Maharashtra-Mumbai Monsoon Weather, Rains LIVE : सावधान! अनेक ठिकाणी पूरस्थिती, दोघांचा बुडून मृत्यू, एक तरुण वाहून गेला

| Updated on: Jul 07, 2022 | 9:49 PM

Maharashtra: Konkan, Mumbai Rains LIVE News in Marathi : कोकणात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत होत आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना (Land Slide) घडल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम सध्या या भागात मदतकार्य पुरवत आहेत, पावसाची प्रत्येक अपडेट...

Maharashtra-Mumbai Monsoon Weather, Rains LIVE : सावधान! अनेक ठिकाणी पूरस्थिती, दोघांचा बुडून मृत्यू, एक तरुण वाहून गेला
सावधान! अनेक ठिकाणी पूरस्थितीImage Credit source: tv9

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra Mumbai Rains Live Update) जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. अजून पाच दिवस राज्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवाफमान खात्याने (IMD Update) व्यक्त केली आहे. मुंबईतल्या माटुंगा, सायन, कुर्ला, दादर, अंधेरी, बांद्रा (Heavy Rain in Mumbai City) परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने पाणी साचले आहे. कोकणात (Kokan Heavy Rain Update) काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील रेल्वे सेवेवरती सुध्दा (local train status mumbai) पावसाचा परिणाम झाला असून रेल्वे संथगतीने सुरू आहे.  मुंबईतल्या विक्रोळी परिसरात सकाळी एक दरड कोसळली (Land Slide) आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम सध्या या भागात मदतकार्य पुरवत आहेत, पावसाची प्रत्येक अपडेट…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Jul 2022 08:49 PM (IST)

    रत्नागिरी  जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    रत्नागिरी  जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे  दापोली तालुक्याला पावसाने झोडपले आहे. दापोली तहसिलदार कार्यालयाबाहेर मोरी पाण्याखाली गेली आहे. तहसील  कार्यलया नजीकची मोरी पाण्याखाली गेली आहे.

  • 07 Jul 2022 08:05 PM (IST)

    जळगावमध्ये मुसळदाधार पाऊस

    जळगावात मुसळधार पाऊस झाला. या धुवाधार पावसामुळे परिसरातील गेल्या दोन दिवसापासून त्याचबरोबर शहरात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले  झाडाच्या फांद्या पडल्याने रस्त्यावर वाहन चालवण्यास कसरत करावी लागत आहे काही भागात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना जीवनदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्येही आनंद पहावयास मिळाला तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिक-ठिकाणी पाणी साचल्याने ग्रामस्थांचे पाण्यातून वाट काढताना हाल झाले.दरम्यान असाच पाऊस अजून सलग दोन ते तीन दिवस आल्यास पिकांची चांगली वाढ होईल असे मत बळीराजा कडून व्यक्त लागल्याचे  पहावयास मिळाले.

  • 07 Jul 2022 08:04 PM (IST)

    अलर्टच्या दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास बंदी

    मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास बंदी

    रेड अलर्ट आणि ऑरेंज  अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल त्यानंतर बीचेसवर कुणीही फिरकू नये- महापालिका प्रशासनाच्या सूचना

    यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्युची नोंद झालीय, या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

    मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवसांमध्येही वारंवार विनंती, आवाहने करुनही मुंबईकर आणि इतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जातात…तसेच, बीचवर पोहण्यास जातात

    त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट  असतांना कोणीही समुद्रकिनारी , बीचेसवर फिरण्यास किंवा पोहण्यास  जायला प्रशासनाकडून प्रतिबंध करण्यात आलाय

  • 07 Jul 2022 08:02 PM (IST)

    नैसर्गिक नाले बुजल्याने शेतकऱ्यांचं नुकसान

    मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचा फटका पालघर मधील शेतकरी आणि स्थानिकांना बसू लागला आहे .  महामार्गाच्या कामासाठी करण्यात आलेल्या माती भरावाने नैसर्गिक नाले बुजवले गेले आहेत . पालघर मधील नवघर घाटीम येथे नैसर्गिक नाला फुटल्याने नाल्याच पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीचं मोठं नुकसान झालं आहे . केंद्र सरकारच्या मुंबई वडोदरा या  द्रुतगती महामार्गाच काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्ध पातळीवर सुरू आहे . मात्र या महामार्गाचा माती भराव करण्याकरता अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून नैसर्गिक नाले बुजवण्यात आल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याने आपला प्रवाह बदलला आहे . त्यामुळे येत्या काळात मुसळधार पाऊस झाल्यास पालघर मधील शेतकऱ्यांच मोठं नुकसान होण्याची भीती आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे .

  • 07 Jul 2022 08:01 PM (IST)

    हिंगोलीत जोरदार पाऊस

    हिंगोली जिल्ह्यात काही भाग वगळता आज सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला तर उगवलेल्या पिकांना ही नवसंजीवनी मिळाली.

  • 07 Jul 2022 06:11 PM (IST)

    नंदुरबारमध्ये धरणात पोहायला गेलेल्या 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

    – मुक्त विद्यापीठाचा पेपर देवून 8 मुले गेली होती विरचक्क धरणात पोहायला

    – यातील राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे या दोघांचा मृत्यू

    – गाळाचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

    – धरण परिसरात परिवाराचा आक्रोश

  • 07 Jul 2022 05:56 PM (IST)

    अतिवृष्टीचा इशारा

    उल्हास नदी ही पुणे जिल्ह्यात उगम पावून पुढे रायगड आणि ठाणे जिल्ह्यात वाहात येते. गेल्या काही दिवसात घाटावर आणि रायगड, ठाणे जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झालीये. उल्हास नदीची धोक्याची पातळी १७.५० मीटर इतकी असून सध्या नदीची पातळी १४.३० मीटरवर पोहोचली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात उल्हास नदीला मोठा पूर येतो आणि त्याचा फटका बदलापूरसह आसपासच्या ग्रामीण भागाला बसतो. यंदाही गेल्या २ दिवसातल्या पावसामुळे उल्हास नदीनं अक्राळविक्राळ रूप धारण केलं असून बदलापूरची उल्हास नदी चौपाटी ही पूर्णपणे पाण्याखाली गेलीये. त्यात पुढील काही दिवस ठाणे आणि रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून त्यामुळे उल्हास नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती व्यक्त होतेय.

  • 07 Jul 2022 05:55 PM (IST)

    रायगडमध्ये तरूण वाहून गेला

    गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटावरून रायगड जिल्ह्यात वाहत येणाऱ्या उल्हास नदीला मोठी भरती आलीय. या नदीत नेरळ परिसरात एक तरुण मासेमारी करण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्यानं हा तरुण वाहून जाऊ लागला. यावेळी या तरुणाला वाचवण्यासाठी तिथे असलेल्या काही जणांनी प्रयत्न केला. मात्र हा तरुण किनाऱ्यापासून लांब असल्यानं त्याला वाचवता आलं नाही आणि अखेर तो बदलापूरच्या दिशेनं वाहून गेला. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित करण्यात आलाय. हा तरुण नेमका कोण होता, हे मात्र अजूनही समजू शकलेलं नसून तो अजूनही सापडलेला नाही.
  • 07 Jul 2022 05:21 PM (IST)

    नागपुरात आज चांगल्या पावसाने हजेरी लावली

    मात्र नरेंद्रनगर ब्रिजमध्ये साचलं मोठ्या प्रमाणात पाणी

    ब्रिजच्या खाली पाण्यात पडला एक ट्रक आणि मिनी डोर बंद

    तर एक स्कुल बस सुद्धा बंद पडली

    ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला रात्रीच एक खांब पडला त्यामुळे दुसऱ्या बाजूची वाहतूक सुद्धा बंद

    नागरिकांना ब्रिज बंद असल्याने मोठा त्रास

    महापालिकेची झाली पोल खोल

    ट्रक बाहेर काढण्यासाठी बोलाविण्यात आली क्रेन

  • 07 Jul 2022 05:19 PM (IST)

    तुमसर तालुक्यातील सिंदपुरी नाल्यावरून मागील चार दिवसापासून वाहतंय पाणी

    गावकऱ्यांना जाण्यायेण्यासाठी मार्ग बंद आहे, या नाल्यावरून पाणी वाहत असल्याने शाळकरी मुलांनाही याचा फटका बसत आहे.

  • 07 Jul 2022 05:17 PM (IST)

    वसई विरारमध्ये रिमझिम पाऊस सुरू

    सकल भागातील मुख्य रस्त्यावर साचलेले पाणी ओसरायला सुरवात.

  • 07 Jul 2022 05:16 PM (IST)

    हवामान विभागाचा अंदाज पावसाने चुकवला

    सिंधुदुर्गात आजही हवामान विभागाचा अंदाज पावसाने चुकवला.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस लागला नसला तरी समुद्र मात्र दुपार नंतर खवळलेला पाहायला मिळाला. मालवण जेटी येथील ही दृश्ये असून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या. आजपासून तीन दिवस जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता मात्र मुसळधार पावसाने दडी मारलेली पहायला मिळाली. आज सकाळ पर्यंतच्या मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 50 मिमी पावसाची नोंद झाली होती. कालही सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी झाला होता त्यालाही पावसाने चकवा दिला होता.

  • 07 Jul 2022 05:14 PM (IST)

    मजीद बंदरमध्ये आज सकाळी रेल्वे ट्रॅकवर भिंत पडली

    रेल्वे सेवा विस्कळीत झाली होतीय त्यानंतर मोटरमन यांनी काळजी घेत ट्रेन थांबवली. आज दोन तासाचा स्पेशल मेगा ब्लॉक घेऊन भिंत हटवण्याचे काम करण्यात आलं आहे आणि ट्रेन सेवा सुरळीत करण्यात आली आहे.

  • 07 Jul 2022 05:12 PM (IST)

    गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढवला

    गोसीखुर्द धरणाच्या पानलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने काल रात्रीपासून गोसीखुर्द धरणातून विसर्ग वाढवला आहे. गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 9 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या वर्षीच्या मान्सून सेशन मध्ये पहिल्यांदा हे धरणाचे दरवाजे उघडे करण्यात आले आहेत.
  • 07 Jul 2022 05:08 PM (IST)

    प्रशासन सज्ज

    इचलकरंजी शहरासह राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज इचलकरजी महापालिकेमध्ये सर्व शासकीय बैठक घेऊन आयुक्त सुधाकर  देशमुख यांनी महापुरासंबंधी सूचना केल्या. यावेळी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन, महावितरण  प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 07 Jul 2022 04:32 PM (IST)

    वैभव नाईक अधिकाऱ्यांवर भडकले

    मालवण शहरातील अर्धवट स्थितीतील व रखडलेल्या गटार खोदाई प्रश्नी नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी मालवण शहरात येत नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदाराला  फैलावर घेतले. ठेकेदाराच्या हातात असलेली फाईल आमदारांनी काढून घेत “फाईल कसल्या फिरवतोस तोंडात मारून देईन” असा आक्रमक पवित्रा आमदार नाईक यांनी घेतला. शांत स्वभावाच्या वैभव नाईक यांचा हा आक्रमक अंदाज पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला .

  • 07 Jul 2022 04:31 PM (IST)

    नांदेडमध्ये आज पावसाचे दमदार आगमन

    नांदेडमध्ये आज पावसाचे दमदार आगमन झालंय, जिल्ह्यात बहुतांश जागी आज पाऊस जोरदारपणे बरसलाय. आजच्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय, तर या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. आता  या पावसानंतर यापुढे खरीप हंगामाच्या कामाची शेतकऱ्यांची लगाबग वाढलेली दिसणार आहे.

  • 07 Jul 2022 04:31 PM (IST)

    बीडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम

    मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असली तरी मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आज दुपारनंतर माजलगाव तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. माजलगाव, दिंद्रुड, वडवणी यासह परिसरात समाधानकारक पाऊस झालाय. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर अनेक ठिकाणी आजही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. बहुतांश ठिकाणी लवकर पेरण्या केल्याने या भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तर आजही अनेक भागातील पेरण्या कोळंबल्यात, त्यामुळे बीड जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

  • 07 Jul 2022 04:30 PM (IST)

    दरेकरांचं फडणवीसांना पत्र

    कोकणातील पाऊस आणि पुरपरिस्थिबद्दल प्रशासनाची बैठक लावून उपाययोजना कराव्यात

    भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली मागणी

    कोकण आणि महाड अतीवृष्टी दौऱ्याहून परतल्यानंतर लिहील पत्र

  • 07 Jul 2022 03:31 PM (IST)

    ग्रामीण भागातही अतिवृष्टीचा फटका

    वसई विरार मधील शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात ही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. वसईच्या पश्चिम पट्टीतील  ग्रामीण भागात रस्त्यावर पाणीच पाणी साचलं आहे. वसईच्या गिरिज, देवतालव, बंगली रोड, गास, निर्मळ, सत्पाला,  वटार इत्यादी ठिकाणी  रस्त्यावर पाणी साचलं आहे.  त्यामुळे काही ठिकाणच्यां रिक्षा आणि पालिकेच्या परिवहन सेवेच्या वाहतूकीवरही  परिणाम झाले आहेत.

