उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढतेय. अशावेळी कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. हा लॉकडाऊन का गरजेचा आहे? याचं उत्तर तुम्हाला उस्मानाबादच्या स्मशानभूमीतील चित्र पाहिल्यावर लक्षात येईल. उस्मानाबादच्या स्मशानभूमीत आज एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे चित्र पाहून स्मशानभूमीही गहिवरली असेल! (Funeral on 19 bodies at a time in Osmanabad cemetery)
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत आज 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे 8 मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवीन 590 रुग्ण सापडले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 224 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत. सक्रिय रुग्णाची संख्या 4 हजार 940 झाली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे, असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर सातत्याने करत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी रॅपिड तपासणीत 406 रुग्ण आणि आरटीपीसीआर चाचणीत 184 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या आता 643 झाली आहे.
उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 307 रुग्ण सापडले. तुळजापुरात 40, उमरगा तालुक्यातील 74 रुग्णांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 4 हजार 940 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे रुग्णालयात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.उस्मानाबाद शहर आणि तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 77 हजार 613 नमुने तपासले गेले. त्यापैकी 26 हजार 467 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 20.24 टक्के आहे. जिल्ह्यात 20 हजार 884 रुग्ण बरे झाले असून 79.99 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 643 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.44 टक्के मृत्यू दर आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात मंगळवारी 307 रुग्ण , तुळजापूर 40, उमरगा 74, लोहारा 35, कळंब 36, वाशी 21, भूम 42 व परंडा तालुक्यात 35 रुग्ण सापडले आहेत.
PHOTO : उस्मानाबादेतील स्मशानभूमीत एकावेळी 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, 8 मृतदेह अंत्यविधीच्या प्रतिक्षेत https://t.co/gH2k3PeN6m @ranajagjitsinh1 @rajeshtope11 @OfficeofUT @GadakhShankarao #Osmanabad #maharashtralockdown #CoronaDeath #OsmanabadCemetery #CoronaDeathRate
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 14, 2021
संबंधित बातम्या :
Maharashtra Lockdown Sanchar Bandi : महाराष्ट्रात 15 दिवस संचारबंदी लागू, अंतिम नियमावली जरुर पाहा
Funeral on 19 bodies at a time in Osmanabad cemetery