Maharashtra Gram Panchayat Elections 2021 Latest News and Updates : महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी मतदान, अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद, 18 जानेवारीला निकाल लागणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज 15 जानेवारीला मतदान पार पडलं. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.
प्रभाग – 46,923
जागा – 1,24,819
उमेदवार : अडीच लाखांहून अधिक
दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66 टक्के मतदान झाले आहे.
ग्रामपंयात निवडणूक एक दृष्टिक्षेप
• निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
• आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,776
• एकूण प्रभाग- 46,921
• एकूण जागा- 1,25,709
• प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
• अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
• वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
• मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
• बिनविरोध होणारे उमेदवार- 26,718
• निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880
महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी मतदान, अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद, 18 जानेवारीला निकाल
गडचिरोली :- पाथरगोटा गावाचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, गावातुन एकही मतदान नाही, मतदान केंद्र फक्त नावापुरते, शासन मात्र अजूनही गावकर्यांच्या प्रश्नावर उदासीन
कल्याण तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीमध्ये मतदान सुरू आहे. या मतदाना दरम्यान 90 वर्षीय आजीबाई रामुबाई साळवे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
जळगाव जिल्ह्याची 4 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
जळगाव 62.89
जामनेर 72.76
धरणगाव 69.42
एरंडोल 65.73
पारोळा 74.68
भुसावळ 56.81
मुक्ताईनगर 69.92
बोदवड 66.46
यावल 65.61
रावेर 73.65
अमळनेर 78.35
चोपडा 67.53
पाचोरा 71.51
भडगाव 64.00
चाळीसगाव 63.18
———————–‐‐——
एकूण टक्के 66.47
सांगली – ग्रामपंचायत निवडणूक 3.30 वाजेपर्यंत 68.10 टक्के मतदान, 142 ग्रामपंचायत साठी मतदान होत आहे.
कल्याण : कल्याण तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींमध्ये खोणी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीत 11 जागांसाठी 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खोणी गावातील मतदान केंद्रावर शेकडो मतदारांनी मतदानासाठी एकच गर्दी केली होती. मात्र या मतदानादरम्यान खोणी ग्रामपंचायतीतील कार्यकर्ते आपापसात भिडले. कार्यकर्ते आमने सामने आल्याने प्रचंड गोंधळ सुरु झाला. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या ग्रामपंचायतीत महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे.
सोलापूर : मतदानाच्या शेवटच्या एक तासात चुरशीने मतदान, उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे मतदानासाठी मोठी गर्दी, मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा
ठाणे जिल्हा ग्रामपंचायत – दुपारी 1.30 पर्यंत जिल्ह्यात 55.65 टक्के मतदान झाले.
जळगाव जिल्ह्यात 3.30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
जळगाव – 45.44
जामनेर – 54.96
धरणगाव – 54.00
एरंडोल – 49.71
पारोळा – 54.68
भुसावळ – 44.90
मुक्ताईनगर – 55.40
बोदवड – 50.35
यावल – 48.25
रावेर – 57.67
अमळनेर – 52.57
चोपडा – 51.44
पाचोरा – 27.54
भडगाव – 47.28
चाळीसगाव – 49.14
——————————-
एकूण टक्के 48.34
अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक, नेवासामध्ये सर्वाधिक मतदान, तर जामखेड मध्ये सर्वात कमी, 11.30 वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी प्राप्त, नेवासा मध्ये 35.98 टक्के, तर जामखेड मध्ये 21.93 टक्के मतदान, दुपारनंतर मतदानाचा टक्का मात्र वाढला
