Maharashtra Election Results 2024 Live : एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी एकमताने निवड

| Updated on: Nov 26, 2024 | 8:50 PM

Maharashtra Assembly Election Final Results 2024 and Winner Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं आज मतमोजणी झाली. राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीलाच कौल दिला असून महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीचं अक्षरश: पानिपत झालं असून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

Maharashtra Election Results 2024 Live : एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी एकमताने निवड
Maharashtra Assembly Election Results 2024Image Credit source: tv9 marathi

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे सर्व निकाल स्पष्ट झाले आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मविआचा दारुण पराभव झाला आहे. महायुतीने 220 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. भाजप हा महायुतीतला सर्वात मोठा भाऊ ठरला आहे. भाजपला 130 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. तर शिंदे शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. तर मविआला 50 जागांवरही विजयी होता आलं नाही. विशेष म्हणजे मविआतील घटक पक्षांना विरोधी पक्षनेते पदासाठी लागणारा 29 आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्ष नेताच राहणार नाही.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Nov 2024 10:22 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून एकमताने निवड

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये निवडून आलेल्या सर्व आमदारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेता ठरवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांच्या गटनेतापदी नियुक्ती व्हावी, असा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

  • 24 Nov 2024 02:57 PM (IST)

    तर आज चित्र वेगळं असतं, राऊतांचा हल्लाबोल

    महाविकास आघाडीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जोरदार झटका बसला. ईव्हीएममधील गडबडीमुळे असा निकाल लागल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तर आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर आज चित्र वेगळं असतं, असे ते म्हणाले.

  • 24 Nov 2024 02:39 PM (IST)

    जरांगेंमुळे माझ्या मतदानावर परिणाम

    मनोज जरांगे हे अखेरच्या टप्प्यात माझ्या मतदारसंघात आले. त्यांनी मी आजारी आहे, त्यामुळे त्यांनी समाजाला आव्हान केलं होते. जरांगेमुळे माझ्या मतदानावर परिणाम झाल्याचे भुजबळ म्हणाले.

  • 24 Nov 2024 02:01 PM (IST)

    शिंदे गटाची बैठक संध्याकाळी

    ग्रामीण महाराष्ट्रातील निवडून आलेल्या उमेदवारांना पोहचण्यास उशीर होत असल्यामुळे बैठक संध्याकाळी ६ वाजता नियोजित करण्यात आली आहे.

  • 24 Nov 2024 02:00 PM (IST)

    एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे

    एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे, असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे. भाजप मोठे भाऊ आहेत.. देशात आणि राज्यात पण आहे.. पण छोट्या भावाने चांगली कामगिरी पाहून जनतेच्या मनातील लोकप्रियता पाहून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी.

  • 24 Nov 2024 01:57 PM (IST)

    ही जनतेची मला भेट- सुजय विखे

    महायुतीला जिल्हयात 12 पैकी 10 जागा मिळणे ही मला अहिल्यानगरच्या जनतेने माझ्या वाढदिवसाची दिलेली सर्वात भेट आहे, असे सुजय विखे यांनी सांगितले.

  • 24 Nov 2024 01:47 PM (IST)

    गद्दारी करणारे निवडणून आले- अहिर

    राज्यात महायुतीकडे वातावरण नसताना जे घडले ते अनेपक्षित आहे. लोकांमध्ये राहणारे नेते लोकांनी नाकारले आहे. गद्दारी केलेल्या लोकांना निवडून कसे दिले? हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. येत्या काही दिवसांत याच विश्लेषण होईल, असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.

  • 24 Nov 2024 01:37 PM (IST)

    भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जल्लोष

    अमरावती जिल्ह्यात 8 पैकी 7 जागांवर महायुतीचा दणदणीत विजय झाला. विजय उमेदवारांचे अमरावतीच्या राजापेठ भाजप कार्यालयात अभिनंदन केले जात आहे. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष होत आहे.

  • 24 Nov 2024 01:19 PM (IST)

    शिवसेनेला चार अपक्ष आमदारांचे समर्थन

    शिवसेनेला चार अपक्ष आमदारांनी समर्थन दिले आहे. त्यात अशोक माने, हातकणंगले, राजेंद्र यड्रावकर, शिरोळ, शरद सोनवणे, जुन्नर, रत्नाकर गुट्टे, गंगाखेड यांचा समावेश आहे.

  • 24 Nov 2024 01:06 PM (IST)

    अजित पवार गटनेते

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांची गटनेतेपदी निवड झाली.

  • 24 Nov 2024 12:59 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीहून मुंबईकडे रवाना

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. इस्लामपूर इथून जयंत पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. महाविकास आघाडीच्या पराभवानंतर इस्लामपूरमधील विजयाचा जल्लोष टाळात जयंत पाटलांनी मौन बाळगला होता. आज सकाळी ते मुंबईकडे तातडीने रवाना झाले आहेत. ते शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.

  • 24 Nov 2024 12:50 PM (IST)

    शिवसेना कोणाची याचा थेट निकाल जनतेनं दिला- दीपक केसरकर

    “शिवसेना कोणाची याचा थेट निकाल जनतेनं दिलाय. आम्ही निवडून आलो की विरोधक ईव्हीएमला दोष देतात,” अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी टोला लगावला आहे.

  • 24 Nov 2024 12:41 PM (IST)

    मराठ्यांशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही- जरांगे पाटील

    “मराठ्यांशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. काल देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सांगितलं की मराठा समाज भाजपसोबत होता. मराठ्यांची विभागणी होऊ शकत नाही. मीच मराठा समाजाला मुक्त केलं होतं. मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं. मी मैदानात नव्हतो तर फॅक्टर फेल कसा झाला? एक महिन्याभर थांबा, तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले,” असं जरांगे पाटील म्हणाले.

  • 24 Nov 2024 12:30 PM (IST)

    धुळ्यातील सर्व महायुतीचे उमेदवार मुंबईकडे रवाना

    धुळ्यातील सर्व महायुतीचे उमेदवार मुंबईकडे रवाना झाले आहेत. संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाची बैठक होणार आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) मंजुळा गावित बैठकीसाठी रवाना झाल्या आहेत. तर भाजपाचे चारही आमदार देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत.

  • 24 Nov 2024 12:20 PM (IST)

    महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर लागणार वर्णी

    महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. विधानसभेत डावललेल्या नाराजांना विधान परिषदेवर संधी मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परिषदेतील 4 आमदारांची विधानसभेवर वर्णी लागणार आहे. विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके विधानसभेवर निवडून गेल्याने भाजपच्या 4 जागा रिक्त झाल्या आहेत.

    शिवसेनेकडून आमशा पाडवी यांची विधानसभेवर निवड झाली आहे. तर राजेश विटेकर विधानसभेवर निवडून गेल्याने राष्ट्रवादीची परिषदेतील एक जागा रिक्त झाली आहे. अनेक नाराज मंडळींपैकी नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलंय.

  • 24 Nov 2024 12:10 PM (IST)

    जरांगे फॅक्टर कळायला हयात जाईल तुमची- मनोज जरांगे पाटील

    “”कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावा. पण श्रेय घेताना लोकांनी आपली औकात बघितली पाहिजे. काल सगळे म्हणत होते जरांगे फॅक्टर फेल झाला, पण आम्ही मैदानातच नाही तर कसं फेल झालो. कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय आम्हाला सोयरसुतक नाही. आले तेवढे मराठा फॅक्टर मिळाले. जरांगे फॅक्टर कळायला हयात जाईल तुमची,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 24 Nov 2024 12:00 PM (IST)

    Maharashtra News: शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधींची आज मुंबईतील ताज लॅंड्स हॅाटेलमध्ये बैठक

    विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे निवडूण आलेले नवनिर्वाचीत उमेदवार या बैठकीला उपस्थित रहाणार… या बैठकीत शिवसेना विधिमंडळ गट नेता निवडला जाणार आहे… शिवसेना विधिमंडळ गट नेता निवडीनंतर नव नियुक्त गट नेता महायुतीच्या सहकारी पक्षांच्या गटनेत्यासोबत सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे निवेदन प्रस्ताव सादर करणार…

  • 24 Nov 2024 11:40 AM (IST)

    Maharashtra News: सरकारनं आता मराठ्यांशी बेईमानी करायची नाही… जरांगे पाटील

    गोल बोलून मराठ्यांची मतं घेतलीत आता उद्याचा दिवस आमचा… सरकारनं आता मराठ्यांशी बेईमानी करायची नाही… आम्ही मैदानात असतो तर तुमच्यात किती दम आहे हे बघितलं असतं… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.

  • 24 Nov 2024 11:23 AM (IST)

    Maharashtra News: मी भाजप सोडून कोणताही विचार करू शकत नाही – शिवाजी पाटील

    मी भाजप सोडून कोणताही विचार करू शकत नाही… चंदगड मधील विजयी उमेदवार शिवाजी पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका.. भाजपचे पदाधिकारी असलेल्या शिवाजी पाटील यांनी चंदगड मधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढवली होती निवडणूक…

  • 24 Nov 2024 11:06 AM (IST)

    Maharashtra News: महायुतीचे सर्वच आमदार आणि महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची आज सायंकाळी पाच वाजता बैठक

    कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे सर्वच आमदार आणि महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची आज सायंकाळी पाच वाजता बैठक… खासदार धनंजय महाडिक यांची माहिती… खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने हे कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांना घेऊन मुंबईच्या दिशेने…

  • 24 Nov 2024 10:57 AM (IST)

    दिलीप धोत्रे आक्रमक

    मनसेचे नेते दिलीप धोत्रे EVM च्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार आहेत. राज्यभरात EVM च्या विरोधात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. दिलीप धोत्रे यांनी EVM मशीनमध्ये गडबड झाली असल्याने मतदान कमी झाले असल्याचा आरोप केला आहे. VVPAT च्या स्लिपची फेर मोजणी करावी अशी काल केलेली मागणी निवडणूक निर्णय अधिकार्यानी फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायलायात दाद मागणार आहेत. उद्या मुंबई हायकोर्टात निवडणूक आयोगा विरोधात याचिका दाखल करणार आहेत.

  • 24 Nov 2024 10:45 AM (IST)

    सामंत बंधूंच्या अभिनंदनाचे बॅनर

    रत्नागिरीत झळकले सामंत बंधूंच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. उदय सामंत आणि किरण सामंत सख्ख्ये भाऊ जिंकले आहेत. दोन्ही भाऊ आमदार झाल्याबद्दल रत्नागिरी शहरातल्या सर्वच ठिकाणी अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. दोन्ही बंधू आमदार म्हणून निवडून आल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन भाऊ एकत्रितपणे विधानसभेत पोहोचले आहेत. उदय सामंत पाचव्यांदा आमदार झाले आहे. किरण सामंत पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले आहेत. उदय सामंत यांनी प्रतिस्पर्धी बाळ माने यांचा 41 हजार 590 मतांनी पराभव करत आमदारकीचा पंच मारला आहे. किरण सामंत यांनी 19 हजार 680 मतांनी राजन साळवी यांचा पराभव करत साळवींचा चौकार हुकवला आहे.

  • 24 Nov 2024 10:30 AM (IST)

    शिंदे गटाचे आमदार मुंबईत दाखल

    शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुंबईत यायला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या वांद्रे येथील ताज अॅन्ड लॅड्स मध्ये आतापर्यंत २९ आमदार उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हाॅटेलमध्येच सर्व आमदारांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची बैठक पार पडणार आहे. उपस्थित आमदारांना मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.

  • 24 Nov 2024 10:15 AM (IST)

    दिलजित दोसांचा कॅानसर्ट वादात

    दिलजित दोसांचा कॅानसर्ट वादात सापडला आहे. कॅानसर्टला विरोध , आमच्या जागेत मद्यविक्रीला परवानगी देऊ नये, असं सुर्यकांत काकडे यांनी एक्साईजच्या एसपीला पत्र  स्थानिक नागरिकांकडूनही विरोध सुरू आहे. पुण्यात आज दिलजीत दोसंज यांची लाईव्ह कॉन्सर्ट पार पडणार आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे.

  • 24 Nov 2024 09:58 AM (IST)

    धुळ्यात महाविकासआघाडी पूर्णपणे हद्दपार, महायुतीचा बोलबाला

    धुळे जिल्ह्यात महाविकास आघाडी पूर्णपणे हद्दपार झाले आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही जागा महायुतीने जिंकल्या आहेत. महायुतीच्या सर्व जागांवरील उमेदवारांना एक लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे ग्रामीणमध्ये देखील भाजपने विजय मिळवला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पाच जागांपैकी चार जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. एक जागेवर शिवसेनेच्या महिला उमेदवार विजयी झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान शिरपूरच्या काशीराम पावरा यांना मिळाला आहे. चौथ्यांदा जागा जिंकत काशीराम पवार यांनी विक्रम केला आहे. तब्बल एक लाख 45 हजार 944 मतांनी काशीराम पावरा यांचा विजय झाला आहे.

  • 24 Nov 2024 09:53 AM (IST)

    चंद्रपुरात 9 जागांवर भाजपची सरशी, नवीन चेहऱ्यांनाही मिळाली संधी

    चंद्रपूर:- राज्यातील भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या पालकमंत्रीपदाच्या नेतृत्वाखाली 2 जिल्ह्यातील 10 पैकी 9 जागांवर भाजपची सरशी बघायला मिळाली. चंद्रपुरात 6 पैकी 5 तर वर्धा जिल्ह्यात सर्व 4 जागांवर भाजपचा झेंडा रोवला गेला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुयोग्य नियोजनाने भाजपने हे यश खेचून आणले. आमदारकीच्या जुन्या चेहऱ्यासह नव्या चेहऱ्याना भाजपने यावेळेस संधी दिली होती. नव्या-जुन्या चेहऱ्यासह भाजपने हे दणदणीत यश प्राप्त केले आहे.

  • 24 Nov 2024 09:49 AM (IST)

    मराठवाड्यात महाविकासआघाडीचा सुपडा साफ, जरांगे फॅक्टरलाही मोठा धक्का

    मराठवाड्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. 46 मतदारसंघांपैकी फक्त 5 जागा महायुतीला मिळाल्या आहेत. तर राष्ट्रीय समाज पक्षाला मिळाली एक जागा मिळाली आहे. महायुतीला 46 पैकी तब्बल 40 जागा मिळाल्या आहेत. महाविकासआघाडीचा मराठवाड्यातून सुपडा साफ झाला असून यामुळे जरांगे फॅक्टरलाही मोठा धक्का बसला आहे.

  • 24 Nov 2024 09:47 AM (IST)

    हिंगोलीतील राड्यानंतर 60 ते 70 जणांवर गुन्हे दाखल

    हिंगोली : काल झालेल्या राड्यात 60 ते 70 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एका गटाच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. शिंदे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मतमोजणी सुरु असताना शहरात राडा झाला होता. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या पुतण्यावर राड्यादरम्यान गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. या राड्यात तलवारीसह अन्य शस्त्राने जखमी झालेल्या हैदराबादसह विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

  • 24 Nov 2024 09:27 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकासआघाडी हद्दपार, पहिल्यांदाच दोन महिला आमदारांची निवड

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून महाविकासआघाडी हद्दपार झाली आहे. याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. शिवसेनेचा गड असलेल्या ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही जागा नाही.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन महिला आमदार विजयी झाल्या आहेत. अनुराधा चव्हाण आणि संजना जाधव जिल्ह्यातून दोन महिला आमदार विजयी झाल्या आहेत. पहिल्यांदाच दोन महिला आमदार निवडून आल्या आहेत.

  • 24 Nov 2024 09:24 AM (IST)

    आमदार योगेश कदम यांनी जंगी मिरवणूक काढत केला विजयाचा जल्लोष

    आमदार योगेश कदम यांनी विजयाचा मोठा जल्लोष केला आहे. त्यांनी जंगी मिरवणूक काढत कोटेश्वरी देवीचे दर्शन घेतले. रत्नागिरीतील दापोलीमधील खेड तालुक्यामधील जामगे गावात योगेश कदम यांची कुलस्वामिनी कोटेश्वर देवीचे मंदिर आहे.  खेड दापोली मतदार संघातील विजयानंतर भव्य मिरवणूक काढल्यानंतर योगेश कदम कोटेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आपल्या घरात प्रवेश करताना देखील घरच्या मंडळींनी योगेश कदम यांच जल्लोषात स्वागत केलं

  • 23 Nov 2024 10:59 PM (IST)

    राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत, सोमवारी शपथविधी

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे सर्व निकाल स्पष्ट झाले आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मविआचा दारुण पराभव झाला आहे. महायुतीने 220 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सोमवारी 25 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.

  • 23 Nov 2024 09:58 PM (IST)

    उद्धव ठाकरेंना गेट आऊट केला, आता हिंदु राष्ट्राची सुरुवात :गुणरत्ने सदावर्ते

    विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. अशात गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण, सहनशीलता, हिंदू राष्ट्र भारत मानणाऱ्या अखंड भारत मानणाऱ्या मतदारांनी भरभरून मतं दिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेकांना त्रास दिला होता. त्यांना आता गेट आउट केला आहे, हिंदु राष्ट्राची सुरुवात झाली आहे, असं सदावर्ते म्हणाले.

  • 23 Nov 2024 08:54 PM (IST)

    बाळासाहेब ठाकरे यांचं देशासाठी मोठं योगदान : नरेंद्र मोदी

    महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच मोदींनी राज्यातील महापुरुषांचा उल्लेख केला. तसेच मोदींनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं देशासाठी योगदान असल्याचंही म्हटलं.

  • 23 Nov 2024 08:31 PM (IST)

    महाराष्ट्रात विभाजनवादी शक्तींचा पराभव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

    महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीच्या या घवघवीत यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. मोदींनी या विजयासाठी महायुतीतील एकनाथ शिंदे, देंवेद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही प्रमुख नेत्यांचं कौतुक केलं. तसेच “महाराष्ट्रात आज विकासाचा विजय झाला. महाराष्ट्रात विभाजनवादी शक्तींचा पराभव झाला, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. नवी दिल्लीतील भाजप मु्ख्यालयात मोदी बोलत होते.

