Maharashtra Exit Poll 2024 Results : मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट नाहीच? मराठा कुणाच्या बाजूने?; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?

आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं, त्यानंतर आता वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा भाजपच मोठा पक्ष ठरला आहे.

Maharashtra Exit Poll 2024 Results : मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट नाहीच? मराठा कुणाच्या बाजूने?; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 7:52 PM

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. दरम्यान मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार महायुतीमध्ये भाजपला 77 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला शिंदे गटाला 3 7 ते 50 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 18 ते 28 जाग मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 28 ते 47 जागा शिवसेना ठाकरे गटाला 16 ते 35 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 25 ते 39 जागा मिळण्याची शक्यता आहे.  तर इतर आणि अपक्षाच्या वाट्याला 12 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे.

तर चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 90 पेक्षा अधिक जागा मिळताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाला 48 जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 22 पेक्षा अधिक जागा दाखवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे, काँग्रेसला 63 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला 40 पेक्षा जास्त जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 35 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला एकूण 152 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर  महाविकास आघाडीकला 130 ते 138 जागा मिळण्याची शक्यता आहे.  पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतुन माघार घेतली. त्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. याचा फटका हा भाजपला बसणार असं मानलं जात होतं. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्याचा फायदा आम्हाला होऊ शकतो असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. मात्र एक्झिट पोलनुसार सध्या तरी महायुतीच्या अधिक जागा येण्याची शक्यता आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा निवडणुकीतुन माघार घेतली तेव्हा त्यांनी आपला कोणत्याही पक्षाला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं होतं. मराठा बांधवांनी ज्यांना वाटेल त्यांना मतदान करावं, मात्र आरक्षण डोक्यात ठेवा असं त्यांनी म्हटलं होतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.