  • 07 Jul 2022 03:30 PM (IST)

    NDRF च्या टीमने पाहणी केली

    चिपळूण वशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे,  NDRF च्या टीमने पाहणी केली. तसेच नदीकाठच्या स्थानिकांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. नदीची पाणी पातळी वाढते आहे. यावेळी चिपळूणचे  आमदार शेखर निकम यांनी NDRf च्या टीमची भेट घेतली. चिपळूण मधे पाणी भरलं तर नगरपालिकाच्या बोटी देखील बचाव कार्यासाठी सज्ज आहेत.
  • 07 Jul 2022 03:27 PM (IST)

    पुराच्या पाण्यात वाहून आला 17 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह

    वसईत पुराच्या पाण्याने वाहून आलेला एका 17 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे.

    राहुल नंदलाल विषवकर्मा असे या 17 वर्षाच्या मुलाचे नाव असून तो वसईच्या गावाराई पाडा येथील रहिवासी आहे.

    सोमवारी हा तरुण वसईच्या वालीव भागातील कंपनीत कामाला गेला होता. सायंकाळी 7 वाजता तो कंपनीतून बाहेर पडल्या नंतर तो घरी पोहचण्याऐवजी बेपत्ता झाला होता.

    बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास वसईच्या मधूबन परिसरातील लोखंडी ब्रिज जवळ नाल्यात वाहत आलेला त्याचा मृतदेह पोलिसांना मिळाला आहे.

  • 07 Jul 2022 03:20 PM (IST)

    वरई-विरारमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस

    वरई-विरारमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडलाय. या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

  • 07 Jul 2022 03:14 PM (IST)

    नागपूरात पावसाचा जोर वाढला

    रिमझिम स्वरूपात सुरू असलेला पाऊस आता चांगला बरसायला लागला

    रखडलेल्या पेरण्यांसाठी लाभदायी ठरणार पाऊस

    विजांच्या गडगडाटसह पाऊस सुरु

    हवामान ख्यात्याचा अंदाज काय? हेही ऐका

  • 07 Jul 2022 03:12 PM (IST)

    हवामान खात्याचा अंदाजही पाहा

  • 07 Jul 2022 03:07 PM (IST)

    नागपुरात पुन्हा पावसाला सुरूवात

    नागपूरच्या काही भागात ढगांच्या गडगडाटसह मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली आहे. चांगल्या मुसळधार पावसाचा  इशारा हवामान विभागाने दिला आहे.

  • 07 Jul 2022 03:03 PM (IST)

    अशोका धबधबा पर्यटकांसाठी बंद

    शहापूर तालुक्यातील अशोका धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. पावसाळ्यात जरी पर्याटकांना अशोका धबधबा खुणावत असला तरी अद्याप हा अशोक धबधबा पर्यटकांसाठी खुला केलेला नाही यामुळे येथे येणारे पर्यटक नाराज होऊन परत जात आहे . दर वर्षी पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले ही निर्सग रम्य ठिकाणी वळतात मात्र असे असताना सुरक्षेच्या दृष्टीने या धबधब्याकडे जाणारे मार्ग वन विभागाने बंद केले आहेत .

  • 07 Jul 2022 03:00 PM (IST)

    मुंबई- बडोदरा एक्सप्रेसवेच्या कामामुळे सफाळे येथील नवघर-घाटीम नैसर्गिक नाला बंद

    पालघर तालुक्यातील सफाळे पुर्व भागातील नवघर-घाटीम ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई- बडोदरा एक्सप्रेस वे कामामुळे नैसर्गिक नाला बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन  गावड पाड्यात   घुसण्याची शक्यता आहे. मुंबई-बडोदरा एक्सप्रेस वेच्या कामाची  सुरुवात करण्यात आली असून जीआर इन्फा प्रोजेक्ट्स या कंपनीने भराव टाकून नैसर्गिक नाले बंद झाले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला  शेती मोठ्या प्रमाणात असल्याने वर्षभरासाठी उदरनिर्वाहसाठी कुठलेही नसल्याने शेतकऱ्यांना शेतीवर अवलंबून राहावं लागते. या नाल्याच्या दोन्ही बाजूला आदिवासी व बिगर आदिवासी असे  30 च्यावर शेतकऱ्यांची शेती असुन मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. नैसर्गिक नाला बंद केल्याने गावात पावसाळ्यात पावसाचे पाणी गावात शिरण्याची ही  शक्यता आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्याना पुर आले आहेत.

  • 07 Jul 2022 02:24 PM (IST)

    शहापूर तालुक्यातील अशोका धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय

    शहापूर तालुक्यातील अशोका धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. पावसाळ्यात जरी पर्याटकांना अशोका धबधबा खुणावत असला तरी अद्याप हा अशोक धबधबा पर्यटकांसाठी खुला केलेला नाही यामुळे येथे येणारे पर्यटक नाराज होऊन परत जात आहे . दर वर्षी पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले ही निर्सग रम्य ठिकाणी वळतात मात्र असे असताना सुरक्षेच्या दृष्टीने या धबधब्या कडे जाणारे मार्ग वन विभागाने बंद केले आहेत .

  • 07 Jul 2022 01:04 PM (IST)

    kalyan rain update : कल्याणात एनडीआरएफचे पथक दाखल 

    कल्याणात एन डी आर एफ चे पथक दाखल
    Anchor : गेल्या वर्षी कल्याण मध्ये पावसाळ्यात काही ठिकाणी पुर परीस्थिती निर्माण झाली होती .यावेळी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एन डी आर एफ च्या पथकाची मदत घेण्यात आली होती . यंदा पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंदा पावसाच्या पार्शवभूमीवर कल्याण मध्ये एन डी आर एफ २५  जणांचे पथक दाखल झाले आहे .हे पथक कल्याण मध्येच तैनात राहणार आहे . आपत्कालीन परस्थितीच सामना करत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लागणारे साधन सामुग्रीसह हे पथक सज्ज आहे
  • 07 Jul 2022 12:13 PM (IST)

    Vidharbh Rain Update : पुढील पाच दिवसांत विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज, नागपूर हवामान खात्याचा अंदाज

    1. – पुढील पाच दिवसांत विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज
    2. – विदर्भातील अकराही जिल्ह्यात पडणार चांगला पाऊस
    3. – काही जिल्ह्यातील मुसळाधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
    4. – नागपूर हवामान विभागाने वर्तवला चांगल्या पावसाचा अंदाज
    5. – बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात चांगला पावसाचा अंदाज
    6. – चांगल्या पावसानं शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
    7. – सध्या विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात पडतोय चांगला पाऊस
  • 07 Jul 2022 11:40 AM (IST)

    kokan rain update : पुढचे काही दिवस कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे

    पुढचे काही दिवस कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून कोकण भागाला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात एनडीआरएफच्या दोन टीम या तैनात आहेत. सध्या सावित्री नदी ही धोक्याच्या पातळीखाली आहे. त्यामुळे महाड शहराला कोणताही धोका नाही. परंतु जर परिस्थिती बिघडली तर महाडकरांना कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात एनडीआरएफ टीमकडून मॉकड्रिल करण्यात येत आहे..

  • 07 Jul 2022 11:37 AM (IST)

    ajit pawar : विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आवाहन

    विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आवाहन

    “भारतीय हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि राज्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर समुद्र, नदी किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. जिल्हा,  राज्य प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. जीवित, वित्तहानी होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. राज्य सरकारनेही एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस, महसूल आदी बचाव, मदत यंत्रणांना सतर्क ठेवून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी. अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी. राज्यातील नागरिकांची जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

  • 07 Jul 2022 11:16 AM (IST)

    मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता

  • 07 Jul 2022 11:02 AM (IST)

    raigad rain update : रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 125 मि.मी. पावसाची झाली नोंद

    रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 125 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग – रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 125.45 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.01 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 963.17 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

    1. अलिबाग-57.00 मि.मी., पेण-119.00 मि.मी.
    2. मुरुड-44.00 मि.मी., पनवेल-149.00 मि.मी.
    3. उरण- 120.00 मि.मी., कर्जत- 163.20 मि.मी.
    4. खालापूर-152.00 मि.मी., माणगाव-134.00 मि.मी.
    5. रोहा-197.00 मि.मी.
    6. सुधागड-122.00 मि.मी.
    7. तळा-133.00 मि.मी.
    8. महाड-97.00 मि.मी.
    9. पोलादपूर-183.00 मि.मी
    10. म्हसळा-79.00 मि.मी.
    11. श्रीवर्धन-83.00 मि.मी.
    12. माथेरान- 175.00 मि.मी.

    असे आजचे एकूण पर्जन्यमान 2 हजार 007.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 125.45 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 31.06 टक्के इतकी आहे. रायगड जिल्ह्यात मागील वर्षी दि.7 जुलै 2021 रोजी सरासरी 2.82 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. तसेच दि.01 जून पासून 7 जुलै 2021 अखेर पर्यंत एकूण सरासरी 1 हजार 008.49 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली होती.

  • 07 Jul 2022 10:34 AM (IST)

    Navi Mumbai : नवी मुंबईत गेल्या 24 तासात 133 मिलिमीटर पावसाची नोंद

    नवी मुंबई गेल्या 24 तासात 133 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे

    मोरबे धरणाची पातळी देखील 71 मीटर एवढी झालेली आहे, बऱ्यापैकी पाऊस या क्षेत्रात पडला आहे

    त्यामुळे नवी मुंबईकरणात पाण्याची चिंता ही आता मिटलेली आहे

  • 07 Jul 2022 10:32 AM (IST)

    palghar rain update : पालघर जिल्ह्यातील पावसाची अपडेट एका क्लिकवर

    पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल दिनांक 07/07/2022 1)वसई:- 127मी मी 2)जव्हार:- 62.66मी मी 3) विक्रमगड:- 113.5मी मी 4) मोखाडा:- 60.4मी मी 5) वाडा :- 135.75 मी मी 6)डहाणू :- 94.02मी मी 7) पालघर:- 79.07मी मी 8) तलासरी :- 41.75मी मी एकूण पाऊस :- 714.15मी मी एकुण सरासरी 89.27मी मी

  • 07 Jul 2022 10:27 AM (IST)

    kolhapur rain update : एनडीआरएफ च्या टीमने प्रयागसंगमावर केली पाहणी

    एनडीआरएफ च्या टीमने प्रयागसंगमावर केली पाहणी

    प्रयाग संगम हा पंचगंगा नदीच उगम स्थान

    एनडीआरएफ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला पावसाचा आढावा

    सध्या पावसाचं प्रमाण कमी त्यामुळे धोका नाही

    मात्र नऊ तारखेपर्यंत जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा

    सध्या गरज नसली तरी आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ च्या आणखी टीम बोलावणार

    एनडीआरएफ चे सहाय्यक कमांडर प्रवीण धत यांची माहिती

  • 07 Jul 2022 09:59 AM (IST)

    Tapi river : खान्देशची जीवनदायिनी सूर्यकन्या तापी नदीला साडीचोळी अर्पण करून तापी जन्मोत्सव साजरा….

    सूर्यकन्या तापी नदीला आज जन्मोत्सव निमित्त भाविकांनी मोठ्या उत्साहात पूजन केले व साडीचोळी चा आहेर अर्पण केला यावेळी संगमेश्वर या ठिकाणी तापी नदी पात्रात भाविकांनी गर्दी केली होती. तापी नदीला खानदेशची जीवनदायिनी असे म्हणतात. खानदेश समृद्ध करण्यासाठी तापी नदी चा मोठा वाटा आहे. तापी नदीने या भागात केवळ शेतीच जगविली नाही तर येथील समाज जीवन सुद्धा जगविले आहे. याचे ऋण फेडण्यासाठी महिला भाविकांनी तापी जन्म उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो पहाटेपासून भाविकांनी संगमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी स्नान आणि पूजे साठी आले होते. महिला भाविकांनी तापी नदीत स्नान करत. त्यानंतर तापी नदीचे पूजन केले. साडी- चोळी सह सोळा शृंगार अर्पण केला.
  • 07 Jul 2022 09:57 AM (IST)

    Panchganga River Flood | पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू होतेय वाढ, पाणी पातळी 32 फुटांवर

    पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू होतेय वाढ, पाणी पातळी 32 फुटांवर आली आहे

    दोन दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरु आहे

  • 07 Jul 2022 09:54 AM (IST)

    Nalasopara Water Logg | स्टेशन परिसरात रस्त्याला नदीचं स्वरूप, पावसामुळे पाणी तुंबलं

    नालासोपारा परिसर कालपासून जलमय झाला आहे. दोन दिवसांपासून तिथं मुसळधार पाऊस सुरु आहे…

  • 07 Jul 2022 09:52 AM (IST)

    Andheri Subway Water Logg | मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, अंधेरी सबवेत पाणी भरलं

    मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.  अंधेरीतील सबवेत कालपासून पाणी आहे…

  • 07 Jul 2022 09:50 AM (IST)

    nalasopara rain update : नालासोपाऱ्यातील अचोळ परिसर पाण्याखाली, पावसाची जोरदार हजेरी

    दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नालासोपारा परिसर एकदम जलमय झाला आहे.

