विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसने ही तीन नावं राहुल गांधींना पाठवली

मुंबई : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी तीन नावांवर शिक्कामोर्तब केलंय. विरोधीपक्ष नेता निवडीचा अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आल्याचा ठराव आमदारांनी मंजूर केला. याला सर्व आमदारांकडून अनुमोदन देण्यात आलं. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व आमदारांची भेट घेतली. काँग्रेस विधीमंडळ […]

विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसने ही तीन नावं राहुल गांधींना पाठवली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी तीन नावांवर शिक्कामोर्तब केलंय. विरोधीपक्ष नेता निवडीचा अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आल्याचा ठराव आमदारांनी मंजूर केला. याला सर्व आमदारांकडून अनुमोदन देण्यात आलं. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व आमदारांची भेट घेतली.

काँग्रेस विधीमंडळ बैठकीत तीन नावांची चर्चा झाली. यामध्ये बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार आणि वर्षा गायकवाड यांच्या नावाची बैठकीत चर्चा झाली. गटनेता निवड अंतिम निर्णय दिल्लीत हायकमांड घेण्याचा निर्णय करण्यात आला आणि सर्व आमदारांनी यासाठी एकमताने पाठिंबा दिला. विखेंचे कट्टर प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांनाच विरोधी पक्षनेते पद मिळणार का याकडे लक्ष लागलंय.

बाळासाहेब थोरातांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी?

नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे एका पक्षात असले तरी त्यांचं जमत नाही. पण विखे पाटलांनी आता भाजपशी जवळीक साधल्यानंतर काँग्रेसकडून थोरातांना बळ दिलं जातंय. काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये सभा घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थोरातांच्या निवासस्थानी मुक्कामही केला होता. शिवाय एकत्र प्रवास केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यावर विधानसभेपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार असल्याचं बोललं जातंय.

VIDEO :

बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.