Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Nov 30, 2022 | 11:08 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

आज 19 नोव्हेंबर रोजी अनेक घडामोडी विशेषतः राजकारणात महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील 13वा दिवस आहे. ही यात्रा बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव ते भेंडवळपर्यंत जाणार आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. आजच्या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाणदेखील सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दोघांनाही डॉ.BAMU विद्यापीठात डी लिट पदवी दिली जाणार आहे. .

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Nov 2022 08:37 AM (IST)

    राज्यपाल भगतसिंह कौशारी यांच्या निषेधार्थ आज लातूर बंद

    लातूरमधीर बाजारपेठा बंद ठेवण्याचे शिवप्रेमींचे आवाहन

    राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवप्रेमींकडून निषेध

  • 19 Nov 2022 10:13 PM (IST)

    माजी खासदार संजय काकडे यांनी घेतली जे.पी.नड्डा यांची भेट

    – माजी खासदार संजय काकडे यांनी घेतली जे.पी.नड्डा यांची भेट,

    – भेटीत संजय काकडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयन्त,

    – संजय काकडे गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर,

    – शिवाय भाजप – मनसे युतीला काकडे यांनी केला होता विरोध,

    – जे.पी.नड्डा आणि संजय काकडे यांच्यात जवळपास 20 मिनिटं चर्चा,

    – चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून नड्डा यांनी काकडे यांना भेटीसाठी बोलवलं.

  • 19 Nov 2022 10:12 PM (IST)

    विक्रोळी पश्चिमेकडील रमनिक सोसायटीच्या बिल्डिंगला लागली आग

    विक्रोळी पश्चिमेकडील रमनिक सोसायटीच्या बिल्डिंगला लागली आग

    बिल्डींगच्या वरील मोबाईल टाॅवरने अचानक घेतला पेट

    फायर ब्रिगेडच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल

    फायर ब्रिगेडच्या अधिकार्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू

    इमारतिच्या रहिवाश्यांना फायर ब्रिगेडच्या जवानांनी सुखरूप काढलं बाहेर

    अद्याप कोणतीही जीवीत हानी नाही

  • 19 Nov 2022 07:49 PM (IST)

    एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ

    Marathi News LIVE Update

    एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ

    नांदेडमध्ये खडसेंविरोधात गुन्हा दाखल

    बंजारा समाजाविरोधात केलं होतं आक्षेपार्ह विधान

    विधानानंतर खडसेंनी मागितली होती माफी

    विधानाचा विपर्यास केल्याचा केला होता दावा

  • 19 Nov 2022 07:38 PM (IST)

    राज्यपालांच्या वक्तव्याविरुद्ध सर्वांनी रस्त्यावर उतरायला हवं

    Marathi News LIVE Update

    राज्यपालांच्या वक्तव्याविरुद्ध सर्वांनी रस्त्यावर उतरायला हवं

    संजय राऊत यांचा हल्लाबोल

    राज्यपालांना काय झालं हेच कळत नाही

    राज्यपालांकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्य

    छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यापालांच्या वक्तव्यावर केली टिका

  • 19 Nov 2022 07:09 PM (IST)

    तरुणांच्या शिक्षणाला राज्य सरकारचे बळ

    Marathi News LIVE Update तरुणांच्या शिक्षणाला राज्य सरकारचे बळ

    स्वधार योजनेच्या माध्यमातून युवकांना मदत

    शिक्षण, राहणे-खाण्यासह इतर खर्चासाठी आर्थिक तरतूद

    महाराष्ट्र सरकार देते 51 हजार रुपयांचे मानधन

  • 19 Nov 2022 06:17 PM (IST)

    गौतम नवलखांना घरी नजरकैदत ठेवणार

    Marathi News LIVE Update

    गौतम नवलखांना घरी नजरकैदत ठेवणार

    भीमा कोरेगाव, एल्गार परिषद प्रकरण

    नवलखांची तळोजो जेलमधून सूटका

    नवी मुंबई पोलीस ठेवणार लक्ष

  • 19 Nov 2022 06:14 PM (IST)

    थंडीची एंट्री होताच, खाद्यतेल महागले

    Marathi News LIVE Update

    थंडीची एंट्री होताच, खाद्यतेल महागले

    सोयाबीन, मोहरीच्या तेलाने खाल्ला भाव

    पामोलिन तेल आणि सीपीओचे दर कमी झाल्याने मागणी वाढली

    2021-22 मध्ये खाद्यतेलाची प्रचंड आयात

    यंदा देशात 1 कोटी 41 लाख टनाहून अधिक खाद्यतेलाची आयात

  • 19 Nov 2022 05:24 PM (IST)

    भारत लवकरच होणार महासत्ता

    Marathi News LIVE Update

    भारत लवकरच होणार महासत्ता

    2030 मध्ये तिसरी अर्थसत्ता होणार

    तर 2050 मध्ये भारत जगातील दुसरी अर्थसत्ता असेल

    जगातील तिसरी श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचा दावा

    मुंबईतील वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाऊंटेंट्स 2022 मध्ये केले वक्तव्य

  • 19 Nov 2022 04:53 PM (IST)

    महिला सशक्तीकरणासाठी स्त्री शक्ती योजना

    Marathi News LIVE Update

    महिला सशक्तीकरणासाठी स्त्री शक्ती योजना

    महिला उद्योजिकांना मिळणार स्वस्तात कर्ज

    5 लाखांपर्यंतच्या कर्जांसाठी तारण ठेवण्याची गरज नाही

    25 लाखांपर्यंतचे मिळेल कर्ज, महिलांसाठी मोठी संधी

  • 19 Nov 2022 04:41 PM (IST)

    सावकरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांसोबत राहणार का?

    Marathi News LIVE Update

    सावकरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांसोबत राहणार का?

    ठाकरे गट शिवसेनासोबत राहणार का ते स्पष्ट करा

    केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा सवाल

    आदित्य ठाकरे यांना दानवे यांनी विचारला प्रश्न

  • 19 Nov 2022 03:48 PM (IST)

    राहुल गांधींच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची

    Marathi News LIVE Update

    राहुल गांधींच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची

    मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे मोठे वक्तव्य

    भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशाच्या दिशेने

    यात्रा इंदूर येथे आल्यावर बॉम्ब स्फोट करण्याची धमकी

    धमकीचे पत्र आल्याने उडाली होती एकच खळबळ

    या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान

  • 19 Nov 2022 02:44 PM (IST)

    भंडाऱ्यात धान मळणी करताना ट्रॅक्टर इंजिन गरम होऊन आग लागली, ट्रॅक्टर पूर्णतः जाळून खाक

    भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील वलनी शेतशिवारात घडली घटना

    देवराव खोब्रागडे यांचे सुमारे 6 लाखांचे तर शेतकरी मेश्राम यांचे धान पूंजने जळाल्याने 50 हजारांचे नुकसान झाले

    यापूर्वी 12 नोव्हेंबरला लाखांदूर तालुक्यातील रोहनी येथे धान मळणी करताना ट्रॅक्टर आणि मशीन जाळून खाक झाल्याची घटना घडली होती

  • 19 Nov 2022 01:23 PM (IST)

    गोव्यात फेरबदलाचे वारे, राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल

    काँग्रेसमधील 8 फुटीर आमदारांपैकी दोन जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार

    माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा या दोघांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता

    इतर फुटीर आमदारांना महामंडळांवर नियुक्त केलं जाणार

    दिल्ली हाय कमांडकडून मंत्रिमंडळ फेररचनेला हिरवा कंदील, सूत्रांची माहिती

    मुख्यमंत्री प्रमोद सावंत लवकरच मंत्रिमंडळ बदलाबाबत घोषणा करणार

  • 19 Nov 2022 12:31 PM (IST)

    हिंदू महासभा आणि मुस्लीम लीगने स्वातंत्र्य मिळू नये आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर काय केले हे आधी वाचा; नाना पटोले यांची टीका

    पंडित नेहरू दूरदृष्टी देणारे नेते होते

    सावरकर यांच्याबद्दल अपशब्द किंवा खालची टीका केली नाही

    माफीचे पत्र आणि पेन्शन त्यांना मिळाली होती हा मुद्दा आहे, यावर उत्तर द्या

    उत्तर देण्यापेक्षा कोणावर खालच्या पातळीवर टीका करतात ही त्यांची मानसिकता

    6 मोठ्या रॅली महाराष्ट्रात होतील, त्यामध्ये राहुल, प्रियंका आणि सोनिया गांधीही उपस्थित राहतील

  • 19 Nov 2022 11:32 AM (IST)

    मद्यधुंद चालकाचा नाशकात थरार

    मद्यधुंद चालकाने वेगाने गाडी चालवत रस्त्यावरील अनेक गाड्यांना दिली धडक

    तर काही पादचाऱ्यांनाही उडवलं, 3 ते 4 जण जखमी

    जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर

    धक्कादायक बाब म्हणजे मद्यधुंद कार चालक शिक्षक असल्याचं आलं समोर

  • 19 Nov 2022 10:55 AM (IST)

    अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

    उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा बाजार मांडला आहे

    महाविकास आघाडीत समन्वय नाही. त्यामुळे ते मध्यावधी निवडणुकीबाबत बोलत आहेत

    बाळासाहेबांनी सांगितलं होतं की, शिवसेनेचा बाजार मांडणार नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी बाजार मांडलाय

    त्यामुळे मूळचा शिवसैनिक हा एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा आहे.

  • 19 Nov 2022 10:17 AM (IST)

    आज रात्री 11 वाजल्यापासून ठाण्यातील कोपरी ब्रिज उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार

    गर्डर टाकण्यासाठी कोपरी पुलावर लावल्या मोठ्या क्रेन

    कोपरी पुलावर 7 गर्डर टाकले जाणार. एका गार्डरचं वजन 110 टन आहे

  • 19 Nov 2022 09:37 AM (IST)

    सातारा जिल्ह्यातील कराड कोपर्डे हवेली येथे शेतकरी आक्रमक, ऊसाने भरलेल्या वाहनांची हवा सोडली

    काल रात्री ऊस दर संघर्ष समितीच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

    कराड तालुक्यात ऊस आंदोलनाचा जोर

    ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या टायरची हवा काढल्याने वाहने रस्त्यात उभी

    ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

  • 19 Nov 2022 09:05 AM (IST)

    नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा

    7 डिसेंबर पासून सुरू होणार हिवाळी अधिवेशन

    29 डिसेंबर पर्यंत चालणार हिवाळी अधिवेशन

  • 19 Nov 2022 08:48 AM (IST)

    खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण

    खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात जलील यांच्यावर पैशांची उधळण

    कव्वालीच्या कार्यक्रमांमध्ये खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या मुलावर पैशाचा पाऊस

    एमआयएमच्या खासदारांवर पैशांच्या उधळणीवरून विरोधकांची टीका

    एमआयएमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर देखील पैशांची उधळण

  • 19 Nov 2022 08:46 AM (IST)

    शरद पवार अध्यक्ष असलेल्या बरखास्त कुस्तीगीर संघाला भारतीय कुस्ती संघाचा मोठा झटका

    35 जिल्हा संघांनी अध्यक्ष बृजभुषण सिंहांना दिलं पत्र

    आम्ही बाळासाहेब लांडगे भरवत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार नाही

    भारतीय कुस्ती महासंघ आणि रामदास तडस गटाकडून पुण्यात होत असलेल्या स्पर्धेत सहभागी होऊ

    बाळासाहेब लांडगेंना जिल्हा संघाचा मोठा झटका

    35 जिल्ह्यांनी अध्यक्ष बृजभुषण सिंहांना दिलेली पत्र टीव्ही 9 च्या हाती

    महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोण भरवणार वाद टोकाला

  • 19 Nov 2022 08:26 AM (IST)

    मुंबई हायकोर्टाने BMC ला फटकारले

    मुंबईतले रस्ते चालण्यायोग्य नसल्याचे कोर्टाचे म्हणणे

    154 वर्ष जुना कर्नाक पूल पडणार

    फेरीवाला धोरणावरून हायकोर्टाने ताशेरे ओढले

  • 19 Nov 2022 07:53 AM (IST)

    मुंबई गोवा महामार्गावर आलिशान चारचाकीत संजय कार्लेचा मृतदेह आढळला

    संजय हा मूळचा पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे

    सोन्याची बनावट नाणी विकून तो अनेकांची फसवणूक करायचा

    त्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्यानं त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता.

    तो पोलिसांच्या अटकेतही होता.

    सहा महिन्यांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता.

  • 19 Nov 2022 07:51 AM (IST)

    नाशिक – FDA ची शहरात मोठी कारवाई

    53 औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द

    शासन कायद्याचे सर्रास उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

    कोरोना नंतरच्या काळात 256 परवाने निलंबित करण्यात आले आहेत

    प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध देणं, दुकानात फार्मसिस्ट नसणे अशा होत्या तक्रारी

  • 19 Nov 2022 07:49 AM (IST)

    शरद पवार आणि नितीन गडकरी आज औरंगाबाद दौऱ्यावर

    डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राहणार उपस्थित

    शरद पवार आणि नितीन गडकरी या दोघांनाही दिली जाणार डी लिट ही पदवी

Published On - Nov 19,2022 7:46 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.