  • 07 Jul 2022 09:45 AM (IST)

    vasai rain update : वसई ते वसई फाटा महामार्गावर जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी

    वसई ते वसई फाटा महामार्गावर जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी

    रस्त्यावर बस बंद पडल्याने ट्रॅक्टर ला बांधून काढली बाहेर

    तर त्याच बाजूला एक श्वान सुद्धा पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहे

    महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी

  • 07 Jul 2022 09:30 AM (IST)

    gadchiroli rain update : गडचिरोली आलापल्ली भामरागड मार्गातील कुंमरगुंडा गावातील रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीला अडचण 

    गडचिरोली आलापल्ली भामरागड मार्गातील कुंमरगुंडा गावातील रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीला अडचण
    गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे रात्री येत असलेल्या या पावसाच्या फटका अनेक नदी-नाल्यांना बसलेला आहे भामरागड तालुक्यातील तालुका मुख्यालय असलेले रस्त्याचे काम सुरू असल्याने कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता हा कच्चा रस्ता रस्ता वाहून गेलेला आहे
    भामरागड तालुक्यातील कुंमरगुंडा गावातील हा रस्ता वाहून गेला असून पहाटेपासून वाहतुकीला मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे
  • 07 Jul 2022 09:26 AM (IST)

    khalapur khopoli rain update : खालापूर खोपोली महामार्गावर पडले भले मोठे खड्डे

    मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर खालापूर खोपोली महामार्गचे काही वर्षांपूर्वी काम करण्यात आले होते.खालापूर खोपोली व खोपोली खालापूर असा प्रवास करताना महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक यांना खडड्यांमधुन वाहन चालवावे लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही त्यामुळे तात्काळ सबंधीत यंत्रणा यांनी याची तात्काळ दखल घेऊन तात्पुरती का होईना रस्त्याची डागडुजी करून खड्डे भरण्याची मागणी केली जात आहे.

  • 07 Jul 2022 09:25 AM (IST)

    Nashik Rain Update : नाशिकच्या गंगापूर व मुकणे धरणांनी आता तळ गाठले

    जून महिना उलटून गेल्यानंतर नाशकात समाधानकारक पाऊस न पडल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व मुकणे धरणांनी आता तळ गाठले आहे… त्यामुळे शहरात पाणी पाणी लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.. अवघा 25 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आता नाशिक करणभोवती पाणी कपातीचे संकट गोंगावत आहे.. महापालिका आयुक्त यासंदर्भात सोमवारी आढावा बैठक घेणार असून बैठकीत पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे….
  • 07 Jul 2022 09:23 AM (IST)

    bhusaval rain update : हतनुर धरणाचे 30 दरवाजे एक मीटरने उघडले

    हतनुर धरणाचे 30 दरवाजे एक मीटरने उघडले

    हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 4 हजार 378 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

    तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आला सतर्कतेचा इशारा

  • 07 Jul 2022 09:22 AM (IST)

    Nalasopara Rain Update : नालासोपारा ते वसई जाणारा मुख्य रस्ता आचोळा परिसरात  पाण्याखाली गेला

    नालासोपारा ते वसई जाणारा मुख्य रस्ता आचोळा परिसरात  पाण्याखाली गेला आहे.

    रस्त्यावर गुडगाभर पाणी साचले आहे. पाण्यातून मार्ग काढताना अनेक वाहन बंद पडत आहेत..

    पाणी साचल्याने अनेक रिक्षाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी, औषध आणण्यासाठी ही पायपीट करत जावे लागत आहे.

    नालासोपारा पूर्व आचोळा रोड वरून साचलेल्या पाण्यातून आढावा घेऊन रुग्णालयात पायपीट

  • 07 Jul 2022 09:16 AM (IST)

    warand ghat rain update : वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद,

    – वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद,

    – महाड ते पंढरपुर या महामार्गावरील धोकादायक असलेला वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत बंद,

    – ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत अवजड वाहतुकीकरीता संपुर्णपणे बंद असणार,

    – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले निर्देश,

    -पुणे-पिरंगुट-मुळशी- ताम्हिणी घाट- निजामपूर-माणगाव- महाड या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश.

  • 07 Jul 2022 09:15 AM (IST)

    navi mumbai rain update : नवी मुंबईत रिमझिम पाऊसाला सुरुवात

    नवी मुंबईत रिमझिम पाऊसाला सुरवात

    वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे

    सर्वीकडे अंधार देखील मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे

    नवी मुंबईतील पाम बीच रस्त्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी र

  • 07 Jul 2022 08:30 AM (IST)

    Amravati rain update : अमरावती जिल्ह्याला पुराचा मोठा फटका, दीड हजार नागरिकांचे स्थलांतर

    अमरावती जिल्ह्यात 1100 घरात घुसले पुराचे पाणी…दीड हजार नागरिकांचे स्थलांतर

    426 घरांची पडझड 5 हजार हेक्टर वरील पिके अतिपावसामुळे बाधित….

    पावसाचा अमरावती, तिवसा, चांदुर बाजार,चिखलदरा व धामणगाव रेल्वे तालुक्याला फटका…

    महसूल विभागाचा प्राथमिक अहवाल आला समोर…

    पावसामुळे शेतातला आले आहे तलावाचे स्वरुप….

  • 07 Jul 2022 08:28 AM (IST)

    Vasai virar rain update : वसई विरार नालासोपारा जलमय झाला आहे

    वसई विरार नालासोपारा जलमय झाला आहे

    नालासोपारा पूर्व स्टेशन रोड ते सेंट्रल पार्क ओसवाल नगरी, आचोळा रोड, वसई नवजीवन, वालीव, सनसिटी रोड, विरार विवा कॉलेज रोड, स्टेशन ते बोलींज रोड वर पाणीच पाणी झाले आहे..

    सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शहरातील शाळांना ही सुट्टी देण्यात आली आहे..

    रेल्वे ट्रक वर कुठेही पाणी साचले नसल्याने, विरार वुन चर्चगेट ते चर्चगेट वुन विरार कडे धावणाऱ्या सर्व लोकल मात्र सुरळीत सुरू आहेत..

    सकाळ च्या वेळेत कामावर जाणाऱ्या नागरिकांना गुडगाभार पाण्यातून मार्ग काडावा लागत आहे

    वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पावसाने बॅटिंग केली असून सकाळ च्या वेळेत मात्र रिमझिम पाऊस सुरू आहे

  • 07 Jul 2022 08:28 AM (IST)

    kalyan rain update : मागच्या चार दिवसांपासून कल्याणमध्ये मुसळधार पाऊस

    कल्याण डोंबिवलीत सलग चौथ्या दिवशी ही पावसाची संततधार  सुरू असून  अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत . काल रात्री पावसाने चांगलीच बॅटिंग केली मात्र आज पहाटे पासून कल्याण डोंबिवली परिसरात रिमझिम पाऊस पडत असल्याने कुठल्याही सखोल भागात पाणी थांबले नाही मात्र गेले चार दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे  हवेत चांगलंच गारवा जाणवत आहे

  • 07 Jul 2022 08:26 AM (IST)

    lonavala rain update : मागील दोन दिवसात लोणावळ्यात मुुसळधार पाऊस

    – गेल्या 24 तासात लोणावळ्यात 146 मिमी (5.75 इंच) पावसाची नोंद झालीय

    -मागील दोन दिवसांपासून लोणावळ्यात जोरदार पाऊस झालाय

    -यावर्षी आजपर्यत 727 मिमी (28.62 इंच) पाऊस झालाय

  • 07 Jul 2022 08:15 AM (IST)

    maharashtra rain update : महाराष्ट्रात दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई ठाणे 10 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टवर

    महाराष्ट्र | रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी 9 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी, तर पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा 8 जुलैपर्यंत रेड अलर्टवर. मुंबई आणि ठाणे 10 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टवर:

  • 07 Jul 2022 07:56 AM (IST)

    nashik khed ghat rain update : नाशिक महामार्गावरील खेड घाटात दरडी कोसळल्या

    पुणे – नाशिक महामार्गावरील नव्यानेच तयार केलेल्या खेड घाटात बऱ्याच ठिकाणी धोकादायक दरडी दिसून येत असल्याने प्रवास धोकादायक बनला आहे . या रस्त्याचे काम काही ठिकाणी दुरुस्ती करून दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यात आला असला ; तरी अद्यापही अनेक ठिकाणी हा धोका कायम आहे काही ठिकाणी दरड कोसळून अपघात होण्याची भीती आहे.

  • 07 Jul 2022 07:38 AM (IST)

    marathwada rain update : मराठवाड्यात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत फक्त 24 टक्केच पाऊस..

    1. मराठवाड्यात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत फक्त 24 टक्केच पाऊस..
    2. मराठवाड्यात परिणामी फक्त 45 टक्केच झाली पेरणी..
    3. अद्यापही मराठवाड्यात मोठे पाऊस झालेले नाहीत..
    4. आठ दिवसात पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचं संकट समोर..
    5. कमी पावसामुळे मराठवाड्यात फक्त 49 लाख 63 हजार हेक्टरवर झाली पेरणी..
  • 07 Jul 2022 07:37 AM (IST)

    jayakwadi dam rain update : जायकवाडी धरणात फक्त 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक..

    1. जायकवाडी धरणात फक्त 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक..
    2. जायकवाडी धरणामध्ये मागील वर्षी मे होता 56% पाणीसाठा तर जुलै महिन्यात 43% पाणीसाठा..
    3. मध्यम प्रकल्पातील जलसाठा 45 टक्क्यांवरून आला 30 टक्क्यांवर..
    4. इतर बंधाऱ्यात 89 टक्क्यांवरून राहिला 65 टक्के जलसाठा शिल्लक..
    5. पाऊस पडल्यानंतरच होणार पाणी साठ्यामध्ये वाढ..
  • 07 Jul 2022 07:36 AM (IST)

    kolhapur rain update : कोल्हापूरात पावसाची विश्रांती, पंचगंगा नंदीच्या पात्रात वाढ

    1. कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची उसंत
    2. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम
    3. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत होते संथगतीने वाढ
    4. नदीची पाणी पातळी 32 फूट 6 इंचावर
    5. पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल
    6. 39 फुटांवर आहे नदीची इशारा पातळी
  • 07 Jul 2022 07:25 AM (IST)

    गोसीखुर्द धरण परिसरात मुसळधार पाऊस

    गोसीखुर्द धरणाच्या पानलोट क्षेत्रात सतत पाऊस पड़त असल्याने काल रात्रि पासून गोसीखुर्द धरणाच्या(Open gate) उघड़े असलेल्या 2 दरवाज्यात आणि भर पड़ली असून आता गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे अर्ध्या मीटर ने उघड़ण्यात आले आहे।विशेष म्हणजे या वर्षिच्या मानसून सेशन मध्ये पहिल्यांदा हे धरणाचे दरवाजे उघड़े करण्यात आले आहे।तर या पाच दरवाज्यातुन 695.86 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे।यामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असून नदी काठीला गावाला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे।

  • 07 Jul 2022 07:24 AM (IST)

    parshuram ghat : परशुराम घाटाच्या रखडलेल्या कामावरून उच्च न्यायालयाचे ताशेरे

    1. रत्नागिरी- पर्शुराम घाटाच्या रखडलेल्या कामावरून उच्च न्यायालयाचे ताशेरे
    2. रखडलेल्या कामावरून राज्य आणि प्रसानाला न्यायालयाने केली विचारणा
    3. गेली दहा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडले
    4. ओवेस पेचकर यांनी दाखल केलीय न्यालयात जनहित याचिका
    5. पर्शुराम घाटात दरडी कोसळू नयेत म्हणुन तंज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन का घेतले नाही- न्यायालयाचा सवाल
  • 07 Jul 2022 07:23 AM (IST)

    bhandara rain update : भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 230.9 मिमी पाऊस.

    सर्वाधिक पावसाची साकोली तालुक्यात नोंद.

    जिल्ह्यात आतापर्यंत 230.9 मिमी पाऊस.

    गत २४ तासात जिल्ह्यात 6.2 मिमी पावसाची नोंद.

    रखडलेली रोवणीची कामे आता वेगाने सुरू झाल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

  • 07 Jul 2022 06:57 AM (IST)

    Andheri Subway Rain Update : अंधेरीत सबवेमध्ये पाणी साचायला सुुरूवात

    मागच्या दोन दिवसांपासून मुंबईत सखल भागात पावसाचे पाणी साचायला सुरूवात झाली आहे.

