राज्यात 2 हजार 500 ग्रामपंचायती आणि 130 रिक्त सरपंचपदासाठी आज मतदान; उद्या निकाल

Gram Panchayat and Sarpanch By Election 2023 : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. बारामतीतील काटेवाडीतही ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. अजित पवार विरुद्ध भाजप असा थेट सामना काटेवाडीत पाहायला मिळतेय. नेमकं काय घडतंय. वाचा सविस्तर...

राज्यात 2 हजार 500 ग्रामपंचायती आणि 130 रिक्त सरपंचपदासाठी आज मतदान; उद्या निकाल
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 9:26 AM

मुंबई | 05 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्रातील लोकसभा आणि निवडणुकीची आज पहिली झलक आज पाहायला मिळणार आहे. कारण राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूक पार पडतेय. आज या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय. राज्यातील 2 हजार 500 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक होतेय. 130 रिक्त सरपंचपदासाठी आज मतदान होतंय. तर या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निडणुकीची झलक या ग्रामपंचायत निवडणुकीचत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आज नागरिकांची मतं आज मतपेटीत बंद होतील. तर उद्या निकाल सर्वांसमोर असेल.

विदर्भात आज ग्रामपंचायत निवडणूक

विदर्भातील ६२८ गावांचा कारभारी कोण? याचा फैसल करण्यासाठी आज ग्रामपंचायत निवडणूक पार पडतेय. विदर्भातील ६२८ ग्रामपंचायतीसाठीच्या मतदानाला सुरुवात थोड्याच वेळात होणार आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३६१ ग्रामपंचायतीत आज मतदान होतंय. विदर्भात नाना पटोले, विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.कडेकोट सुरक्षेत ग्रामपंतायत निवडणुकीचं मतदान पार पडेल. लोकसभा निवडणूकीपूर्वी ग्रामीण जनतेचा कौल काय? याचा आज जनता फैसला करणार आहे.

शिंदेच्या ठाण्यात ग्रामपंचायत निवडणूक आज मतदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 61 सार्वत्रिक ग्रामपंचायत तर 7 रिक्त झालेल्या ग्रामपंचायतच्या जागेसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 68 ग्रामपंचायतीत 13 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. तर सात ग्रामपंचायत विविध कारणामुळे निवडणुका होणार नसून उर्वरित 48 ग्रामपंचायत साठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालीय. सर्वच ग्रामपंचायत मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. शहापूरमधील वासिम ग्रामपंचायतमध्येही सकाळपासून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासूनच या ठिकाणी मतदारांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावून द्यायला दिसून येत आहे.

अजित पवार विरुद्ध भाजप सामना

पवारांच्या काटेवाडीत ग्राम पंचायतीसाठी आज मतदान होतंय. काटेवाडीत ग्रामपंचायतीच्या सर्व 16 जागांसाठी आज पार मतदान पडणार आहे. काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवारांच्या पॅनल विरुद्ध भाजपचॉ पॅनल अशी लढत होतेय. काटेवाडीत थेट अजित पवार विरुद्ध भाजप लढाई होत आहे. काटेवाडी गावात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. यंदा राष्ट्रवादीच्या श्री जय भवानीमाता पॅनलच्या विरोधात सरपंचासह सर्व जागांवर भाजपचेॉं पॅनल आहे. काटेवाडीसह बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.