कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याचे कोर्टाचे आदेश, “लवकरात लवकर तपास पूर्ण व्हावा”, मेघा पानसरेंची मागणी
पानसरेंच्या हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याचे आदेश
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत. तपास एटीएसकडे देण्याची पानसरे कुटुंबियांनी मागणी केली होती. पानसरे हत्येचा तपास आता एसआयटी कडून एटीएस कडे वर्ग होणार आहे. न्यायालयाच्या आदेशावर पानसरे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं आहे. लवकरात लवकर हत्या प्रकरणाचा छडा लागण्याची आशा व्यक्त केली. यावर मेघा पानसरे (Megha Pansare) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “तपासात प्रगती नसताना खटला सुरू करण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती.याचा खटल्यावर तपास होऊ शकला असता. त्यामुळे तपास यंत्रणा बदलण्याची मागणी अभय नेवागी याच्या सूचनेनुसार केली 22 एप्रिल 202 ला केली होती. नालासोपारा केस मध्ये एटीएसने मोठा तपास केलाय ज्यात काही हिंदुत्ववादी लोकांच्या घरी शस्त्रसाठा सापडला होता.दाभोलकर पानसरे मधले काही आरोपी पकडले होते त्यामुळे एटीएसचा आधीपासूनच तपासात संबंध आहे”, असं त्या म्हणाल्या आहेत.
पानसरेंच्या हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याचे आदेश
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत. तपास एटीएसकडे देण्याची पानसरे कुटुंबियांनी मागणी केली होती. पानसरे हत्येचा तपास आता एसआयटी कडून एटीएस कडे वर्ग होणार आहे. न्यायालयाच्या आदेशावर पानसरे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं आहे. लवकरात लवकर हत्या प्रकरणाचा छडा लागण्याची आशा व्यक्त केली.
“तपासात प्रगती नसताना खटला सुरू करण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती.याचा खटल्यावर तपास होऊ शकला असता. त्यामुळे तपास यंत्रणा बदलण्याची मागणी अभय नेवागी याच्या सूचनेनुसार केली 22 एप्रिल 202 ला केली होती. नालासोपारा केस मध्ये एटीएसने मोठा तपास केलाय ज्यात काही हिंदुत्ववादी लोकांच्या घरी शस्त्रसाठा सापडला होता.दाभोलकर पानसरे मधले काही आरोपी पकडले होते त्यामुळे एटीएसचा आधीपासूनच तपासात संबंध आहे. आरोपी पकडण्यात त्याचा उपयोग होता.एसआयटी ची रचना बरोबर नव्हतं.एक पूर्ण वेळ टीम देण्याची मागणी वारंवार केली मात्र मान्य झाली नाही. तपास अधिकारी बदलत होते. सरकारची इच्छा असते तेव्हा तपास लागलात. पानसरे हत्येचा तपास लागत नाही आरोपी पकडले जात नाही महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही.आजच किंवा या आधीच सरकार वेळोवेळो संबंधितांना भेटलो.राजकीय इच्छा असतेच तेव्हाच तपास होतो.इथून पुढे हा तपास गांभीर्याने होईल अशी अपेक्षा आहे. खटला सुरू करायला आमची हरकत नाही. खून म्हणजे मोठ्या कारस्थानाचा भाग आहे त्यामुळे खटला सुरू असला तरी तपास सुरू राहावा अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेतली होती”, असं मेघा पानसरे म्हणाल्या आहेत.