    आज पुन्हा सकाळी मुसळधार पाऊस असल्याने अंधेरी येथील सबवेमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळाले

    #WATCH | Maharashtra | Andheri Subway waterlogged in Mumbai as rain continues to lash the city pic.twitter.com/7kiRhDVjel

    — ANI (@ANI) July 7, 2022

  • 07 Jul 2022 06:55 AM (IST)

    vasai virar nalasopara rain update : वसई विरार नालासोपाऱ्यात सगळीकडे पाणीचं पाणी, महत्त्वाचे रस्ते गेले पाण्याखाली

    1. वसई विरार नालासोपाऱ्यात सर्वत्र पाणीच पाणी
    2. शहरातील अनेक शाळांना दिल्या सुट्टी
    3. नालासोपारा, विरार, वसई मधील अनेक रस्ते गेले पाण्याखाली
  • 07 Jul 2022 06:54 AM (IST)

    rantagiri rain update : रत्नागिरीत मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस 

    NDRF च्या टीम रत्नागिरीच्या गावामध्ये जाऊन पाऊस आणी परिस्थितीचा आढावा घेतला

    रत्नागिरीत मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस

    कोकण किनारपट्टीवर दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे

  • 07 Jul 2022 06:51 AM (IST)

    nashik rain update : तापी नदीकाठच्या गावांना हातनुर प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा

    तापी नदीकाठच्या गावांना हातनुर प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा
    दोन दिवस पूर्णा नदी  आणि तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हातनुरच्या पाणलोट क्षेत्रात आवक वाढली.
    त्यामुळे आज संध्याकाळच्या सुमारास हतनुर धरणाचे  8 दरवाजे 1.00 मी. ने उघडे असून  296.00  विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे .
    तसेच जिल्हा प्रशासन तर्फे 26 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कोणीही आपले गोरे ढोरं धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये सोडू नये असे आवाहन हातनूर धरणाचे अभियंता एस जी चौधरी यांनी केले आहे
  • 07 Jul 2022 06:50 AM (IST)

    mumbai rain update : कांदिवली मलाड गोरेगाव जोगेश्वरी परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात

    मुंबई जोरदार पावसाची सुरुवात कांदिवली मलाड गोरेगाव जोगेश्वरी एक तासापासून संततधार पाऊस पडत आहे

  • 07 Jul 2022 06:48 AM (IST)

    Mumbai Rainfall update : राज्यात कुठे किती पाऊस पडणार जाणून घ्या

  • 07 Jul 2022 06:46 AM (IST)

    katraj tunnel rain update : काञज जुन्या बोगदा येथे कोसळलेली दरड हटवली

    काञज जुन्या बोगदा येथे दरड कोसळल्याची घटना घडली होती. पुणे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तातडीने तसेच महापालिका कर्मचारी आणि पाटबंधारे विभागाकडून जेसीबीची मदत घेऊन घटनास्थळी पोहोचले. सद्यस्थितीत रस्त्यावर आलेले मोठे दगड बाजूला करत काम पुर्ण केले असून तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी

  • 07 Jul 2022 06:34 AM (IST)

    andheri rain update : अंधेरी सबवे पाण्याने भरला

    मुंबईत रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असल्याने अंधेरी सबवे मध्ये पाणी भरला आहे. मात्र इथे सांचलेल्या पाण्याचा प्रमाण वाढण्याची शक्यता आहे

  • 07 Jul 2022 06:32 AM (IST)

    mumbai rain update : मुंबईच्या मलबार हिल परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे

    मुंबईच्या मलबार हिल परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे

    डोंगराळ भाग असल्या कारणाने इथे पाणी सांचलेला नाही

    मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत निवास स्थान आणि जवळपासच्या परिसरात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे

  • 07 Jul 2022 06:30 AM (IST)

    malegaon rain update : मालेगाव शहर परिसरात जोरदार पाऊस..

    गेल्या एक आठवड्याच्या विश्रांती नंतर आज मालेगाव शहर परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाले.एक तास मुसळधार पावसाने शहर परिसराला अक्षरशः झोडपून काढले त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे त्यातून वाट काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.रस्त्याच्या कडेला असलेल्या काही दुकानात पावसाचे पाणी शिरल्यामुळे त्यांचे नुकसान झाले दमदार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले असले तरी मात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
  • 07 Jul 2022 06:21 AM (IST)

    mumbai rain Update : मुंबईसह उपनगरात रात्री पासून मुसळधार पाऊस, सखल भागात साचले पाणी

    मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, मुंबईसह उपनगरातील बांद्रा, अंधेरी, गोरेगांव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.

    अंधेरी सबवे, मालाड सबवे सह अनेक सखल भागात पाणी साचले आहे, तर दुसरीकडे मुंबईतील नदी-नालेही पाण्याने भरून वाहू लागले आहेत.

  • 07 Jul 2022 06:19 AM (IST)

    सकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरु

    राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    त्याचबरोबर काल झालेल्या पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचले होते

  • 06 Jul 2022 09:23 PM (IST)

    सिंधुदुर्गात उद्यापासून पुढील तीन दिवस रेड अलर्ट जारी

    सिंधुदुर्गात उद्यापासून पुढील तीन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून ndrf चे पथक तैनात करण्यात आले आहे. 22 जणांचे पथक जिल्ह्यात दाखल. नागरिकांनी खबरदारी व सतर्क राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.

  • 06 Jul 2022 08:55 PM (IST)

    रत्नगिरी- परशुराम घाट आजपासून सर्व वाहतुकीसाठी बंद

    9 जुलै पर्यंत घाट राहणार बंद

    दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे वाहतूक ठेवली जाणार बंद

    प्रशासनाने काढला आदेश

    अवजड वाहन प्रमाणेच छोट्या वाहनांसाठी देखील परशुराम घाट बंदच

  • 06 Jul 2022 08:54 PM (IST)

    अधिकाऱ्यांनी पावसाच्या स्थितीचा घेतला आढावा

    वसई विरार नालासोपारा परिसरातील पूरजन्य परिस्थितीचा आयुक्त अनिलकुमार पवार यांनी प्रत्येक ठिकाणाला भेटी देत पाहणी करून आढावा घेतला आहे.

    महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या हॅजमेट वाहनातून ही पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांचीही समावेश होता.

    वसई विरार नालासोपाऱ्यात मागच्या 3 दिवसात सलग मोठ्याप्रमाणात पाऊस झाला आहे.

    आज एका दिवसात 217 मिलिमीटर पाऊस शहरात पडला आहे. या पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते, जलमय होऊन सर्वत्र पाणीच पाणी होऊन पूर्ण शहरात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती.

    अनेक सोसायटीच्या तळमजाळ्यातील घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन ही विस्कळीत झाले होते.

    महापालिकेने केलेल्या उपाययोजना, सध्याच्या पुरपरिस्थितीत कितपत कार्यान्वित आहे. नागरिकांच्या समस्या काय आहेत हेही आयुक्तांनी जाणून घेतले आहे.

  • 06 Jul 2022 08:53 PM (IST)

    वीस वर्षीय तरुणी कुंड मळ्यात वाहून गेली

    -मावळमध्ये वर्षाविहारासाठी गेलेली वीस वर्षीय तरुणी कुंड मळ्यात वाहून गेलीय

    -साक्षी सतीश वंजारे ही तरुणी मैत्रिणीसह इंदोरी येथील कुंडमळा येथे आली होती, कुंड मळाच्या कडेला फिरत असताना साक्षीचा पाय घसरला अन ती कुंडमळ्यात पडली

    -पाण्यात वाहून गेल्याने तिचा शोध घेतला जातोय, तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते

    -वर्षाविहारासाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वतः ची काळजी घ्यायला हवी अस या घटनेतून अधोरेखित होतय

  • 06 Jul 2022 07:04 PM (IST)

    मुंबईत पावसाचा जोर ओसरला

    मुंबईला गेल्या दोन दिवसात पावसाने झोडपलं आहे. मात्र गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर हा कमी झाला आहे. पावसाने काही काळ विश्रांती घेतली आहे.

  • 06 Jul 2022 06:36 PM (IST)

    सांगलीतही पावसाचा जोर वाढला

    चांदोलीत सलग दोन दिवस अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे, वारणा नदीवरील कोकरूड रेठरे बंधाराही पाण्याखाली गेला आहे.

  • 06 Jul 2022 06:34 PM (IST)

    हवामान खात्याचा अंदाज

  • 06 Jul 2022 06:32 PM (IST)

    पहिल्याच पावसात पूर्णा शहराचा भुयारी मार्ग तुंबला

    परभणीच्या पूर्णा शहरात पहिल्याच पावसाने भुयारी मार्ग तुंबल्याचा दिसून आल , पूर्णा शहरातून नांदेडकडे जाणारा हा भुयारी मार्ग पावसाच्या पाण्याने  तुंबल्याने रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे . त्यामुळे या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने कायमस्वरूपी समस्या मार्गी लावावी अशी मागणी नागरिक करत आहे .
  • 06 Jul 2022 06:14 PM (IST)

    हिंगोली -जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाला सुरुवात

    जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून खोळंबलेल्या पेरणीला उद्यापासून वेग येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • 06 Jul 2022 06:11 PM (IST)

    अधेरीत तुफान पाऊस

    मुंबईच्या अंधेरीमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, रस्त्यांवरून पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. अंधेरी सबवे असो की आजूबाजूचे रस्ते, सर्वत्र यावेळी पाणी साचले आहे. पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान आहे की बॅरिकेड्स आणि दुचाकीही वाहू लागल्या आहेत. आजूबाजूची सर्व दुकाने जलमय झाली असून रस्त्यावर उभी केलेली वाहनेही आता पाण्यात बुडाली आहेत.

  • 06 Jul 2022 05:45 PM (IST)

    पावसामुळे खजरी ते खोडशिवनी मार्गावरील पूल तुटला

    गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू असून चार तालुक्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे सडक अर्जुनी  तहसीलमधील  खजरी ते खोडशिवनी मार्गावरील सध्या मोठ्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून 16 गावातील नागरिक जुन्या पुलावरून वाहतूक करीत असतात. मात्र दोन दिवसापासून अतिवृष्टी झाल्याने जुना पर्यायी पुल पाण्यामुळे वाहून गेल्याने 16 गावातील नागरिकांच्या समोर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पुलावरून नागरिक जिल्हा संपर्क साधातात. अनेक विद्यार्थी याच पुलावरून शिक्षणासाठी येणे जाणे करत असल्याने सध्या त्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
  • 06 Jul 2022 05:43 PM (IST)

    तळोजा कल्याण रस्ता पाण्याखाली

    पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागझरी गावातून जाणाऱ्या तळोजा कल्याण रस्त्यावर एमआयडीसीतील कंपन्यांनी नैसर्गिक नाले बुजवल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येत असून त्यामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे वाहनांच्या दोन-तीन किलोमीटर दुतर्फा रांगा लागलेल्या आहेत. अधिकृत व अनधिकृत कंपन्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे तसेच नैसर्गिक नाले बुजविल्यामुळे नागरिकांना पावसाच्या पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

    शेकडो वाहने थोड्याशा पावसामुळे अडकून पडत आहेत. एमआयडीसी व पनवेल महानगरपालिका यांनी संयुक्त कारवाई करून नैसर्गिक नाले खुले करण्याची मागणी होत  आहे. वाहतूक पोलीस या ठिकाणी उपस्थित नसल्याने ट्रॅफिक जामची नेहमीच समस्या निर्माण झाली आहे.

  • 06 Jul 2022 05:41 PM (IST)

    जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत कोसळली 

    पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर वर आला आहे. डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पळे बोरीपाडा येथील शाळेच्या इमारतीची भिंत मुसळधार पावसामुळे जमीन दोस्त झाली आहे . सुदैवाने ही दुर्घटना रात्री घडल्याने कोणत्याही विद्यार्थ्याला अथवा शिक्षकाला इजा झाली नाही . पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून याच पावसामुळे ही भिंत कोसळल्याचे समोर आलय . मात्र पळे बोरीपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत जीर्ण झाली असून त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून येथील शिक्षक आणि ग्रामस्थ करत होते, मात्र जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याने मध्यरात्रीच्या सुमारास अखेर ही दुर्घटना घडली .

  • 06 Jul 2022 05:38 PM (IST)

     पचोऱ्यात जोरदार पाऊस

    जळगावातील पाचोरा तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे शेतकरी दुबार प्रेरणीच्या संकटात सापडला होता. यामुळे झालेल्या दमदार पावसामुळे पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

  • 06 Jul 2022 05:36 PM (IST)

    NDRFचे पथक कराडमध्ये दाखल

    अतिवृष्टीच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाल्यास बचाव व उपाय योजना त्वरीत राबवण्यासाठी  NDRFचे पथक कराडमध्ये दाखल झाले असून कराड, पाटण तालुक्यातील संभाव्य परस्थितीची माहिती घेतली जात आहे,

  • 06 Jul 2022 04:41 PM (IST)

    सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

    कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय….. कोल्हापूरच्या प्रयाग चिखली जवळ असलेल्या प्रयाग संगमावर कुंभी कासारी भोगावती तुळशी आणि धामणी या पाच नद्यांचा संगम होतो… या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यान प्रयाग संगमाच्या ठिकाणी नदीचे पात्र विस्तीर्ण झालंय… नद्यांनी पात्र सोडल्यानंतर आजूबाजूच्या शेतामध्ये हे पाणी जायला सुरवात झालीय..या पाच नद्यांचा संगम होऊन पुढे पंचगंगा नदी वाहते.

    पाहा व्हिडिओ

  • 06 Jul 2022 04:20 PM (IST)

    दमदार पावसाची प्रतिक्षा

    वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.. त्यामुळं पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे……

  • 06 Jul 2022 04:14 PM (IST)

    नंदुरबारमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    नंदुरबार शहरासह तालुक्यात जोरदार पाऊसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवली होती. वरुणराजा बरसत नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी संकट समोर उभा राहिलं होतं. आज तीन वाजेच्या सुमारास आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • 06 Jul 2022 04:12 PM (IST)

    रेल्वेच्या यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना

    मुंबई महापालिकेशी समन्वय राखावा. पाणी साचून सेवा विस्कळीत झाल्यास प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी घ्या. यासाठी एक समन्वयक अधिकारी ( नोडल) नियुक्त करावा. प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्ट, एसटी बसेस किंवा स्थानिक परिवहन सेवा यांची मदत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी लोकांना माहिती देण्याची व्यवस्था करा. संपर्क आणि समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करा.

  • 06 Jul 2022 03:43 PM (IST)

    पुढचे चार ते पाच दिवस पावसाचे

  • 06 Jul 2022 03:36 PM (IST)

    रायगडावरील वाहत्या पाहण्याचा व्हिडिओ

    रायगडावरील एक व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. एका शिवप्रेमीने हा व्हिडिओ शूट केला आहे.

  • 06 Jul 2022 03:28 PM (IST)

    बच्चू कडू यांच्याकडून पूरस्थितीचा आढावा

    मंत्री बच्चू कडू यांच्याकडून पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. अमरावती चांदूर बाजार परिसरात तसेच इतरही काही भागात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.

