ठाकरेंची नजर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात? अचूक टायमिंग साधला; मिलिंद नार्वेकरांची कुणी घेतली भेट?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. ही भेट मुरबाड मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलू शकते. म्हात्रे यांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला असून, ही भेट त्यांच्या राजकीय रणनीतीचा भाग असू शकते. निवडणुकीपूर्वीच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

ठाकरेंची नजर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात? अचूक टायमिंग साधला; मिलिंद नार्वेकरांची कुणी घेतली भेट?
मिलिंद नार्वेकरांची कुणी घेतली भेट?
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 1:46 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच आता राज्यात मोठ्या राजकीय घटना घडताना दिसत आहेत. अनेक नेते एकमेकांची भेट घेऊन आपली सेटिंग लावताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या मतदारसंघात सुरुंग लावताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे हे कंबर कसून कामाला लागले आहेत. हे सर्व सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे गटातील एका नेत्याने आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली आहे. या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. पण या नेत्याने अचूक टायमिंग साधल्याची चर्चा आहे. तर ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यावर आपली नजर केंद्रीत तर नाही ना केली? अशी चर्चाही सुरू झाली आहे.

बदलापूरचे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो स्वतः वामन म्हात्रे यांनीच फेसबुकवर टाकले. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत वामन म्हात्रे यांनी मिलिंद नार्वेकर यांची भेट घेऊन बिनधास्तपणे फोटो सोशल मीडियावर टाकल्याने म्हात्रे यांनी अचूक टायमिंग साधल्याची चर्चा बदलापुरात रंगली आहे.

राजकीय चर्चा झाली

‘दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त नार्वेकर यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या, या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली’, असं वामन म्हात्रे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. या भेटीमुळे बदलापूर शहरात चर्चांना उधाण आलं आहे. कारण बदलापूर शहराचा समावेश असलेल्या मुरबाड मतदारसंघात भाजप उमेदवार किसन कथोरे आणि वामन म्हात्रे यांच्यात निवडणुकीपूर्वीच काही तरी बिनसलं आहे. त्यामुळे यंदा म्हात्रे यांनी कथोरेंविरोधात असहकार पुकारला आहे. तर आधी शिंदेंसेनेत असलेले आणि सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्याशी मात्र म्हात्रे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे वामन म्हात्रे यांनी अचूक टायमिंग साधत या पोस्टमधून अप्रत्यक्षपणे काही संकेत दिल्याची चर्चा बदलापूरमध्ये आहे.

बंडखोरीचा इशारा दिला होता

दरम्यान, मुरबाड मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला मिळावा अशी मागणी वामन म्हात्रे आणि सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत केली होती. मात्र महायुतीने भाजपाच्या किसन कथोरे यांनाच पुन्हा संधी दिल्यामुळे नाराज म्हात्रे हे बंडखोरीच्या पवित्र्यात होते. मात्र त्यांनी बंडखोरी केली नाही. दुसरीकडे सुभाष पवार यांनी मात्र पक्षांतर करत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवली. त्यामुळे आता म्हात्रे हे महाविकास आघाडीच्या सुभाष पवार यांना अप्रत्यक्षपणे मदत करतील अशी शक्यता बदलापूरमध्ये व्यक्त होत असून ऐन निवडणुकीत म्हात्रेंच्या या भेटीमुळे आगामी काळात फटाके फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.