Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा घसरला पण चिंता कायम, तर पुण्यात मोठी रुग्णवाढ

| Updated on: Jan 09, 2022 | 8:14 PM

मुंबईतील काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. कारण मागील तीन दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजाराच्या पुढे होता. तो आज 19 हजारावर आला आहे. दुसरीकडे पुण्यातील रुग्णांचा आकडा मात्र दुपटीने वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा घसरला पण चिंता कायम, तर पुण्यात मोठी रुग्णवाढ
कोरोना
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी राज्य सरकारनं 10 जानेवारीपासून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नवी नियमावलीही (New Corona Guidelines) शनिवार जाहीर करण्यात आली आहे. अशावेळी मुंबईतील काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. कारण मागील तीन दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजाराच्या पुढे होता. तो आज 19 हजारावर आला आहे. दुसरीकडे पुण्यातील रुग्णांचा आकडा मात्र दुपटीने वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 19 हजार 474 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी मुंबईत सलग तीन दिवस कोरोना रुग्णांची संख्या 20 हजाराच्या पुढे गेली होती. 8 जानेवारी रोजी मुंबईत 20 हजार 318 नवे रुग्ण सापडेल होते. 7 जानेवारी अर्थात शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971 कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 8 हजार 490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले होते. त्याआधी 6 जानेवारी अर्थात गुरुवारी मुंबईत 20 हजार 181 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

पुण्यात रुग्णवाढ दुप्पट

पुण्यात आज तब्बल 4 हजार 29 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 688 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. पुणे शहरातील 1 आणि ग्रामीण भागातील 2 अशा एकूण 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात 134 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. ही आकडेवारी पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे. कारण, काल पुण्यातील रुग्णसंख्या 2 हजाराच्या घरात होती, ती आज 4 हजाराच्या पुढे गेली आहे.

दरम्यान, पुणे मनपा हद्दीत आज ४ हजार ०२९ नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असली तरी 14 हजार 890 सक्रीय रुग्णांपैकी केवळ 5.48 टक्केच रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवाय आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून काळजी करण्याऐवजी काळजी घ्यावी, इतकंच ! असं ट्वीट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलंय.

मुंबईमध्ये सेल्फ टेस्ट किटवर बंदी

मुंबईमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा एक महत्त्वाचे कारण आता समोर आले आहे. मुंबईमधील अनेक रुग्ण हे कोविड सेल्फ टेस्ट किटचा वापर करत आहेत. या किटच्या मदतीने ते आपल्या घरीच कोरोनाची टेस्ट करतात. अनेक जण लक्षणे आढळल्यानंतर देखील कोरोना टेस्ट करण्यासाठी लॅबमध्ये जात नाहीत. घरीच कोरोना टेस्ट करत असल्यामुळे कोरोनाचा योग्य आकडा समोर येत नाही, तसेच कोरोनाबाधित रुग्णाची ओळख लपून राहात असल्यामुळे संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता अशा किटवर मुंबईमध्ये बंदी येऊ शकते. तसे संकेत मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी दिले आहेत.

इतर बातम्या :

Narendra Modi : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमी पंतप्रधान मोदींची अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक, देशातील स्थितीवर मंथन

शिवसेना आमदाराचं ‘ते’ पत्र व्हायरल, नंतर आमदार म्हणतात ‘तो मी नव्हेच’! तर भाजपकडून मात्र पत्राला जनभावनेची उपमा