  • 06 Jul 2022 03:24 PM (IST)

    नालासोपारा दिवसभर जलमय, सेंट्रल पार्क, तुलिंज, आचोळा रस्ता पाण्याखालीच 

    वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे आज दिवसभर  शहरातील मुख्य रस्ते,  गुडगाभर पाण्याखाली जाऊन पूर्ण परिसर जलमय झाला होता. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमानी, वाहनधारक यांना याच पाण्यातून मार्ग काढत मोठा त्रास सहन करावा लागला आहे. यंदाच्या वर्षी वसई विरार महापालिकेने केलेल्या नाळेसफाईचा मात्र पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.
  • 06 Jul 2022 03:18 PM (IST)

    चंद्रपूर : मूल तालुक्यातील राजोली गावात लोकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी

    ग्रामपंचायतीच्या चुकीचा नियोजनामूळे घरात पावसाचे पाणी घुसल्याचा ग्रामस्थांचा आरोप,

    राजोली गावात आज सकाळी या मौसमातील पहिलाच जोरदार पाऊस झाला आणि शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले,

    ग्रामपंचायतने नाल्यांची व रस्ताची उंची वाढविल्या मुळे राजोली गावात पावसाचे व नाल्याचे पाणी घरात घुसल्याच्या लोकांचा आरोप,

    घरात पाणी शिरल्याले लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

  • 06 Jul 2022 03:14 PM (IST)

    हवामान विभागाच्या अंदाजाला पावसाने चकवा दिला

    सिंधुदुर्गात हवामान विभागाच्या अंदाजाला पावसाने चकवा दिला असून आज सकाळ पासून जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 90 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा दोडामार्ग तालुक्यात 170 मिलिमीटर पाऊस पडला आहे. आज सकाळ पासून जिल्ह्यात संमिश्र वातावरण आहे. कधी ढगाळ, कधी ऊन तर कधी मोठी सर अशा स्वरूपाच वातावरण जिल्ह्यात आहे. पाऊस कमी असला तरी पडझडीच्या घटना घडल्यामुळे काही ठिकाणी वाहतूकीचा खोळंबा देखील झाला होता. हवामान खात्याने काल रेड अलर्ट दिला होता मात्र रत्नागिरी आणि रायगडच्या तुलनेत पाऊस झाला नाही तर आज हवामान खात्याने सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जाहीर केला असला तरी पावसाने हवामान विभागाच्या अंदाजाला चकवा दिला आहे.

  • 06 Jul 2022 02:46 PM (IST)

    मुंबईत बेस्टचा मार्ग पुर्ववत करण्यात आला…

  • 06 Jul 2022 02:38 PM (IST)

    raigad rain update : कुंडलिक नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    जिल्ह्यात आठ तारखेपर्यंत अतीवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अंबा नदी, सावित्री नदी, या नद्यांनी आज धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी रोहा शहरातील कुंडलीका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला आहे. नदीकाठी राहणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

  • 06 Jul 2022 02:34 PM (IST)

    kokan rain update : पंचगंगा नदीची पाणी पातळी धीम्या गतीने इशारा पातळीकडे

     कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी पंचगंगा नदीची 54 फुटावर गेले आहे तसेच महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन स्थापना मार्फत दोन यांत्रिक बोटी तसेच 20 जवान तैनात करण्यात आले तसेच कोल्हापूर व शिरूर मध्ये दोन एनडीआरएफ टीम फायनल करण्यात आले आहेत मार्फत पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, पेंडाखळे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- मांडूकली, शेणवडे, कळे व वेतवडे, धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे,  दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे व चिखली असे 27 बंधारे पाण्याखाली आहेत.
    आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 42.45 दलघमी, वारणा 353.03 दलघमी, दूधगंगा 219.65 दलघमी, कासारी 34.30 दलघमी, कडवी 26.10 दलघमी, कुंभी 35.01 दलघमी, पाटगाव 42.53 दलघमी, चिकोत्रा 19.76 दलघमी, चित्री 18.47 दलघमी, जंगमहट्टी 14.65 दलघमी, घटप्रभा  42.61 दलघमी, जांबरे 10.14 दलघमी, आंबेआहोळ 19.25, कोदे (ल.पा) 5.83 दलघमी असा आहे.  तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 30.4 फूट, सुर्वे 28.3 फूट, रुई 55.6 फूट, इचलकरंजी 53.6, तेरवाड 46 फूट, शिरोळ 35 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 19.1 फूट तर नजीकच्या सांगली 5.9 फूट व अंकली 11  फूट अशी आहे.
  • 06 Jul 2022 02:28 PM (IST)

    kokan rain update : आंबोली धबधबा ओसंडून वाहू लागला

    आंबोली धबधबा ओसंडून वाहू लागला
    कोल्हापूर – सावंतवाडी आंबोली घाटातील असणाऱ्या आंबोली धबधबा ओसंडून वाहू लागला आहेआंबोली धबधबा मध्ये आनंद घेण्यासाठी पर्यटक धबधब्याखाली आनंद घेण्यासाठी येऊ लागलेआंबोली घाटामध्ये धुक्याची चादर पसरली आहे जणूकाही स्वर्गाचा आनंद पर्यटक लुटत आहेआंबोली धबधबा तून पांढरेशुभ्र पाणी पडत असल्यामुळे हा धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी बनला आहे
  • 06 Jul 2022 02:26 PM (IST)

    Thane Monsoon Update | ठाण्यात जोरदार पावसामुळे प्रचंड वाहतूक कोंडी

    ठाण्यात मुसळधार पावसामुळे वाहतुक कोंडी झाली आहे

    राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

  • 06 Jul 2022 02:24 PM (IST)

    लातूरमध्ये केवळ 150 मिमी पावसाची नोंद 

    लातूर जिल्ह्यात खरिपाचे 6 लाख 12 हजार 421 हेक्टर क्षेत्र

    2 लाख 30 हजार 379 हेक्टरवर पेरा झाला

    पावसाची सरासरी लक्षात घेतली तर केवळ 150 मिमी पावसाची नोंद

  • 06 Jul 2022 02:17 PM (IST)

    चुलबंद नदीच्या पाण्यात अडकलेले 10 शेतकरी सुखरुप

    भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ
    सोनी आवळीच्या चुलबंद नदीच्या पुरात दहा शेतकरी अडकले होते
    जीव वाचविण्याच्या आकांत करत असताना नावाड्याच्या प्रसंगावधानामुळे सर्वांना सुखरूप नदी तिरावर आणण्यात आलं.
    चुलबंदी नदीच्या पुरामुळे अडकलेल्या शेतकऱ्यांना सुरक्षितस्थळी पोहचवल्यानं मोठा अनर्थ टळला
    शेतकऱ्याच्या शेती असल्यामुळे चुलबंद नदीतून ये जा करावी लागते
    काल सकाळी शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी नावेत बसले होते
    नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने 10 शेतकरी नदीत आडकून पडले होते
    अशातच नावाडी नारायण कुंभरे यांनी मोठ्या शिताफीनं नाव अडकवलं
  • 06 Jul 2022 02:05 PM (IST)

    दरड कोसळण्याचा घटनेवर कायमस्वरुपी उपाय होतील-प्रविण दरेकर

    कोकणातील दरड कोसळण्याच्या घटनेवर कायमस्वरुपी उपाय होतील
    भाजप नेते प्रविण दरेकर यांची माहिती
    आमचं गतिशील सरकार आहे.  आवश्यक ते होईल, असंही दरेकर म्हणालेत
    मुंबईतील 25 – 30 ठिकाणी पाणी भरतं, तरीही आदित्य ठाकरे पाठ थोपटून घेतात
    प्रविण दरेकरांची पुन्हा आदित्य ठाकरेंवर टीका टीका
  • 06 Jul 2022 02:01 PM (IST)

    चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील राजोली गावात अनेक घरात पाणी शिरलं, नागरिकांचे हाल

    ग्रामपंचायतीच्या चुकीचा नियोजनामूळे घरात पावसाचे पाणी घुसल्याचा ग्रामस्थांचा आरोप

    राजोली गावात आज सकाळी या मोसमातील पहिलाच जोरदार पाऊस झाला आणि शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.

    ग्रामपंचायतीने नाल्यांची आणि रस्ताची उंची वाढवल्यामुळे राजोली गावात पावसाचे आणि नाल्याचे पाणी घरात घुसल्याचा नागरिकांचा आरोप आहे

    घरात पाणी शिरल्याले लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

  • 06 Jul 2022 01:59 PM (IST)

    चुलबंद नदीचे अचानक पाणी वाढले, पाण्यात अडकले दहा शेतकरी

    भंडारा : चुलबंद नदीच्या अचानक वाढलेल्या पाण्यात अडकले दहा शेतकरी

    नावाड्याच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    सोनी आवळी घाटावरील घटना

  • 06 Jul 2022 01:47 PM (IST)

    भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 24 तासात 43.1 मिमी पावसाची नोंद

    भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाले असून मागील 24 तासांत जिल्ह्यात 43.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे।तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 82 टक्के पडला आहे।आलेल्या या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून रोवणीच्या कामाला वेग येणार आहे।गत महिनाभरापासून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते।जून महीना हो कोरडा गेला होता।मात्र जुलै महीना लागताच दमदार पावसाची हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून खोलंबलेल्या रोवन्या पूर्ण होण्यास मदत होणार आहे।
  • 06 Jul 2022 12:58 PM (IST)

    chembur rain update : मुसळधार पावसानंतर चेंबूरमध्ये साचलं पाणी

    सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं आहे.

    #WATCH | Heavy waterlogging in Chembur area of Mumbai as rains lash the city pic.twitter.com/e3SLqWRe6O

    — ANI (@ANI) July 6, 2022

  • 06 Jul 2022 12:54 PM (IST)

    Pune | संततधार पावसामुळे खडकवासला प्रकल्पांतील 4 ही धरणांच्या पाणीपातळीत वाढ

    खडकवासला धरणात तीन महिने पुरेल इतका पाणीसाठी,

  • 06 Jul 2022 12:51 PM (IST)

    nandurbar rain update : नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटात दरड कोसळली

    नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटात दरड कोसळुन रस्त्यात मोठ्या प्रमाणात माती साचत असल्याने वाहन धारकांना मोठा कसरत करावा लागत आहे. या मातीच्या चिखलामधुन जिवघेणी वाट सध्या प्रवाश्यांना काढावी लागत असुन दुसरीकडे प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासुन हा मातीचा ढिगारा रस्त्यावर पडुन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने हो हटवण्याची तसदी देखील घेतलेली नाही. या ठिकाणी चिखलात वाहन घसरुन पडत असल्याने प्रवाशी काहीसे किरकोळ जखमी देखील होत आहे. मागच्या वर्षी या ठिकाणी दरड कोसळल्याने रस्त्या बंद झाला होता. आणि एका महिलेला उपचारासाठी खांद्यावर टाकुन दुसऱया बाजुला घेवुन जाव लागल होत. यात तिचा मृत्यु देखील झाला होता. मात्र प्रशासनाने याठिकाणी वर्षभरात कोणतीही उपयायोजना केली नसल्याचे दिसुन येत आहे.
  • 06 Jul 2022 12:48 PM (IST)

    amravati rain update : बगाजी सागर धरणाचे सात दरवाजे उघडले

    सद्या विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लोवर वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणात सद्या ७१.९६ टक्के जलसाठा आहे. या धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहे. यातून ३० सेमी ने पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय नदीपात्रात कुणीही उतरू नये असे आव्हाहन देखील करण्यात आले आहे.

  • 06 Jul 2022 12:40 PM (IST)

    mumbai rain update : चुनाभट्टी दरड कोसळली

    चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरातील डोंगर भाग कोसळला सदर घटनास्थळी चेंबूर अग्निशमन  जवान व चुनाभट्टी पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे सदर व्यक्तीस उपचार करण्यासाठी सायन रूग्णालयात पाठवले आहे

  • 06 Jul 2022 12:30 PM (IST)

    pune rain update : पुण्यात पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी

    पुण्यात पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी

    पुण्यातील अनेक भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा

    पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर साचले पाणी

    मागील एक तासापासून शहराचा मध्यवर्ती भाग जाम

  • 06 Jul 2022 12:29 PM (IST)

    navi mumbai rain update : नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे दोन झाडे कोसळून गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

    नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे दोन झाडे कोसळून गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे

    मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे तरीदेखील पावसाची रिपरिप पाहायला मिळते

  • 06 Jul 2022 12:28 PM (IST)

    Vasai-virar Waterlogg | वसई पूर्वेतील मीठागरांमध्ये पुराचं पाणी भरलं, मार्ग काढताना नागरिकांची कसरत

    वसई पूर्वेतील मीठागरांमध्ये पुराचं पाणी भरलं, मार्ग काढताना नागरिकांची कसरत

    कालपासून तिथल्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे

  • 06 Jul 2022 12:26 PM (IST)

    अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईत वाहतुक कोंडी

  • 06 Jul 2022 12:19 PM (IST)

    pune rain update : पुण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस

    गेल्या ५ तासात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील अग्निशमन दलाकडे प्राप्त झालेल्या विविध वर्द्या…

    १) आग – १

    २) इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट – ०

    ३) झाड पडणे – १३

    ४) मनपा इलेक्ट्रिक पोल वाकला – १ (शिवदर्शन, महालक्ष्मी मंदिरजवळ)

    ५) पाणी शिरले – ०

    ६) भिंत पडणे – ०

    वरिल प्रकारच्या वर्द्यामधे कुठे ही जिवितहानी वा जखमी नाही

    झाडपडी ठिकाण

    1) दत्तवाडी पोलिस चौकीजवळ 2) शिवणे, शिंदे पुलाजवळ 3) टिंगरेनगर, गल्ली क्रमांक ६ 4) लुल्लानगर 5) भवानी पेठ, मनपा वसाहत क्र 10 6) औंध, आंबेडकर चौक 7) प्रभात रोड, लेन नं 14 8) नवीन सर्किट हाऊसजवळ 9) नाना पेठ, अशोका चौक 10) कळसगाव, जाधव वस्ती 11) हडपसर, क्वालिटी बेकरीजवळ 12) कोथरुड, मयुर कॉलनी 13) एरंडवणा, गुळवणी महाराज रस्ता

  • 06 Jul 2022 12:17 PM (IST)

    ambernath rain update : अंबरनाथमध्ये मुख्य रस्त्यावर झाड कोसळलं

    अंबरनाथमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडलीये. वेल्फेअर सेंटर ते रोटरी क्लब दरम्यानच्या रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास हे झाड कोसळलं. यामुळे रस्त्याची एक बाजू बंद झाली आहे. हा रस्ता अंबरनाथ एमआयडीसीत जाणारा मुख्य रस्ता असून वडवली परिसरातून स्टेशनला जोडणारा एकमेव रस्ता आहे. त्यामुळं झाड कोसळल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून हे झाड हटवण्याचं काम हाती घेण्यात आलंय.

