Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 02, 2022 | 7:31 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज गुरुवार, 1 डिसेंबर 2022. आज गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडेल. 19 जिल्हे आणि 89 विधानसभा जागांसाठी गुजरातमध्ये एकूण 788 उमेदवार रिंगणात आहेत. आज पहिल्या टप्प्यात नेमकं किती मतदान पार पडतं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. या सोबत श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आज काय खुलासे होतात, याचाही आढावा घेणार आहोत. महाराष्ट्रासह देशातील प्रमुख शहरांमधील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या अपडेट्स, ब्रेकिंग न्यूजचा आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Dec 2022 08:20 PM (IST)

    राज्यपाल हटाव मोहिमेला यश?

    Marathi News LIVE Update

    राज्यपाल हटाव मोहिमेला यश?

    राज्यपाल कोश्यारींना बदलण्याच्या हालचाली-सूत्र

    हिवाळी अधिवेशनापूर्वीच राज्यपाल बदलणार

    याच महिन्यात राज्यपाल पदी बदल करण्यात येणार-सूत्र

  • 01 Dec 2022 06:51 PM (IST)

    वसई तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी

    वसई तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. 28 ते 2 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ असून आज आणि उध्या दोन दिवसात ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 5 वाजेपर्यंत वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे आज दिवसभरात उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी केली होती.

    वसई तालुक्यातील पारोळ, राणगाव, तरखड आकटन, टेम्भी कोल्हापूर, तिल्हेर, टीवरी, टोकरे खैरपाडा, कळंब, करंजोन, खार्डी डोलीव, खोचिवडे, माजीपाडा, नागले, पणजु, वासळई, या ग्रामपंचायत ची निवडणूक होत आहे.

  • 01 Dec 2022 06:21 PM (IST)

    बेळगाव सीमा प्रश्नाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

    नवी दिल्ली :

    बेळगाव सीमा प्रश्नाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

    उद्याही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार नाही

    पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता

  • 01 Dec 2022 06:21 PM (IST)

    सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर

    Marathi News LIVE Update बेळगाव सीमप्रश्नी पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता

    सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर

    बेळगाव सीमाप्रश्नी उद्या सुनावणी होणार नाही

    आता पुढील आठवड्यात होईल सुनावणी

  • 01 Dec 2022 06:21 PM (IST)

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन वाघांचे आढळले मृतदेह

    चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन वाघांचे आढळले मृतदेह,

    मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी कक्ष क्रमांक 189 मध्ये सहा महिन्याचा मादी बछडा मृतावस्थेत आढळला,

    अन्य नर वाघाच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज,

    दुसऱ्या घटनेत बफर क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रातील वासेरा गट क्रमांक 185 मध्ये 14 ते 15 वर्ष वयाच्या वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे उघड,

    गस्तीदरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळला मृतदेह

  • 01 Dec 2022 06:13 PM (IST)

    गायरान जमीनीवरील शासकीय अतिक्रमण काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसीला उच्च न्यायालयाची स्थगिती

    पुणे : 

    गायरान जमीनीवरील शासकीय अतिक्रमण काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसीला उच्च न्यायालयाची स्थगिती

    राज्य शासनाच्या अखत्यारित सर्वच शासकीय गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश होते

    मात्र उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत याला स्थगिती देण्यात आली आहे

    न्यायमूर्ती दिपांकर दत्त आणि न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे

    या अतिक्रमण कारवाईमुळे अनेक भटके विमुक्तांवर बेघर होण्याची वेळ येणार होती

    तात्पुरता न्यायालयाने दिलासा दिला आहे

    16 नोव्हेंबरला अॅड. असीम सरोदेंनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती

  • 01 Dec 2022 06:12 PM (IST)

