महाराष्ट्र काँग्रेसमध्ये होणार मोठा बदल, प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेंच, ‘ही’ नावं चर्चेत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षपदाची शर्यत रंगली आहे. यासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये होणार मोठा बदल, प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेंच, 'ही' नावं चर्चेत
नाना पटोले
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 4:18 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाले. तर महाविकासआघाडीचा सुफडासाफ झाला. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. राज्यात फक्त १६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर सध्या काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच प्रदेशाध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गटनेता व्हायचे असल्याने प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. त्यातच नाना पटोले यांनी विधिमंडळात गटनेता व्हायचे असल्याने प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. यामुळे सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. आता यासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेंच

नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची चर्चा रंगली आहे. यात विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार यांच्यासह इतर काही नावांची चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांची गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. तर मुख्य प्रतोद पदी अमित देशमुख यांची निवड होणार असल्याचे बोललं जात आहे.

विजय वडेट्टीवारांचा विरोध?

दरम्यान नाना पटोले हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार झाले असेल तरी ते विधिमंडळातील गटनेतेपद मिळवण्यासाठी आग्रही आहेत. पण याला काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून विरोध केला जात आहे. नाना पटोले यांना विधिमंडळ गटनेता करण्याची चर्चा मी ऐकलेली नाही. तो निर्णय हायकमांड करेल. दिल्ली निर्णय घेईल. त्यांच्यासोबत चर्चा होईल, हा निर्णय नाना पटोले यांचा नाही किंवा विजय वडेट्टीवार यांचा नाही. प्रभारी येतील तेव्हा कोणाला गटनेता करायचं याचा निर्णय होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. त्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.