लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी लर्निंग फ्रॉम होम, शासनाकडून ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरु

विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने लर्निंग फ्रॉम होमची संकल्पना सुरु केली (Maharashtra Lockdown Student Learn From Home) आहे.

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी लर्निंग फ्रॉम होम, शासनाकडून ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरु
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 6:47 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात (Maharashtra Lockdown Student Learn From Home) आलं आहे. त्यामुळे राज्यातील शाळा महाविद्यालय बंद आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने लर्निंग फ्रॉम होमची संकल्पना सुरु केली आहे. नुकतंच महाराष्ट्र शासनाने याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे.

या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना DIKSHA अॅप किंवा पोर्टलद्वारे शिक्षण घेता येणार आहे. या अॅपवर पहिली ते दहावी पर्यंतच सर्व शिक्षण साहित्य या अॅपवर उपलब्ध आहेत. त्यामुळे घरातच अभ्यास करण्याचे सरकारने आवाहन केलं आहे. इतकंच नव्हे तर 11 वी आणि 12 वी चे शिक्षण साहित्य ऑनलाईन उपलब्ध आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशा परिस्थिती राज्यातील शाळा महाविद्यालय बंद आहे. तसेच शालेय स्तरावरील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील कालावधीकरिता वाढवण्यात आली आहे. संचारबंदीच्या या काळात प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाच्या प्रवाहात असणे महत्त्वाचे आहे. यासाठी तंत्रज्ञानाच्या या युगात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे आता उपयुक्त ठरणार आहे. त्याआधारे मुलांना स्वयंअध्ययन करता येईल, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

यासाठी मुलांना लर्निंग फॉर्म होम म्हणजे घरी राहून शिक्षण ही संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने DIKSHA या ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरु केले आहे. यात प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकाला मोफत आणि मुबलक प्रमाणात ई-लर्निंगचे साहित्य मिळणार आहे.

यात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यामातील 9000 पेक्षा अधिक ई-लर्निंग साहित्य उपलब्ध आहे. यात इंटरअॅक्टिव व्हिडीओ, बौध्दिक खेळ स्वरुपातील गेम्स, विविध वर्कशीट, प्रश्नपेढी इत्यादींचा समावेश आहे. या अॅपचा वापर करुन विद्यार्थी घरबसल्या अध्ययन सुरु ठेवू शकतात. तसेच पालकही याचा वापर करुन विद्यार्थ्यांना अभ्यास घेऊ शकता, असेही यात म्हटलं (Maharashtra Lockdown Student Learn From Home) आहे.

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना दिलासा, मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांसाठी नियमावली जारी

पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची घरी जाण्याची व्यवस्था, मंत्री विजय वडेट्टीवार यांचं आश्वासन

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.