सोलापुरात मतदानाला कााही तास शिल्लक असताना उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू, सायबण्णा बिराजदार असे मृत उमेदवाराचे नाव, गेल्या काही दिवसापासून विजयी होण्यासाठी बिराजदारांनी वार्डातील प्रत्येक घर पिंजून काढले, सकाळ संध्याकाळ होते प्रचारात मग्न, हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने काल खाजगी हॉस्पिटलमध्ये केले होते दाखल, मतदानाच्या दिवशीच उपचारादरम्यान मृत्यू, तालुक्यातील खैराट येथील घटना
उस्मानाबाद जिल्ह्यात सकाळी 7.30 ते 1.30 या वेळेत 49.09 टक्के मतदान, जिल्ह्यातील 5 लाख 91 हजार मतदारांपैकी 2 लाख 90 हजार 166 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, सर्वाधिक 52.61 टक्के मतदान तुळजापूर तालुका येथे झाले, उस्मानाबाद जिल्ह्यात 382 ग्रामपंचायतमध्ये मतदान होत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी डॉ सचिन गिरी यांनी दिली
यवतमाळ यवतमाळ तालुक्यातील अर्जुना गावात मतदानादरम्यान मतदान केंद्र क्रमांक 312 मध्ये वॉर्ड क्रमांक 2 मधील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, झोनल ऑफिसर, केंद्राध्यक्ष कडून मशीन बदलविणे सुरु
वाशिम जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सकाळी 7: 30 ते 1:30 दरम्यान 40.88 टक्के मतदान झालं आहे
वर्ध्यात दुपारी दीड वाजेपर्यंत 41.97 टक्के मतदान, जिल्ह्यात 50 ग्रामपंचायतीसाठी सुरू आहे मतदान
निफाड तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीत 1.30 वाजेपर्यंत 46.65 मतदान
पुरुष – 39,309
स्त्री – 43,827
एकूण – 43,186
टक्के – 46.65
सोलापुरातील तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवेळी दोन गटात दगडफेक, भोसले-भिंगारे गटात मतदान केंद्राच्या जवळ दगडफेक, दोन्ही गटाचे तीन ते चार कार्यकर्ते जखमी, पोलीस घटनास्थळी दाखल
रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत 33.18 टक्के मतदान, 360 ग्रामपंचायतीमध्ये शांततेत मतदान सुरु आहे , साडे अकरा वाजेपर्यंत 1 लाख 56 हजार 16 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, महिलांपेक्षा पुरुषांची मतदानाची आकडेवारी अधिक
गोंदिया जिल्ह्याची 1 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
गोंदिया – 26.10 टक्के
तिरोडा – 27.62 टक्के
गोरेगांव – 28.13 टक्के
देवरी – 43.11 टक्के
आमगांव – 40.28 टक्के
सलेकसा – 38.94 टक्के
अर्जुनी मोर – 42.41 टक्के
सडक अर्जुनी – 43.81 टक्के
एकूण – 34.34 टक्के
स्त्री – 51, 845
पुरुष – 56,406
बुलडाणा ग्रामपंचायत निवडणूक, दुपारी साडे 11 वाजेपर्यंत 28.18 टक्के मतदान, तर परभणी
सकाळी 11.30 वाजेपर्यंत 29.79 टक्के मतदान, सातारा जिल्ह्यात 11.30 पर्यंत 33.55 टक्के मतदान
ठाणे जिल्ह्यात दुपारपर्यंत 38.86 टक्के मतदान , दुपारी 11:30 वाजेपर्यंत मतदान, ग्रामपंचायतसाठी
जिल्ह्यात 38.86 टक्के मतदान झाले आहे
अमरावती जिल्हा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, अमरावती जिल्ह्यात सकाळी साडे अकरापर्यंत 23.20 टक्के मतदान, दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदारांची तुफान गर्दी
रायगड जिल्ह्यात पहिल्या चार तासात 35.12 टक्के मतदान, सकाळी 9.30ते 11.30 पर्यंतची आकडेवारी,
स्त्रिया – 33.64%
पुरुष – 36.55%
मुक्ताईनगर तालुक्यात ग्रामीण भागात मतदारांच्या मतदान करण्यासाठी केंद्रांवर दुपारनंतर लागल्या लांबच लांब रांगा, मुक्ताईनगर तालुक्यात शांततेच्या मार्गाने मतदान सुरु, 47 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत 14.36 टक्के मतदान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांचीही मुक्ताईनगर तालुक्यात भेट
निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक शास्त्रीनगर मतदान केंद्रावर सोशल डिस्टन फज्जा, तीन प्रभाग एकाच मतदान केंद्रावर आल्याने मतदारांची मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी, मतदान केंद्रावर अनेक मतदार मास्क विना मतदान करण्यासाठी दाखल, प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव, ज्येष्ठ नागरिक अपंग नागरिकांची देखील हेळसांड
रायगडरायगड जिल्ह्यात पहिल्या दोन तासात 14.80 टक्के मतदान, सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंतची आकडेवारी, स्त्रिया 12.69 %, तर पुरुष 16.92% मतदान
सांगली : लेंगरेवाड़ी गावात निवडणूक सुरु असताना भाजप आणि शिवसेना कार्यत्यात जोरदार वाद झाला आहे. भाजप कार्यकर्ते संतोष लेगनरे या तरुणाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेमुळे लेंगरेवाडी या गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
नाशिकमधील नांदगाव तालुक्यात दुपारपर्य़ंत 27 टक्के मतदान झाले आहे. नांदगाव तालुक्यात सकाळी 7.30 ते 11.30 पर्यंतची मतदानाची टक्केवारी
पुरुष -13746
स्रिया -11090
एकूण -24836
टक्केवारी -27.66
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाकरीता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावामध्ये मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 12 वाजता त्यांनी सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्या स्वतः रांगेत उभ्या राहिल्या होत्या. यावेळी लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी मतदारांना केले. यशोमती ठाकूर यांच्या गावात त्यांच्या काँग्रेस पक्षाची गेल्या 10 वर्षांपासून सत्ता आहे.
ठाणे : शहापूर तालुक्यात 5 ग्रामपंचायतीमध्ये 51 जागांसाठी मतदान होत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत येथे 32 % मतदान झाले आहे.
धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 12.54 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात आज सकाळपासून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जातोय.
रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान, मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदातांची रांग, रत्नागिरी जवळच्या मिरजोळे ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर लाईन, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मतदानासाठी मतदान केंद्रावर
ग्रामिण भागातल्या मतदारांचा ग्रामपंचायतीच्या मतदानाला उत्फुर्त प्रतिसाद
एका उमेदवाराच्या नातेवाईकाला पैसे वाटप करताना पोलिसांनी रंगेहात पकडले, डोंबिवलीतील खोणी ग्रामपंचायतमधील घटना, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, रात्री घडली होती घटना, पैसे वाटणाऱ्या व्यक्तीचे नाव आकाश ठोंबरे, आकाश ठोंबरे याची काकू निवडणुकीच्या रिंगणात
वर्ध्यात पहिल्या दोन तासात 8.15 टक्के मतदान, जिल्ह्याच्या 50 ग्रामपंचायतीसाठी मतदान, 206 मतदान केंद्रावर सुरु आहे प्रक्रिया
दौंड तालुक्यातील कुसेगावमध्ये मतदान प्रकियेला गालबोट, कुसेगावमधील दोन गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले, दोन गटात बाचाबाची, शाब्दिक वादाचे रुपांतर वादात, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज
अकोला जिल्ह्यातल्या 224 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सकाळी साडे सात ते साडे नऊ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 7.17 टक्के
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मतदानाचा हक्क बजावला, लोकशाही बळकट करायची असेल तर मतदानाचा हक्क बजावा अण्णांनी केले आव्हान, सदृढ आणि निकोप लोकशाही च्या वाढीसाठी मतदान करणे गरजेचा आहे, म्हणून मी आज माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे, यादव बाबांचे दर्शन घेऊन अण्णांनी केले मतदान, राळेगणसिद्धी जिल्हा परिषदेच्या प्रधामिक शाळेतील केंद्रावर केले मतदान
