Maharashtra College Reopening : राज्यातील कॉलेज 20 ऑक्टोबरपासून सुरु, विद्यार्थ्यांना दोन्ही डोस आवश्यक
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असल्याचं सांगितलंय. विद्यार्थ्यांना दोन्ही लस आवश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संकटापायी बंद असलेले कॉलेज पुन्हा सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असल्याची माहिती दिलीय. विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस आवश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय. 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली करण्यात आलीय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री आणि सचिव यांची एक बैठक झाली, या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आलाय. विद्यापीठ महाविद्यालय वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला देण्यात आलेत, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलीय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
तर महाविद्यालयांनी कॅम्पस घेत लसीकरण करावे
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा निर्णय सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असेल. दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्पस घेत लसीकरण करावे, अशा सूचनाही देण्यात आल्यात. विशेष म्हणजे वसतिगृह सुरू करण्याचा आदेशही दिलाय. शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक यांचं लसीकरण पूर्ण झालं पाहिजे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिलीय.
‘स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा’
“तिसरी लाट येणार आहे की नाही ते अद्याप कुणालाच माहिती नाही. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची नियमावली तयार करण्याची वेळ आली तर विद्यापीठाने त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे स्पष्ट मत आम्ही शासन म्हणून घेतलेला आहे. कारण काही अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. तसेच काही ठिकाणी प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे हीच नियमावली लागू करायची की नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. प्रत्येक जिल्ह्यात कदाचित वेगवेगळी नियमावली असू शकते”, असं सामंत म्हणाले.
‘त्या विद्यार्थ्यांसाठी कम्पलसरी ऑनलाईन व्यवस्था करावी’
“ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये उपस्थित राहणं शक्य होणार नाही त्यांची कम्पलसरी ऑनलाईन व्यवस्था महाविद्यालय किंवा विद्यापीठांनी करुन द्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड 19 ची लस घेतली नाही त्यांच्याकरता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून विशेष लसीकरण मोहिम राबवावी, अशा सूचना आम्ही जीआरमध्ये नमूद केला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
‘वसतीगृह देखील टप्प्याटप्प्याने सुरु होणार’
“वसतीगृहांच्या संदर्भात देखील मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. टप्प्याटप्प्याने वसतीगृह उघडण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण ही सुरु करत असताना मुंबई उच्च शिक्षण संचालक आणि पुण्याचे उच्च शिक्षण संचालकांनी यांनी पूर्ण वसतीगृहांचा आढावा घ्यायचा आहे. त्यानंतरच वसतीगृह सुरु करायचे आहेत”, अशी सूचना उदय सामंत यांनी केली. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि आऊटसोअर केलेला स्टाफ जो विद्यालयात काम करतो त्यांचं शंभर टक्के लसीकरण करुन घेण्याचा प्रयत्न विद्यापीठांनी केला पाहिजे, असंशी सूचना त्यांनी केली.
ऑनलाईन वर्ग सुरु राहणार
शाळेत न येणाऱ्या मुलांसाठी ऑनलाईन वर्गाचे सुद्धा आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचे दैनंदिन तापमान नोंदविल्यानंतरच प्रवेश देण्यात येत आहे. तसेच 25 विद्यार्थी क्षमतपेक्षा जास्त विद्यार्थी झाल्यानंतर आज ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे त्या विद्यार्थ्यांना उद्या प्रवेश न देता एक दिवसाआड या पद्धतीने प्रवेश देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी आपल्या तोंडावरील मास्क काढू नये तसेच आपले दप्तर घरी गेल्यानंतर निर्जंतुकीकरण करून घेण्याचे सूचनाही गेल्या काही दिवसांपूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना दिल्या होत्या.
विद्यार्थ्यांना आखून दिलेल्या चौकांनाप्रमाणे शाळेत प्रवेश करणे, तसेच प्रवेश केल्यानंतर आपले नाव व नंबर असलेल्या बेंचवर बसावे, असेही महापौरांनी यावेळी सांगितले. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी स्वतःजवळ साबण बाळगणे आवश्यक असून साबणाने हात निर्जंतुकीकरण केल्यानंतरच पिण्याचे पाणी प्यावे, प्रत्येक वर्ग खोलीमध्ये विद्यार्थ्यांचे नावांची यादी लावण्यात आली असून तसेच नियम पाळण्याच्या सूचना याचे ठिकठिकाणी स्टिकर लावण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केल्यानंतर सहकाऱ्यांना मिठी मारू नये तसेच टाळी देऊ नये. त्यासोबतच स्वच्छ, सुंदर शाळेमध्ये प्रकृती स्वास्थ्य चांगले असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले होते.
आठवड्यातून तीन दिवस निर्जंतुकीकरण
शाळेसोबत आरोग्य केंद्र संलग्न करण्यात आले असून विद्यार्थ्यांना काही त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने आपल्या शिक्षकांना सांगावे, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले होते. तसेच ज्या पालकांची प्रवासाची समस्या आहे त्या पालकांबाबत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करून त्यांना रेल्वेची पास कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच मुले एकत्र खेळणार नाही, डब्बा आणणार नाही याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच शाळेची इमारत आठवड्यातून तीन दिवस निर्जंतुकीकरण करून घेण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. याप्रसंगी नगरसेवक अँड. संतोष खरात, सह आयुक्त (शिक्षण ) अजित कुंभार, उप शिक्षणाधिकारी संजीवनी कापसे तसेच माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व मनपा शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नियमावली नेमकी काय?
1. आपले दप्तर भरताना शालेय वस्तूंसोबतच सॅनिटायझरची बाटली जरुर भरा. 2. शाळेत जाण्यासाठी तयार होताना तोंडावर मास्क घालणे विसरू नका. 3. शाळा घराजवळ असेल तर चालत किंवा सायकलने जा.बसने जाताना एका सीटवर 4. एकाच विद्यार्थ्याने बसावे, पूर्ण वेळ मास्क वापरा.शाळेत प्रवेश करताना आणि शाळा सुटताना शारीरिक अंतर पाळा. 5. शाळेत येताना शाळेतील कर्मचा-यांना विद्यार्थ्यांचे तापमान मोजू द्या. 6. वर्गात प्रवेश करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरने निर्जंतुक करा. 7.नेमलेल्या बाकांवरतीच बसा, मित्रांसोबत जागेची अदलाबदल करू नका.
संबंधित बातम्या