एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, दिवाळीपूर्वी पगार आणि इतके सानुग्रह अनुदान

सर्वत्र दिवाळीचे वेध लागले असताना एकीकडे घराघरात दिवाळी खरेदीचे बेत आखले जात असताना राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणारी बातमी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, दिवाळीपूर्वी पगार आणि इतके सानुग्रह अनुदान
SHIVNERI
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 12:35 PM

मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अवघ्या महिन्यावर दिवाळी आली असल्याने सर्वसामान्यांनी खरेदीसाठी प्लानिंग सुरु केले आहे. राज्य सरकारने दिवाळीचा सण तोंडावर आल्याने दिवाळीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना 5,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान ( DIWALI BONUS ) देण्याची घोषणा केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा ( MSRTC ) पगार दिवाळी पूर्वीच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच सण अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्यात येणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यामुळे यंदा आनंदात जाणार आहे.

राज्यात आघाडी सरकार सत्तेवर असताना सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना अडीच हजार तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. आता यंदाही एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार सानुग्रह अनुदान मिळणार आहे. तसेच दिवाळीआधी महिन्याचा पगार खात्यात जमा होणार आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळातील तृतीय आणि चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांना ज्यांचे वेतन 43,477 अथवा त्यापेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना सण अग्रिम म्हणून 12,500 म्हणून देण्यात येणार आहे.

या योजनांमुळे मंडळाला फायदा

एसटी महामंडळाला कोरोनाकाळांत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. महामंडळ सातत्याने तोट्यात असल्याने राज्य सरकारच्या आर्थिक मदतीवर महामंडळ कर्मचाऱ्यांचे वेतन होत आहे. मात्र, सरकारने 75 वर्षांच्या वरील ज्येष्ठ प्रवाशांना मोफत प्रवास आणि महिलांना अर्ध्या तिकीटातून प्रवास योजना सुरु केल्याने महामंडळाचे प्रवासी वाढून हळूहळू महामंडळाचे उत्पन्न वाढत आहे. लवकरच महामंडळ नफ्यात येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.