मुक्ताईनगर 47 ग्रामपंचायत निवडणूक आतापर्यंत 14.60 टक्के मतदान, मुक्ताईनगर आतापर्यंत झालेले एकूण मतदान 11,140, मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींसाठी मतदान केंद्रांची संख्या 151, निवडणूक कामी कर्तव्यावर असलेले कर्मचारी संख्या 755, एकूण मतदार संख्या 76,300
परिवार म्हणून आम्ही सोबतच आहे, नाथाभाऊ इथे असते तर आम्ही सोबतच मतदान केले असते, एका घरात राहतो, विचार पक्षांना घेवू वेगवेगळे असू शकतात, एकनाथ खडसे आज मुंबईमध्ये असल्यामुळे आज मतदानाचा हक्क गावकऱ्यांसोबत बजावला, एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेशानंतर एकनाथ खडसे विना खासदार रक्षा खडसे यांनी प्रथमच ग्रामपंचायत निवडणुक साठी मतदानाचा हक्क बजावला
वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघातील काँग्रेस आमदार अमित झनक यांनी मतदानाचा हक्क बजावला, मूळगावी मागुळ झनक इथे ग्रामपंचायत निवडणुकीत रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला
वसमत तालुक्यातील लोन बुद्रुक येथे वार्ड क्रमांक एक मध्ये आद्यपही मतदान प्रक्रियेला सुरुवात नाही, ईव्हीएम मशिनवर चिन्ह बदलून आल्याचा आरोप, ग्रामविकास पॅनल प्रमुख बबन होळपादे यांचा आरोप, एकूण 9 जागा होत्या, त्यापैकी 5 जागा बिनविरोध, 4 जागेसाठी मतदान, वार्ड क्रमांक 01 साठी अद्यापही मतदानाला सुरुवात नाही, दोन्ही उमेदवारांचे चिन्ह बदलून आल्याचा आरोप
वाशिम जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतसाठी आज मतदान, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून 96 पोलीस अधिकारी, 983पोलीस कर्मचारी आणि 472 गृहरक्षक दलाचे जवान, आरसीपीचे 02, क्युआरटीचे 01 आणि एसआरपीएफचे 02 असे नियुक्त करण्यात आले आहेत, जिल्ह्यात संवेदनशील असलेल्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट, जनतेला निर्भीड पणे मतदान करण्याचं आवाहन.
सोलापूर ग्रामपंचायतच्या मतदानासाठी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे मतदान करण्यासाठी लागली मोठी रांग, महिलांची सकाळ पासूनच मतदान केंद्रावर गर्दी
ईव्हीएम मशिनवर उमेदवारांचे नाव स्पष्ट दिसत नसल्याचा आक्षेप, सकाळपासून मतदान प्रक्रिया बंद, सेनगाव तालुक्यातील बनबरडा येथील वार्ड क्रमांक 01 मधील मतदान प्रक्रिया ठप्प
नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील प्रभाग क्र. 3 चे ईव्हीएम मशीन बंद, मतदान प्रकिया ठप्प, आतापर्यंत एकही मतदाराला बजावता आला नाही मतदानाचा हक्क, तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीत देखील घडला असाच प्रकार, येथेही ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबले
शिवसेना मंत्री संदीपान भुमरे मतदानासाठी केंद्रावर दाखल, पाचोड येथील मतदान केंद्रावर संदीपान भुमरे दाखल, पाचोड ग्रामपंचायत निवडणूक संदीपान भुमरे यांच्यासाठी समजली जाते प्रतिष्ठेची, थोड्याच वेळात संदीपान भुमरे करणार आहेत मतदान
सोलापूर जिल्ह्यात 590 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु, 2,325 केंद्रावर मतदान, मतदानासाठी 8530 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती, अनेक ठिकाणी होत आहे चुरशीने मतदान
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील नागद मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान यंत्रात बिघाड, मतदान यंत्र सुरु न झाल्यामुळे मतप्रक्रिया ठप्प, मतदान केंद्रासमोर मतदारांच्या लागल्या रांगा, मतदान प्रक्रिया सुरु करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु
खासदार रक्षा खडसे यांनी कोथळी गावात मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला, एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेशानंतर एकनाथ खडसे विना खासदार रक्षा खडसे यांनी मतदानाचा हक्क बजावला
