सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या तालुक्यातील ग्रामपंचायतीचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. या पहिल्याच निकालात पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील खुबी गावात भाजपचे अतुल भोसले यांचं पॅनले बहूमताने विजयी झालं आहे. अतूल भोसले यांच्या पॅनेलने 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर भोसले यांच्या विरोधी पॅनलला खातंही उघडता आलेलं नाही. (In karad khubi gram panchayat election is won by bjp panel)
सातारा जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येथे मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचा मोठा ताफा आहे. सकाळी 8 वाजेपासून येथे मतदानास सुरुवात झाली आहे. दरम्यान कराड तालुक्यातील पहिला निकाल जाहीर झाला आहे. खुबी गावात भाजपाचे अतुल भोसले यांचं पॅनेल येथे विजयी झालं आहे. 9 विरुद्ध शून्य असा निकाल खुबी या गावात लागला आहे. तालुक्यातील पहिल्याच ग्रमपंचायतीच्या निकालामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे 9 विरुद्ध शून्य असा निकाल लागल्यामुळे भाजपच्या या यशाची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.
खुबी येथील निवडणूक भाजपचे अतुल भोसले यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी महाविकास आघाडी विरुद्ध दंड थोपटून भापच्यावतीने पॅनल उभं केलं होतं. प्रचारादरम्यान भोसले यांनी जीवाचं रान करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या याच प्रयत्नांना आता फळ आल्याचं दिसतंय. त्यांनी येथील निवडणूक 9 विरुद्ध शून्य अशा फरकाने जिंकली आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण 80.58 टक्के झाले मतदान झाले होते. येथे एकूण 652 ग्रामपांचायतीसाठी मतमोजणी होत आहे. जिल्हयातील प्रत्त्येक गावातील प्रभाग क्रमांक 1 ची मतमोजणी होत आहे. आगामी काही क्षणांत येथील निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
संबंधित बातम्या :
(In karad khubi gram panchayat election is won by bjp panel)