एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार? गृहखात्याऐवजी ‘ही’ दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत सत्तास्थापनेवर चर्चा झाली. यावेळी कोण-कोणती मंत्रिपदे दिली जाणार, याबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच गृहमंत्रिपदाचे काय करायचे यावरही चर्चा झाली.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार? गृहखात्याऐवजी 'ही' दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 8:35 AM

Maharashtra Government formation : महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या ५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी मुंबईतील आझाद मैदानावर सुरु आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरु असताना दुसरीकडे सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला. तर भाजपकडून गृहमंत्रिपदाचा दावा सोडणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यातच काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत गृहमंत्रिपदावर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे शिंदेंना गृहखात्याऐवजी नगरविकास आणि एक महत्त्वाचे खाते दिले जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत सत्तास्थापनेवर चर्चा झाली. यावेळी कोण-कोणती मंत्रिपदे दिली जाणार, याबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच गृहमंत्रिपदाचे काय करायचे यावरही चर्चा झाली. यानंतर भाजपकडून एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. शिंदेंनी ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णयही घेतला आहे. मात्र एकनाथ शिंदेंना गृहखात्याऐवजी नगरविकास आणि एक महत्त्वाचे खातं देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अद्याप यावर कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही.

काल नेमंक काय काय घडलं?

एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने ते गेल्या काही दिवसांपासून आराम करत होते. यानंतर काल ज्युपिटर रुग्णालयात एकनाथ शिंदेंच्या काही चाचण्या करण्यात आल्या. यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. यानंतर ते थेट वर्षा निवासस्थानी दाखल झाले. यानंतर एकनाथ शिंदेंनी बैठकांचा सपाटा सुरु केला.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिनासाठी काय-काय तयारी केली आहे याची आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यानंतर भाजप नेते गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यानंतर एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले.

गिरीश महाजनांनी एकनाथ शिंदे यांचा निरोप देवेंद्र फडणवीस यांना कळवला. गिरीश महाजन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर थेट देवेंद्र फडणवीस हे स्वत: एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक झाली. यानंतर अवघ्या १५ मिनिटात देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्याबाहेर आले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र अद्याप सत्तास्थापनेचा पेच सुटला की नाही, याची माहिती समोर आलेली नाही.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.