एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रीपद या दोन्हीही पदांवर ठाम आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेत मोठा तिढा पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 1:49 PM

Maharashtra Government formation : महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या ५ डिसेंबरला महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदाना पार पडणार आहे.  यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा तोंडावर आलेला असताना सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम आहे. महायुतीला बहुमत मिळालेलं असताना अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता एकनाथ शिंदेंकडून आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला आहे. मात्र भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे. त्याउलट एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रीपद या दोन्हीही पदांवर ठाम आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेत मोठा तिढा पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या आज होणाऱ्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या ते विश्रांती घेत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

एकनाथ शिंदे दरेगावात मुक्कामी

दरम्यान शनिवार आणि रविवार असे दोन दिवस एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते विश्रांतीसाठी गावी गेले होते. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ते दरे गावात होते. यानंतर काल संध्याकाळी ते मुंबईत परतले. यानंतर आज एकनाथ शिंदे अनेक बैठकांना हजेरी लावतील असे सांगितले जात होते. मात्र सध्या एकनाथ शिंदेंची प्रकृती ठिक नसल्याने ते विश्रांती घेत आहे.

एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने महायुतीच्या आज होणाऱ्या बैठका कशा पार पडणार, गृहमंत्रिपदाचा तिढा सुटणार का? शिंदे गट फक्त उपमुख्यमंत्रीपदावर समाधानी होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत. त्यामुळे आता सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.