Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरज 60 हजारांची, मिळणार फक्त 26 हजार, रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार नाराज, केंद्राला पत्र लिहणार

राज्य सरकार केंद्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा अशी मागणी करणार आहे. तशा आशयाचे पत्रसुद्धा राज्य सरकार लिहणार आहे. (remdesivir injection corona patient)

गरज 60 हजारांची, मिळणार फक्त 26 हजार, रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार नाराज, केंद्राला पत्र लिहणार
j
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 4:30 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची(Corona patien) संख्य प्रचंड प्रमाणात वाढत आहे. रोज 65 हजाराच्या पुढे नवे रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणवेवर ताण पडतो आहे. रोज 10 ते 15 टक्के रुग्णांना रेमडेसिव्हीरची गरज भासते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सराकारने राज्याला रेमडेसिव्हीरच्या केलेल्या पुरवठ्यावरुन चांगलंच राजकारण रंगलं आहे. राज्याने रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन (Remdesivir injection) गरजेपेक्षा अत्यंत कमी दिल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी राज्य सरकार केंद्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा वाढवावा अशी मागणी करणार आहे. तशा आशयाचे पत्रसुद्धा राज्य सरकार लिहणार आहे. (Maharashtra government will write letter to Central Government on Remdesivir injection supply and Corona patient)

राज्य सरकार केंद्राला लिहिणार पत्र

देशातील विविध राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीरचे आकडे केंद्र सरकारनं नुकतेच जारी केलेत. महाराष्ट्राची गरज दिवसाला 60 हजार इंजेक्शन्सची आहे. राज्य सरकार सातत्याने तशी मागणी करत आहे. केंद्र सरकारने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारला कमी इंजेक्शन्स मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाग्रस्तांची हेळसांड होणार असून त्यातून मृतांचा आकडा वाढण्याचा धोका संभवतो असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी 10 ते 15% रुग्णांना रेमडेसिव्हीरची गरज असते. त्यामुळे राज्याला दर दिवशी 60 हजार रेमडेसिव्हीर मिळणे गरजेचे आहे. याच कारणामुळे राज्य सराकर केंद्र सरकारला पत्र पाठवणार आहे. तसेच राज्याला दिलेल्या पुरवठ्याबद्दल विचार व्हावा अशी विनंतीसुद्धा राज्य सरकार केंद्राला करणार आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची नाराजी

केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्दा नाराजी व्यक्त केलीय. केंद्राने कोणत्या राज्याला किती रेमडेसिवीर वाटायचं याच नियंत्रण स्वत:कडे घेतलं आहे. यातून महाराष्ट्राला 21 ते 30 एप्रिल या काळात फक्त 26 हजार रेमडेसिव्हीर देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या निर्णयाने राज्यात 10 हजार रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रेमडेसिव्हीर आयात करू शकत नाही. तो केंद्राचा अधिकार आहे. निर्यातदारांचा साठा वापरू शकत नाही. त्यावरसुद्धा केंद्राचे नियंत्रण आहे. केंद्राने पीएओ स्तरावर रेमडेसिव्हीर निर्माण करणाऱ्या पेटंट कंपनीशी बोलून महाराष्ट्राचा आणि देशाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही टोपे यांनी केंद्राकडे केलीय.

इतर बातम्या :

अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास करण्यावर मनाई: राजेश टोपे

Coronavirus: होम क्वारंटाईन असताना शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर काय कराल?

Corona Cases and Lockdown News LIVE : दादर परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी, आतापर्यंत 60 लोकांवर केली कारवाई

(Maharashtra government will write letter to Central Government on Remdesivir injection supply and Corona patient)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.