Jai Bhavani Jai Shivaji | ‘शपथविधीसाठी नियमावली ठरवून द्या’, भगतसिंग कोश्यारी यांचं व्यंकय्या नायडूंना पत्र
भगतसिंग कोश्यारी यांनी व्यंकय्या नायडू यांच्याकडे शपथविधीसाठी नियमावली ठरवून देण्याची मागणी केली आहे (Bhagatsingh Koshyari on oath regulations).
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे शपथविधीसाठी नियमावली ठरवून देण्याची मागणी केली आहे (Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari on oath regulations). याबाबत त्यांनी पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रमुखांना आपली भूमिका स्पष्ट केली. शपथविधी घेताना आपल्या आराध्य व्यक्तींची नावं जोडून शपथ घेण्याला अटकाव बसावा यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यालयाने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. यामध्ये म्हटलं आहे, “शपथ ग्रहण प्रक्रिये संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे / आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचेकडे स्वतंत्र पत्र पाठवून केली आहे.”
शपथ ग्रहण प्रक्रिये संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे / आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचेकडे स्वतंत्र पत्र पाठवून केली आहे.
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 25, 2020
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
नुकताच भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची घोषणा दिली. यावर राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेत समज दिली. यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला. तसेच व्यंकय्या नायडूंच्या माफीची मागणीही झाली. त्याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हे पत्र लिहित शपथविधी घेण्याबाबत निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे / आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती केली आहे.
नव्याने निवडून आलेले काही संसद सदस्य आणि विधानमंडळ सदस्य निर्धारित केलेली शपथ न घेता आपल्या पक्षाचे आणि आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेतात. त्यामुळे शपथविधीचे गांभीर्य कमी होते, असं राज्यपालांनी या पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळी अशाचप्रकारे घोषणा देण्यावरुन वाद झाला होता. त्यावेळी मंत्रिपदाची शपथ घेताना आपल्या वंदनीय, प्रेरणादायी व्यक्तींचे स्मरण करणाऱ्या मंत्र्यांना राज्यपाल्यांनी रोखलं होतं. के. सी. पाडवी यांना तर पुन्हा शपथ घ्यायला लावली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली होती.
संबंधित बातम्या :
इंग्रजीतून शपथ घेऊन उदयनराजे म्हणाले, जय भवानी, जय शिवाजी, सभापतींकडून समज
व्यंकय्या नायडूंविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक, ब्राह्मण महासंघाकडून माफीची मागणी
महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता : उदयनराजे भोसले
Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari on oath regulations