Corona Update : राज्यात कोरोनाचा आलेख चढताच, आजही रुग्णसंख्या वाढली, वाचा तुमच्या शहरात किती रुग्ण?
आज राज्यात 2813 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 1047 रुग्ण आज कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच एका कोरोना रुग्णाचा मृत्युही झाला असल्याने चिंता वाढली आहे. आज एकट्या मुंबईत 1702 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत.
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा (Corona Update) आलेख हा चढताच आहे. कारण आजही राज्यतल्या रुग्णसंख्येतली वाढ (Today Corona Update) ही कायम आहे. आज राज्यात 2813 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 1047 रुग्ण आज कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच एका कोरोना रुग्णाचा मृत्युही झाला असल्याने चिंता वाढली आहे. आज एकट्या मुंबईत 1702 नवे कोरोना रुग्ण आढळून (Mumbai Corona Update) आलेत. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईचा धोका हा वाढत चालला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनानेही पुन्हा अलर्ट होत आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तर मुख्यमंत्र्यांनकडूनही लोकांना मास्क वापरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीही काही ठिकाणी लोकांचा निष्काळजीपण उघडपणे दिसून येत आहे.
देशातली रुग्णसंख्याही वाढली
देशात आज नवे कोरोना रुग्ण – 7,240 आढळून आले आहेत. तर सक्रिय कोरोना रुग्ण 32498 झाली आहेत, तसेच 3641 हे बरे झाले आहेत. मात्र देशात गेल्या 24 तासात 8 कोरोना रुग्णांचा मृत्युही झाला आहे. तर आतापर्यंत देशात एकूण मृत्यू 524723 वर पोहोचले आहेत, तसेच आतापर्यंत 194 कोटी 59 लाख 81 हजार 691 लसींंचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
India records 7,240 new COVID19 cases in the last 24 hours; Active cases rise to 32,498 pic.twitter.com/mnXkuoRsCY
— ANI (@ANI) June 9, 2022
गेल्या काही दिवसातली कोरोना आकडेवारी
गेल्या काही दिवसांतल्या सततच्या वाढत्या कोरोना आकडेवारीमुळे पुन्हा मास्कसक्तीही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल राज्यात 2701 नवे कोरोना रुग्ण आढळले होते, त्याच रुग्णसंख्येत पडणारी भर आज कायम आहे, तर काल एकट्या मुंबईत 1765 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असल्याने धाबे दणाणले होते, आजची आकडेवारीही मुंबईतील थोडीशी घटली असली तर फार दिलासादायक नाही. त्यामुळे पालिका प्रशासन पुन्हा जोमाने कामाला लागले आहे.
चौथी लाट किती धोकादायक?
कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट ही सर्वात जास्त हानीकारक ठरली आहे. यात अनेक लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. मात्र तिसऱ्या लाटेपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस आल्याने तिसऱ्या लाटेने जास्त हैराण केले नाही, वाढलेली रुग्णसंख्या काही दिवसातच अटोक्यात आणण्यात यश आलं. आता तर लसीकरणचा टक्का चांगलाच वाढला आहे. त्यामुळे चौथ्या लाटेचा धोका कमी असेल असे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.