गारवा जाणवत आहे. गेल्या ८ दिवसात किमान तापमानात तब्बल ११ अंशाची घट झाली आहे. आगामी तीन दिवस जिल्ह्यात थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.