Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज 11 नोव्हेंबर 2022. संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलंय. अशातच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) आज सामील होणार आहे. त्यामुळे या घडामोडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. तर दुसरीकडे राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होतं, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच प्रतापगडवरील अफजल खाना्चाय कबरीसंदर्भातही आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सत्ता संघर्षाच्या राजकारणापासून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
पुण्यात हडपसर जवळ दोन पीएमटी बसचा अपघात
– पुण्यात हडपसर जवळ दोन पीएमटी बसचा अपघात
– हडपसर परिसरातील गाडीतळ जवळ दोन पीएमपी बस एकमेकांना घासल्या,
– बस मध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली,
– वाघोली कडे जाणारी बस सिग्नलला थांबली असता घडली घटना
– या अपघातात दोन्ही बसच्या काचा फुटल्या असुन इतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही
– या दोन्ही बसमध्ये प्रवासी नसल्याने कोणाला दुखापत देखील झाली नाही
-
खासदार गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार
Marathi News LIVE Update
खासदार गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार
रवींद्र नाट्यमंदिरातील कार्यक्रमात करणार शिंदे गटात प्रवेश
शिंदे गटातील खासदारांची संख्या आता 13
ठाकरे गटाला आणखी एक धक्का
-
-
विकृतीविरोधातील लढाईत अटक झाल्याचा आनंद
Marathi News LIVE Update
विकृतीविरोधातील लढाईत अटक झाल्याचा आनंद
जितेंद्र आव्हाड यांची अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विकृतीकरण
इतिहासाच्या विकृतीकरणाविरोधात आवाज उठविला
वैद्यकीय चाचणीसाठी आव्हाडांना सामान्य रुग्णालयात नेण्यात आले
-
जितेंद्र आव्हाड यांचे मेडिकल करण्यात येणार
Marathi News LIVE Update
जितेंद्र आव्हाड यांचे मेडिकल करण्यात येणार
आव्हाडांना घेऊन पोलीस सामान्य रुग्णालयाच्या दिशेने
उद्या कोर्टात हजर करण्याची शक्यता
हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडताना मारहाणीचे प्रकरण
-
जितेंद्र आव्हाड वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांच्या गाडीत बसून रुग्णालयाच्या दिशेला रवाना
जितेंद्र आव्हाडांची वैद्यकीय तपासणी होणार आव्हाड पोलिसांच्या गाडीत बसून ठाणे जिल्हा रुग्णालयाकडे रवाना
-
-
देशभरात स्वस्तात मालमत्ता खरेदीची संधी
Marathi News LIVE Update
देशभरात स्वस्तात मालमत्ता खरेदीची संधी
ई-ऑक्शनमध्ये खरेदी करता येईल स्वस्तात घर
15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मिळणार संधी
बँक ऑफ बडोदा आणि इंडियन बँकेकडून ई-ऑक्शन
प्रक्रिया होणार ऑनलाईन
-
मी नाराज असल्याच्या अफवा
Marathi News LIVE Update
मी नाराज असल्याच्या अफवा
माहिती न घेता माझी बदनामी केल्या जात आहे
अजित पवारांनी घेतला समाचार
सहा महिन्यांपूर्वीच दौऱ्यासाठी तिकीट काढले होते
-
केतकी चितळेची वादात उडी
Marathi News LIVE Update
केतकी चितळेची वादात उडी
जितेंद्र आव्हाडांवर गंभीर कलम लावा
मारहाणप्रकरणात विनयभंगाचं कलम लावण्याची मागणी
चितळेचं वकिलामार्फत पोलिसांना पत्र
-
भारत जोडो यात्रेत ही ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा
Marathi News LIVE Update
भारत जोडो यात्रेत ही ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा
यात्रे नांदेड जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात
आ.संतोष बांगर यांच्या मतदार संघात येताच घोषणाबाजी
’50 खोके एकदम ओके’च्या शिवसैनिकांनी दिल्या घोषणा
-
वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
Marathi News LIVE Update
वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी
पोलिसांनी केली जितेंद्र आव्हाड यांना अटक
पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडल्याचे प्रकरण
-
आदित्य ठाकरेही भारत जोडो यात्रेत
Marathi News LIVE Update
आदित्य ठाकरेही भारत जोडो यात्रेत
राष्ट्रवादीच्या नेत्यानंतर आज ठाकरेही सहभागी
नांदेड येथील भारत जोडो यात्रेत सहभाग
मविआचे नेते भारतो जोडो यात्रेत
-
अदानी समूह ऊर्जा क्षेत्रातील कंपनीची करणार विक्री
Marathi News LIVE Update
अदानी समूह ऊर्जा क्षेत्रातील कंपनीची करणार विक्री
अदानी पॉवरचे जानेवारी 2023 पर्यंत विक्रीचे उद्दिष्ट
1556 कोटींची आहे डील, बाजारात घडामोडी
शेअर बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण
-
कर्जबाजारी कंपनीसाठी अदानी-अंबानीमध्ये रस्सीखेच
Marathi News LIVE Update
कर्जबाजारी कंपनीसाठी अदानी-अंबानीमध्ये रस्सीखेच
किशोर बियाणी यांच्या फ्यूचर रिटेल खरेदीसाठी स्पर्धेत
15 कंपन्यांनी लावली फ्यूचर रिटेलसाठी बोली
शेअर बाजारात 10 ऑक्टोबरपासून फ्यूचर रिटलेच्या शेअरचे ट्रेडिंग बंद
-
जितेंद्र आव्हाडांना ठाणे कोर्टात हजर करणार
Marathi News LIVE Update
जितेंद्र आव्हाडांना ठाणे कोर्टात हजर करणार
विवियान मॉल मारहाणप्रकरणात पोलिसांनी केली अटक
पोलिस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
गुन्हा कबूल करणार नाही-जितेंद्र आव्हाड
-
चूक करणाऱ्याला माफी आणि आंदोलन करणाऱ्याला अटक
Marathi News LIVE Update
चूक करणाऱ्याला माफी आणि आंदोलन करणाऱ्याला अटक
जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
पोलिसांवर कोणाचा तरी दबाव येत असल्याचा आरोप
राज्यात ब्रिटिशराज सुरु आहे- सुळे
आव्हाडांना पोलिसांनी केली अटक
-
जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक
Marathi News LIVE Update
जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक
विवियान मॉलमधील मारहाणप्रकरण भोवलं
हर हर महादेव सिनेमाचा शो पाडला होता बंद
वर्तक नगर पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याची माहिती
-
संजय राऊत यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा
Marathi News LIVE Update
संजय राऊत यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा
पवारांवर टीका करुन स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर सर्वांचाच विश्वास
माझ्याशी काय लढता, शिवसेनेशी लढा
शिवसेना पुन्हा उसळी घेईल-राऊत
-
औरंगाबादेत लवकरच रेल्वे बोगीचा प्रकल्प
Marathi News LIVE Update
औरंगाबादेत लवकरच रेल्वे बोगीचा प्रकल्प
सीमेन्स कंपनीने केली प्रकल्पाची घोषणा
देशातच नव्हे तर परदेशात ही होणार निर्यात
या कारखान्यातून 200 रेल्वे बोगी तयार करण्याचे उद्दिष्ट
पॅसेंजर रेल्वे, ट्राम आणि मेट्रोचेही काम होणार
-
चित्रा वाघ पत्रकारावर भडकल्या
यवतमाळमध्ये चित्रा वाघ पत्रकारावर भडकल्या
संजय राठोड यांच्या प्रश्नावर चित्रा वाघ संपातल्या
यवतमाळमधील पत्रकार परिषदेची व्हिडीओ समोर
पत्रकारावर चित्रा वाघ यांची आगपाखड
-
संजय राऊत एक्शन मोडमध्ये
खासदार संजय राऊत एक्शन मोडमध्ये
आज पुन्हा घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
दोघांमध्ये पार पडली महत्त्वपूर्ण चर्चा
-
‘वेडात मराठे..’ चित्रपट प्रदर्शित केल्यास पडदा फाडू!