पालघर येथील सागावे ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात, 3 मतदान केंद्रावर मतदान सुरु, कोव्हिडचे नियम पाळून ग्रामीण भागात मतदान प्रक्रिया, ग्रामपंचायतीसाठी मतदार सकाळपासून मतदान केंद्रावर, 3 प्रभागातल्या 4 जागांसाठी निवडणूक, 631 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, पुरुष मतदारांपैक्षा महिला मतदारांवर उमेदवारांची मदार, मतदान प्रक्रियेला एक तास पूर्ण, आतापर्यंत 5 % मतदान झाले आहे
कोरोनाबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गंभीर नाहीत, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विना मास्क केले मतदान, मास्क न घालता साधला मतदारांशी संवाद, गोवर्धनवाडी या मतदान केंद्रावर एकाही अधिकारी-कर्मचाऱ्यानी मास्क घातलेला नाही, लोकप्रतिनिधी कडूनच कोरोना नियमांच उल्लंघन
ग्रामपंचायत मतदानासाठी मतदारांची गर्दी वाढली, पाचोड मतदान केंद्रावर वाढली मतदारांची गर्दी, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर उत्स्फूर्त गर्दी, 617 ग्रामपंचायतसाठी पार पडत आहे मतदान प्रक्रिया, 5086 उमेदवार आहे निवडणुकीच्या रिंगणात
धुळे तालुक्यातील कावठी या मतदान केंद्रावर गेल्या एक तासापासून मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा, मतदान प्रक्रिया एक तासापासून खोळंबली
कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली खालसा येथे ईव्हीएम यंत्र बंद, प्रभाग क्रमांक 2 चे ईव्हीएम मशीन पडले बंद, मशीनची चाचणी घेताना सिग्नल न आल्याने हा प्रकार आला लक्षात
कर्जतमधील कडाव ग्रामपचांयत मध्ये 85 वर्षाच्या आजीला नातवाने उचलून नेले मतदान केद्रांत, लिलाबाई सावंत यांना चालता येत नसल्याने मतदान केद्राबाहेर कार ने आणून मतदान केद्रात उचलून नेल्याने आजीने बजावला मतादानचा हक्क
बारामती आमदार रोहित पवार यांचं पिंपळी लिमटेक येथे मतदान, पिंपळी ग्रामपंचायतीसाठी बजावला मतदानाचा हक्क, वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, पत्नी कुंती पवार यांच्या समवेत बजावला मतदानाचा हक्क
कल्याण तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतींमध्ये आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु, तर एक ग्रामपंचायत ही बिनविरोध, या 20 ग्रामपंचायतीत एकूण 82 केंद्र उभारण्यात आले असून 167 जागी मतदान होणार, या 20 ग्रामपंचायतीसाठी 378 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उतरले असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी चुरस
पुणे जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतसाठी आज निवडणूक, प्रत्यक्षात 11 हजार 07 उमेदवार रिंगणात, जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत
राज्यात बऱ्याच ठिकाणी अपंग व्यक्ती मतदानापासून मुकतानाचं चित्र असतं, परंतु अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात या उलटच पहायला मिळाले, अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील विठोबा कीसन मेश्राम हा अपंग वृध्द व्यक्ती सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचला, यानंतर मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या व्हीलचेअरच्या माध्यमातून मतदान कक्षात जाऊन मतदानाचा हक्क बजावला
ईव्हीएम मशीनवरुन उमेदवारांचे नावच गायब, मनमाडच्या पानेवाडी ग्रामपंचायतीमधील प्रकार, वॉर्ड नंबर 2 मधील उमेदवाराचे नाव झाले होते गायब, नाव गायब झाल्याने गोंधळ, वॉर्ड 2 मधील मतदान प्रक्रिया थांबली, प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल, ईव्हीएम मशीन दुरुस्तीचे काम सुरू
कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या कडाव ग्रामपचांयतीमध्ये मतदानाला शांततेत सुरुवात, एकूण 5 मतदान केद्रांवर मतदारांचा उत्साह, कर्जत पोलिसांचा तालुक्यातील 8 ग्रामपचांयतमध्ये कडक बंदोबस्त
गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 170 ग्रामपंचायतींमध्ये आज सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात, जिल्ह्यातील सहा कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली आणि धानोरा तालुक्यातील 499 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरु, मतदारांमध्ये मोठा उत्साह
मुक्ताईनगर तालुक्यात 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे, पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक पोलिस बंदोबस्त, सोशल डिस्टन्सचे नियम पाळून मतदान
उस्मानाबाद जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत असून या निवडणुकीत 5 लाख 97 हजार 291 मतदार मतदानाचा हक्क बजावणार, मात्र उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धनवाडी मतदान केंद्रासह अन्य मतदान केंद्रांवर कोरोना नियमांचे तीनतेरा, मतदान केंद्रावरील कंर्मचारीसह मतदारांनी मास्क घातले नव्हते, सॅनिटायझर आणि इतर कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही, विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात निवडणूक काळात मतदान कर्मचारी आणि उमेदवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली नाही
जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात, जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींच्या 5 हजार 154 जागांसाठी आज (शुक्रवारी) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे, जिल्हाभरात 5 हजार 154 जागांसाठी एकूण 13 हजार 847 उमेदवार रिंगणात
परभणी जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु, 1 हजार 573 मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात, जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतीसाठी 8 हजार 717 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती, कोविडचे नियम पाळून ग्रामिण भागात मतदान, 6 लाख 82 हजार 170 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात मतदान सुरु होण्यापूर्वीच गायगाव येथील ईव्हीएम यंत्रात बिघाड
गोंदिया जिल्ह्यात आज 189 ग्रामपंचायतीकरिता मतदान, नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त
धुळे जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून उर्वरित 181 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, धुळे जिल्ह्यात 1 हजार 409 जागांसाठी 3 हजार 228 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, जिल्ह्यात 626 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून यासाठी 3 हजार 128 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
अहमदनगरला ग्रामपंचायतीच्या मतदानाला सुरुवात, 767 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, सकाळपासून मतदार मतदानासाठी बाहेर पडले, सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात, राळेगणसिद्धी त मतदानाला सुरवात
बुलडाणा जिल्ह्यात 498 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात, 527 पैकी 28 ग्रामपंचायती बिनविरोध, तर एक ग्रामपंचायत निवडणूक स्थगित, मतदारांमध्ये उत्साह
अकोला जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली असून थंडीमुळे ओघ थोडा कमी आहे, 9 वाजेनंतर मतदानाचा टक्का वाढेल
उस्मानाबाद जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सपत्नीक मतदान करत मतदानाचा हक्क बजावला, लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी गाव पातळीवर निवडणूक महत्वाची असते, त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन खासदार ओमराजे यांनी केलं
