डहाणू, पालघर : पावसाचा (Maharashtra Rain) आनंद घेण्यासाठी एका दहावीत शिकणाऱ्या मुलाने वडिलांची फोर व्हीलर घेतली. फेरफटका मारण्यासाठी त्याने रस्त्यावर गाडी चालवायला सुरुवात केली. पण पुढं अघटित घडलं. डहाणू-बोर्डी (Dahanu) राज्य महामार्गावरील पारनाका येथे या मुलाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोन संरक्षक कर्मचाऱ्यांना धडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरत राऊत (55) आणि व्यंकेश झोप (38) अशी मृतांची नावं आहेत. तर या अपघातात (Accident) 16 वर्षीय तरुणही किरकोळ जखमा झाला आहे. ही घटना घडली तेव्हा मुलगा गाडीमध्ये एकटाच होता. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याचे वडील आणि त्याच्या घरातील इतरांना माहित होतं की, त्याला गाडी चांगल्या प्रकारे चालवता येते, त्याचमुळे त्यांनी मला गाडी चालवायला दिली.
डहाणू-बोर्डी राज्य महामार्गावरील पारनाका येथे दहावीत शिकणाऱ्या मुलाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोन संरक्षक कर्मचाऱ्यांना धडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरत राऊत (55) आणि व्यंकेश झोप (38) अशी मृतांची नावं आहेत. तर या घटनेत 16 वर्षीय तरुणही किरकोळ जखमा झाला आहे.
सकाळी 8.30 च्या सुमारास हा तरूण आपली गाडी घेऊन जात होता. पाऊस येत होता तेव्हा हे दोघे पावसाचं पाणी साचू नये यासाठी काम करत होते. इतक्यात त्याच्या गाडीला अपघात झाला. डहाणू नगरपरिषदेतील कर्मचारी भरत राऊत (55) आणि व्यंकेश झोप (38) यांना त्याच्या गाडीने धडक दिली. मुसळधार पाऊस पडत असल्यानं हे दोघंही हॉटेलजवळ थांबले होते. तेवढ्यात ही कार त्यांच्यावर येऊन आदळली. तिने या दोघांना चिरडलं आणि ही कार हॉटेलच्या भिंतीवर जाऊन धडकली. स्थानिकांनी दोघांना तातडीने डहाणूतील कॉटेज रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच दोघांना मृत घोषित करण्यात आलं.
हा मुलगा डहाणूतच राहणारा असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या मुलावर आयपीसी कलम 304 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पीआय नामदेव बंडगर यांनी दिली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.