  • 06 Jul 2022 12:13 PM (IST)

    palghar rain update : पालघर कवडास बंधारा ओव्हरफ्लो

    सूर्या नदी वरील धामणी धरण सध्या दोन दिवस झालेल्या पावसाने 24.14 % भरले असून धरणक्षेत्रात हवा तसा पाऊस झालेला नसला तरी धामणी धरण खालोखाल असलेला कवडास बंधारा यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाच्या खालोखाल असलेला कवडास उन्नती बंधारा 100 टक्के भरला असून सुर्या नदीत 51.43 क्यूमिक पाण्याचा विसर्ग सध्या सुर्या नदीत सुरू आहे. धामणी धरण व कवडास बंधारा मूळ परिसरातील 7 हजार 400 हेक्टर क्षेत्र सिंचना खाली येत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचा करिता मोठा फायदा होत असतो.

  • 06 Jul 2022 12:10 PM (IST)

    आदित्य ठाकरेंचं पालिकेच्या कामासंदर्भात ट्विट

  • 06 Jul 2022 12:02 PM (IST)

    thane mumbai rain update : ठाण्यातील मुंबई नाशिक हायवे वर प्रचंड वाहतूक कोंडी

    ठाण्यातील मुंबई नाशिक हायवे वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून जवळपास ६ ते ७ किलोमीटर च्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत… मुंबई कडून नाशिक कडे जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालीय… भिवंडी -कल्याण नाशिक मार्गावर प्रचंड खड्डे पडलेत त्यामुळे ही वाहतूक कोंडी झालीय..

  • 06 Jul 2022 11:58 AM (IST)

    satara rain update : मुसळधार पावसामुळे साताऱ्यात दरड कोसळली

  • 06 Jul 2022 11:54 AM (IST)

    navi mumbai rain update : नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले

  • 06 Jul 2022 11:46 AM (IST)

    ulhasanagar rain update : उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसामुळे झाड उन्मळून पडलं

    उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसामुळे झाड उन्मळून पडलं

    कॅम्प ४ मधील सुभाष टेकडी, महात्मा फुले कॉलनीतली घटना

    या घटनेत सुदैवाने कुणालाही इजा झालेली नाही

  • 06 Jul 2022 11:45 AM (IST)

    beed rain update : माजलगाव तालुक्यात रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली

    माजलगाव तालुक्यात रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसात गुजरवाडी येथील पूल पूल वाहून गेल्याने दोन गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान रस्त्याचा अंदाज न आल्याने एक वृद्ध शेतकरी वाहून गेला. बाबुराव नरवडे असं वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याचा मृतदेह सकाळी आढळून आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून पूल दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी होती मात्र प्रशासनाकडून कसलीच डागडुजी करण्यात आली नाही. अखेर पहिल्याच पावसात पूल वाहून गेला. दिवसा या पुलावर मोठी रहदारी असते रात्रीच्या सुमारास पाऊस झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

  • 06 Jul 2022 11:40 AM (IST)

    kokan rain update : महाड मार्गावरील वरंधा घाट सर्वप्रकारच्या वाहतुकी साठी बंद

    पुणे- महाड मार्गावरील वरंधा घाट सर्वप्रकारच्या वाहतुकी साठी बंद करण्यात आलाय. गेल्या दोन दिवसापासून या भागात मुसळधार पाऊस सुरूय त्यामुळं घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचलाय,त्याच बरोबर घाटात दरड, माती कोसळत असल्यानं हा निर्णय घेण्यातं आलाय.मागच्या आठवड्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा अलर्ट मिळाल्यानंतर जड वाहनांसाठी हा घाट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यातं आला होता, मात्र पावसामुळं घाट रस्ता खचत असल्यानं आणि जागोजागी दरड कोसळत असल्यानं आता हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. दरम्यान वरंध घाटातून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनय जगताप यांनी.

  • 06 Jul 2022 11:33 AM (IST)

    vasai virar rain update : वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरूच

    वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरूच

    वसई सनसिटी ते गास जाणारा रस्ता गेला पाण्याखाली

    चोहीबाजूने मुख्य रस्त्याला पाण्याने घातला वेढा

    कंबरे इतक्या पाण्यातून वाहन नेताना बंद पडल्याने वाहनचालकांना ढकलत आणावे लागत आहेत वाहन

    वसई सनसिटी ते गास, सोपारा, भुईगाव, विरार ला जोडणारा आहे रस्ता

    रस्त्याच्या कडेला उभे असणारे वाहन ही साचलेल्या पाण्यात बुडाली आहेत..

  • 06 Jul 2022 11:29 AM (IST)

    sangli rain update : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.3 मि. मी. पावसाची नोंद

    सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर शिराळा तालुक्यात सर्वाधिक 51 मि. मी. पावसाची नोंद झाली असून चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. तर कृष्णा नदी सध्या पात्रातूनच वाहत असून पाणी पातळी 6 फुटांच्या जवळ आहे. जिल्ह्यात पावसाची थांबून थांबून संततधार सुरूच आहे. दीर्घ प्रतीक्षे नंतर काल पासून मान्सूनचे आगमन झाले आहे. जिल्ह्यात पावसाची थांबून थांबून संततधार सुरूच आहे. मात्र शिराळा तालुक्यात सर्वाधिक 51 मि. मी. पावसाची नोंद झाली असून चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे.
  • 06 Jul 2022 11:25 AM (IST)

    thane rain update : ठाण्यातील तलावपाली तलाव भरला

  • 06 Jul 2022 11:23 AM (IST)

    vasai rain update : वसईतील मिठाग्रहाला पुराच्या पाण्याचा वेढा,

    वसईतील मिठाग्रहला पूर्ण पाण्यानी वेढा टाकला आहे.

    वसई पूर्व ला मुख्य रस्त्याच्या एक किलोमीटर अंतरावर  400 ते 500 रहिवाशांची मिठाग्रह ही लोकवस्ती आहे..

    रात्री पासून पडणाऱ्या पावसाने या वस्तीला 4 ही बाजूने वेढले असून, तेथील महिला, पुरुष, वयोवृद्ध ना गुडगा ते  कंबरे इतक्या पाण्यातून मार्ग काढत बाहेर पडावे लागत आहे..

    याच मिठाग्रह चा आढावा घेऊन पाण्यातून मार्ग काढणार्या नागरिकांशी बातचीत

  • 06 Jul 2022 11:20 AM (IST)

    Mumbai Rain update : पालिकेकडून पाण्याचं तात्काळ नियोजन

  • 06 Jul 2022 11:19 AM (IST)

    Mumbai rain update : पालिकेकडून हिंदमाता परिसरातील पाण्याची विल्हेवाट

  • 06 Jul 2022 11:17 AM (IST)

    maharashtra rain update : झरी तालुक्यातील लिंगती येथील पर्यायी पूल गेला वाहून

    झरी तालुक्यातील वणी पाटण बोरी मार्गावरील लिंगती येथील पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूला गिट्टी मुरूम टाकून छोटा पुल बनवण्यात आला होता.मात्र झरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे उभा केलेला पूल वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.मात्र पूल नसल्याने पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो मार्ग बंद करण्यात आला आहे.व आजूबाजूच्या खेड्यापाड्याचा संपर्क तुटला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासन काय पर्यायी व्यवस्था करतील याकडे लोकांचे लक्ष लागले आहे……
  • 06 Jul 2022 11:15 AM (IST)

    mumbai rai update : माटुंगा परिसरात पावसाला सुरूवात

    1. माटुंगा परिसरात पावसाला सुरूवात, माटुंग्याच्या पाच उद्यान परिसारात पाणी साचले साचलेल्या पाण्यातून वाहने चालविताना चालकांची सकरत

  • 06 Jul 2022 10:41 AM (IST)

    mumbai rain update : बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत

  • 06 Jul 2022 10:40 AM (IST)

    kokan rain update : कणकवली-नरडवे रस्त्यावर झाड कोसळले,

    कणकवली-नरडवे रस्त्यावर झाड कोसळले.वाहतूक विस्कळीत. एकेरी वाहतूक सुरू. कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी पडलेले झाड तोडून रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या घराबाहेरील रस्त्यावर हे झाड पडले आहे.

  • 06 Jul 2022 10:36 AM (IST)

    virar rain update : विरारमध्ये गुडघाभर पाणी साचले

    विरार पश्चिम स्टेशन ते बोलींज रस्त्या गुडगाभर पाण्याखाली गेला आहे..

    बोलींज रस्त्या लागत च्या सोसायटी मध्ये ही शिरले पाणी

    रस्त्यावर वाहन बंद पडत असल्याने अनेक नागरिक ट्रेकटर मधून प्रवास करीत आहेत…

    पावसाची उघडझाप सुरू असतानाही वसई विरार नालासुआरा मधील पाणी ओसारण्याचे नाव घेत नसल्याने नागरिक हैराण

  • 06 Jul 2022 10:35 AM (IST)

    Mumbai Rain Update : मुंबईसह उपनगरातील अनेक भागात पुन्हा एकदा मान्सूनने दणका दिला आहे,

    मुंबईसह उपनगरातील अनेक भागात पुन्हा एकदा मान्सूनने दणका दिला आहे,

    बांद्रा, अंधेरी, बोरीवली सह उपनगरातील अनेक भागात पुन्हा एकदा मूसलाधार पाऊस पडत आहे,

    अंधेरी सबवे येथे तुम्ही पाहू शकता किती मुसळधार पाऊस पडत आहे, सबवे मध्ये आणि रस्त्यावर पाणी साचू लागले आहे,

    हवामानाचा रंगही बदलला आहे, आणि रस्त्यावरून जाणारे वाहन हळू-हळू चालत आहे, वाहनांचे लाईट लावून भुयारी मार्गावरून गाड्या धावताना दिसत आहे.

    आता हा पाऊस असाच पडत राहणार की थांबणार हे पाहावं लागेल.

  • 06 Jul 2022 10:22 AM (IST)

    मुसळधार पावसानंतर दादरमधील सखल भागात पाणी साचलं

  • 06 Jul 2022 10:18 AM (IST)

    Mumbai rain Update : मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, पावसामुळे पाणी साचायला सुरूवात झाली

  • 06 Jul 2022 10:13 AM (IST)

    Chandoli dam rain update : चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी…

    सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.3 मि. मी. पावसाची नोंद. तर चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार आहे.

  • 06 Jul 2022 10:07 AM (IST)

    pune rain update : पुणे शहराला तीने महिने पुरेल इतका पाणीसाठा

    खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु

    यामुळे या धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरवात

    गेल्या तीन दिवसांत या सर्व धरणांत मिळून पुणे शहराला आणखी किमान तीन महिने पुरेल इतकी पाणीसाठ्यात वाढ

    यामुळे पुणेकरांच्या डोक्यावरील पाणी कपातीची टांगती तलवार आता दूर होण्याची शक्यता

  • 06 Jul 2022 09:56 AM (IST)

    kalyan rain update : कालपासून कल्याणमध्ये मुसळधार पाऊस

    कल्याण डोंबिवलीत पावसाची रिपरिप, अधून मधून जोरदार पावसाच्या सरी
    कल्याण डोंबिवलीत सलग तिसऱ्या दिवशी रिप रिप पाऊस  सुरू अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत . मध्ये मध्ये पाऊस विश्रांती घेत असल्याने कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक सखोल ठिकाणी साचलेले पाणी ओसरले आहे मात्र पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा सखल  भागात पाणी साचण्याची शक्यता आहे या पार्शवभूमीवर पालिका देखील सतर्क झाली आहे
  • 06 Jul 2022 09:53 AM (IST)

    Mumbai Rain Update : सध्याच्या स्थितीत मुंबईतील बसचे मार्ग कशापध्दतीने आहेत जाणून घ्या…

  • 06 Jul 2022 09:49 AM (IST)

    Navi Mumbai Rain Update : नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात, जुईनगरच्या सबवेमध्ये साचलं पाणी

    नवी मुंबई मध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसास सुरुवात

    जुईनगरच्या सबवेमध्ये साचलं पाणी

  • 06 Jul 2022 09:48 AM (IST)

    gadchilroli rain update : गडचिरोली जिल्ह्यात दोन धरणाचे दरवाजे आज उघाडण्यात आले

    गडचिरोली जिल्ह्यात दोन धरणाचे दरवाजे आज उघाडण्यात आले

    महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 88 पैकी 30 दरवाजे सोडण्यात आले असून 1964 क्युमेक्स (16350 क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग या धरणातून होत आहे

    गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसाच्या नोंद मध्ये 13.00 मिमी पावसाची नोंद झाली

    सध्या गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नाही

    गडचिरोली येथील चिचडोह बॅरेजचे ही 38 पैकी 38 दरवाजे दीड फुटांनी उघडले असून त्यातून 1244 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे

  • 06 Jul 2022 09:47 AM (IST)

    mumbai rain update : दक्षिण मध्य मुंबईत पावसाचा जोर वाढला, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी

    दक्षिण मध्य मुंबईत पावसाचा जोर वाढला

    वरळीहून लोअर परेल महालक्ष्मी कडे जाणार्या मार्गावर वाहतूक कोंडी

    रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांची तारांबळ

  • 06 Jul 2022 09:43 AM (IST)

    kokan rain update : कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे


    कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. हवामान विभागांना रेड अलर्ट जारी केलाय. पण सध्या पाऊस सरींवरती बर असताना दिसून येतोय. ज्या ठिकाणी पाणी शिरलं होतं किंवा तुंबलं होतं  ते आता हळूहळू उतरायला सुरुवात झाली आहे. पण एकंदरीत समुद्र किनारपट्टीच्या काही भागांमध्ये  वाऱ्याचा वेग वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणं आहे. अर्थात तिन्ही जिल्ह्यांचा विचार केल्यास  ज्या काही प्रमुख नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत होत्या  त्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील घट झाली आहे. सुदैवानं कोणत्याही मोठ्या दुर्घटना आतापर्यंत घडलेल्या नाहीत. नागरिकांना स्थलांतर करणे त्यांना सूचना देणे सर्व कर्ज काम सुद्धा प्रशासनाकडून केले जात आहे. कोकणातला गेल्यावर्षीचा अनुभव पाहता  एन डी आर एफ च्या टीम देखील तैनात करण्यात आले आहेत.

  • 06 Jul 2022 09:42 AM (IST)

    lonavala rain update : मागच्या चोवीस तासात लोणावळ्यात मुसळधार पाऊस

    -लोणावळ्यात गेल्या 24 तासात 166 मिमी पावसाची नोंद झालीय

    -गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय

    -लोणावळा परिसरात ह्यावर्षी आतापर्यंत 581 मिमी पावसाची नोंद झालीय जी गेल्या वर्षीच्या तुलनेत फारच कमी आहे, गेल्या वर्षी याच वेळेस एकूण 1 हजार 105 मिमी पावसाची नोंद झाली होती

  • 06 Jul 2022 09:36 AM (IST)

    pune rain update : काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने मावळात जोरदार आगमन केल आहे.

    -काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने मावळात जोरदार आगमन केल आहे.

    -पाऊस नसल्याने शेतकरी राजा चिंतेत होता. परंतु आता दमदार पावसाने भाताची शेती ला जीवदान मिळणार आहे,आंदर मावळच्या पश्चिम पट्टयात पावसाची जोरदार सुरवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

    -जोरदार पावसामूळे शेताच्या खाचरात पाणी साचले असून लवकरच भाताच्या पिकाला बहार येणार आहे..मावळात 13500 हेक्टरवर भात शेती केली जाते..त्यामुळेच मावळला भाताचे आगार म्हंटल जाते..

  • 06 Jul 2022 09:31 AM (IST)

    Ratnagiri Kajli River Flood | रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला पण काजळी नदीला पूर

    पावसाचा सगळ्यात अधिक जोर रत्नागिरीत राहिला आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आल्याचं पाहायला मिळालं.

  • 06 Jul 2022 09:29 AM (IST)

    gadchiroli rain update : गडचिरोलीत मुसळधार पाऊस

    गडचिरोली जिल्हा मुख्यालय इंद्रा वार्डात राञी आलेल्या पावसामुळे  रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी दोन ते तीन मार्गावर जमा झाले
    नगर परिषद गडचिरोली कडून नाल्या साफ न करण्यात आल्यामुळे हे पाणी जमा होऊन पहिल्याच पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे
    सिरोंचा येथे काल रात्री झालेल्या पावसामुळे परिसराच्या समोर तलावा सारखा दृश्‍य तयार झाले
    सध्या पाऊस रिमझिम सुरू आहे
  • 06 Jul 2022 09:25 AM (IST)

    Mumbai rain update : मुंबईत मागच्या चोवीस तासात झाली मुसळधार पावसाची नोंद

  • 06 Jul 2022 09:16 AM (IST)

    Satara Rain Update : सातारा प्रतापगड रस्त्यावर दरड कोसळली, प्रतापगडकडे जाणारी सर्व वाहतूक बंद

    1. सातारा प्रतापगड रस्त्यावर दरड कोसळली…
    2. दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रतापगड येथील अफजलखान कबरी जवळ असणाऱ्या वळणावर दरड कोसळली
    3. प्रतापगड कडे जाणारी सर्व वाहतूक बंद

  • 06 Jul 2022 09:15 AM (IST)

    Mumbai Rain Update : मुंबई शहर व उपनगरात जोरदार पावसाची शक्यता

  • 06 Jul 2022 09:05 AM (IST)

    mumbai rain update : मुंबईत आज सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली

  • 06 Jul 2022 09:00 AM (IST)

    Palghar NDRF Team | पालघरमध्ये रात्री उशिरा दाखल झालं NDRF चं पथक

    पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सगळीकडे पाणीचं पाणी आहे

  • 06 Jul 2022 08:58 AM (IST)

    Sidhudurg rain update : जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफ पथकाची मागणी

    जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफ पथकाची मागणी. सिंधुदुर्गात आज एनडीआरएफ ची तुकडी दाखल होऊ शकते. हवामान विभागाने जिल्ह्यात आणखी 3 दिवस मुसळधार पावसाचा ईशारा दिला असल्यामुळें खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ पथकाची मागणी केली आहे.

  • 06 Jul 2022 08:57 AM (IST)

    Navi Mumbai : नवी मुंबईतील शिरवणे भुयारी मार्गत साचलं पाणी

    नवी मुंबईतील शिरवणे भुयारी मार्गत साचलं पाणी

    त्यामुळे नागरिकांना जुईनगर व शिरवणे गाव येथे जायचे असेल तर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो आहे

    भुयारी मार्गात पाणीच साचल्याने दुचाकी वाहन बंद पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे

  • 06 Jul 2022 08:57 AM (IST)

    mumbai pune expressway : मुसळधार पावसाने पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील बोरघाट धुक्यात हरवला

    1. -मुसळधार पावसाने पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील बोरघाट धुक्यात हरवला
    2. -त्यामुळे या द्रुतगती मार्गावर वाहन चालविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे
    3. -लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे तर पाऊस थांबल्यावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धुके पसरत होते
  • 06 Jul 2022 08:56 AM (IST)

    mumbai rain update दोन दिवसांच्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांना पडले खड्डे

    1. मुंबईत दोन दिवस झालेला मुसळाधार पावसामुळे पश्चिम दुती महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे साम्राज पसरल्याचा पाहायला मिळत आहे,,,
    2. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले या ठिकाणी रस्त्यावर दोन ते अडीच फुटाचा मोठा प्रमाणात खड्डा झाला आहे,,
    3. पश्चिम दुती महामार्गावर भरधाव वेगाने गाड्या जातात मात्र या खड्ड्यात पावसामध्ये पाणी भरल्यामुळे वाहन चालकांचा अपघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता आहे,,
  • 06 Jul 2022 08:54 AM (IST)

    Mumbai Rain Update | मुंबईत काही तासांपासून पावसाची विश्रांती

    मुंबईत काही तासांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे

    अनेक ठिकाणी ढगाळवातावरण आहे

  • 06 Jul 2022 08:50 AM (IST)

    Kolhapur | कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ, पाणी पात्राबाहेर

    कालपासून कोल्हापूरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीला पाणी पात्रात अधिक वाढ झाली आहे. काल रात्री उशिरा एनडीआरएफची एक टीम कोल्हापूरात दाखल झाली आहे.

  • 06 Jul 2022 08:45 AM (IST)

    Ratnagiri Parshuram Ghat | परशुराम घाट जड वाहनांसाठी आठ दिवस बंद, प्रशासनाने जारी केले आदेश

    रत्नागिरीच्या परशुराम घाटात मुसळधार पाऊस

    घाट आठ दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे.

    c

  • 06 Jul 2022 08:42 AM (IST)

    Lonavala Rain Update : लोणावळ्यात गेल्या 24 तासात 166 मिमी पावसाची नोंद

    -लोणावळ्यात गेल्या 24 तासात 166 मिमी पावसाची नोंद झालीय

    -गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय

    -लोणावळा परिसरात ह्यावर्षी आतापर्यंत 581 मिमी पावसाची नोंद झालीय जी गेल्या वर्षीच्या तुलनेत फारच कमी आहे, गेल्या वर्षी याच वेळेस एकूण 1 हजार 105 मिमी पावसाची नोंद झाली होती

  • 06 Jul 2022 08:41 AM (IST)

    ratnagiri : जिल्ह्यात पहाटे नंतर पावसाची विश्रांती

    रत्नगिरी,- जिल्ह्यात पहाटे नंतर पावसाची विश्रांती

    काजळी नदीचं दुथडी भरून

    नऊ तारखेपर्यंत जिल्ह्याला रेडअलर्ट

    राजापूर मधील अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली

    सध्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे प्रशासनासाठी चिंतेची बाब नाही

  • 06 Jul 2022 08:41 AM (IST)

    ratnagiri rain update : रत्नागिरीत मुसळधार पाऊस

    गेल्या दोन ते तीन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत असताना रत्नागिरीतील काजळी नदीच्या पुराचा फटका मठ येथील देवस्थानाला बसला असून हे देवस्थान गेले तीन दिवस पाण्यात आहे. लांजा मठ येथील मंदिर हे स्वयंभु दत्तमंदिर असून ते भाविकांचे श्रद्धास्थान आहे सध्यस्तिथीत अर्धा मंदीराचा भाग हा पाण्यात बुडालेला आहे. पाऊस जर असाच पडत राहिला तर मंदिराच्या कळसापर्यंत हे पाणी पोहचेल असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या दत्तमंदीरात अनेक ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येथे येत असतात परंतु गेल्या तीन दिवसापासून हे मंदीर पाण्यात असल्यामुळे भाविकांना येथे येण्यास बंदी केली असल्याचे समजते.आता हे पुराचे पाणी कधी ओसारतेय याकडे भाविकांचे व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

  • 06 Jul 2022 08:38 AM (IST)

    amravati rain update : भातकुली तालुक्यातील सावरखेड गावचा संपर्क तुटला

    अमरावती ४ जुलैच्या मध्यरात्री मुसळधार पावसाने  हजेरी लावली. परिणामी नदी नाले ओसंडून वाहू लागले.यात पेढी नदीला पूर आल्याने पेढी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे भातकुली तालुक्यातील सावरखेड गावचा संपर्क तुटला आहे.पुलावरून पाणी वाहत आहे.त्यामुळे येण्याजण्याचा मार्ग बंद झाला असल्याने सावरखेड ची वाहतूक थांबली आहे.

  • 06 Jul 2022 08:28 AM (IST)

    palghar rain update : पालघरमध्ये रात्री 12 वाजता  NDRF ची टीम दाखल,

    पालघरमध्ये  रात्री 12 वाजता  NDRF ची टीम दाखल,

    जिल्हा प्रशाशनाकडून मागवण्यात आली  NDRF ची  टीम

    जिल्ह्यात  मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशाशन अलर्ट

  • 06 Jul 2022 08:13 AM (IST)

    nalasopara rain update : रात्रभर पडलेल्या पावसाने नालासोपारा जलमय

    रात्रभर पडलेल्या पावसाने नालासोपारा जलमय नालासोपाऱ्यात सेन्ट्रलपार्क, स्टेशन रोड, ओसवाल नगरी, तुलिंज रोड

  • 06 Jul 2022 08:07 AM (IST)

    buldhana raun update : पुरात जीव वाचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलीस प्रशासनाने केली रंगीत तालीम

    सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येऊन यामध्ये पुरात वाहून अनेक प्रकाराची जीवित हानी होण्याच्या घटना घडत असतात… यावर मात करण्यासाठी जिल्हा पोलीस विभागामार्फत बुलडाणा चिखली रस्त्यावरील पैनगंगा नदी पात्रात आपत्तीग्रस्त नागरिकांसह पशूंचे जीव वाचवण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आलीय.., आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विविध सूचना ही देण्यात आलीय .. यामध्ये जिल्हा आपत्ती विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासनाचे अधिकारी सह कर्मचारी उपस्थित होते…
  • 06 Jul 2022 08:05 AM (IST)

    maharashtra rain update : गोंदिया जिल्ह्यात चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद

    गोंदिया जिल्ह्यात आतापर्यत्न पडलेल्या पावसाचा अहवाल आला असून गोंदिया जिल्हातिल तिरोडा, गोरेगाव आणि सडक-अर्जुनी आणि गोंदिया चार अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक 150.7 मिमी पावसाची नोंद सडक अर्जुनी तालुक्यात झाली आहे. तिरोडा तालुक्यात 140 मिमी आणि गोरेगाव तालुक्यात 106 व गोंदिया तालुक्यात 81 .4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचे संकेत मिळाल्याने गोंदिया जिल्हा प्रशासन अलर्ट मोड़ वर आहे….

