Beed Gram Panchayat Election Results 2021: धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार, 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची टिक टिक
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीनं विजयी पताका फडकावली आहे. (Dhananjay Munde Parali NCP )
बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गटानं परळीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. परळी तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपला दारुण पराभावाला सामोरं जावं लागले आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे यांच्या गटानं विजय मिळवला. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटानं पुन्हा एकदा वर्चस्व दाखवून दिलं आहे. (Maharashtra gram panchayat election results 2021 Dhananajay Munde supporter win six Gram Panchayat in Parali)
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीनं वर्चस्व मिळवलं आहे. परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी वंजारवाडी, रेवली, सरफराजपूर, मोहा, गडदेवाडी, वंजारवाडी , लाडझरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादींनं विजय मिळवलेल्या ग्रामपंचायती
1 वंजारवाडी बिनविरोध
2 रेवली बिनविरोध
3 सरफराजपुर
4 मोहा
5. लाडझरी
6. गडदेवाडी
परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. या दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या होत्या. भोपळा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटानं विजय मिळवला आहे.
ग्रामपंचायत निकालातील महत्वाच्या घडामोडी
भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी खूर्द गावातील 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला. लोणी खूर्द गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या गावातही सत्तांतर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केल्याचं समोर आलं होत. मात्र, शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या गावातील 6 जागांवर विजयी सलामी दिली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. खानापूरमध्ये शिवेसना आमदार प्रकाश आबिटकरांन चंद्रकांत पाटील यांच्या ताब्यातील खानापूर ग्रामपंचायत खेचून आणली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा
निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234 आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711 एकूण प्रभाग- 46,921 एकूण जागा- 1,25,709 प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221 अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024 वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197 मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719 बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718 अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880
सिंधुदुर्ग ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मालवणमध्ये शिवसेनेला धक्का, 6 पैकी 5 ग्रामपंचायती भाजपकडेhttps://t.co/n3hMIP6MhQ#गुलालकुणाचा #Grampanchayatelection #GramPanchayatElectionResults
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 18, 2021
संबंधित बातम्या:
(Maharashtra gram panchayat election results 2021 Dhananajay Munde supporter win six Gram Panchayat in Parali)