आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी समोर

येत्या गुरुवारी ५ डिसेंबरला राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबतच अनेक मंत्र्‍यांचाही शपथविधी होणार आहे. आता यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कोणते नेते शपथ घेणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.

आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी समोर
एकनाथ शिंदेImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 9:00 PM

Maharashtra CM Oath Taking Ceremony : महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला पार पडणार आहे. राज्यातील सध्या सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. महायुतीला बहुमत मिळालेलं असताना अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? हे निश्चित झालेले नाही. तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला आहे. त्यातच आता सध्या सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने घडत आहेत. येत्या गुरुवारी ५ डिसेंबरला राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबतच अनेक मंत्र्‍यांचाही शपथविधी होणार आहे. आता यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कोणते नेते शपथ घेणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या ५ डिसेंबरला आझाद मैदानावर 22 ते 34 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात भाजपचे जवळपास 19 नेते मंत्रिपदाची शपथ घेतील असे बोललं जात आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, गणेश नाईक, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ अशा नव्या चेहऱ्यांना दिली जाणार असल्याची शक्यता आहे. तर शिवसेनेच्या 6 नेत्यांना मंत्रि‍पदाची संधी देण्यात येणार आहे.

शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?

1) एकनाथ शिंदे

2) दादा भुसे

3) शंभूराज देसाई

4) गुलाबराव पाटील

5) अर्जुन खोतकर

6) उदय सामंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित

दरम्यान राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा अतिशय भव्यदिव्य असा असणार आहे. येत्या 5 डिसेंबरला म्हणजेच पुढच्या दोन दिवसांनीच मुंबईतील आझाद मैदानात नव्या सरकारचा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार आहेत. या शपथविधीसाठी एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण करण्यात आलं आहे. शपथविधीच्या या ग्रँड महोत्सवात केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी साधू-महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.

दिवसभरात काय-काय घडलं?

एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचा दरेगावातील मुक्काम वाढला होता. शिंदे सलग दोन दिवस दरेगावात होते. त्यानंतर ते मुंबईत आले. पण प्रकृतीत सुधार न झाल्यामुळे ते ठाण्यातील निवासस्थानी आराम करत होते. या सर्व घडामोडींनंतर आज दुपारी एकनाथ शिंदे हे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी गेले. सर्व चेकअप झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेला रवाना झाले. एकनाथ शिंदे अवघ्या अर्ध्या तासात वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिनासाठी काय-काय तयारी केली आहे याची आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.