Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 03, 2022 | 7:32 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज शुक्रवार, 2 डिसेंबर 2022. श्रद्धा हत्याकांडप्रकरणी आज पुन्हा एकदा आरोपी आफताब पुनावाला याची नार्को टेस्ट होणार आहे. या नार्को टेस्टमधून काय खुलासे होतात, हे पाहणं महत्त्वाचंय. दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरही आपलं लक्ष असेल. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज घडतं, याचाही आढावा घेणार आहोत. राज्यातील राजकीय, सांस्कृतिक आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींसह महत्त्वाच्या शहरांमधील बातम्या, ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज या सगळ्याचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Dec 2022 06:48 PM (IST)

    शिंदे-फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी करणार

    Marathi News LIVE Update शिंदे-फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी करणार

    4 डिसेंबर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार पाहणी

    पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे समृद्धी महामार्गाचे उद्धघाटन

    शिंदे-फडणवीस करणार कामाची पाहणी

  • 02 Dec 2022 05:38 PM (IST)

    शिंदे-फडणवीस सरकार हतबल, लाचार

    Marathi News LIVE Update

    शिंदे-फडणवीस सरकार हतबल,लाचार

    संजय राऊत यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

    सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे

    राज्य सरकारला लाज वाटायला पाहिजे

    बेळगावमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना पाय ठेऊ देत नाहीत

    मंत्र्यांनी ढोंग करु नये, कर्नाटकमध्ये जाऊन दाखवावे

  • 02 Dec 2022 04:42 PM (IST)

    उदयराजेंनी राज्यापालांच्या वक्तव्याचा विषय संपवावा

    Marathi News LIVE Update

    उदयराजेंनी राज्यापालांच्या वक्तव्याचा विषय संपवावा

    चंद्रकांत पाटील यांची उदयनराजे यांना विनंती

    राज्यपाल महापुरुषांचा अनादर करु शकत नाही

    चंद्रकांत पाटील यांनी केली हात जोडून विनंती

  • 02 Dec 2022 03:55 PM (IST)

    मालेगाव म्हसदी रोडवर धाकड बारीत अपघात

    दोघांचा मृत्यू तर 10 पेक्षा जास्त जखमी

    मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता

    साकरीला लग्नाला जाताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने धाकड बारीत झाला अपघात..

    पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली अपघातग्रस्तांची भेट

  • 02 Dec 2022 11:38 AM (IST)

    पनवेल : वाळूमाफियांविरुद्ध सर्वात मोठी कारवाई

    पनवेल : तळोजा खारघर खाडीमध्ये वाळूमाफियांविरुद्ध सर्वात मोठी कारवाई, 4 मोठ्या आणि 4 मध्यम बार्जसह 2 छोट्या संक्शन पंपच्या बोटींवर धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल पाण्यामधून जप्त

  • 02 Dec 2022 11:22 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी

    उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख असल्याने तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी

    2029 ग्रामपंचायत सदस्यपदासाठी पेटणार रण

    808 प्रभागामध्ये चढणार रंगत

    18 डिसेंबरला होणार निवडणूकीसाठी मतदान

    अमरावती तालुक्यात सर्वाधिक 102 ग्रामपंचायच्या निवडणूका

  • 02 Dec 2022 10:41 AM (IST)

    चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण?

    मुंबई : चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण असल्याची माहिती, मुंबईतील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, खाणींबाबत चाचणी करण्याचे प्रयत्न सुरु, वाचा सविस्तर वृत्त

  • 02 Dec 2022 09:30 AM (IST)

    छत्रपती उदयनराजे भोसले आज साताऱ्यातून रायगडला होणार रवाना

    उद्या रायगडावर निर्धार शिवसन्मानाचा कार्यक्रम

    उदयनराजे करणार भूमिका जाहीर

    साताऱ्यातील पोवई नाक्यावर शिवाजी महाराजांना अभिवादन करुन होणार सुरुवात

    चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुलांची सजावट करण्यात आलीये

  • 02 Dec 2022 09:22 AM (IST)

    पुणे शहरातील पाणी प्रश्नावर आजी-माजी पालकमंत्री आज एकत्र येणार

    शहरातील पाणीप्रश्नी चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात एकत्रित बैठक

    शहराचा पाणी कोटा वाढवण्याची महापालिकेची मागणी

    या मुद्यावर आज बैठकीत चर्चा होणार

    बैठकीला पालिका आयुक्त उपस्थित राहणार

    याआधी कालवा समितीच्या बैठकीला अजित पवार आणि चंद्रकांत पाटील एकत्र आले होते

  • 02 Dec 2022 09:19 AM (IST)

    आज पुन्हा होणार आफताब पुनावालाची नार्को टेस्ट

    दिल्ली : आज पुन्हा होणार आफताब पुनावाला याची नार्को टेस्ट, सलग दुसऱ्या दिवशी होणाऱ्या नार्को टेस्टकडे देशाचं लक्ष, नार्को टेस्टच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त

  • 02 Dec 2022 08:48 AM (IST)

    अंधेरी पहाटे लागली भीषण आग, 4 दुकानं जळून खाक

    मुंबई : अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील दुकानांमध्ये पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास लागली मोठी आग, एका तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, आगीत रेल्वेचा सुद्धा काही भाग जळून खाक, 4 ते 5 दुकानांचं आगीत मोठं नुकसान, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

  • 02 Dec 2022 08:03 AM (IST)

    थ्रेशर मशीनमध्ये अडकून शेतमजुराचा मृत्यू

    गोंदिया : धान मळणी करीत असताना थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने शेतमजुराचा मृत्यू, मशीनमध्ये धानाचे बोझे टाकत असताना अचानक तो मशीनमध्ये ओढली गेला, गोरेगाव तालुक्यातील देऊटोला येथील घटना

  • 02 Dec 2022 07:55 AM (IST)

    मुंबई : ऑटो रिक्षा चोरणारी टोळी अटकेत

    मुंबई : ऑटो रिक्षा चोरणारी टोळी अटकेत, चोरी केलेल्या एकूण सहा रिक्षाही जप्त, कांदिवली पोलिसांची कारवाई, नंबरप्लेट बदलून वापरल्या जात होत्या चोरी केलेल्या रिक्षा, वाचा सविस्तर वृत्त

  • 02 Dec 2022 07:35 AM (IST)

    अजित पवार यांचा बारामती दौरा

    बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बारामती दौरा, 6 वाजल्यापासून अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी, विकासकामांबाबत अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सूचना

  • 02 Dec 2022 07:34 AM (IST)

    स्विफ्ट डिझायर कारची ऍक्टिव्हाला धडक, एकाचा मृत्यू

    गोंदिया : भरधाव स्विफ्ट डिझायर कारची ऍक्टिव्हाला धडक, एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी, चालक मुलीला अटक

Published On - Dec 02,2022 7:32 AM

Follow us
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.