राज्यात 14 एप्रिलनंतर संचारबंदी आणखी कडक, तुमच्या जिल्ह्यातील नियमावली काय?

त्यामुळे आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये कसा आणायचा, सगळ्यांनी प्रयत्न करा, असे आवाहन प्रशासनाने केलं (Maharashtra red green orange zone) आहे. 

राज्यात 14 एप्रिलनंतर संचारबंदी आणखी कडक, तुमच्या जिल्ह्यातील नियमावली काय?
Follow us
| Updated on: Apr 13, 2020 | 9:07 AM

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रसार वेगाने वाढत (Maharashtra red green orange zone)  आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकरानं संचारबंदी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण 14 एप्रिलनंतरच्या दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन स्वरुप बदलणार आहे. हे स्वरुप नेमकं कसं असणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

येत्या 14 एप्रिलनंतर महाराष्ट्रातील लॉकडाऊन हे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोननुसार (Maharashtra red green orange zone) असणार आहे. यानुसार त्या त्या जिल्ह्यानुसार प्रत्येक झोनमधील नियमावली ठरणार आहे. त्यामुळे त्या परिसरातील संचारबंदी ठरणार आहे.

मुंबई, कोल्हापूर, नंदुरबार याठिकाणी लॉकडाऊनची स्थिती वेगवेगळी असणार आहे. एकीकडे मुंबईत सर्वाधिक रुग्णा आढळले आहेत. तर कोल्हापुरात मोजके रुग्ण आणि नंदुरबारमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे वेगवेगळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये 14 एप्रिलनंतर लॉकडाऊनची काय स्थिती असेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लॉकडाऊन वाढवल्यानंतर आता राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे. यात 15 पेक्षा जास्त रुग्णसंख्या असणारे जिल्हे रेड झोनमध्ये असणार आहे. तर 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे हे ऑरेंज झोनमध्ये असणार आहे. त्याशिवाय एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये असणार आहे.

दरम्यान जे जिल्हे रेड झोनमध्ये असणार आहे. त्यांच्यासाठी लॉकडाऊन कडक असणार आहे.

राज्यातील रेड झोन

मुंबई ठाणे पुणे पालघर नागपूर रायगड सांगली औरंगाबाद नाशिक

रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी कडक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी भाजीपाला मार्केट बंद ठेवलं जाणार आहे.

ऑरेंज झोनमध्ये काय होणार?

रेड झोनच्या तुलनेत म्हणजे 15 पेक्षा कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोन म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.

राज्यातील ऑरेंज झोन

रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर अहमदनगर जळगाव उस्मानाबाद बीड जालना हिंगोली लातूर अमरावती अकोला यवतमाळ बुलडाणा वाशिम गोंदिया

या ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा पूर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत. पण, या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या तुलनेनं कमी असल्यानं, तिथले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले जाऊ शकतात.

ग्रीन झोनला सर्वाधिक दिलासा

एकीकडे रेड झोनमध्ये लॉकडाऊन कडक होणार आहेत. तर दुसरीकडे एकही कोरोना बाधित नसलेल्या जिल्ह्याना मात्र लॉकडाऊनमधून काहीसा दिलासा मिळणार आहे.

ग्रीन झोन

धुळे नंदुरबार सोलापूर परभणी नांदेड वर्धा चंद्रपूर भंडार गडचिरोली

विशेष म्हणजे 14 एप्रिलनंतर संचारबंदीत ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे. कारण अशा जिल्ह्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जाणार आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

ग्रीन झोनमधले जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आणि ऑरेंज झोनमधील जिल्हे रेड झोनमध्ये जाणार नाहीत याचं आव्हान सरकारसमोर आहे. त्यासाठी स्वयंशिस्त हीच महत्वाची आहे. ग्रीन झोनमधल्या लोकही बंधनमुक्त असतील असं नाही. पण काही व्यवहार तिथं सुरु होऊ शकतात. त्यामुळे आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये कसा आणायचा, सगळ्यांनी प्रयत्न करा, असे आवाहन प्रशासनाने केलं (Maharashtra red green orange zone) आहे.

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.