Maharashtra Flood : घर-दुकानात पाणी शिरलेल्यांना 10 हजार, तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजार, पूरग्रस्तांना मदत जाहीर
ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरलं त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सांगली : राज्यातील 8 ते 9 जिल्ह्यात महापुरानं थैमान घातलं. चिपळूण, महाड आदी ठिकाणी अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं होतं. सांगली आणि कोल्हापुरात अद्यापही घरांमध्ये, रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. घरातील सर्व साहित्य, दुकानातील सामान पूर्णत: वाया गेलं आहे. अशावेळी राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरलं त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (10 thousand rupees to family whose house and shops was flooded, 5 thousand help for food grains)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत विजय वडेट्टीवार यांनी महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली. अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र अधिकारी नेमला आहे. महाड आणि चिपळूणमध्ये 30 फुटापर्यंत पाणी होतं. दरडी कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढली आहे. लोकांचं न भरुन येणारं नुकसान झालं आहे. सांगलीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाणार. एनडीआरएफच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तुकड्या तयार करणार असल्याची माहितीही यावेळी वडेट्टीवार यांनी दिली.
2019च्या जीआर प्रमाणे पूरग्रस्तांना मदत
त्याचबरोबर पूरग्रस्तांना 2019च्या जीआर प्रमाणे पूरग्रस्तांना मदत दिली जाणार अशी घोषणा केली आहे. ते पुण्यात बोलत होते. 2019 मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आणि केंद्राचे सर्व नियम बाजूला ठेवत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीसांच्या काळातील त्या जीआरप्रमाणेच राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत दिली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.
अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची घोषणा
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून काल 6 जिल्ह्यांमध्ये पुराने बाधित झालेल्या कुटुंबांना 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 5 किलो तूरडाळ, 5 लिटर केरोसीन मोफत देण्यात येणार आहे, अशी घोषणा यावेळी अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
अखेर पाच दिवसानंतर तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी
10 thousand rupees to family whose house and shops was flooded, 5 thousand help for food grains