    आमदार बच्चू कडू यांची पुण्यात कार्यकर्त्यांनी केली लाडू तुला

    आमदार बच्चू कडू यांची पुण्यात कार्यकर्त्यांनी केली लाडू तुला

    अपंगांसाठी अपंग मंत्रालय सुरू केलं म्हणून केला सत्कार

    पुणेरी पगडी घालत कार्यकर्त्यांनी धरला ठेका

    बच्चू कडू यांच फुलांनी सजवलेल्या वजन काट्यावर केली लाडू तुला

    पुण्यात पार पडला कार्यक्रम

  • 01 Dec 2022 05:15 PM (IST)

    कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले

    Marathi News LIVE Update

    कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले

    जतच्या दुष्काळी भागात कर्नाटक सरकारने पाणी सोडलं

    एका दिवसात कर्नाटक सरकारकडून तिकोडी तलाव ओव्हरफ्लो

    दुष्काळी भागाला कर्नाटक सरकारकडून पाणी

  • 01 Dec 2022 01:39 PM (IST)

    शिवसेना ठाकरे गटाकडून परभणीत महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

    शेतकऱ्यांची वीज तोडणी विरोधात आंदोलन सुरू

    महावितरणच्या कार्यालयाच्या गेटवर शिवसैनिक ठाम मांडून बसले

    सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू

  • 01 Dec 2022 12:10 PM (IST)

    आफताब पुनावाला याची नार्को टेस्ट संपली

    दिल्ली : आफताब पुनावाला याची नार्को टेस्ट संपली, दीड तास चालली डॉ. आंबेडकर रुग्णालयात नार्को टेस्ट, श्रद्धा हत्याकांड प्रकरणी नार्को टेस्टमधून मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता

  • 01 Dec 2022 11:39 AM (IST)

    कोरियन युट्युबर तरुणीची छेड काढणाऱ्या दोघांनाही अटक

    मुंबई : कोरियन युट्युबर तरुणीची छेड काढणाऱ्या दोघांनाही अटक, दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून तातडीने कारवाई

  • 01 Dec 2022 11:37 AM (IST)

    आफताब पुनावाला याच्या नार्को टेस्टला सुरुवात

    दिल्ली : आफताब पुनावाला याच्या नार्को टेस्टला सुरुवात, डॉ. आंबेडकर रुग्णालयात पोलिसांचं पथक आफताबसह पोहोचलं, नार्को टेस्टकडे संपूर्ण देशाचं लक्ष, पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबने कबूल केला होता श्रद्धाच्या हत्येचा गुन्हा

  • 01 Dec 2022 10:45 AM (IST)

    गुजरात : 10 वाजेपर्यंत 8% मतदान

    गुजरात विधानसभा निवडणूक, 10 वाजेपर्यंत 8% मतदान, 89 जागांसाठी आज गुजरात राज्यात सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला झाली सुरुवात

  • 01 Dec 2022 10:28 AM (IST)

    वडा पाव विक्रेत्याला मारहाण करणाऱ्यांना घडवली अद्दल

    नाशिक : आधी मद्यधुंद टोळक्याची वडा पाव विक्रेत्याला मारहाण, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी नेऊन टोळक्याला दिला चोप, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

  • 01 Dec 2022 10:01 AM (IST)

    शिवसेनेचे आज चक्काजाम आंदोलन

    शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आंदोलनाच्या दिशेने रवाना

    नांदगाव मनमाड रोडवर करणार चंद्रकांत खैरे चक्काजाम आंदोलन

    चक्का जाम आंदोलनासाठी येणार हजारो शिवसैनिक

  • 01 Dec 2022 09:27 AM (IST)

    औसा लातूर महामार्गावर कार उलटली

    लातूर : औसा लातूर महामार्गावर कार उलटली, 4 जण जखमी, बुधोडा गावाजवळ भरधाव वेगात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारचा अपघात

  • 01 Dec 2022 08:59 AM (IST)

    व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक

    जप्त करण्यात आलेल्या उलटीची आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 5 कोटी रुपये

    राजेंद्र कोरडे, नवाज कुरुपकर, अजिम काजी, विजय ठाणगे, अक्षय ठणगे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे

    त्यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

  • 01 Dec 2022 08:56 AM (IST)

    जी-20 देशांची पुण्यात बैठक होणार

    13 ते 15 जानेवारी दरम्यान होणार बैठक

    जी 20 देशांच्या बैठकीचा मान भारताला मिळाला आहे आणि पहिली बैठक पुण्यात होत आहे

    मुख्यमंत्र्यांच्या सचिवांकडून पुणे महापालिका आयुक्तांना सूचना

    शहरं विद्रुप असता कामा नये, सगळ्या उपाययोजना तातडीने करा

    शहरातील 60 चौकांच केलं जाणार सुशोभीकरण

    आज महापालिका आयुक्त विमानतळ ते सेनापती बापट रोड या मार्गाची करणार पाहणी,

    अतिक्रमण, पथदिवे, रस्त्यांची अवस्था याची पाहणी केली जाणार

  • 01 Dec 2022 08:51 AM (IST)

    पहिल्या टप्प्यासाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात

    89 जागांसाठी आज गुजरातमध्ये मतदान

    भाजप काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात मुख्य लढत

    संवेदनशील मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त

  • 01 Dec 2022 08:49 AM (IST)

    आजपासून थंडीचा कडाका वाढणार

    पुणे : राज्यात आजपासून थंडीचा कडाका वाढणार, 2 आणि 3 डिसेंबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता

  • 01 Dec 2022 08:48 AM (IST)

    खार परिसरात कोरियन युट्युबवर महिलेची छेडछाड करण्याचा प्रयत्न

    मुंबई : खार परिसरात कोरियन युट्युबवर महिलेची छेडछाड करण्याचा प्रयत्न, खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

  • 01 Dec 2022 08:39 AM (IST)

    देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार

    देशभरात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलरवर

    देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर 14 रुपयांनी कमी होण्याची शक्यता

    भारतीयांना मिळणार मोठा दिलासा

    पुढील दोन दिवसांमध्ये इंधनांचे दर कमी होण्याची शक्यता

  • 01 Dec 2022 08:16 AM (IST)

    ‘रविवार’ ऐवजी ‘शुक्रवार’ ची घोषित केलेली सुट्टी रद्द

    मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘रविवार’ ऐवजी ‘शुक्रवार’ ची घोषित केलेली सुट्टी रद्द, हिंदू संघटनांच्या विरोधामुळे बँकेने सुट्टी केली रद्द, 1 डिसेंबर पासून मुंबईतील दादर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही शाखांनी ‘रविवार’ ऐवजी ‘शुक्रवार’ बंद राहील असा घेतला होता निर्णय

  • 01 Dec 2022 07:52 AM (IST)

    सैन्य भरतीत अपयश आल्याने  तरुणाची आत्महत्या

    सैन्य भरतीत अपयश आल्याने  तरुणाची आत्महत्या

    कोल्हापुरातील शिरोली इथला धक्कादायक प्रकार

    रमजान देसाई असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव

    रमजान देसाई कोल्हापुरात सुरू असलेल्या अग्निवीर भरतीमध्ये झाला होता सहभागी

    शारीरिक चाचणीत रमजानला अपयश आल्यानंतर प्रक्रियेतून पडला बाहेर

    गेली पाच वर्षे शिरोली येथे मैदानावर त्यांचा भरतीसाठी सुरू होता सराव

  • 01 Dec 2022 07:44 AM (IST)

    औरंगाबाद :निवडणूक आयोगाची वेबसाईट ठप्प

    औरंगाबाद :निवडणूक आयोगाची वेबसाईट ठप्प, वेबसाईट ठप्प पडल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी अडचणी

  • 01 Dec 2022 07:36 AM (IST)

    पुण्यातील रिक्षा संघटनेत मोठी फूट

    पुणे : पुण्यातील रिक्षा संघटनेत मोठी फूट, बाईक टँक्सी विरोधी आंदोलन समितीतून बाबा कांबळेंची संघटना वगळली, 17 संघटनाऐवजी आता 16 संघटना आंदेलनात

Published On - Dec 01,2022 7:34 AM

Follow us
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.