अहमदनगर जिल्ह्यात मनसेने खाते उघडले, विखेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

अविनाश पालवे यांनी राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक असलेल्या अर्जुन शिरसाठ यांचा दारुण पराभव केला आहे.  (Gram Panchayat Election Result MNS Win In Ahmednagar District) 

अहमदनगर जिल्ह्यात मनसेने खाते उघडले, विखेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 5:17 PM

अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेला 29 जागांवर यश मिळालं आहे. अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. तर यवतमाळमध्ये मनसेला घवघवीत यश मिळाले आहे. वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील 15 ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. (Gram Panchayat Election Result MNS Win In Ahmednagar District)

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील ग्रामपंचायतीत एकूण 9 जागा होत्या. या सर्व जागांवर अविनाश पालवे यांचे पॅनल निवडून आले आहे. त्यामुळे आता शिरसाठवाडी ग्रामपंचायतवर मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांची सत्ता आली आहे. अविनाश पालवे यांनी राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक असलेल्या अर्जुन शिरसाठ यांचा दारुण पराभव केला आहे.

मनसेने आतापर्यंत 29 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. या जिंकलेल्या ग्रामपंचायतीत शिरपूर, मोहूर्ली, येनक, खांदला, खांदला, चंडकापुर, बाबापूर, मोहदा, शिंदी, माहागाव , गदाजी बोरी, करणवाडी या गावांचा समावेश आहे.

याशिवाय, राज्याच्या इतर भागांमध्येही मनसेने खाते उघडले आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी गावात मनसेने शिवसेना-भाजप युतीला धूळ चारत विजय मिळवला आहे. अमरावती जिल्ह्यातील खैरी सावंगी वाढोणा ग्रुप ग्रामपंचायतीमध्येही मनसेनं एकहाती विजय मिळवला आहे. पक्षानं ७ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत.

आणखी कोणत्या ग्रामपंचायींवर मनसेचा झेंडा

* सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायतीमधील सातपैकी 5 जागांवर मनसेने विजय मिळवला. * अहमदनगरच्या शिरसटवाडी ग्रामपंचायमध्ये मनसेचे 9 सदस्य विजयी * अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील खैरी सावंगी वाढोणा गट ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे ०७ पैकी ०७ उमेदवार विजयी * आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीमध्ये सातपैकी सहा जागांवर मनसेचा विजय (Gram Panchayat Election Result MNS Win In Ahmednagar District)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021: …अखेर मनसेचं इंजिन धावलं; यवतमाळमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला घवघवीत यश

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.