Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके गटाला धक्का

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: मंगळवेढा तालुक्यात 22 पैकी 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या समाधान आवताडे गटाचा विजय झाला. (Bharat Bhalke panel Mangalwedha)

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके गटाला धक्का
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 1:43 PM

पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) गटाला धक्का बसला. 22 पैकी 13 ग्रामपंचायतींवर समाधान आवताडे गटाचा विजय झाला. मंगळवेढा तालुक्यात शिवसेनेचे समाधान अवताडे, आमदार प्रशांत परिचारक, भारत भालके यांचे गट कार्यरत आहेत. तांबडी, तांडोर, आरळी, सिद्धापूर, नंदेंश्वर और या गावात लक्षवेधी निवडणूक रंगली. हुलजंती गावात शिवसेनेच्या समाधान आवताडे गटाने एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले होते. (NCP Former MLA Bharat Bhalke panel lost in Mangalwedha)

विटे ग्रामपंचायतीत ईश्वरचिठ्ठीने कौल

विटे ग्रामपंचायतीत दोन उमेदवाराना समसमान मते मिळाली होती. दोन्ही उमेदवारांना 144 मते मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढून कौल घेण्याचा निर्णय घेण्यात आला. चिठ्ठी काढल्यानंतर भालके गटाच्या रुक्मिणी पुजारी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीत भालके गटाकडे 4 विरुद्ध 3 जागा आल्या.

मंगळवेढ्यात 21 गावांमध्ये दुरंगी लढत

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या 186 जागांसाठी 464 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मंगळवेढ्यात 21 गावांमध्ये दुरंगी लढत झाली, तर सीमावर्ती भागात असलेल्या मरवडे या गावात तिरंगी लढत झाली.

स्वाभिमानीकडूनही आव्हान

दोनच ग्रामपंचायतींसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ग्रामपंचायतीच्या आखाड्यात दोन हात करण्याचा निर्णय घेतला होता. तर लेंडवे चिंचोळे ग्रामपंचायतीसाठी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्याविरोधात समाधान अवताडे गटाने मोठे आव्हान उभे केले होते.

भारत भालके यांच्या निधनाने राजकीय पोकळी 

भारत भालके यांचे 28 नोव्हेंबर 2020 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. (NCP Former MLA Bharat Bhalke panel lost in Mangalwedha)

कोण होते भारत भालके?

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर कायम वर्चस्व ठेवले. भारत भालके यांनी सलग 18 वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती.

भालकेंच्या सुपुत्राला वारसा

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या सुपुत्राची वर्णी लागली. भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाचा एकमताने फैसला झाला होता.

संबंधित बातम्या 

भारतनानांचा वारसा मुलगा चालवणार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध

ट्रेंड बदलला; भाजपने शिवसेनेला केलं ओव्हरटेक

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | आम्ही 6 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकू : भाजप

(NCP Former MLA Bharat Bhalke panel lost in Mangalwedha)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.