Maharashtra lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवावाच लागेल- राजेश टोपे

ब्रेक द चेन (Lockdown) अंतर्गतचे प्रतिबंधात्मक नियम आणखी 15 दिवसांकरीता वाढवले जाऊ शकतात. (maharashtra government coronavirus lockdown)

Maharashtra lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवावाच लागेल- राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 5:28 PM

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार आहे. राज्यात कोरोनाला ( Coronavirus transmission) थोपवण्यासाठी लागू करण्यात आलेले ब्रेक द चेन (Lockdown) अंतर्गतचे प्रतिबंधात्मक नियम आणखी वाढवण्यात येणार आहेत. हे नियम आणखी 15 दिवसांकरीता वाढवले जाऊ शकतात. कोरोनाला थोपवण्यासाठीच्या उपायोजना, तसेच लसीकरणावर चर्चा करण्यासाठी आज (28 एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी वरील माहिती दिली दिली. (Maharashtra government will extend Lockdown and break the chain rule to stop Coronavirus transmission said Rajesh Tope)

राजेश टोपे काय म्हणाले ?

कोरोनाच्या संसर्गावर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत कोरोना संसर्ग, लसीकरण आणि ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक नियम यावर चर्चा करण्यात आली. याविषयी माहिती देताना, “ब्रेक द चेनच्या अनुषंगाने आपण लॉकाडाऊन लागू केलेला आहे. आज त्यावरही चर्चा झाली. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत या नियमांना लांबवणीवर टाकावंच लागेल. त्यावर सध्या चर्चा झाली. निर्बंधाच्या शेवटच्या दिवशी सध्याचे नियम 15 दिवस वाढवायचे की काय करायचं याबाबत चर्चा होईल. ब्रेक द चेनचे नियम आणखी किमान 15 दिवस वाढवले जाऊ शकतात, असा माझा अंदाज आहे,” असे राजेश टोपे म्हणाले.

2 कोटी डोस विकत घ्यावे लागणार

राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात 5 कोटी 71 लाख लोक 18 ते 44 वयोगटातील आहेत. त्यांना मोफत लस देण्यात येणार आहे. शंभर टक्के लोकांना फ्रि लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याला दोन कोटी डोस विकत घ्यावे लागणार आहेत. एका लसीसाठी 400 रुपये आकारले जातात. त्यानुसार 2 कोटी डोससाठी अंदाजे 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सहा महिन्यात लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यात लसीकरण करायचे म्हटलं तर 12 कोटी डोस द्यावे लागतील. म्हणजे दर महिन्याला 2 कोटी डोस द्यावे लागणार आहेत. आमच्या आरोग्य विभागाच्या 13 हजार संस्था असून त्यांच्या माध्यमाधून दिवसाला 13 लाख डोस देण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं.

कोणत्या कोणत्या लस घेणार

कोव्हॅक्सि उत्पादक कंपन्यांकडून या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात प्रत्येकी 10 लाख डोस मिळणार आहे. जुलैनंतर ते 20 लाख डोस देणार आहेत. कोविशिल्डचे प्रत्येक महिन्याला 1 कोटी डोस मिळणार आहे. कंपनीने तसं तोंडी आश्वासन दिलं आहे. तसेच रशियाची लस योग्य दरात आणि मुबलक प्रमाणात घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच ऑगस्ट दरम्यान झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सनकडून पुरवठा होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

इतर बातम्या :

Free Corona Vaccination | महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Maharashtra Coronavirus LIVE Update : मालेगावकारांना काहीसा दिलासा, गेल्या 24 तासात सापडले फक्त 16 नवीन रुग्ण

जिल्हाधिकाऱ्याने शिवसेना नेत्याच्या खासगी संस्थेला रेमडेसिवीर विक्रीला दिले; हिना गावित यांचा आरोप

(Maharashtra government will extend Lockdown and break the chain rule to stop Coronavirus transmission said Rajesh Tope)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.