  • 06 Jul 2022 08:04 AM (IST)

    maharashtra rain update : चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण 83 मिलिमीटर पावसाची नोंद

    खेड सह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेला चासकमान धरणात अवघ्या 6.65% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भीमाशंकर अभयारण्य परिसरात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने भीमा नदी प्रवाहित झाली आहे या धरणामुळे खेड तालुक्यासह शिरूर तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण 83 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे परिसरामध्ये हलक्या सरी पडत असल्याने भीमा नदी प्रवाहित झाली असून मोठा पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होणार आहे

  • 06 Jul 2022 08:02 AM (IST)

    kolhapur rain update : पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली तीस फुटांवर

    पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली तीस फुटांवर

    काल दिवसभरात पाणी पातळीत सहा फुटांची वाट

    जिल्ह्यातील 25 बंधारे पाण्याखाली

    पावसाने उसंत घेतल्याने काहीसा दिलासा

    एनडीआरएफच्या दोन टीम रात्री उशिरा कोल्हापुरात दाखल

  • 06 Jul 2022 08:01 AM (IST)

    pune rain update : फडके बंधारा यंदा पहिल्याच पावसात तुडुंब भरून ओसंडून वाहू लागला आहे

    पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील घाटघर नाणेघाट येथे ब्रिटिशकालीन पद्धतीने बांधण्यात आलेला फडके बंधारा यंदा पहिल्याच पावसात तुडुंब भरून ओसंडून वाहू लागला आहे.स्थानिक खासदार आमदार यांच्या प्रयत्नातून जलसंधारण योजनेतून या बंधाऱ्याची नुकतीच पुनर्बांधणी करण्यात आली होती आणि यानंतर पहिल्याच पावसात हा बंधारा ओसंडून वाहू लागला आहे,या बंधाऱ्याचां आदिसी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

  • 06 Jul 2022 07:53 AM (IST)

    maharashtra rain update : राज्यातील धरणांमध्ये सध्या २३ टक्के पाणीसाठा

    – पावसामुळे राज्यातील धरणांमधील जलसाठा वाढण्यास सुरुवात

    – चार दिवसांतल्या पावसाने राज्यातील धरणांमध्ये सरासरी २ टक्के पाणीसाठा वाढला

    – राज्यातील धरणांमध्ये सध्या २३ टक्के पाणीसाठा

    – ४ दिवसातल्या पावसाने कोकण विभागातील धरणातील पाणीसाठा ४ टक्के वाढला

    – जून महिन्यात पावसानं दांडी मारल्याने अनेक धरणातील पाणीसाठा कमी झाला होता

    – आता मुसळाधार पावसाने राज्यातील राज्यातील अनेक भागात धरणातील पाणीसाठा वाढायला सुरुवात

  • 06 Jul 2022 07:50 AM (IST)

    Ratnagiri rain update : सुरक्षेच्या दृष्ट्रीने पर्शुराम घाट बंद,

    रत्नागिरी- सुरक्षेच्या दृष्ट्रीने पर्शुराम घाट बंद करण्यात आला आहे. काल पर्शुराम घाटातील वाहतुक झाली होती सुरु,  घाटातील नवीन रस्त्याला तडे गेले आहेत. सततच्या पावसाने चौपदरीकरणाच्या रुंदीकणाच्या कामाला फटका. सुरक्षेसाठी वाहतुक आज देखिल सकाळपासून बंदअवजड वाहतुकीला घाटात बंदी त्यामुळे अवजड वाहनांच्या रांगा

  • 06 Jul 2022 07:44 AM (IST)

    pune rain update : हवामान खात्याने दिला पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

    हवामान खात्याने दिला पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

    जिल्ह्यात 6 ते 9 जुलै या आगामी चार दिवस 50 मिमीपेक्षा जास्त म्हणजेच मुसळधारचा इशारा

    गेल्या चोवीस तासांत घाटमाथ्यासह पुणे शहर, पिंपरी -चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात चांगला पाऊस झाला

    त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यटनाला जाताना सावधानतेचा इशारा मंगळवारी दिला

    जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, गेल्या चोवीस तासांत सर्वच तालुक्यांत चांगला पाऊस

    आगामी चार दिवसांत 60 ते 99 मिमी पाऊस पडू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील पर्यटनाला जाताना सावधानतेचा इशारा दिला

    पुणे धरण पाऊस अपडेट धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर पाऊस सुरू खडकवासला 18 मिमी, पानशेत -68 मिमी, वरसगाव 70 मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात 65 मिमी पावसाची नोंद तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा 3.67 टीएमसी झाला आहे.

  • 06 Jul 2022 07:39 AM (IST)

    पावसाचा जोर असाच राहिल्यास पंचगंगा, कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता

    पावसाचा जोर असाच राहिल्यास पंचगंगा, कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता

  • 06 Jul 2022 07:01 AM (IST)

    Koyna Dam Rain Update : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची नोंद, धरणात 17.46 टीमसी पाणीसाठा

    कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊसाची नोंद कोयना धरणात 17.46 tmc पाणीसाठा झाला

    सकाळी 6 वाजेपर्यंत कोयनानगर 137 मिलिमीटर नवजा 197 मिलीमिटर महाबलेश्वर 155 मिलीमीटर वळवण 182 मिलीमिटर पाऊसाची नोंद झाली

  • 06 Jul 2022 06:56 AM (IST)

    Ambernath | अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराबाहेर नदीत फेस

    अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराबाहेर नदीत फेस

    मुसळधार पावसानंतर हा प्रकार घडला आहे

    नेमका कशामुळा हा प्रकार घडला आहे…हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही

  • 06 Jul 2022 06:53 AM (IST)

    Kokan rain update : चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरू

    चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. नद्यानाले दुथडी भरून वाहत आहेत. वाशिष्ठी नदीत पाणी पात्रात वाढ झाली आहे.

  • 06 Jul 2022 06:36 AM (IST)

    Maharashtra Nanded Rain Update : नांदेड मुसळधार पाऊस कायम, बळीराजा सुखावला

    नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही रात्रीच्या सुमारास वरूनराजाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय, धुळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळालाय. तर पावसाच्या प्रतीक्षेत थांबलेल्या शेतकरी आता पेरणीला सुरुवात करणार आहेत. सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे आता खऱ्या अर्थाने मॉन्सूनचे आगमन झाल्याचे सांगण्यात येतय.

  • 06 Jul 2022 06:35 AM (IST)

    pune rain update : टघर आणि नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

    पुणे जिल्ह्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पाहायला मिळतोय. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्यानं धरणाच्या पाणी पातळीने तळ घाटला होता. मात्र मागच्या दोन दिवसापासून पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरल्यानं धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागलीय. त्याचं बरोबर शेतात पेरणी केलेल्या भात आणि कडधान्य पिकांना पाऊस फायदेशीर ठरत असल्यानं शेतकरी आणि नागरिकांच्यात समाधानाचं वातावरणयं.

  • 06 Jul 2022 06:34 AM (IST)

    heavy rainfall in Mumbai : मुंबईतील मुसळधार पावसामुळे पवई तलाव काल संध्याकाळी ओसंडून वाहू लागला

    मुंबईतील मुसळधार पावसामुळे पवई तलाव काल संध्याकाळी ओसंडून वाहू लागला.

    #WATCH | Maharashtra: Due to heavy rainfall in Mumbai, Powai Lake started overflowing at 6.15 pm today.

    (Source: BMC PRO) pic.twitter.com/JSpetDsKpy

    — ANI (@ANI) July 5, 2022

  • 06 Jul 2022 06:30 AM (IST)

    Mumbai Rain Update : दहिसर तलावात बुडून दोघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडला

    मुंबईतील दहिसर परिसरात तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्यासाठी शोधमोहीम सुरू आहे:

    #WATCH | Maharashtra | Two people drowned after they went to take a bath in a pond in Mumbai’s Dahisar area. One of the bodies has been found and a search operation underway for the other: Mumbai Fire Brigade (MFB) pic.twitter.com/WIOs1tRZNk

    — ANI (@ANI) July 5, 2022

  • 06 Jul 2022 06:22 AM (IST)

    kokan rain update : मुसळधार पाऊस सुरू असताना अमित ठाकरे कोकणात

    सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राज ठाकरे यांचे मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान आज कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच सिंधुदुर्गात सकाळी धडकले. सावंतवाडी येथील मँगो हॉटेल सभागृहात श्री. अमित ठाकरे यांनी मनविसेत नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी मुक्त संवाद साधला आणि जिल्ह्यात मनविसे भक्कम कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर तिथेच त्यांनी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथील विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी यांच्याशी प्रत्येक तालुक्याबाबत चर्चा केली आणि लवकरच संघटनात्मक पुनर्बांधणी करून जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन रचना करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले.
    अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तिन्ही तालुक्यांतील शेकडो मनसे पदाधिकारी तसंच महाराष्ट्र सैनिक यांनी गर्दी केली होती. चांगलं शिक्षण घेऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण तरुणींना गोव्यात नोकरीसाठी जावं लागतं, सिंधुदुर्गात पुरेशा रोजगार संधी उपलब्ध नाहीत असा मुद्दा काही तरुणांनी अमित ठाकरे यांच्याशी चर्चा करताना मांडला. तर, येत्या काही महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात मनविसे कार्यकारिणी युनिट स्थापन करण्यात येईल, असा शब्द विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांना दिला.
  • 06 Jul 2022 06:19 AM (IST)

    akola rain update : अकोल्यात मुसळधार पावसाला सुरुवात

    अकोल्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. साधारण रात्री तीनच्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. तसेच शेतकऱ्यांमध्ये आनंद देखील पाहायला मिळत आहे.

  • 05 Jul 2022 10:54 PM (IST)

    काजुपाडा येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोटारसायकलचा अपघात, तरुणाने जीव गमावला

    घोडबंदर रोड काजुपाडा परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे एका तरुणाने आपला जीव गमावला आहे. खड्ड्यामुळे बाईकस्वाराचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसच्या चाकाखाली तो तरुण आला. या अपघातात तरुणाला जीव गमवावा लागला. या अपघाताची माहिती काशिमिरा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिलीय.

  • 05 Jul 2022 10:21 PM (IST)

    एनडीआरएफच्या 2 टीम कोल्हापुरात दाखल, पावसाचा जोर ओसरल्यानं काहीसा दिलासा

    कोल्हापुरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. मात्र, पावसाचा जोर आता काहीसा ओसरल्यानं जिल्हा प्रशासनाला आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. दरम्यान, पुराची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफच्या दोन टीम कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. यातील एक टीम कोल्हापूर तर दुसरी शिरोळ तालुक्यासाठी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. प्रत्येक टीममध्ये 25 जवानांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एनडीआरएफच्या जवानांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती दिली.

    Kolhapur NDRF

    कोल्हापुरात एनडीआरएफच्या दोन टीम दाखल

  • 05 Jul 2022 09:30 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात पावासाचा जोर वाढला; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    कोल्हापूर जिल्ह्यात पावासाचा जोर वाढला आहे. गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदी धोक्याची पातळीवर आहे. नदीकाठच्या गावांना जिल्हाधिकाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला आहे.  पावसामुळे चंदगड तालुक्यातील वीज गायब झाली आहे.

  • 05 Jul 2022 09:12 PM (IST)

    भारतीय हवामान खात्याकडून राज्यातील जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

    भारतीय हवामान खात्याकडून राज्यातील जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्य मंत्र्यालयाकडून स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

  • 05 Jul 2022 08:44 PM (IST)

    मुंबईत जोरदार पाऊस पडून जनजीवन विस्कळीत

    मुंबईत जोरदार पाऊस पडून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक पाणी साचल्याने तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांना वाट काढावी लागली. यामुळे नागरीकांची मोठी तारांबळ उडाली.

  • 05 Jul 2022 08:33 PM (IST)

    हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात; शेतकऱ्यांना काहीसा दिलासा

    हिंगोली-जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात

    पंधरा दिवसांच्या विश्रांती नंतर जोरदार पावसाला सुरुवात

    पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा

  • 05 Jul 2022 07:03 PM (IST)

    गडचिरोली- महाराष्ट्रात तेलंगणा सीमावर्ती भागात असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 88 पैकी 16 दरवाजे उघडले

    गडचिरोली- महाराष्ट्रात तेलंगणा सीमावर्ती भागात असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 88 पैकी 16 दरवाजे सोडण्यात आले आहेत. या मधून 1244 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. सध्या इंद्रावती प्राणहिता गोदावरी या तीन नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. चिवडा बॅरेज येथील 38 पैकी 38 दरवाजे दीड फूट आणि उघडलेले आहेत 587 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.

  • 05 Jul 2022 06:51 PM (IST)

    कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे परिसरात मुसळधार पाऊस पडतोय

    मुंबईसह उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे, तर दुसरीकडे मुंबईतील नदी-नालेही पाण्याने भरून वाहू लागले आहेत.

Published On - Jul 04,2022 7:35 PM

Follow us
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.