  • 23 Nov 2024 08:03 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात जंगी स्वागत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात दाखल झाले आहेत. मोदींचं भाजप मुख्यालयात जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

  • 23 Nov 2024 07:19 PM (IST)

    मविआच्या उमेदवाराची फेर मतमोजणीची मागणी फेटाळली

    मविआच्या उमेदवाराची फेर मतमोजणीची मागणी फेटाळण्यात आली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काही फेऱ्यांची फेर मतमोजणी करावी,अशी मागणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून करण्यात आली होती. मात्र ही मागणी मागणी ठोस कारणाअभावी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळली आहे. शेवटच्या फेरीनंतर भाजपचे समाधान अवताडे हे 8 हजार 316 मताने विजयी झाले आहेत .

  • 23 Nov 2024 06:05 PM (IST)

    महाराष्ट्रात अनाकलनीय निकाल लागला : उद्धव ठाकरे

    विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल आहे. या विजयानंतर मविआतील शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात अनाकलनीय निकाल लागला आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

  • 23 Nov 2024 05:29 PM (IST)

    पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे विजयी

    मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे विजयी झाले आहेत. पंढरपूर पोटनिवडणुकीत समाधान अवताडे विजयी झाले होते. अशाप्रकारे काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा भाजपच्या समाधान आवताडे यांच्यासमोर दुसऱ्यांदा पराभव झाला आहेत.

  • 23 Nov 2024 05:06 PM (IST)

    वानखेडे स्टेडियमवर होणार नव्या सरकारचा शपथविधी

    वानखेडे स्टेडियमवर होणार नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. सोमवारी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधी पार पडणार आहे. याआधी 2014 सालीही याच वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पाकर पडला होता.

  • 23 Nov 2024 04:52 PM (IST)

    पाचोरा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार किशोर पाटलांचा मोठ्या मताधिक्याने विजय

    पाचोरा विधानसभेतील महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. किशोर पाटील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र वैशाली सूर्यवंशी यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. पाचोरा विधानसभेच्या निवडणुकीत किशोर पाटलांनी आपल्या बहिणीचा पराभव केला आहे. विजयानंतर किशोर पाटील यांची शहरातून विजय रॅली काढण्यात आली आहे.

  • 23 Nov 2024 04:25 PM (IST)

    जनतेने दिलेला कौल मान्य, संजय काका पाटील यांची प्रतिक्रिया

    जनतेने दिलेला कौल मान्य करायचा, विकासाचा जो प्रयत्न केला,पण भावनेवर राजकारण केलं गेलं,त्यामुळे आपल्याला अपयश आलं, अशी प्रतिक्रिया सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पराभूत उमेदवार माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन करत राज्यात आणि देशात महायुतीचे सरकार आहे,त्यामुळे विकासाचा राजकारण यापुढे करूया,असं मत देखील संजयकाका पाटील यांनी व्यक्त केलं.ते सांगलीच्या तासगावमध्ये बोलत होते.

  • 23 Nov 2024 04:13 PM (IST)

    लाडक्या बहि‍णींनी सावत्र भावांना जोडा दाखवला : एकनाथ शिंदे

    राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. शिंदेंनी विजयानंतर मतदारांचे आभार मानत तसेच लाडकी बहिण योजनेचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. लाडक्या बहि‍णींनी सावत्र भावांना जोडा दाखवला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 23 Nov 2024 03:52 PM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : महाराष्ट्राच्या जनतेने विकासाकडे पाहून महायुतीला यश दिलं – अजित पवार

    महाराष्ट्राच्या जनतेने विकासाकडे पाहून महायुतीला यश दिलं. राज्य कंगाल केलं अशी आमच्यावर टीका झाली.लोकसभेत आम्हाला अपयश मिळालं. आम्ही ते मान्य केलो, त्यातून शिकलो, सावरलो. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. विरोधक उताणे पडले. विजयानंतर अजित पवारांनी मानले जनतेचे आभार.

  • 23 Nov 2024 03:46 PM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर पराभूत

    तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपचे राजेश वानखेडे विजयी.

  • 23 Nov 2024 03:38 PM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : महायुतीच्या भव्य विजयानंतर शपथविधीही भव्य होणार, जागा ठरली ?

    महायुतीच्या भव्य विजयानंतर शपथविधीही भव्य होणार. महायुतीकडून शिवाजी पार्क आणि वानखडे स्टेडिअमवर शपथविधी घेण्याबाबत विचार सुरू असून सोमवार किंवा मंगळवारी शपथविधी होऊ शकतो.

  • 23 Nov 2024 03:23 PM (IST)

    Bhor election Result 2024 : भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे यांना पराभवाचा धक्का

    भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे संग्राम थोपटे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

  • 23 Nov 2024 03:10 PM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : मुख्यमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचं वक्तव्य

    मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कोणताही वाद-विवाद नाहीत, तीनही पक्षांचे नेते बसून, बोलून, विचार विनिमय करून जो निर्णय घेतील ते मान्य असेल. मुख्यमंत्रीपदावरून स्पष्ट वक्तव्य करणं देवेंद्र फडणवीस यांनी टाळलं.

  • 23 Nov 2024 03:04 PM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : विषारी प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने कृतीतून उत्तर दिलंय – देवेंद्र फडणवीस

    राज्यात जो विषारी प्रचार करण्यात येत होता, त्याला महाराष्ट्राच्या जनतेनं कृतीतून उत्तर दिलं , एकी दाखवली आहे. त्या जनतेचे मी आभार मानतो. आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, अखेर हा चक्रव्यूह तोडून दाखवला आहे,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 23 Nov 2024 03:00 PM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : महायुती,भाजपच्या यशानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

    संपूर्ण महाराष्ट्र हा मोदींच्या पाठिशी आहे. एक है तो सेफ है हा मोदींनी दिलेला नारा महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांनी एकत्रित येऊन, हा नारा यशस्वी केला आहे. आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला खूप आशीर्वाद दिले, त्यांचेही आभार मानतो.

    जे फेक नरेटिव्ह तयार करण्यात आलं होतं त्या फेक नरेटिव्हच्या विरोधात लढणाऱ्या राष्ट्रीय संघटनांचा हा विजय आहे. विशेषत: महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्याविरोधात लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या संतांचा, महाराष्ट्राल एक ठेवणाऱ्यांचा हा विजय आहे

  • 23 Nov 2024 02:50 PM (IST)

    Dombivli election Result 2024 : डोंबिवलीमध्ये कमळ फुललं, भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचा दणदणीत विजय

    डोंबिवली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुललं आहे. भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण यांनी 1 लाख 30 हजार मतं मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांच्यासमोर शिवसेन ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे उभे होते, मात्र त्यांचा पराभव झाला.

  • 23 Nov 2024 02:47 PM (IST)

    Nalasopara election Result 2024 : नालासोपारामध्ये बविआचे क्षितीज ठाकूर पराभूत, भाजपाचे नाईक विजयी

    नालासोपारा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे राजन नाईक विजयी झाले असन बविआचे क्षितीज ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

  • 23 Nov 2024 02:37 PM (IST)

    Latur Gramin election Result 2024 : लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव, देशमुखांचा गड हादरला

    लातूर ग्रामीण धीरज देशमुख पराभूत झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे रमेश कराड यांनी विजय मिळवला आहे. लातूर ग्रामीण हा देशमुख कुटुंबाचा गड मानला जातो, मात्र या पराभवामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.

  • 23 Nov 2024 02:32 PM (IST)

    Karad election Result 2024 : पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का, भाजपच्या अतुल भोसलेंचा विजय

    कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे अतुल भोसले यांचा विजय झाला.

  • 23 Nov 2024 02:17 PM (IST)

    Mahim election Result 2024 : ‘राज’ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा माहिममध्ये पराभव, कोण झालं विजयी ?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीममध्ये निवडणूक लढवत होते, त्यांचा पराभव झाला आहे. माहिममध्ये ठाकरे गटाचे महेश सावंत हे विजयी झाले आहेत. शिवसेना सदा सरवणकर हे दुसऱ्या स्थानी तर अमित ठाकरे हे तिसऱ्या स्थानी आहेत.

  • 23 Nov 2024 02:05 PM (IST)

    Sangole Election Result 2024 : सांगोल्यात शहाजीबापू धक्का, शेकापच्या देशमुखांची विजयी वाटचाल

    सांगोला विधासभा मतदारसंघात शहाजीबापू यांना मोठा धक्का बसला आहे. शेकापचे बाबासाहेब देशमुख यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडे 23 हजार मतांची मोठी आघाडी आहे.

  • 23 Nov 2024 01:57 PM (IST)

    Baramati Election Result 2024 : बारामतीमध्ये अजित पवारांची विजयी आघाडी, युगेंद्र पवारांची मोठी पिछेहाट

    बारामती मतदारसंघातून अजित पवारांनी पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 12 व्या फेरीअखेरीस ते 60 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. काटेवाडीत अजित दादांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. शरद पवार गटाचे युगेंद्र पवार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 01:45 PM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : बाळासाहेब थोरात पराभवाच्या उंबरठ्यावर

    बाळासाहेब थोरात पराभवाच्या उंबरठ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील विजयी झाले आहेत.

