हळवार प्रेमाचा जोडीदार हरपला, बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन
बॅरिस्टर अंतुले आणि नर्गिस यांचे 1957 साली लग्न झाले. पहिल्या नजरेतच ते अंतुले नर्गिस यांच्या प्रेमात पडले. त्यावेळी नर्गिस यांचे वय केवळ 16 वर्ष होते. बॅरिस्टर अंतुले यांनी त्यांच्याशी लग्न करण्यासाठी 4 वर्षे वाट पाहिली.
मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांच्या पत्नीचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात नीलम, मुबीना आणि शबनम या तीन मुली तसेच त्यांचे जावई मुश्ताक अंतुले असा परिवार आहे. अंतुले यांच्या राजकारणात पत्नी नर्गिस यांनी मोठी साथ दिली होती. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अतिशय विश्वासू निष्ठावंत सहकारी म्हणून अब्दुल रहमान अंतुले यांची ओळख होती. नर्गिस यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. नर्गीस यांच्यावर गुरुवारी दुपारी आंबेत या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
बॅरिस्टर अंतुले आणि नर्गिस यांचे 1957 साली लग्न झाले. पहिल्या नजरेतच ते अंतुले नर्गिस यांच्या प्रेमात पडले. त्यावेळी नर्गिस यांचे वय केवळ 16 वर्ष होते. बॅरिस्टर अंतुले यांनी त्यांच्याशी लग्न करण्यासाठी 4 वर्षे वाट पाहिली. नर्गिस 20 वर्षाच्या झालाय तेव्हा त्यांनी लग्न केले. 1957 पासून ते बॅरिस्टर अंतुले यांच्या निधनापर्यंत त्यांनी सुखी संसार केला.
बॅरिस्टर अंतुले यांनी 9 जून 1980 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे ते पहिले मुस्लिम व्यक्ती होते. बॅरिस्टर अंतुले यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. देश्भार्त त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात आले होते. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार लंडनमधून आणण्याची त्याची घोषणाही लोकप्रिय झाली होती.
बॅरिस्टर अंतुले यांच्या पत्नी नर्गिस यांना लेखन आणि वाचनाची प्रचंड आवड होती. बॅरिस्टर अंतुले यांनी त्यांच्यासाठी अनेक प्रेमपत्रे लिहिली होती. जेव्हा नर्गिस अंतुले यांना एकांत मिळायचा त्यावेळी आवर्जून ती प्रेमपत्रे पुन्हा पुन्हा वाचत. सोबत अनेक पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे होता.