Maharashtra Corona Update : चिंता वाढली, राज्यात दिवसभरात 47 हजार 827 रुग्णांची भर, तर मृतांचा आकडा 200 पार!
राज्यात आज दिवसभरात तब्बल 47 हजार 827 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 24 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती अत्यंत विदारक बनत चालली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अनेक शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होतेय. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक बनलाय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 47 हजार 827 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 24 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 202 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णांचा हा आकडा राज्याची चिंता वाढवणारा आहे. (47,827 new corona patients were found in the state, while 202 died due to corona)
#Maharashtra #COVID19 Updates for today
47,827 new cases have been reported in the state today
The state tally of #Covid_19 positive patients is now 29,04,076
District-wise details of cases and deaths until today are as follows:
(3/4)? pic.twitter.com/IywH4AKbn1
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) April 2, 2021
राज्यात सध्या 3 लाख 89 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.62 टक्के झालं आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.91 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 21 लाख 1 हजार 999 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 19 हजार 237 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईतील कोरोना स्थिती –
मुंबईतील कोरोना स्थितीही दिवसेंदिवस बिघडत आहे. मुंबईत आज दिवसभरात 8 हजार 832 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 5 हजार 352 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरात 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 16 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 13 पुरुष तर 7 महिलांचा समावेश आहे.
मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्क्यांवर पोहोचलाय. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 46 दिवसांवर आला आहे. 26 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.46 टक्के झाला आहे.
#CoronavirusUpdates २ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/IqPkvLKTVN
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 2, 2021
पुण्यातील कोरोना स्थिती –
पुणे शहरात आज दिवसभरात 4 हजार 653 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 3 हजार 337 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यातील मृतांची संख्या आज वाढली आहे. दिवसभरात 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 7 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. पुण्यात सध्या 37 हजार 126 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यातील 475 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
नव्या आकडेवारीसह पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 27 लाख 8 हजार 99 झाला आहेत. त्यातील 23 लाख 5 हजार 597 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत 5 हजार 376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पाहिला तर तो अतिशय चिंताजनक आहे. कारण पुण्यात आज तब्बल 9 हजार 86 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Maharashtra: Pune district reports 9,086 fresh COVID19 cases, 6,000 recoveries, and 58 deaths in the last 24 hours.
Total cases: 5,51,508 Total recoveries: 4,73,714 Death toll: 10,097 Active cases: 67,866
— ANI (@ANI) April 2, 2021
तर पिंपरी चिंचवडमध्ये आज 2 हजार 463 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 507 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 19 कोरोनारुग्णांचा मृत्यू झालाय.
नागपुरातील कोरोना स्थिती –
नागपुरातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अत्यंत चिंताजनक बनलं आहे. आज दिवसभरात 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 108 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिवसभरात 3 हजार 214 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 33 हजार 776 वर पोहोचली आहे. त्यातील 18 लाख 7 हजार 751 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 5 हजार 218 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिकमधील कोरोना स्थिती –
नाशिकमध्ये आज दिवसभरात 3 हजार 995 नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. तर 3 हजार 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 18 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज वाढलेल्या रुग्णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीत 2 हजार 305, नाशिक ग्रामीण परिसरात 1 हजार 513, मालेगाव महापालिका क्षेत्रात 116 तर जिल्ह्याबाहेरील 61 रुग्णांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? वाचा लाखमोलाच्या सवालावर मुख्यमंत्र्यांचं थेट उत्तर
47,827 new corona patients were found in the state, while 202 died due to corona