Maharashtra Exit Poll 2024 Results : मराठवाड्यातही जरांगेंचा इम्पॅक्ट नाहीच? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी!

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन उभारलं. हे आंदोलन जेथून सुरू झालं ते अंतरवाली सराटी हे गाव मराठवाड्यात येते.

Maharashtra Exit Poll 2024 Results : मराठवाड्यातही जरांगेंचा इम्पॅक्ट नाहीच? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी!
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 7:07 PM

बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातल्या दोन बड्या पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. तसेच राज्यात महायुतीचं सरकार असतानाच आरक्षणासाठी मराठा समाजाचं मोठं आंदोलन उभं राहिलं ज्याचं नेतृत्व सध्या मनोज जरांगे पाटील करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली होती, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.

या आंदोलनाचा फटका हा राज्यातील महायुती सरकारला बसेल असं बोललं जातं होतं, विशेषत: या आंदोलनाची धग ही मराठवाड्यात अधिक बसू शकते असा अंदाज होता, मात्र एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत, ज्यामध्ये मराठावाड्यात महायुती जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या कमी जागा निवडून येतील असा अंदाज आहे.

मराठवाडा क्षेत्रात विधानसभेच्या एकूण 46 जागा आहेत, त्यापैकी तब्बल तीस जागांवर महायुतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. तर 15 जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी होऊ शकतो.अ‍ॅक्सिसच्या वतीनं हा एक्झिट पोल करण्यात आला आहे. याचाच अर्थ मराठवाड्यात महायुतीला जास्त जागा मिळताना दिसत आहेत, ही जागांची आकडेवारी महाविकास आघाडीच्या जवळपास दुप्पट आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन उभारलं. हे आंदोलन जेथून सुरू झालं ते अंतरवाली सराटी हे गाव मराठवाड्यात येते. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय देखील घेतला होता, मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली, मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाचा आणि मराठा समाजात सरकार विरोधात असलेल्या रोषाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यात महायुतीला बसेल असा अंदाज होता, मात्र एक्झिट पोलनुसार मराठवाड्यात महायुतीचे तब्बल 30 उमेदवार निवडून येण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडी 15 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.