Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 07, 2022 | 10:11 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज मंगळवार, 6 डिसेंबर 2022. आज महानिर्वाण दिन. दादर येथील चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेकडो आंबेडकरी अनुयायी हे महामानवाला अभिवादन करण्यासाठी एकटवणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांकडून चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय. या सर्व घडामोडींची आढावा घेणार आहोत. शिवाय कर्नाटक-महाराष्ट्र यांच्यातील सीमावादाचा मुद्दाही ताणला गेलाय. त्या पार्श्वभूमीवर आज कोणत्या राजकीय घडामोडी घडतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबत प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरही आपली बारीक नजर असेल. राजकीय घडामोडींसोबत राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील ताज्या अपडेट्स आणि ब्रेकिंग न्यूजचाही आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Dec 2022 06:52 PM (IST)

    कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली

    Marathi News LIVE Update

    कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका

    तात्काळ कारवाई करण्याची केली मागणी

    दोषींवर कारवाई करण्याचे कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

    हा विषय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर घालणार

    महाराष्ट्रात कोणीही कायदा हातात घेऊ नये-फडणवीस

  • 06 Dec 2022 05:29 PM (IST)

    अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

    Marathi News LIVE Update

    अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

    सीबीआय प्रकरणात हायकोर्टात सुनावणी

    अनिल देशमुख यांची सीबीआय न्यायालयाच्या निकालाविरोधात धाव

    वैद्यकीय उपचारांसाठी जामीन देण्याची विनंती

  • 06 Dec 2022 05:15 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

    Marathi News LIVE Update

    आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

    राज्यात शेतकरी त्रस्त, महिलांवर अत्याचार

    उद्योग राज्यातून दुसऱ्या राज्यात पाठविण्यात येत आहे

    महाराष्ट्राची गावं ही दुसऱ्या राज्यात पळविण्याचा प्रयत्न सुरु

    तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यावर गप्प-आदित्य ठाकरे

  • 06 Dec 2022 05:11 PM (IST)

    अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल

    Marathi News LIVE Update

    अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल

    संभाजीराजे यांनी दिला कर्नाटक सरकारला इशारा

    छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची तोडफोड

    कन्नडीगांच्या हल्ल्याचा केला निषेध, महाराष्ट्रात जशास तसे उत्तर देणार

    रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती

    त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करण्याचे आवाहन

  • 06 Dec 2022 05:07 PM (IST)

    मराठी माणसांनी बांगड्या घातल्या असे समजू नका

    Marathi News LIVE Update

    मराठी माणसांनी बांगड्या घातल्या असे समजू नका

    जितेंद्र आव्हाड यांचा कन्नड रक्षण वेदिके संघटनेला इशारा

    बंगळुरुपेक्षा जास्त कन्नड माणसं मुंबईत राहतात

    महाराष्ट्रातील माणसांना षंढ समजू नका-आव्हाड

  • 06 Dec 2022 03:03 PM (IST)

    महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद एस टी महामंडळ अलर्ट!

    महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणी एस टी महामंडळ अलर्ट

    बेळगावमध्ये सुरू असलेल्या आंदोलनानंतर राज्यातील एसटी महामंडळ अलर्टवर

    जर कर्नाटक प्रशासन किंवा आंदोलन ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने राज्यांची सीमा ओलांडू दिली नाही तर महाराष्ट्रातून कर्नाटककडे जाणाऱ्या बस थांबवणार.

    एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती

  • 06 Dec 2022 01:21 PM (IST)

    नारायण गौडा पोलिसांच्या ताब्यात

    नारायण गौडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद पेटण्याची शक्यता

    कर्नाटकच्या हिरेबागेवाडी टोल नाक्यावर हल्ला

    महाराष्ट्राच्या ५ वाहनावर हल्ला

    कन्नड रक्षण वेदिका महाराष्ट्रविरोधात आक्रमक

  • 06 Dec 2022 01:14 PM (IST)

    बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला

    बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला

    कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

    बेळगावात महाराष्ट्राच्या 5 वाहनावर हल्ला

    कन्नड रक्षण वेदिका महाराष्ट्रविरोधात आक्रमक

  • 06 Dec 2022 12:27 PM (IST)

    अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

    भाग्यलक्ष्मी ज्वेलर्सवर ५ दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत घातला दरोडा

    ज्वेलर्स मालक आणि दरोडेखोरांमध्ये झाली झटापट

    हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल, तपासाला सुरुवात

  • 06 Dec 2022 12:18 PM (IST)

    गटार साफ करताना दोघांचा मृत्यू

    नवी मुंबई : गटार साफ करताना दोन कामगारांचा मृत्यू, रबाळे एमआयडीसी मधील धक्कादायक घटना, प्रोफॅब कंपनी समोर असलेले गटार साफ करताना घडली घटना, रासायनिक उग्र वासामुळे गुदमरून मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

  • 06 Dec 2022 12:15 PM (IST)

    भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण ठार

    जळगाव : कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण ठार, रफिक हुसेन मेवाती (वय-23) आणि अरबाज जहांगीर मेवाती (वय 20) अशी मृत तरुणांची नावं

  • 06 Dec 2022 11:30 AM (IST)

    स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या नागरिकांचा मोर्चा

    नाशिक ते मुंबई पायी मोर्चा

    मोर्चात काही नागरिक अर्धनग्न अवस्थेत सहभागी

    नाशिकच्या अंबड परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर

  • 06 Dec 2022 10:42 AM (IST)

    शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे घेणार शहाजीबापू पाटलांच्या मतदारसंघात सभा

    13, 14 आणि 15 तारखेला सुषमा अंधारेंचा सोलापूर जिल्हा दौरा

    सोलापूर, सांगोला आणि मोहोळ या ठिकाणी होणार सभा

  • 06 Dec 2022 10:23 AM (IST)

    नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाची हजेरी

    मालेगाव : नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाची हजेरी, मालेगाव, सटाणा तालुक्यातील पावसाच्या हजेरीने शेतकरी संकटात

  • 06 Dec 2022 09:46 AM (IST)

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त

    वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 400 पोलिसां कडून सीमेवर तपासणी

    महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त

    चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांचा दौरा रद्द तरीही कर्नाटक प्रशासनाकडून खबरदारी

  • 06 Dec 2022 09:40 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तीन वर्षात दीडशे सामंजस्य करार

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तीन वर्षात दीडशे सामंजस्य करार

    आंतरराष्ट्रीय करारामध्ये विद्यापीठाने हार्वर्ड बिझनेस स्कूल, मेलबर्न युनिव्हर्सिटी, द युनिव्हर्सिटी ऑफ केलिफॉर्निया आदी नामांकित शैक्षणिक संस्थांशी करार

    नवीन शैक्षणिक धोरणात अकॅडमीक क्रेडिट बँक, द्विलक्षी अभ्यासक्रम, संशोधन आदींबाबत मोठ्या प्रमाणात बदल

    कुलगुरूंच्या संयुक्त बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी लेखाजोखा मांडला

  • 06 Dec 2022 09:34 AM (IST)

    अडीच महिन्यांनी फरार आरोपी गजाआड

    उस्मानाबाद : घरात शिजवलेले मटण कुत्र्याने खाल्याचा राग काढत स्वतःच्या मुलीवर गोळी झाडून खून करणाऱ्या पित्यास अटक, उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, गेले अडीच महिने फरार आरोपीला बेड्या, वाचा सविस्तर

  • 06 Dec 2022 08:56 AM (IST)

    बारसू सोलगाव रिफायनरीच्या दृष्ट्रीने महत्वाची अपडेट

    रत्नागिरी : बारसू सोलगाव रिफायनरीच्या दृष्ट्रीने महत्वाची अपडेट, आणखी ६०० एकर जमीन मालकांची रिफायनरी प्रकल्पासाठी संमतीपत्र, ५५०० एकर पैकी ३५०० एकरची शेतकऱ्यांची संमतीपत्र, नव्याने संमतीपत्र देणाऱ्यांमध्ये बारसू, सोलगाव, गोवळ आणि धोपेश्वरमधील शेतकऱ्यांचा सहभाग, येत्या चार दिवसात एमआयडीसीच्या माध्यमातून नवीन संमतीपत्र मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचवणार, रिफायनरी प्रकल्प समर्थन संघटनेची माहिती

  • 06 Dec 2022 08:17 AM (IST)

    आयटी इंजिनिअर असलेल्या पतीनं पत्नीचा केला खून

    पुणे : चारित्र्याच्या संशयावरून आयटी इंजिनिअर असलेल्या पतीनं पत्नीचा केला खून, फुरसुंगी परिसरातील घटना, राजेंद्र गायकवाड पतीला हडपसर अटक

  • 06 Dec 2022 08:13 AM (IST)

    कोल्हापूर : मुलांच्या भविष्यासाठी मोबाईल टीव्ही बंद

    कोल्हापूर : मुलांच्या भविष्यासाठी मोबाईल टीव्ही बंद, नूल गावच्या ग्रामस्थांचा निर्णय, सकाळी सात ते साडे आठ पर्यंत घरातील टीव्ही आणि मोबाईल ठेवले जाणार बंद, गावातील हायस्कूलमध्ये झालेल्या माता पालक मेळाव्यात घेण्यात आला निर्णय

  • 06 Dec 2022 07:32 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात गोवरचा उद्रेक

    औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गोवरचा उद्रेक, गोवरच्या संशयित रुग्णांत वाढ, औरंगाबाद जिल्ह्यातील गोवरचे 105 बालके संशयित. गोवर बाधित रुग्णांची संख्या 16 वर

Published On - Dec 06,2022 7:31 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.