Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आवळा देऊन कोहळा, पालकमंत्रीपदावरून भाजपाची मोठी खेळी, रायगडचं पालकमंत्रीपद शिंदेकडे, तर मनपा निवडणुकीपूर्वी मुंबई खिशात

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदांवरून महायुतीत वाद निर्माण झाला होता. अदिती तटकरे यांच्या रायगडसाठी निवडीला शिवसेनेने (शिंदे गट) विरोध केला होता. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार असून, त्यांच्याकडे असलेले मुंबईचे पालकमंत्रीपद भाजपकडे जाईल. भरत गोगावले आणि तटकरे यांच्यातील वादावर भाजपा तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.

आवळा देऊन कोहळा, पालकमंत्रीपदावरून भाजपाची मोठी खेळी, रायगडचं पालकमंत्रीपद शिंदेकडे, तर मनपा निवडणुकीपूर्वी मुंबई खिशात
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 9:30 AM

राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली, पण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीच्या नेत्यांमध्येच धूसफूस सुरू होती. अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून ( शिंदे गट) विरोध झाला. तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये वातावरण होतं. पण पालकमंत्रीपदाचा तिढा आता सुटल्याची चर्चा आहे. कारण रायगडचं पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शिंदेंकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्रीमद हे भारतीय जनता पक्षाकडे जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे. भरत गोगावले- तटकरे या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील शिवेसना एकानथ शिंदे गटाचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्यात वाद सुरू आहे. त्यावरच हा तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.

मागील अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रपदावरून तिढा निर्माण झाला होता. रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू होता. अदिती तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगावलेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदेना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिंदेंकडे सध्या मुंबईचं पालकमंत्रीपद असून ते भाजपकडे जाणार असल्याचं सूत्र सांगत आहेत.

अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू होता. सुरूवातीला रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवाी काँग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. पण भरत गोगावलेच्या नाराजीनंतर या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र या स्थगितीनंतरही गोगावले- तटकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरूच आहे. महाड विधानसभा संघातील सर्वच पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शनं केली. मात्र आता या वादावर तोडगा काढत शिवसेना शिंदे गटाकडे, प्रामुख्याने एकनाथ शिंदेंकडे हे पालकमंत्रीपद सोपवण्यात येण्याची शक्यता आहे, असी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यावर आता भरत गोगावले आणि अदिती तटकरे काय प्रतिक्रिया देतात,ते पाहणं महत्वाचं ठरेल.

रायगडच्या पालकमंत्रीपदाला देण्यात आली होती स्थगिती

रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना मिळालं, मात्र त्यामुळे नवा संघर्ष निर्माण झाला. भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने ते प्रचंड नाराज झाले. गोगावले यांच्या नाराज झालेल्या शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून रात्री मोठा हंगामा केला. या संदर्भात पोलिसांना हस्तक्षेप करुन महामार्गाची वाहतूक कोंडी दूर केली. मात्र भरत गोगावले यांचे कार्यकर्ते आता प्रचंड आक्रमक झाले असून गोगावले यांचे मंत्री झाल्यानंतर एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मिळालेले पदही काढून घेतल्याने ते प्रचंड नाराज होते. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती. आता हा तिढा लवकरच सुटण्याची शक्यत आहे.

..याची माहिती CM यांना आहे का?, बीड हत्या प्रकरणावरून दमानियांची टीका
..याची माहिती CM यांना आहे का?, बीड हत्या प्रकरणावरून दमानियांची टीका.
गोऱ्हेंना अंधारेंची कायदेशीर नोटीस, ठाकरेंबद्दलचं 'ते' भाष्य करण भोवलं
गोऱ्हेंना अंधारेंची कायदेशीर नोटीस, ठाकरेंबद्दलचं 'ते' भाष्य करण भोवलं.
त्र्यंबकेश्वरमधील वादावर प्राजक्ता स्पष्ट म्हणाली, मनातले किंतू परंतू
त्र्यंबकेश्वरमधील वादावर प्राजक्ता स्पष्ट म्हणाली, मनातले किंतू परंतू.
देख तूनी बायको.. गाण्यावर थिरकले महसूलचे अधिकारी; वडेट्टीवारांचा संताप
देख तूनी बायको.. गाण्यावर थिरकले महसूलचे अधिकारी; वडेट्टीवारांचा संताप.
धंगेकर पक्षप्रवेशावर स्पष्टच म्हणाले, 'निर्णय घ्यायचा की नाही ते...'
धंगेकर पक्षप्रवेशावर स्पष्टच म्हणाले, 'निर्णय घ्यायचा की नाही ते...'.
'..माझ्यावर दबाव होता', कोल्हेंचा 'स्वराज्यरक्षक संभाजी'बाबत मोठा दावा
'..माझ्यावर दबाव होता', कोल्हेंचा 'स्वराज्यरक्षक संभाजी'बाबत मोठा दावा.
'पण ब्राम्हणांची औकात...', इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी
'पण ब्राम्हणांची औकात...', इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी.
गोऱ्हेंच्या वक्तव्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर?आता पक्षाची भूमिका काय?
गोऱ्हेंच्या वक्तव्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर?आता पक्षाची भूमिका काय?.
राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?
राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?.
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र.