अमरावती जिल्ह्यातील होवू घातलेल्या 537 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7:30 वाजता पासून सुरुवात, अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 537 ग्रामपंचायतीमध्ये 4397 जागेकरिता प्रत्यक्ष निवडणूक, तर 13 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या आहे, अमरावती जिल्ह्यात एकूण 10 लाख 40 हजार मतदार प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजवणार, निवडणूक प्रक्रियेमध्ये 15321 कर्मचारी कार्यरत असून पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त मतदान केंद्रवर ठेवण्यात आला आहे, तर 1 हजार अतिरिक्त होमगार्ड कार्यरत असल्याचं प्रशासनाने सांगितलं
वाशिम जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात, जिल्ह्यात एकूण 163 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायत बिनविरोध, तर उर्वरित 152 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळपासून प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात, सकाळी गर्दी जरी कमी दिसत असेल, मात्र हळूहळू गर्दी वाढणार आहे, दरम्यान निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त
नागपूर जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतीमध्ये मतदानाला सुरुवात, जिल्ह्यातील 485 मतदान केंद्रावर सुरु झाली मतदानाची प्रक्रिया, कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर मतदारांचं ॲाक्सीजन आणि तापमानात तपासणी, जिल्ह्यात 485 मतदान केंद्रावर 1455 मतदान अधिकारी कर्मचारी तैनात
रत्नागिरीतील 360 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात, 990 मतदान केंद्रावर मतदान सुरु, कोविडचे नियम पाळून ग्रामिण भागात मतदान, ग्रामपंचायतींसाठी मतदार सकाळपासून मतदान केंद्रावर, 915 प्रभागातल्या 2009 जागांसाठी होतेय निवडणूक, 990 मतदान केंद्रावर मतदान सुरु, 4 लाख 59 हजार 121 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, पुरुष मतदारांपैक्षा महिला मतदारांवर उमेदवारांची मदार, महिला मतदार 2 लाख 37 हजार 498, तर पुरुष मतदार 2 लाख 21 हजार 613
नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली, सकाळपासून मतदार मतदानासाठी बाहेर पडले आहेत, ग्रामीण भागातील उत्साह सकाळपासून दिसून येतोय
नाशिक ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात, सकाळच्या सुमारास मतदानाला चांगला प्रतिसाद, पोलिसांच्या बंदोबस्तात पार पडते आहे मतदान प्रक्रिया, अनेक ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक
कोल्हापूर जिल्ह्यात 386 ग्रामपंचायतींसाठी मतदान, थोड्याच वेळात होणार मतदानाला सुरुवात, बहुतांशी गावात तिरंगी लढती, पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदानासाठी पॅनल प्रमुखांचे प्रयत्न, जिल्ह्यात साडेसात हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
कल्याण तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये मतदान, एक ग्रामपंचायत बिनविरोध, एकूण 82 केंद्रांवर 167 जागी मतदान, 378 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
उरण तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, 6 ग्रामपंचायतीत 70 जागांवर मतदान, तालुक्यातील चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली, वेशवी, फुंडे या 6 ग्रामपंचायत, एकूण 166 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, बहुतांश ठिकाणी भाजप विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये खरी लढत, एकूण 43 मतदान केंद्रावर होणार मतदान, एकूण 31 हजार 301 मतदार यापैकी 15 हजार 615 पुरुष, तर 15 हजर 688 महिला, 25 प्रभाग आणि 70 उमेदवार, ग्रामपंचायतींसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्ससह, मास्कसह अधिकारी वर्गाला देण्यात आल्या इतर आवश्यक सूचना
नागपूर जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, जिल्ह्यातील 485 मतदान केंद्रावर मतदान, एकूण 1015 उमेदवारांमध्ये लढत, जिल्ह्यात 485 मतदान केंद्रावर 1455 मतदान अधिकारी कर्मचारी, 127 ग्रामपंचायतीच्या 431 प्रभागापैकी 411 प्रभागात मतदान, 1196 एकूण जागांपैकी 1086 जागांवर प्रत्यक्ष मतदान होणार, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान
अकोला जिल्ह्यातील 224 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत 1 हजार 741 जागांसाठी आज मतदान, त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण, मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील 224 ग्रामपंचायतींच्या 2 हजार 70 जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे, तर निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये 2 हजार 395 महिला उमेदवार असून, 2 हजार 16 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे
रायगडमध्ये आज 78 ग्रामपचांयती मधील 299 मतदान केद्रांवर मतदान होणार, 1,77,383 मतदार, 612 जागांसाठी 1,588 उमेदवार निवडणुक रिगंणात, तर जिल्ह्यात तीन ठिकाणी नामनिर्देशन प्राप्त न झालान्ये किवां उमेदवार अपात्र ठरल्याने जागा रिक्त,
मनमाडच्या नांदगाव तालुक्यातील 59 ग्रामपंचायत निवडणुकीत 5 ग्रामपंचायत बिनविरोध, 54 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान, 386 जागांसाठी 877 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 182 मतदान केंद्रावर 89 हजार 796 मतदार बाजाणावर मतदानाचा हक्क, थोड्याच वेळात मतदानाला होणार सुरुवात
नाशिक जिल्ह्यात 621 ग्रामपंचायतीच्या 5,895 जागांसाठी थोड्याच वेळात मतदान, 1,627 जागा अविरोध, तर लिलाव प्रकरणामुळे उमराणेची निवडणूक यापूर्वीच रद्द, 1,1056 उमेदवार रिंगणात, 1,952 मतदान केंद्रांची व्यवस्था, 389 अधिकारी तर 9,760 कर्मचारी तैनात, तर जिल्हाभरात 44 केंद्र संवेदनशील, तर 8 केंद्र अतिसंवेदनशील, 12 लाख 84 हजार मतदार नोंदवणार आपलं मत, तर कोरोना संशयित असलेल्या रुग्णांना शेवटच्या अर्धा तासात मतदानाची व्यवस्था
पनवेल तालुक्यात आज 186 जागांसाठी मतदान, 390 उमेदवार रिंगणात; 94 केंद्रावर मतदान, 750 पोलीस बंदोबस्तासाठी त्यापैकी 600 पुरुष पोलीस तर 150 महिला पोलीस, तालुक्यात एकूण 55 हजार 279 एकूण मतदार ; 26 हजार 91 महिला, तर 29 हजार 205 पुरुष 6 मतदार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्कॅनिंग करुनच मतदान केंद्रात प्रवेश, पनवेल शहरातील व्ही के हायस्कुल मध्ये 18 तारखेला पार पडणार मतमोजणी, नवडणुकीआधीच खनावले आणि आकुर्ली ग्रामपंचायत बिनविरोध
ग्रामपंचायत निवडणूक: 24
एकूण प्रभाग: 84
निवडणुकीच्या रिंगणात एकूण उमेदवार : 390
महिला उमेदवार : 155
एकूण मतदार केंद्र: 94
निवडणूक अधिकारी संख्या: 100
कर्मचारी संख्या : 500
भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींमधील 466 सदस्य निवडीकरीता आज मतदान, 175 प्रभागातून 466 सदस्य निवडून द्यावयाचे असून त्यासाठी 1,082 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 30 प्रभागातील 105 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत
मुक्ताईनगर तालुक्यात 47 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, मुक्ताईनगर तालुक्यात 51 ग्रामपंचायत, त्यापैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध, 47 ग्रामपंचायत साठी आज मतदान, तालुक्यात 734 उमेदवार रिंगणात उभे, आज मतदार राजा ठरविल याचं भवितव्य
औरंगाबाद जिल्ह्यात 617 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला होणार सुरुवात, मतदान केंद्रावर मतदानाची तयारी पूर्ण, औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड मतदान केंद्र मतदारांसाठी सज्ज
अहमदनगरमध्ये आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे आचार संहितेचा भंग, मतदारांना साड्या वाटप करताना दोघांना पकडले, सुरेश दगडू पठारे तसेच किसन मारूती पठारे यांना मतदारांना साडया वाटताना भरारी पथकाने पकडले, 10 लाख रुपयांची इनोव्हाकार आणि 27 हजार 200 रुपयांच्या 136 साड्या जप्त, महिलांसह 4 जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल