मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावरू दिल्लीतील जेएनयूमध्ये वाद झाला आहे. डाव्या आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने बोलावली तातडीची बैठक. निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
अमरावती :
अमरावतीच्या पंचवटी चौकमधील हॉटेल ‘नाईस डे’वर अज्ञातांचा हल्ला
तलवार घेऊन ५ ते ७ लोकांनी फोडले काच
गाडगे नगर पोलीस घटनास्थळी दाखल
दारूचे बिल देण्यावरून वाद झाल्याची माहिती
एका आरोपीस अटक
पुणे :
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराचा जोर वाढला
भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी मामुर्डी गावात आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची बैठक
गावातील नागरिकांसोबत बैठक घेत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार
श्रीरामपूर / अहमदनगर
६५ वर्षाच्या नराधमाचा २ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार
श्रीरामपूर तालुक्यातील मानवतेला काळीमा फासणारी घटना
श्रीरामपूर पोलिसांनी ठोकल्या या ६५ वर्षाच्या नराधमाला बेड्या
खेळण्यासाठी आलेल्या शेजारच्या नातीबरोबर ६५ वर्षीय नराधमाने केला अत्याचार
भास्कर मोरे वय – ६५ असे आरोपीचे नाव
पिडीत मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल
भादवि कलम ३७६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, पोस्को कायदा कलम ४, ८ , १२ प्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल
पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांच्याकडुन पुढील तपास सुरू
पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकाच गाडीत
कसबा पोटनिवडणुकीसाठि आता मुख्यमंत्री घेणार बैठक
5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निलम गोऱ्हेंच्या भेटीला
नीलम गोऱ्हे यांच्या घरी जाऊन आस्थेनं केली विचारपूस
बाळासाहेब थोरात- नाना पटोले वाद मिटवण्यासाठी हायकमांडने चेन्निथला यांना पाठवलं
केरळ काँग्रेस आमदार रमेश चेन्निथला मुंबईत दाखल
पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोपांची माहिती घेऊन अहवाल हायकमांडला पाठवणार
निवडणूक आयोगाने कायदेशीर चौकट ओलांडून चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा निर्णय घेतला का ?
निवडणूक आयोगाला शिवसेना पक्षात गटबाजी सुरू आहे हे माहीत नव्हतं का ?
स्वेच्छेने शिवसेना पक्ष सोडणारे एकनाथ शिंदें कशा पद्धतीने नाव आणि चिन्हावर दावा करू शकतात ?
मालेगाव महापालिकेच्या विरोधात धडक कारवाई..
कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर केली कारवाई..
कोट्यावधींचा घोटाळा उघड…
शहरातील कचरा संकलन करणाराऱ्या ठेकेदाराकडून वजन काट्यावर होत होता घोटाळा…
कचरा गाड्यांच्या वजनाच्या काट्यावर होत होता मोठा घोटाळा भूसेंनी केला उघड…
वजन काटा सील करण्याचे दिले आदेश..
चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला
उद्धव ठाकरे यांचा भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल
हुकुमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो
आयोगाचा निकाल आयोग्य आहे
उद्धव ठाकरे यांनी घेतला आक्षेप
येत्या काळात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जाणार
जिल्हा प्रमुखांना महत्वाच्या सूचना
राज्यभर दौरे करणार
बीएमसीसीच्या कार्यालयातील ताब्यात घेण्याची तयारी
शिवसेना संपवण्याचा प्रयत्न
जुनी प्रकरणं उखरून काढण्याचा केला जाणार प्रयत्न
सिनेमासाठी आर माधवन याने दिलेल्या ऑडिशनचा व्हिडीओ तुफान व्हायरल; तुम्ही व्हिडीओ एकदा नक्कीच पाहाच…
3 Idiots सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं, आजही होते सिनेमाची चर्चा… वाचा सविस्तर
कसब्यात आज भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळावा
मंत्री गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित
मेळाव्यात कसब्यातील रहिवासी असतील अशाच कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार
आधार कार्ड बघून कार्यकर्त्यांना आत सोडलं जाणार
कसब्यात मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपची अनोखी कल्पना
आधार कार्ड बघूनच आम्ही सभेत सोडणार
आजच आमचा निकाल लागेल
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडेंची माहिती
थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
शिवसेना भवन शिंदे गटाकडून ताब्यात घेणार असल्याची चर्चा
शिवसेना भवनासमोर शिवसैनिक प्रचंड संख्येने जमले
Venkatesh Prasad यांच्याकडून केएल राहुलची पोल-खोल. वाचा सविस्तर….
