Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज दिनांक 2 नोव्हेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. ऑक्टोबर महिन्यात विक्रमी जीएसटीचे संकलन झाले आहे. जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा समावेश हा पहिल्या पाच राज्यात आहे. ऑक्टोबर महिन्यात तब्बल1.52 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. दिवाळीमुळे या महिन्यात विक्रमी जीएसटी कराची प्राप्ती झाली असून, सरकारसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. जाणून घेऊयात दिवसभरातील इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी.