Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुपदेशन किटमध्ये चक्क रबरी लिंग, आशा वर्करांसमोर पेच; Chitra Wagh यांची राज्यसरकारवर सडकून टीका

लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपापाययोजना राबविल्या जातात. त्यामध्ये राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा मोठा वाटा असतो. या विभागाकडून कुटुंब नियोजनाचा उपक्रम सुद्धा राबवण्यात येतोय.

समुपदेशन किटमध्ये चक्क रबरी लिंग, आशा वर्करांसमोर पेच; Chitra Wagh यांची राज्यसरकारवर सडकून टीका
समुपदेशन किटमध्ये चक्क रबरी लिंग, आशा वर्करांसमोर पेचImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 8:05 AM

बुलडाणा: लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपापाययोजना राबविल्या जातात. त्यामध्ये राज्य सरकारच्या (Maharashtra Government) सार्वजनिक आरोग्य विभागाचा मोठा वाटा असतो. या विभागाकडून कुटुंब नियोजनाचा (family planning) उपक्रम सुद्धा राबवण्यात येतोय. मात्र, राज्य सरकारकडून कुटुंब नियोजनासाठीच्या समुपदेशन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याचे समोर आलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर (Asha Worker) नाराज असून त्यांच्या समोर अजब पेच निर्माण झाला आहे. तर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करून राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

आशा सेविका कुटुंब नियोजनासाठी गावागावात जाऊन महिलांचं समुपदेशन करत असतात. मात्र, राज्य सरकारकडून आशा सेविकांना देण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन किटमध्ये चक्क रबरी लिंग देण्यात आलंय. मात्र यामुळे आशा सेविकांसमोर समोर मोठा पेच निर्माण झाला असून हे रबरी लिंग प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्या किटमध्ये देण्यात आलेय. आशा सेविकांना ते रबरी लिंग घेऊन गावागावात फिरायचे कसे? असा प्रश्न पडलाय. त्यामुळे राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

आरोग्य विभागाची कबुली

तर प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आले असल्याचं आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. मात्र ते कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. हे रबरी लिंग घेऊन ग्रामीण भागातील महिलांसमोर जायचं कसं? या विवंचनेत आशा वर्कर्स असल्याचं पाहायला मिळत आहे. आशा सेविकांशी या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन सरकार विरोधात बोलायला नकार दिला. मात्र सरकारच्या या अजब कारभारावर महिलांमधून संताप व्यक्त होत आहे.

चित्रा वाघ सरकारवर भडकल्या

हा प्रकार समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी सडकून टीका केली आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..?? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा… आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले 35/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून…थोडी लाज ठेवा…मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका…असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

PHOTO: मालेगावच्या दहिदी परिसरातील डोंगराला भीषण आग; अग्निशमन विभागाचे 4 बंब घटनास्थळी दाखल

Harbour Line वरती आज मेगाब्लॉक, जाणून घ्या दिवसभरातलं रेल्वेचं वेळापत्रक

Nagpur ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र विशेष मोहीम

डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.