CSK च्या ‘या’ प्लेयरवर शस्त्रक्रिया होणार आहे. वाचा सविस्तर….
प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटींवर दुःखाचा डोंगर..
अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख केलं व्यक्त… सध्या त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ… वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पंचमहाभूत लोकोत्सवाच उद्घाटन
थोड्याच वेळात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर कार्यक्रमस्थळी दाखल होणार
20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे पंचमहाभूत लोकोत्सव
पंचमहाभूत लोकोत्सवाच्या निमित्ताने कणेरी मठच्या तब्बल 600 एकर परिसरात वेगवेगळी प्रदर्शनं
40 लाखाहून अधिक लोक भेट देण्याचा हा अंदाज
कणेरी मठाचे मठाधीपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या संकल्पनेतून होतोय पंचमहाभूत लोकोत्सव
नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे आज सकाळी निधन झाले
अंत्यदर्शन वेळ दुपारी 2.30 ते 4.30 पर्यंत घेता येणार आहे
सिल्हररॅाक्स, हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॅालनी, पुणे येथे अंत्यदर्शन घेता येणार आहे.
सायंकाळी 5 वाजात वैकुंठ स्मशानभूमी येथे लतिकाताई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार
पक्षाचा फंड वापरण्याचीही एकनाथ शिंदेंना परवानगी
शिवसेना पक्षाकडे तब्बल 148 कोटी रुपयांची FD
186 कोटी रुपयांची पक्षाकडे स्थावर मालमत्ता
नाव आणि पक्ष चिन्ह सह मालमत्ता आणि डिपॉझिट रक्कम वापरण्यासही निवडणूक आयोगाने दिली आहे मान्यता
सगळं चोरलं …पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार ?
जगातील कोणतीही व्यवस्था ही तुम्हाला देऊ शकत नाही
आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत
ठाकरे गटाचे युवासेना सहसचिव कृनाल धनावडे यांची बँनरबाजी …
नाशिक : शहरातील 450 सफाई कर्मचारी आजपासून आमरण उपोषण करणार,
पूर्व सूचना न देता कंपनीने कामावरून काढल्याचा आरोप,
मनसेच्या नेतृत्वात शहरातील सफाई कर्मचारी आजपासून आंदोलनात सहभागी.
नाशिक महापालिका मुख्यालयासमोर वॉटर ग्रेस कंपनीच्या कामगारांचे आंदोलन
शहरातील 450 सफाई कर्मचारी आजपासून आमरण उपोषण करणार
पूर्व सूचना न देता कंपनीने कामावरून काढल्याचा आरोप
मनसेच्या नेतृत्वात शहरातील सफाई कर्मचारी आजपासून आंदोलनात सहभागी
IND vs AUS Test : सीरीजच्या मध्यावर Pat Cummins ने घेतलेल्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन टीमला मोठा झटका बसला आहे. वाचा सविस्तर….
10 वर्षानंतर वनडे टीममध्ये कमबॅक करणारा तो खेळाडू कोण? वाचा सविस्तर….
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह कुठल्या टुर्नामेंटमधून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार? ते निश्चित झालय. वाचा सविस्तर….
ठाकरे गटाला याचिका सर्वोच्च न्यायालयातच दाखल करावी लागणार
ठाकरे गटासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता
ठाकरे गटासाठी करो, या मरो ची परिस्थिती, ज्येष्ठ वकिलांचे मत
पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी केस सर्वोच्च न्यायालयात दाखल होणार
निवडणूक आयोगाच्या विरोधात जर याचिका दाखल झाली तर पहिल्यांदाच शिंदे-ठाकरे एकमेकांविरोधात न्यायालयात येणार
अहमदनगरच्या नामांतरासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
नगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करण्याची मागणी
दुपारी 12 वाजता बिस्तभाग चौकातून मोरच्याला होणार सुरूवात
तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची सांगता
पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आचारसंहिताभंगाच्या 59 तक्रारी
आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल या ऑनलाईन अॅपवर
मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे
आचार संहिता लागू झाल्यापासून 59 तक्रारी या ॲपवर आल्या होत्या
या सर्व तक्रारीचे निरसन करण्यात आलं
चिंचवड विधानसभा क्षेत्रात जर आचारसंहिता भंग होत असेल तर या अॅपवर तक्रार करण्याचं आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आलंय
बारामती : शरद पवार अपडेट
– शरद पवार यांचा आज सांगली दौरा..
– थोड्याच वेळात सांगलीकडे होणार रवाना..
– बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानाहून निघणार सांगलीकडे..
– हेलिकॉप्टरने होणार सांगलीकडे प्रयाण…
सगळ्यांचे श्वास रोखले गेलेल्या या सामन्यात फक्त एका चेंडूने मॅच फिरली. वाचा सविस्तर….
सध्या पृथ्वी शॉ भारतीय क्रिकेटमध्ये एकाकी पडलाय. वाचा सविस्तर….
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसब्यात 4 वाजता घेणार विविध समाज प्रतिनिधीच्या बैठका,
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज संध्याकाळी 6 वाजता कसब्यात जाहीर सभा,
अजित पवारांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 वाजता कसब्यात बाईक रॅली,
तर भाजप नेत्या पंकजा मुंडे कसब्यात भाजप उमेदवाराच्या पदयात्रेत सहभागी होणार.
जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी, यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषाने जेजुरी गड दुमदुमला
जेजुरी गडावर भंडाऱ्याची मोठी उधळण
खंडेरायाच्या मानाच्या पालखीचं गड उतरून कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान
सोमवती अमावस्या निमित्त जेजुरी गड भक्तांनी फुलला
नगर प्रदिक्षणा करत देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी जाणार
खंडेरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविक जेजुरी गडावर
जेजुरी गडाला सोन्याचं रूप
पोलीस भरतीची लेखी परीक्षा लांबली
लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा
राज्यभरात एकाच वेळी होणार लेखी परीक्षा
पुण्यातील निवडणुकांमुळे परीक्षा स्थगित
शिवजयंती निमित्त अमरावतीच्या चांदूर रेल्वेत सुषमा अंधारे यांचे जाहीर व्याख्यान
सायंकाळी 6 वाजता चांदूर रेल्वे शहरातील जिल्हा परिषदच्या मैदानावर सुषमा अंधारे यांचे व्याख्यान
सुषमा अंधारे आणि आयोजकांना समज देण्याची वारकरी संप्रदायाने केली होती पोलिसांना मागणी
नाशिक : चोवीस तासात तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के,
रघतविहीर, फणसपाडा, राशा या गावांत भूकंपाचे धक्के,
मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
दोन युवकांनी आपापसात हुज्जत घातल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला
लाठीचार्जे केल्यामुळे शिवभक्तांमध्ये पळापळ, घाबरून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली
राणी लक्ष्मीबाई टॉवर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने सार्वजनिक मिरवणूक सुरू असताना हा प्रकार घडला
रात्री उशिरा एक्सपेरिया मॉलमधील कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने धुराचे साम्राज्य
अचानक आग लागल्याने लोकांमध्ये गोंधळ, सुदैवाने जीवितहानी नाही
आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली
दोन तास शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण
नवी दिल्लीतल्या अशोक रोडवरच्या घरावर दगडफेक
दगडफेक करणाऱ्या अज्ञात विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू
जेएनयुमध्ये पुन्हा विद्यार्थी संघटना आमने-सामने
एबीव्हीपीकडून शिवजयंती सुरू असताना विरोध झाल्याचा दावा
डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीला विरोध केल्याचा एबीव्हीपीचा दावा
दोन्ही गटातल्या विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक बचाबाची
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड झाल्याचा एबीव्हीपीचा आरोप
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्याबाबत संभ्रम?
आज ठाकरे गट पुन्हा वकिलांशी चर्चा करणार, चर्चेनंतरच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेणार
निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्याचा होणार निर्णय