कोल्हापूर : कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. (Kolhapur District 10 days Lockdown)
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्ह दर कमी नाही. सध्या जिल्ह्यातील 2400 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे. त्यामुळे उद्या बुधवार दि. 5 मे सकाळी 11 पासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यानुसार 15 मे पर्यंत कोल्हापुरात लॉकडाऊन असणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या पाहता प्राणवायू आणि रेमडेसिव्हीरची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वा दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते.
#कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या 5 मे दुपारपासून कडक लॉकडाऊन, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती, थोड्याच वेळात नियमावली जारी केली जाणार, कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे 10 दिवस कडक लॉकडाऊन @satejp #Kolhapur pic.twitter.com/iBF1qLDYtp
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 4, 2021
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या 11 वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा, असे पालकमंत्री सतेज पाटील यावेळी म्हणाले.
लॉकडाऊनचे काटेकोरपण पालन करा – हसन मुश्रीफ
तर सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. रूग्णसंख्या थांबविण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. पोलीसांनी त्याची अंमलबजावणी करावी, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. (Kolhapur District 10 days Lockdown)
संबंधित बातम्या :
सांगलीत आठ दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर; जयंत पाटील म्हणाले, सर्वांचाच जीव महत्त्वाचा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कसं रोखायचं?; औरंगाबादमधील डॉक्टरांना मिळणार घाटीत प्रशिक्षण
India Corona Cases | भारतातील कोरोना रुग्णवाढीला ब्रेक, दोन दिवसात 35 हजार रुग्णांची घट