Remdesivir Injection | कोरोनावर प्रभावी Remdesivir इंजेक्शन राज्य सरकार खरेदी करणार, काय आहे रेमडेसीवीर इंजेक्शन?
महाराष्ट्र शासनाने Remdesivir चे 10000 vial इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Government Buy Remdesivir Injection Covid 19)
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनावर Remdesivir हे इंजेक्शन प्रभावी मानलं जातं. याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. मात्र हे औषध अत्यंत महाग आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने Remdesivir चे 10000 vial इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली. (Maharashtra Government Buy Remdesivir Injection Covid 19)
“रेमडेसीवीर हे इंजेक्शन मुंबईत काही रुग्णांना देण्यात आले. त्याचा चांगला परिणाम जाणवला. मात्र ते औषध फार महाग आहे. ते त्या संबंधित रुग्णांनी विकत आणलं होतं. मात्र ते औषध शासनानेही खरेदी केलं पाहिजे. हे औषध अँटी व्हायरल आहे. ते व्हायरसला नष्ट करण्याचे काम करतयं, अशी माहिती सांगण्यात आली आहे.”, असे राजेश टोपे टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले.
“हे औषध महागडं आहे. पण ती औषधं गरीब लोकांनाही उपलब्ध झाली पाहिजे. या दृष्टीकोनातून 10 हजार इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. तात्याराव लहाने यांनी याबाबतची माहिती मला सांगितली.
याचा परिणाम काही गंभीर रुग्णांवर होऊ शकेल. पण ते कोणाला द्यायचे, कोणला नाही याचाही काही प्रोटोकॉल असतो. त्या तपासून निश्चित त्याचा उपयोग होईल. हे इंजेक्शन सहसा उपलब्ध नसतं,” असेही राजेश टोपे म्हणाले.
“सध्या हे इंजेक्शन आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आपण बांगलादेश मधून आपण त्याची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा चांगला परिणाम येणाऱ्या दिवसात जाणवले. श्वसनाचा त्रास तसेच आणखी हृदयविकार, श्वसनासंबंधीचे आजार असे काही आजार आहेत. त्यांच्यासाठी हे कोरोना ब्रेक करण्यासाठी हे वापरलं जाऊ शकतं,” अशीही माहिती राजेश टोपेंनी यावेळी दिली.
“ज्या गरीबांना हे औषध घेणं परवडणारे नाही. त्यांना ते मिळावं असाचं त्याचा दृष्टीकोन आहे. त्याची काही ट्रायल ज्या छोट्या मोठ्या असतील त्या WHO ने यशस्वी झाले हे सांगितले आहे. तसेच त्याचा परिणाम जाणवला आहे. त्यामुळे ते घेण्याचा निर्णय झालेला आहे. ज्यावेळी ते मिळेल त्यावेळी अधिक चांगल्या रितीने त्यावर उपचार सुरु होईल,” असेही राजेश टोपे म्हणाले.
राजेश टोपेंची ट्विटद्वारे माहिती
“महाराष्ट्र शासन Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन खरेदी करणार आहे. यात प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जो देखील कोरोना व्हायरसमुळे होतो.”
“WHO सुचविते की Covid19 उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली,” असे ट्विट राजेश टोपे यांनी केले आहेत.
महाराष्ट्र शासन Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन खरेदी करणार.प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जो देखील कोरोना व्हायरसमुळे होतो. 1/2@DrLahanetp @CMOMaharashtra @ChaiMIRROR
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 6, 2020
WHO सुचविते की Covid19 उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली.2/2@DrLahanetp @CMOMaharashtra @ChaiMIRROR
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 6, 2020
काय आहे रेमडेसीवीर इंजेक्शन?
- कोरोनावर प्रभावी मानलं जाणारं इंजेक्शन
- WHO ने शिफारस केलेलं रेमडेसीवीर इंजेक्शन
- एका इंजेक्शनची किंमत अंदाजे 12 हजार रुपये
- महाराष्ट्र खरेदी करणार 10 हजार इंजेक्शन
- तीन अन्य औषधांसोबत उपचारात वापर
- मुळात MERS- CoV, SARS वर प्रभावी
- हे दोन्ही आजारही विषाणूंमुळे होतात
- अमेरिकेतील गिलीड सायन्स इंकचं उत्पादन
- बांग्लादेशातील इस्केएफकडे उत्पादन परवाना
- बांग्लादेशातील इस्केएफ फार्माचा प्रस्ताव
- भारतीय कंपन्यांनीही बनवलीत तशीच इंजेक्शनं
- अद्यापि औषध नियंत्रकांकडून मान्यता मिळालेली नाही
(Maharashtra Government Buy Remdesivir Injection Covid 19)
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,436 नवे रुग्ण, आतापर्यंत 35,156 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात ‘पुनश्च हरिओम’, पहिला-दुसरा टप्पा आजपासून, काय सुरु काय बंद?