Satara Gram Panchayat Election Results 2021: पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का, कराड दक्षिणमधील कार्वे ग्रामपंचायतीत सत्तांतर
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: कराड दक्षिणमध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसल्याचं समोर आलं आहे. (Prthiviraj Chavan Karad Gram Panchayat)
सातारा: माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांना ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का बसल्याचं चित्र सुरुवातीच्या निकालात पाहायला मिळत आहे. कराडमधील महत्वाच्या अशा दोन ग्रामपंचायतींवर भाजपच्या पॅनेलने विजय मिळवला आहे. शेणोली शेरे आणि कार्वे गावात भाजपप्रणित पॅनेलनं विजय मिळवला आहे. हा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. ( Maharashtra gram panchayat election results 2021 BJP wins two gram panchayat in Prithiviraj Chavan Karad South Constituency)
कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कार्वे गावात अतुल भोसले यांचे पॅनेल विजयी झाले आहे. कार्वे ग्रामपंचायतीच्या 17 जांगांपैकी 10 जागांवर भाजपच्या पॅनेलनं विजय मिळवला आहे. तर पृथ्वीराज चव्हाण समर्थकांच्या गटानं 7 जागांवर विजय मिळवला. ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला अपयश आलं आहे.
शेणोली शेरेमध्ये अतुल भोसलेंच्या पॅनेलचा विजय
कराड तालुक्यातील शेणोली शेरे गावात पृथ्वीराज चव्हाणांना धक्का बसला असून भाजपच्या अतुल भोसले यांच्या पॅनेलनं एकतर्फी विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे कार्वे गावातही भाजप समर्थित पॅनेलनं विजय मिळवला आहे.
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | राज्यातील 25 मोठे निकाल, कुठे कोण जिंकलं?
खुबीमध्येही अतुल भोसलेंची विजयी सलामी
दुसरीकडे कराड तालुक्यातील पहिला निकाल खुबी या गावचा लागला आहे. खुबी गावात भाजपचे अतुल भोसले यांच्या पॅनले दणदणीत विजय मिळवला आहे. अतुल भोसले यांच्या पॅनलनं विरोधकांचा 9 विरुद्ध 0 अशा मोठ्या फरकानं दारुण पराभव केला आहे.
कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटलांचं वर्चस्व
विधानसभेच्या प्रतिष्ठित कराड उत्तर मतदारसंघातील पहिला ग्रामपंचायत निकाल हाती आला आहे. निगडी गावात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झालाय. 8 विरुद्ध 1 अशा मोठ्या फरकानं बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. पाटील यांच्या पॅनलपुठे विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कराड उत्तरमधील निगडी गावात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे
ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा
निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234 आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711 एकूण प्रभाग- 46,921 एकूण जागा- 1,25,709 प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221 अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024 वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197 मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719 बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718 अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880
सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर, मविआ 82 तर भाजपकडे 81 ग्रामपंचायतींची सत्ताhttps://t.co/n3hMIP6MhQ#गुलालकुणाचा #Grampanchayatelection #GramPanchayatElectionResults
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 18, 2021
संबंधित बातम्या :
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | राज्यातील 25 मोठे निकाल, कुठे कोण जिंकलं?
( Maharashtra gram panchayat election results 2021 BJP wins two gram panchayat in Prithiviraj Chavan Karad South Constituency)