महाराष्ट्र एकीकरण समितीचं ठरलं! ‘या’ शहरात आंदोलन करणार, कोणते पक्ष होणार सहभागी?
बैठकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कोल्हापुरात दाखल झाले होते, महाराष्ट्र सरकारने याबाबत ठोस निर्णय घ्यावा यासाठी महाविकास आघाडी देखील आक्रमक झाली आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यात अचानक कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावं हे कर्नाटकमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हंटले होते. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने हा वाद उभा राहिला आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली जात असतांना बेळगाव मधील अनेक नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतिने याबाबत आवाजही उठवला होता. त्यामुळे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक गावं आंदोलन करत असतांना कर्नाटक सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वाद अधिकच चिघळत आहे. त्यातच कोल्हापुरात मविआसह महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच सोमवारी कोल्हापुरात आंदोलन होणार आहे, त्याबाबत नुकतीच बैठक पार पडली असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन होणार आहे.
आंदोलनाच्या नियोजनासाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली असून कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात येथे सर्व पदाधिकारी एकत्र आले होते.
बैठकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कोल्हापुरात दाखल झाले होते, महाराष्ट्र सरकारने याबाबत ठोस निर्णय घ्यावा यासाठी महाविकास आघाडी देखील आक्रमक झाली आहे.
सोमवारी दिलेल्या आंदोलनात सर्वच पक्षांना निमंत्रित करण्यात आले असून महाराष्ट्र एकीकरन समितीचे आंदोलन कसे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमा वादाच्या प्रश्न आक्रमक असतांना महाराष्ट्र कुठलाही ठराव करत नाही, कुठले मंत्रीही येऊन विचारपूस करत नाही म्हणून आंदोलनाची हाक देण्याची केली जात आहे.