  • 23 Nov 2024 01:27 PM (IST)

    Mawal Election Result 2024 : मावळ मतदारसंघाचा निकाल समोर, कोण झालं विजयी ?

    मावळ विधानसभा मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. 29 व्या फेरीअखेर मावळमध्ये महायुतीमधील अजित पवार गटाचे सुनील शेळके यांचा विजय झाला आहे. शेळके हे 1 लाख 08 हजार,565 मतांनी विजयी झाले. बापू भेगडे यांचा पराभव झाला.

  • 23 Nov 2024 01:20 PM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उधळला विजयाचा गुलाल

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि शिंदे गटालाही अभूतपूर्व यश मिळालं. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर सर्व नेते, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले, पेढे भरवत त्यांनी विजयी गुलाल उधळला.

  • 23 Nov 2024 01:01 PM (IST)

    Kurla Election Result 2024 : कुर्ल्यातून शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर विजयी

    कुर्ला मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर यांचा विजय झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मोरजकर यांचा त्यांनी पराभव केला

  • 23 Nov 2024 12:56 PM (IST)

    Mankhurd Election Result 2024 : मानखुर्द -शिवाजीनगरमध्ये नवाब मलिकांना धक्का, अबू आझमींची आघाडी कायम

    मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवाब मलिक यांना धक्का बसला आहे. अबू आझमींची आघाडी कायम आहे.

  • 23 Nov 2024 12:53 PM (IST)

    Pune Election Result 2024 : पुणे कॅन्टोनमेंटचा निकाल समोर, कोण विजयी ?

    पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे सुनील कांबळे हे विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या रमेश बागवेंना पराभवाचा धक्का बसला आहे.

  • 23 Nov 2024 12:50 PM (IST)

    Andheri Election Result 2024 : अंधेरी पूर्वमधून शिंदे गटाच्या मुरजी पटेल यांचा विजय

    अंधेरी पूर्व मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाच्या मुरजी पटेल यांनी विजय मिळवला आहे.

  • 23 Nov 2024 12:49 PM (IST)

    Nifad Election Result 2024 : निफाडमधून अजित पवार गटाचे दिलीप बनकर विजयी

    निफाडमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप बनकर यांचा विजय झाला आहे.

  • 23 Nov 2024 12:31 PM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : भाजप, महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, माझा मुलगा..

    देवेंद्रची अविश्रांत मेहनत आणि लोकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम या दोन्ही गोष्टींनी त्याला मोठा हा विजय मिळाला आहे. महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की त्याने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं.महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आईने त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

  • 23 Nov 2024 12:23 PM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : नाशिक जिल्ह्यात 15 पैकी 13 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर

    नाशिक जिल्ह्यात 15 पैकी 13 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. काही जागांवर महायुतीच्या उमेदवारांकडून निर्णय आघाडी . मालेगावमध्ये अपक्ष उमेदवार आणि कळवण मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेपी गावित आघाडीवर आहेत.

    १.नाशिक पूर्व: राहुल ढिकले भाजप २.नाशिक मध्य: देवयानी फरांदे भाजप ३.नाशिक पश्चिम: सीमा हिरे भाजप ४.देवळाली: सरोज आहेर अजित पवार गट ५.इगतपुरी: हिरामण खोसकर अजित पवार गट ६.सिन्नर: माणिकराव कोकाटे अजित पवार गट ७.दिंडोरी: नरहरी झिरवाळ अजित पवार गट ८.कळवण: जे.पी गावित मास्कवादी कम्युनिस्ट पक्ष ९.बागलाण: दिलीप बोरसे भाजप १०.चांदवड: राहुल आहेर भाजप ११.निफाड: दिलीप बनकर अजित पवार गट १२.नांदगाव: सुहास कांदे शिंदे गट १३.येवला: छगन भुजबळ अजित पवार गट. १४.मालेगाव बाह्य: दादा भुसे शिंदे गट १५.मालेगाव मध्य: आसिफ शेख अपक्ष

  • 23 Nov 2024 12:18 PM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : ही तर लँडस्लाईड व्हिक्टरी – महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

    महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना मी धन्यवाद देतो. राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी – अशा प्रकारचा विजय मिळाला आहे. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करत. लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी , समाजातील प्रत्येक घटकाने भरभरून मतदान केलं. गेली दोन-अडीच वर्षे महायुतीने जे काम केलं, त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. जनतेचे पुन्हा आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.

  • 23 Nov 2024 12:13 PM (IST)

    Malbar Hill Election Result 2024 : मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा विजयी

    मलबार हिलमधून भाजपचे मंगलप्रभात लोढा विजयी झाले आहेत.

  • 23 Nov 2024 11:56 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंना मोठा धक्का, चंद्रकांत पाटील आघाडीवर

    मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील 20 हजार840 मतांनी आघाडीवर आहेत. रोहिणी खडसे पिछाडीवरच आहेत. एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे.

  • 23 Nov 2024 11:50 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : श्रीवर्धनमधून अदिती तटकरे यांचा विजय

    श्रीवर्धनमधून अदिती तटकरे या विजयी झाल्या आहेत. तर खानापूरमधून शिंदे गटाचे सुहास बाबर हे विजयी झाले आहेत.

  • 23 Nov 2024 11:48 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : कर्जत-जामखेडमध्ये अखेर रोहित पवार आघाडीवर

    कर्जत जामखेडमध्ये अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार हे आघाडीवर आले आहेत. सातव्या फेरीत ते 634 मतांनी आघाडीवर असून राम शिंदेंना धक्का बसला आहे.

  • 23 Nov 2024 11:40 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : अहिल्यानगर – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर

    13 व्या फेरी अखेर नगर मतदार संघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संग्राम जगताप 23712 मतांनी आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर 23 हजार 712 मतांनी पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 11:35 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : माढा अभिजीत पाटील आघाडीवर

    माढा मतदारसंघात अभिजीत पाटील हे 2289 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 11:29 AM (IST)

    Bandra Election Result 2024 : वांद्रे पश्चिम मध्ये आशिष शेलार यांची आघाडी कायम

    वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात आशिष शेलार यांची 14 हजारपेक्षा अधित मतांनी आघाडी

    आशिष शेलार – 25,590

    आसिफ झकेरिया – 10,775

  • 23 Nov 2024 11:15 AM (IST)

    Maharashtra Election Results 2024 : मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

    मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल. 12 व्या फेरीअंती मंगल प्रभात लोढा यांचं मताधिक्य ३६ हजारांच्या पार गेलं आहे.

    मंगल प्रभात लोढा यांना ५७,३९० मतं मिळाली असून ठाकरे गटाच्या भैरुलाल चौधरी यांना २१,०२८ मतं आहेत.

  • 23 Nov 2024 11:04 AM (IST)

    धाराशिवच्या परंडा मतदारसंघात अटीतटीचा सामना

    धाराशिव ब्रेकिंग – राहुल मोटे विरुद्ध तानाजी सावंत यांच्यात चुरस वाढली.

    सहाव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राहुल मोटे 65 मतांनी आघाडीवर

  • 23 Nov 2024 10:52 AM (IST)

    Worli Election Result 2024 : चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण यांची आघाडी कायम

    चाळीसगाव विधानसभेतून भाजप महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांची आठव्या फेरीतही आघाडी कायम आहे. सहाव्या फेरीत मंगेश चव्हाण यांना 30 हजार 600 मतांची आघाडी

  • 23 Nov 2024 10:45 AM (IST)

    Worli Election Result 2024 : कुछ तो गडबड है – संजय राऊत

    आत्तापर्यंतच्या निकालात कुछ तो गडबड है. हा जनतेचा कौल वाटत नाही – विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संजय राऊतांनी व्यक्त केली शंका. शिंदेंच सर्व आमदार कसे निवडून येतात ? असा सवालही त्यांनी विचारला.

  • 23 Nov 2024 10:33 AM (IST)

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, अनेक ज्येष्ठ नेते पिछाडीवर

    विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेतक दिग्गजांना मोठा धक्का बसल्याचं दिसतं आहे. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख हेही पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 10:30 AM (IST)

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : बंडानंतरही एकनाथ शिंदेंना मोठं यश, ठाकरेंना धक्का

    बंड करून बाहेर पडलेले आणि महायुतीमध्ये सामील झालेले एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठं यश मिळालेलं दिसत आहे. महाविकास आघाडीला 50 पेक्षा कमी जागांवर आघाडी मिळाली आहे तर शिवसेना शिंदे गट 58 जागांवर आघाडीवर आहे .

  • 23 Nov 2024 10:27 AM (IST)

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : खानापूर मधून शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास बाबर आघाडीवर

    सांगली – खानापूर मधून शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास बाबर पाचव्या फेरी 19 हजार 452 मतांनी आघाडीवर

    शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांना धक्का

  • 23 Nov 2024 10:25 AM (IST)

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे संतूक हंबर्डे आघाडीवर

    नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे संतूक हंबर्डे आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 10:17 AM (IST)

    Anushakti Nagar Election Result 2024 : अणुशक्ती नगरमध्ये सना मलिक आघाडीवर , स्वरा भास्करचा पती फहाद अहमदला धक्का

    अणुशक्ती नगरमध्ये चौथ्या फेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सना मलिक आघाडीवर असून फाहाद अहमद हे पिछाडीवर आहेत.

    सना मलिक (अजित पवार राष्ट्रवादी पक्ष)-10644 मतं

    फाहाद अहमद (शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष)- 9253 मतं

  • 23 Nov 2024 10:14 AM (IST)

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : जालना जिल्ह्यात भाजपचे तीन उमेदवार पुढे तर शिंदेंच्या शिवसेनेचे दोन उमेदवार आघाडीवर

    जालना जिल्ह्यात भाजपचे तीन उमेदवार पुढे तर शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपचे संतोष दानवे,बबनराव लोणीकर आणि नारायण कुचे हे आघाडीवर आहेत. तर शिंदे यांच्या शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि हिकमत उडान यांची आघाडी कायम.

  • 23 Nov 2024 10:12 AM (IST)

    Parli Election Result 2024 : धनंजय मुंडेंची तब्बल 22 हजार मतांची आघाडी

    परळीमध्ये धनंजय मुंडे तब्बल 22 हजार मतांनी आघाडीवर आहेत. देशमुख यांना मोठा फटका बसला आहे.

  • 23 Nov 2024 10:09 AM (IST)

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : महायुती 188 जागांवर आघाडीवर तर मविआ अवघ्या 87 जागांवर आघाडीवर

    भाजप 107 जागांवर आघाडीवर, शिवसेना 49 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर आहे. महायुती 188 जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी अवघ्या 87 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 31, शिवसेना ठाकरे गट 23 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 33 जागी आघाडीवर आहे.

  • 23 Nov 2024 10:06 AM (IST)

    Kudal Election Result 2024 : कुडाळमध्ये निलेश राणे आघाडीवर , वैभव नाईकांना मोठा धक्का

    कुडाळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे हे 280 मतांनी पुढे आहेत. वैभव नाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर गुहागरमधून भास्कर जाधव हे 7 हजार 700 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 10:04 AM (IST)

    Shiwadi Election Result 2024 : शिवडीतून बाळा नांदगावकर पिछाडीवर

    शिवडीतून मनसेचे बाळा नांदगावकर पिछाडीवर आहेत. ठाकरे गटाचे अजय चौधरी हे आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 09:58 AM (IST)

    Ghatkopar Election Result 2024 : घाटकोपर पूर्व मधून पराह शाह आघाडीवर

    घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे पराग शाह आघाडीवर आहेत.

    पराग शाह – भारतीय जनता पक्ष – 12601

    राखी जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 7427

  • 23 Nov 2024 09:49 AM (IST)

    Malbar hill Election Result 2024 : मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा आघाडीवर

    मलबार हिल मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे मंगलप्रभात लोढा हे 7 हजारपेक्षा अधिक मतांनी पुढे आहेत. तर विलेपार्ले येथे भाजपचे पराग अळवणी हेही 1 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 09:46 AM (IST)

    Mahim Election Result 2024 : राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर; माहीममध्ये काय घडणार?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीममध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. ठाकरे गटाचे महेश सावंत हे माहीमध्ये आघाडीवर आहेत. तर शिंदे गटाचे सदा सरवणकर हे दुसऱ्या स्थानावर आहेत.

  • 23 Nov 2024 09:41 AM (IST)

    AnushaktiNagar Election Result 2024 : अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा नवरा आघाडीवर, अजितदादा गटाला धोबीपछाड

    अणुशक्तिनगर विधानसभेतून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद निवडणूक लढत आहेत. फहाद अहमद सध्या आघाडीवर असून अजितदादा गटाच्या सना मलिक या पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 09:38 AM (IST)

    Vikroli Election Result 2024 : विक्रोळीमध्ये सुनील राऊत आघाडीवर

    विक्रोळी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत सुनील राऊत आघाडीवर आहेत.

    सुनील राऊत – 3800 मतं

    सुवर्णा करंजे – 2712 मतं

    विश्वजी ढोलम – 915 मतं

  • 23 Nov 2024 09:36 AM (IST)

    Ahilyanagar Election Result 2024 : अहिल्यानगरमध्ये संग्राम जगताप आघाडीवर, शरद पवार गटाला धक्का

    अहिल्यानगरमध्ये तिसऱ्या फेरीत अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप 9960 मतांनी आघाडीवर. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर पिछाडीवर आहेत.

    तिसऱ्या फेरीत संग्राम जगताप यांना 6676 मतं तर अभिषेक कळमकर यांना 2941 मतं मिळाली आहेत.

  • 23 Nov 2024 09:33 AM (IST)

    Bandra Election Result 2024 : वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई आघाडीवर

    वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई आघाडीवर आहेत. झिशान सिद्दीकी पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 09:31 AM (IST)

    Achalpur Election Result 2024 : अचलपूरमध्ये बच्चू कडूंना धक्का, कोण आहे आघाडीवर ?

    अचलपूर मतदारसंघात बच्चू कडूंना मोठा धक्का बसला आहे, ते पिछाडीवर आहेत. भाजपचे प्रवीण तायडे यांनी आघाडी घेतली आहे.

  • 23 Nov 2024 09:26 AM (IST)

    Mahim Election Result 2024 : माहीममध्ये अमित ठाकरेंना धक्का, कोण आघाडीवर ?

    माहीम मतदारसंघात तिरंगी लढत असून मनसेचे अमित ठाकरेंना धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर हे आघाडीवर आहेत.

    अमित ठाकरे – 2 हजार 156 मतं

    महेश सावंत – 2हजार 142 मतं

    सदा सरवणकर – 2 हजार 270 मतं

  • 23 Nov 2024 09:23 AM (IST)

    Mankhurd Election Result 2024 : नवाब मलिक यांचे काय होणार, पहिल्या फेरीत तिसऱ्या क्रमांकावर

    मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात नवाब मलिक प्रचंड धक्का बसला आहे. ईव्हीएम मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अबू आझमी यांना 3884, अतिक खान (MIM) यांना 3617 मते मिळाली आहेत. तर नवाब मलिक यांना फक्त 461 मते मिळाल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

  • 23 Nov 2024 09:19 AM (IST)

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : भुजबळ कुटुंबाला मोठा धक्का, काका-पुतणे दोघेही पिछाडीवर

    भुजबळ कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. येवल्यातून छगन भुजबळ हे पिछाडीवर आहेत. तर त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे नांदगावमधून पिछाडीवर आहेत. दुसऱ्या फेरी अखेरीस शिंदे गटाचे सुहास कांदे 8200 मते घेऊन आघाडीवर आहेत. त्यामुळे भुजबळ कुटुंबात चुळबुळ निर्माण झाली आहे.

  • 23 Nov 2024 09:17 AM (IST)

    Shirol election Result 2024 : शिरोळमध्ये अपक्ष राजेंद्र यड्रावर आघाडीवर

    शिरोळ मतदारसंघात अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावर हे आघाडीवर आहेत. त्यांना 6700 मतांची आघाडी मिळाली आहे.

  • 23 Nov 2024 09:14 AM (IST)

    Jalgaon election Result 2024 : जळगाव – भुसावळ मतदारसंघात भाजपचे संजय सावकारे 3789 मतांनी आघाडीवर

    जळगाव – भुसावळ मतदारसंघात पहिल्या फेरी अखेर भाजपचे संजय सावकारे 3789 मतांनी आघाडीवर

    भाजप – संजय सावकारे 5546 मतं

    काँग्रेसचे राजेश मानवतकर 1757 मतं

  • 23 Nov 2024 09:10 AM (IST)

    भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांची 8613 मतांची मोठी आघाडी

    दुसऱ्या फेरी अखेर सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले यांची 8613 मतांची मोठी आघाडी

    भाजप – शिवेंद्रराजे भोसले-11015

    उबाठा -अमित कदम- 2402

  • 23 Nov 2024 09:08 AM (IST)

    नितेश राणे यांना मोठा दिलासा, हजार मतांची आघाडी

    कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे 1048 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 09:06 AM (IST)

    Kalwa-Mumbra election Result 2024 : कळवा -मुंब्रा येथून जितेंद्र आव्हाड आघाडीवर

    कळवा -मुंब्रा येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे 3 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 09:04 AM (IST)

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीत काटें की टक्कर, कोण किती जागांवर आघाडीवर ?

    महायुती आणि महाविकास आघाडीत काटें की टक्कर आहे. महायुती 137 तर महाविकास आघाडीची 134 जागांवर आघाडी आहे.

  • 23 Nov 2024 09:01 AM (IST)

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : इंदापूरमध्ये दत्ता भरणे आघाडीवर, शरद पवार गटाला धक्का

    इंदापूर मतदारसंघातून अजित पवार गटाचे उमेदावर दत्ता भरणे हे 336 मतांनी आघाडीवर आहेत. शरद पवार गटाला धक्का बसला असून हर्षवर्धन पाटील पिछाडीवर गेले आहेत.

  • 23 Nov 2024 08:58 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE : नागपूर दक्षिण-पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस यांची आघाडी कायम

    नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे 3 हजार मतांनी आघाडीवर आहेत तर प्रफुल गुडदे हे पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:53 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE : येवल्यामध्ये छगन भुजबळ पिछाडीवर

    येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे पिछाडीवर गेले आहेत. माणिकराव शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.

  • 23 Nov 2024 08:50 AM (IST)

    Thane election Result 2024 : कोपरी-पाचपाखाडीमध्ये एकनाथ शिंदे आघाडीवर

    एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:48 AM (IST)

    Baramari election Result 2024 : ईव्हीएम मतमोजणी सुरू होताच बारामतीत ट्विस्ट; अजितदादा आघाडीवर की पिछाडीवर ?

    ईव्हीएम मतमोजणी सुरू होताच बारामतीत ट्विस्ट आला असून अजित पवार आघाडीवर असून युगेंद्र पवार हे पिछाडीवर गेले आहेत.

  • 23 Nov 2024 08:46 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE : महायुती 125 तर मविआ 106 जागांवर आघाडीवर

    महायुती 125 तर मविआ 106 जागांवर आघाडीवर. इतर 11 जागांवर आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:43 AM (IST)

    Ghatkopar election Result 2024 : घाटकोपरमध्ये भाजपचे राम कदम यांची आघाडी

    घाटकोपरमध्ये भारतीय जनता पक्षाचे राम कदम हे आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:42 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE : उत्तर नागपूरमधून नितीन राऊत यांची आघाडी

    उत्तर नागपूर मतदार संघात काँग्रेसचे नितीन राऊत हे पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:40 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE : येवल्यामध्ये छगन भुजबळ आघाडीवर

    नाशिकमधील मतमोजणीस सुरूवात झाली असून येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:37 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 LIVE : वडाळ्यातूल भाजपाचे कालिदास कोळंबकर आघाडीवर

    वडाळ्यातून पहिला कल हाती आला असून भाजपाचे कालिदास कोळंबकर आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:33 AM (IST)

    Baramati election Result 2024 : पोस्टल मतांमध्ये बारामतीकरांची युगेंद्र पवारांना पसंती, अजित पवार अद्याप पिछाडीवर

    बारामतीची पोस्टल मतमोजणी अद्याप सुरू असून बारामतीकरांनी युगेंद्र पवारांना पसंती दर्शवली आहे. बारामतीत युगेंद्र पवार हे पोस्टल मतमोजणीत आघाडीवर आहेत. तर अजित पवार हे अद्यापही पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:29 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : वांद्रे पश्चिम भाजपचे आशिष शेलार आघाडीवर

    वांद्रे पश्चिम येथे पोस्टल मतमोजणी सुरु झाली असून पहिला कल हाती आला आहे. वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार हे आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:26 AM (IST)

    Mahim election Result 2024 : माहीममधील पहिला कल हाती, अमित ठाकरे आघाडीवर

    माहीममध्ये पोस्टल मतमोजणी सुरु झाली असून पहिला कल हाती आला आहे. मनसेचे अमित ठाकरे हे आघाडीवर आहेत. माहीममध्ये अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत अशी तिरंगी लढत आहे.

  • 23 Nov 2024 08:24 AM (IST)

    Latur Election Result 2024 : लातूर शहर मधून अमित देशमुख आघाडीवर

    लातूर पोस्टल मतमोजणी सुरु झाली असून पहिला कल हाती आला आहे. लातुर शहर मध्ये अमित देशमुख पोस्टल फेरीत आघाडीवर तर लातुर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख आघाडीवर आ

  • 23 Nov 2024 08:22 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : कराड मध्ये अद्याप पहिल्या मतमोजणीला सुरूवात झालेली नाही

    कराड दक्षिण मतमोजणी केंद्रावर प्रशासनाच्या नियोजनात गोंधळ, अजूनही मतमोजणीला सुरूवात झालेली नाही.

  • 23 Nov 2024 08:19 AM (IST)

    Aurngabad Election Result 2024 : औरंगाबादमध्ये पोस्टल मतमोजणी सुरू, पहिला कल काय ?

    औरंगाबादमध्ये स्टल मतमोजणी सुरु झाली असून पहिला कल हाती आला आहे. औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे आघाडीर आहेत तर औरंगाबाद पश्चिममधून शिंदेसेना संजय शिरसाट आघाडीवर आहेत. तसेच औरंगाबाद मध्यमधून शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:17 AM (IST)

    Dombivli Election Result 2024 : डोंबिवलीमध्ये पहिला कल हाती, रवींद्र चव्हाण आघाडीवर

    डोंबिवलीमध्ये पोस्टल मतमोजणी सुरु झाली असून पहिला कल हाती आला आहे. भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण हे आघाडीवर आहेत, दीपेश म्हात्रे पिछाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:15 AM (IST)

    Kagal Election Result 2024 : कागलमध्ये समरजित घाटगे आघाडीवर

    कागलमध्ये पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घटाचे समरजित घाटगे हे आघाडीवर असून हसन मुश्रीफ यांना धक्का बसला आहे.

  • 23 Nov 2024 08:14 AM (IST)

    Worli Election Result 2024 :  वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर

    वरळीमध्ये पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे, पहिला कल हाती आला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्घव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:08 AM (IST)

    Baramati Election Result 2024 : बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत पिछाडीवर

    बारामतीची पोस्टल मतमोजणी सुरू झाली आहे. बारामतीत युगेंद्र पवार हे पोस्टल मतमोजणीत आघाडीवर आहेत. तर अजित पवार हे पिछाडीवर आहे. त्यामुळे अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

  • 23 Nov 2024 08:05 AM (IST)

    Sakoli Election Result 2024 : साकोलीमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात, नाना पटोले आघाडीवर

    साकोलीमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला कल हाती आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आघाडीवर आहेत.

  • 23 Nov 2024 08:02 AM (IST)

    Satara Election Result 2024 : साताऱ्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात, भाजपचे शिवेंद्र राजे भोसले आघाडीवर

    साताऱ्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपचे शिवेंद्र राजे भोसले आघाडीवर आहेत. सोलापूर तसेच नवी मुंबईतही मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

  • 23 Nov 2024 08:01 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : पोस्टल मतांच्या मतमोजणीला सुरूवात, काही क्षणांत येणार पहिला कल

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 तारखेला पार पडले असून आज मतमोजणी होत आहे. प्रथम पोस्टल मतांची मतमोजणी सुरू होत असून अवघ्या काही मिनिटांत पहिला कल हाती येणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार की मविआ स्थापन करणार सत्ता, संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलंय.

  • 23 Nov 2024 07:55 AM (IST)

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 : कॅशकांड प्रकरणावरून संपूर्ण देशात गाजलेल्या नालासोपारा विधानसभा मतदार संघाचा निकाल अवघ्या काही मिनिटात येणार समोर

    नालासोपारा :- कॅशकांड प्रकरणावरून संपूर्ण देशात गाजलेल्या नालासोपारा विधानसभा मतदार संघाचा निकाल अवघ्या काही मिनिटात समोर येणार आहे. मतमोजणी केंद्रावर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात आहे

    विधमान आमदार क्षितीज ठाकूर , भाजपाचे राजन नाईक यांच्यात नालासोपाऱ्यामध्ये काटें की टक्कर आहे. तर वसई विधानसभेत विधमान आमदार हितेंद्र ठाकूर, काँग्रेसचे विजय पाटील, भाजपाचे स्नेह दुबे यांच्यात प्रमुख लढत आहे.

  • 23 Nov 2024 07:52 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : अटीतटीची लढत झाली, पण माझाच विजय निश्चित – ठाकरे गटाच्या महेश सावंत यांना विश्वास

    शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत हे माहीमधून निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्यासमोर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित तसेच शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांचे आव्हान होते. या निवडणुकीत अटीतटीची लढत झाली पण माझाच विजय होणार हे निश्चित असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या निकालापूर्वी त्यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतलं.

  • 23 Nov 2024 07:26 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : परभणी मध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार

    परभणी जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार असून सुरुवातीला 8 टेबल वरती पोस्टल मतांची मोजणी केली जाईल. चारही विधानसभेत 14 टेबल वर 25 ते 32 फेऱ्या होणार आहे.

    जिल्ह्यात एकूण 1554547 इतके मतदार आहेत. साधारणतः 72 टक्के इतका मतदान झालंय.

  • 23 Nov 2024 07:04 AM (IST)

    महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 :  नंदुरबार जिल्ह्यातील मतमोजणीला अवघ्या काही मिनिटात सुरुवात होणार , मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    नंदुरबार जिल्ह्यातील मतमोजणीला अवघ्या काही मिनिटात सुरुवात होणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडवून यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेसाठी 71.88% मतदान झालं होतं. वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • 23 Nov 2024 06:33 AM (IST)

    पहिला कल विदर्भातून? राज्याचं लक्ष लागलं

    महाराष्ट्र विधानसभेचे निकाल थोड्याच वेळात सुरु होणार आहे. राज्यातील पहिला कल विदर्भातून त्यातही नागपुरातून येणार असल्याचं सांगितलं जात आहे. साधारण 8.45 वाजता पहिला कल हाती येईल. त्यामुळे विदर्भातून कुणाच्या विजयाची आणि कुणाच्या पराजयाची सुरुवात होते याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 22 Nov 2024 06:43 PM (IST)

    शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न – रामदास आठवले

    महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालापूर्वी रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेस शिवसेनेला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेने महायुती करावी.

  • 22 Nov 2024 06:35 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी पाच दिवसांत 31 जागतिक नेत्यांशी चर्चा केली

    पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 जागतिक नेत्यांची भेट घेतली. तीन देशांचा दौरा करून पंतप्रधान मोदी आज भारतात परतले आहेत. पीएम मोदींनी नायजेरिया, ब्राझील आणि गयानाला भेट दिली होती.

  • 22 Nov 2024 06:22 PM (IST)

    निकालापूर्वी भाजपला धक्का, सचिन शिंदे उद्धव गटात सामील

    महाराष्ट्र निवडणूक निकालापूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माहीम येथील भाजप नेते सचिन शिंदे अनेक कार्यकर्त्यांसह उद्धव गटात सामील झाले.

  • 22 Nov 2024 06:13 PM (IST)

    महाराष्ट्रात 160 ते 165 जागा मिळतील, कैलाश विजयवर्गीय यांचा दावा

    मध्य प्रदेश सरकारचे मंत्री कैलाश विजयवर्गीय म्हणाले, मी मतदानाच्या दिवशी महाराष्ट्रात 160-165 जागा मिळतील असे सांगितले होते. पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आहे. युतीच्या लोकांचाही आपापल्या भागात प्रभाव आहे. त्यामुळे तेथे भाजपचे सरकार येणार आहे. झारखंडमध्येही शिवराज सिंह चौहान आणि हिमंता बिस्वा सरमाजींनी मेहनत घेतली आहे, तिथेही भाजपचे सरकार येणार आहे.

  • 22 Nov 2024 03:06 PM (IST)

    भाजप महायुतीकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर

    भाजप महायुतीकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपनं महत्त्वाच्या नेत्यांना जबाबदारी दिली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण , भाजप नेते प्रवीण दरेकर , संजय कुटे, मोहित कंबोज , नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • 22 Nov 2024 02:58 PM (IST)

    ज्यांचा जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला नाही

    ज्यांचा जास्त जागा, त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला नाही आणि असा कोणताही फॉर्म्युला होणार नाही, सर्व मिळून मुख्यमंत्री ठरणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

  • 22 Nov 2024 02:53 PM (IST)

    सागर बंगल्यावर बैठकीचा महत्त्वाची बैठकीला सुरुवात

    चंद्रशेखर बावनकुळे , मंगलप्रभात लोढा,,भूपेंद्र यादव आणि रावसाहेब दानवे ,पराग शाह, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, मिहिर कोटे, चित्रा वाघ बैठकीत उपस्थित आहेत. उद्या मतमोजणी नंतर मुख्यमंत्र्यांचे गणित जुळवण्यासाठी भाजपचे सगळे नेते पदाधिकारी जिंकून येणाऱ्या उमेदवार जागेवरील उमेदवारांची देखील सागर बंगल्यावर उपस्थित आहेत.

  • 22 Nov 2024 02:40 PM (IST)

    रत्नागिरी- पाच विधानसभा मतदार संघातील निकाल काही तासात येणार

    रत्नागिरी जिल्ह्यातील  विधानसभा मतदार संघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मतमोजणीचे 26 राऊंड, दापोली विधानसभा मतदार संघात मतमोजणीचे 28 राऊडमध्ये मतमोजणी होईल.

  • 22 Nov 2024 02:30 PM (IST)

    गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी देवाला साकडं

    जळगावच्या पाळधी येथे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्याने महादेवाला साकडं घातलं आहे. पाळधी येथील महादेवाच्या मंदिरात कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींनी पूजा अभिषेक करत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी साकड घातल आहे..

  • 22 Nov 2024 02:20 PM (IST)

    सर्व्हेची ऐशी की तैशी

    जे सर्व्हे करतात त्यांच्या ऐशी की तैशी,महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला. जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई यांच्यासोबत आम्ही काल सर्व जण बसलो यावर चर्चा झाली. 160 जागा आम्ही सहज जिंकू. एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही, असे ते म्हणाले.

  • 22 Nov 2024 02:09 PM (IST)

    “नाद करा.. पण आमचा कुठं?

    निलेश राणे नवनिर्वाचित आमदार असा आशयाचे लागले बॅनर.राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्या मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मध्ये महामार्गालगत असलेल्या बांबार्ड गावात कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवार असलेले निलेश राणे यांचा विजयी शुभेच्छा देण्यात आलेला बॅनर रात्री लावण्यात आला.

  • 22 Nov 2024 02:00 PM (IST)

    उद्या मतमोजणीची तयारी

    जळगाव जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघ निहाय होणार त्या त्या ठिकाणी मतमोजणी होईल.

  • 22 Nov 2024 01:53 PM (IST)

    तो बॉम्बआधी फुटला असता तर…

    वसई, विरारमध्ये नोटांचा बॉम्ब दिसला. तो बॉम्ब आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबई भाजप सचिव सचिन शिंदे यांचा ठाकरे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यावेळी ते बोलत होते.

  • 22 Nov 2024 01:41 PM (IST)

    निकालांआधीच मुंबई भाजपला धक्का

    निकालांआधीच मुंबई भाजपला धक्का बसला आहे. मुंबई भाजप सचिव सचिन शिंदे यांचा शिवसेना यूबीटीमध्ये प्रवेश करणार आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी मशाल हाती घेणार आहे.

  • 22 Nov 2024 01:30 PM (IST)

    सागर बंगल्यावर भाजपची महत्त्वाची बैठक

    भाजपची सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, चित्रा वाघ आणि इतर नेतेही या ठिकाणी आले आहे. तसेच मनसेचे बाळा नांदगावकर देखील सागर बंगल्यावर दाखल झाले आहे.

  • 22 Nov 2024 01:23 PM (IST)

    ठाण्यातील चित्र दुपारी दोनपर्यंत स्पष्ट होणार

    ठाण्यातील 18 विधानसभेची मतमोजणी होणाऱ्या केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघांमध्ये वागळे इस्टेट या ठिकाणी 14 टेबल असून 26 फेऱ्या होणार आहे. दुपारी दोन पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे

  • 22 Nov 2024 01:04 PM (IST)

    नाराज उमेदवार आमच्या संपर्कात- काँग्रेस

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक उमेदवार नाराज आहेत. कारण भाजपनं त्यांच्या मतदारसंघात अपक्षांना मदत केली. त्यामुळे असे नाराज उमेदवार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

  • 22 Nov 2024 01:00 PM (IST)

    शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दोघा शिक्षकांवर गुन्हा दाखल

    कोल्हापूर जिल्ह्यातील केरलेमध्ये शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दोघा शिक्षकांवर गुन्हा दाखल. करवीर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल. खराब गेट सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून बाजूला करायला लावल्या प्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल. गेट बाजूला करत असताना लोखंडी गेट विद्यार्थ्यावर पडून सहावीत शिकणाऱ्या स्वरूप माने या अकरा वर्षीय विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू.

  • 22 Nov 2024 12:34 PM (IST)

    शरद पवार काहीही करु शकतात – संजय शिरसाट

    “शरद पवार काहीही करु शकतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं सर्व पदाधिकाऱ्यांना वाटतं. अपक्षांना आमचे दरवाजे खुले. काही अपक्षांच्या संपर्कात आहोत. शरद पवारांच्या भूमिकेबद्दल सगळ्यांमध्ये संभ्रम” असं संजय शिरसाट म्हणाले.

  • 22 Nov 2024 12:18 PM (IST)

    संजय राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही – नाना पटोले

    संजय राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. दुपारी 1 वाजता काँग्रेस उमेदवारांची ऑनलाइन बैठक होईल. सर्व उमेदवारांना 17 सी फॉर्म बंधनकारक केला. पेटोले, चेन्नीथला, थोरात उमेदवारांची बैठक घेणार. महायुतीत गडबड ते काहीतरी पाप करु शकतात असं नाना पटोले म्हणाले.

  • 22 Nov 2024 12:05 PM (IST)

    मुंबईसह ठाण्यात CNG च्या दरात वाढ, वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त

    महाराष्ट्रात विधानसभेत मतदानाचा टक्का वाढला तर दुसरीकडे महानगर गॅस अर्थात CNG च्या दरात वाढ झालेली आहे. मध्यरात्रीपासून मुंबई आणि ठाणे या ठिकाणी CNG च्या दरात 2 रुपये वाढ झाली आहे. यामुळे वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल राजकारण्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. या दरवाढीचा फटका महागाई आणि वाहन धारकांना बसणार आहे.

  • 22 Nov 2024 12:02 PM (IST)

    विधानसभा निकालानंतर विजय मिरवणूक काढण्यास बंदी, गुन्हा दाखल होणार

    विधानसभा निवडणुकीत विजयानंतर विजय मिरवणूक काढण्यास पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. निकाल लागल्यानंतर जल्लोष तसेच मिरवणूक न करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना तंबी दिली आहे. छत्रपती संभाजी नगरातील निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली आहे. विजय उमेदवारांनी अति उत्साहात मिरवणूक केल्यास गुन्हा दाखल होणार आहे.

  • 22 Nov 2024 11:46 AM (IST)

    सांगोल्यातील शेकाप उमेदवाराला महायुती आणि मविआ नेत्यांचे फोन, कोणाला देणार पाठिंबा?

    पंढरपूर : सांगोल्यात शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून फोन येण्यास सुरुवात झाली आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीच्या नेत्यांचे फोन आले असल्याची माहिती बाबासाहेब देशमुख यांनी दिली. शेकाप हा केडर बेस पक्ष (पार्टी )असल्याने कार्यकर्त्यांची चर्चा करून महाविकासआघाडी किंवा महायुतीला पाठिंबा द्यायचा ते ठरवणार असे बाबासाहेब देशमुख म्हणाले.

    शेतकरी कामगार पक्षाने ज्या ज्या वेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांना गरज भासली त्यावेळेस मदत केली. मात्र सांगोल्यात महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने बाबासाहेब देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता बाबासाहेब देशमुख यांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. निवडून आल्यानंतर सत्कार न स्वीकारता प्रत्येक गावाचं लीड पाहून जेवढे लीड तेवढे वृक्षारोपण करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

  • 22 Nov 2024 11:35 AM (IST)

    रत्नागिरीत मतमोजणीची तयारी पूर्ण, एकाचवेळी सुरु होणार मतमोजणी

    रत्नागिरी पाच विधानसभा मतदारसंघातील निकाल काही तासात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात मतमोजणीची तयारी पूर्ण  झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीचे 26 राऊंड, दापोली विधानसभा मतदार संघात मतमोजणीचे 28 रांऊडमध्ये मतमोजणी होणार आहे. राजापूर विधानसभा मतदार संघात मतमोजणीचे 25 राऊंड, चिपळूण विधानसभा मतदार संघात 24 राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीचे सर्वात कमी राऊंड 23 राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे.

    सर्व टेबलवरची मतमोजणी एकाच वेळी सुरु केली जाणार आहे. टपाली मतदान मोजण्यासाठी वेगळा टेबल असणार आहे. तर सैन्यदलातील ईटीबीएस मतदान मोजण्य़ासाठी 1 स्वंतत्र टेबल असणार आहे.

  • 22 Nov 2024 11:33 AM (IST)

    गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्याचे महादेवाला साकडं

    जळगावच्या पाळधी येथे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्याने महादेवाला साकडं घातलं आहे. पाळधी येथील महादेवाच्या मंदिरात कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींनी पूजा अभिषेक करत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी साकड घातलं आहे. लाडक्या बहिणीच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक भूषण महाजन यांनी सपत्नीक पूजा अभिषेक केला. यावेळी पाळधी सह परिसरातील लाडक्या बहिणींची उपस्थिती होती.

  • 22 Nov 2024 11:06 AM (IST)

    Maharashtra News: निकालापूर्वीच ठाकरे गटाचे उमेदवार गजानन लवटे यांच्या विजयाचे बॅनर..

    निवडणूक निकालापूर्वीच अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात झळकले ठाकरे गटाचे उमेदवार गजानन लवटे यांच्या विजयाचे बॅनर… गजानन लवटे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे लावले बॅनर… दर्यापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे गजानन लवटे ,शिवसेनेचे अभिजीत अडसूळ आणि युवा स्वाभिमानचे रमेश बुंदिले यांच्यात लढत..

  • 22 Nov 2024 10:37 AM (IST)

    Maharashtra News: चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले विजयाचे बॅनर….

    मंगेश चव्हाण आमदार पदी पुन्हा एकदा नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर शहरात झळकले… भाजप युवा मोर्चाकडून शहरात मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले… निकालाला एक दिवस बाकी असताना कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला… विकासाचा दुसरा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज असाही बॅनर वर उल्लेख… चाळीसगाव विधानसभेत भाजपचे मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेना उबाठाचे उन्मेश पाटील यांच्यात थेट सामना रंगला होता….

  • 22 Nov 2024 10:20 AM (IST)

    Maharashtra News: छत्रपती संभाजी नगर शहरात निवडणूक निकालावर लागला 50 कोटींचा सट्टा

    छत्रपती संभाजी नगर पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभावर लागला सट्टा… कोण निवडून येणार यासाठी सट्टा बाजार आला तेजीत…. संभाजीनगरच्या निकालाबाबत सट्टा बाजारातील बुक्की देखील संभ्रमात… कोण निवडून येईल याबाबत सट्टा बाजारातही संभ्रम… सर्वाधिक संभ्रम पश्चिम विधानसभा मतदारसंघात…

  • 22 Nov 2024 10:10 AM (IST)

    Maharashtra News: महायुतीकडून अरक्षांना पैशांची ऑफर, याचा अर्थ आम्ही जिंकत आहोत – संजय राऊत

    महायुतीकडून अरक्षांना पैशांची ऑफर, याचा अर्थ आम्ही जिंकत आहोत…. शेकाप, सपाचे आमदार देखील निवडून येत आहेत… एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही… सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही…. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 22 Nov 2024 10:00 AM (IST)

    26 तारखेला आम्हीच सरकार स्थापन करू – संजय राऊत यांना विश्वास

    महाविकास आघाडी 160 जागा सहज जिंकेल. एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही. आम्ही कमीत कमी 160 जागा सहज जिंकू, 26 तारखेला आम्हीच सरकार स्थापन करू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

  • 22 Nov 2024 09:53 AM (IST)

    मणिपूर सारख्या गंभीर विषयावर काँग्रेस राजकीय फायदा करून घेत आहे – भाजप अध्यक्ष जे पी नड्डांचा आरोप

    नवी दिल्ली  – भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र  लिहीलं आहे.  मणिपूर सारख्या गंभीर विषयावर राजकीय फायदा काँग्रेस करून घेत असल्याचा नड्डा यांचा आरोप आहे.  देशाला कमजोर करणाऱ्या शक्तींना आम्ही पाठिंबा देणार नाही, नड्डा यांनी पत्रात केलं नमूद.

  • 22 Nov 2024 09:39 AM (IST)

    विधानसभा मतमोजणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून खबरदारी, उद्धव ठाकरेंचा उमेदवारांशी संवाद

    विधानसभा मतमोजणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांशी काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

    मतमोजणीवेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तसंच उमेदवारांनी काय काळजी घ्यावी, यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि तज्ञांनी उमेदवार आणि प्रमुखांना मार्गदर्शन केलं.  टपाली आणि ईव्हिएम मधील मतमोजणीसंदर्भातील बारकावे,कोणत्या वेळी आक्षेप घ्यावेत, लेखी तक्रार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले

    लोकसभा निवडणुकीतील उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात झालेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे आणि पक्षाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.  लोकसभेत झालेल्या प्रकारानंतर ठाकरे गट वारंवार सावध भूमिका घेताना दिसत आहे.

  • 22 Nov 2024 09:34 AM (IST)

    महायुतीचा प्लॅन बी तयार, बहुमतापासून दूर राहिल्यास काय करणार ?

    महायुतीचा प्लॅन बी तयार. बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षाची मोट बांधणार.

    छोट्या छोट्या घटक पक्षाशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरु असून त्यांना घेऊन महायुती सरकार बनवण्याचाही प्रयत्न असेल. सत्तेतील वाटा देऊन घटक पक्षांना जवळ ठेवणार.

  • 22 Nov 2024 09:29 AM (IST)

    अनिल परब यांना धक्का, अनधिकृत रिसॉर्टला संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

    रत्नागिरी- अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत साई रिसोर्टला संरक्षण देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने परब यांना मोठा धक्का. अनिल परब, सदानंद कदम यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे आता हे रिसॉर्ट पाडावे लागणार,  तसेच 25 लाख रुपये दंडही भरावा लागणार.

    आमच्या तक्रारीनंतर भारत सरकारने CRZ नियमांच्या उल्लंघनामुळे हे रिसोर्ट पाडण्याचे दिले होते आदेश. अनिल परब यांचे रिसॉर्ट तुटणार, किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे

  • 22 Nov 2024 09:20 AM (IST)

    चेंबूरच्या छेडा नगर येथे पहाटे मुंबई पोलिसांच्या निर्भया वाहनाचा अपघात

    चेंबूरच्या छेडा नगर येथे पहाटे मुंबई पोलिसांच्या निर्भया वाहनाचा अपघात. घाटकोपरहून पेट्रोल भरून येत असताना पोलिस व्हॅनने ट्रेलरला दिली धडक. अपघातात २ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून जयदीप पाटील आणि साहिल खामकर अशी या दोघांची नावे आहेत

  • 22 Nov 2024 09:19 AM (IST)

    विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी आणि निकाल.

    विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी आणि निकाल. काऊंटडाऊन सुरू होताच नेत्यांची धाकधूक वाढली. कोण बाजी मारणार, विजयी गुलाल कोण उधळणार उद्या होणार स्पष्ट.

Published On - Nov 23,2024 12:17 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.