Maharashtra Corona Update : महाराष्ट्राला दिलासा, 12 जिल्ह्यातील रुग्णसंख्येत काहीशी घट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे.

Maharashtra Corona Update : महाराष्ट्राला दिलासा, 12 जिल्ह्यातील रुग्णसंख्येत काहीशी घट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
कोरोना चाचणी प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 7:43 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर गेल्या 15 दिवसांत ही रुग्णसंख्या घटल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात नागरिक, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Decline in corona cases in 12 districts of Maharashtra)

राज्यातील ज्या 12 जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, त्यात औरंगाबाद, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, ठाणे, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. तसंच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत असल्याचं राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती ?

औरंगाबाद – 4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान औरंगाबादेतील कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 505 झाली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान औरंगाबादेतील रुग्णसंख्या 6 हजार 748 पर्यंत खाली आली आहे.

भंडारा – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान भंडाऱ्यात कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 550 वर पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान रुग्णसंख्या 6 हजार 751 पर्यंत खाली आली आहे.

धुळे – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान धुळ्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 15 वर जाऊन पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 373 पर्यंत आली आहे.

गोंदिया – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान गोंदियातील कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 798 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 295 पर्यंत खाली आली आहे.

जळगाव – 28 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान जळगावात कोरोना रुग्णांची संख्या 8 हजार 232 वर पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान जळगावातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 186 वर आली आहे.

लातूर – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान लातूरमधील कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 566 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 8 हजार 345 पर्यंत खाली आली आहे.

मुंबई – 4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 58 हजार 598 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 23 हजार 903 पर्यंत कमी झाली आहे.

मुंबई उपनगर – 4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान मुंबई उपनगरातही कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 345 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 6 हजार 520 पर्यंत कमी झाली आहे.

नांदेड – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान नांदेडमधील कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 728 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 5 हजार 577 पर्यंत कमी झाली आहे.

नंदुरबार – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान नंदुरबारमधील कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 795 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 1 हजार 256 पर्यंत कमी झाली आहे.

ठाणे – 4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 हजार 877 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 25 हजार 997 पर्यंत खाली आली आहे.

वाशिम – 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान वाशिममधील कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 494 पर्यंत पोहोचली होती. आता 25 एप्रिल ते 1 मे दरम्यान ही संख्या 2 हजार 736 पर्यंत कमी झाली आहे.

संबंधित बातम्या :

लस रातोरात बनत नाही, ती एक प्रक्रिया, वेगवान लस कशी देऊ? : अदर पुनावाला

कोरोनाच्या सौम्य लक्षणांमध्ये CT-SCAN करू नका, एम्सच्या संचालकांनी सांगितलं ‘कारण’

Decline in corona cases in 12 districts of Maharashtra

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.