Ahmednagar Gram Panchayat Election Results 2021: राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का,लोणी-खूर्द गावातील सत्ता गमावली

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावातील लोणी खूर्दमध्ये सत्तांतर झाले असून विरोधी गटानं 13 जागांवर विजय मिळवला. ( Radhakrishna Vikhe Patil lost Loni Khurd )

Ahmednagar Gram Panchayat Election Results 2021: राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का,लोणी-खूर्द गावातील सत्ता गमावली
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 11:24 AM

अहमदनगर: भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी खूर्द गावातील 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. लोणी खूर्द गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला आहे. (Maharashtra gram panchayat election results 2021 Radhakrishna Vikhe Patil lost Loni Khurd Gram Panchayat Election)

लोणी खुर्द गावात सत्तांतर

लोणी खुर्द हे राधाकृष्ण विखे-पाटलांचं गाव आहे. या गावात विखे पाटलांची 20 वर्षांपासून सत्ता होती. 17 पैकी 13 जागांवर परिवर्तन पॅनेलनं विजय मिळवल्यानं अवघ्या 4 जागांवर विखे पाटील समर्थकांचं पॅनेल विजयी झाले.

जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनल विजयी

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला. जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनेलनं 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. लोणी खूर्दमधील संत्तांतर हे विखे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यातील सहा ग्रामपंचयाती विखेंनी बिनविरोध केल्या होत्या.

चंद्रकांत पाटील यांच्या गावातही सत्तांतर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केल्याचं समोर आलं होत. मात्र, शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या गावातील 6 जागांवर विजयी सलामी दिली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. खानापूरमध्ये शिवेसना आमदार प्रकाश आबिटकरांन चंद्रकांत पाटील यांच्या ताब्यातील खानापूर ग्रामपंचायत खेचून आणली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा

निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234 आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711 एकूण प्रभाग- 46,921 एकूण जागा- 1,25,709 प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221 अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024 वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197 मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719 बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718 अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | नितेश राणेंना धक्का, सोनाळी ग्रामपंचायत शिवसेनेने जिंकली

Gram Panchayat Results | औरंगाबादच्या आडगावमध्ये महाविकास आघाडी विजयी

(Maharashtra gram panchayat election results 2021 Radhakrishna Vikhe Patil lost Loni Khurd Gram Panchayat Election)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.