बदलापूरमधील सकल मराठा समाजाचा चित्रपटगृहांना इशारा
महेश मांजरेकर यांनी त्यांच्या मुलाला एखाद्या सिनेमात नाच्याची भूमिका द्यावी!
मराठा वीर म्हणून मांजरेकरांचा मुलगा शोभत नसल्याचीही टीका!
-
वाजत गाजत आणलेली 21 लाखाची गाडी पंधरा मिनिटात जळून खाक
कोल्हापूर : वाजत गाजत आणलेली 21 लाखाची गाडी पंधरा मिनिटात जळून खाक
कळंबा परिसरात मध्यरात्री तीनच्या सुमारास अग्नितांडव
घटनास्थळी दोन वाहने जळून खाक झाली
21 लाखाची दुचाकी मालकाच्या डोळ्यासमोर जळून खाक
जवळपास 40 पेक्षा जास्त लाखांचे नुकसान
आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
21 लाखाची दुचाकी खरेदी केल्यानंतर हौसेपोटी वाजत गाजत काढली होती मिरवणूक
-
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात दुचाकीचा भीषण अपघात
अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू
वरुड तालुक्यातील पंढरी ते महेंद्री दरम्यान भीषण अपघात
दुचाकी आणि अज्ञात वाहनांचा अपघात
-
अमरावती : वरुड तालुक्यात भीषण अपघात, 3 ठार
अमरावती : वरुड तालुक्यात दुचाकीचा भीषण अपघात, 3 ठार
अपघातात दुचाकीवरील 3 जणांचा जागीच मृत्यू
वरुड तालुक्यातील पंढरी ते महेंद्रीदरम्यान अपघात..
दुचाकी आणि अज्ञात वाहनाचा अपघात
-
विरोधी पक्षनेते अजित पवारांचा आज पुणे जिल्हा दौरा
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी
सुप्रिया सुळेंवर अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांच मौन पाहायला मिळालं
राष्ट्रवादीच्या शिर्डीतील शिबीरानंतर अजित पवार कुठे होते हा प्रश्न विचारला जात होता
आज अजित पवार करणार पुणे जिल्ह्यात दौरा
अजित पवार राज्यातील घडामोडींवर काय बोलणार?
-
जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे- उदयनराजे भोसले
जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे- उदयनराजे भोसले
‘अफझल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण हटवलंच पाहिजे’
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचं महत्त्वाचं वक्तव्य
-
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी
रायगड : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडी
अवजड वाहनांमुळे बोरघाटात वाहतूक कोंडी
मुंबईहून पुण्यकडे येणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा
-
यंदा 65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगर जिल्ह्यात होण्याची शक्यता
नगर जिल्ह्याला यंदा मैदान भरवण्याचा मान मिळणार
बरखास्त कुस्ती परिषद घेणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
दोन दिवसांत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद मैदानासाठी जागेची करणार पाहणी
बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यावर ठाम
यंदा 5 जिल्ह्यातून आली होती मागणी
नगर जिल्ह्यात भरणार कुस्तीचा आखाडा
-
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वेगाने जाताय? सावधान!
पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई
1 जानेवारी 2022 ते 31ऑक्टोबर 2022 पर्यंत 7,325 वाहन चालकांना ठोठावला दंड
कारवाई करत 1 कोटी 4 लाख 71 हजार 500 रुपये दंड ठोठावण्यात आल्याचं समोर
वेग मर्यादा ओलांडल्यावर हलक्या वाहनांना 2 हजार रुपये तर जड वाहनांना 4 हजार रुपये दंड
द्रुतगती महामार्ग हलक्या वाहनाला 100 किमी प्रतितास वेगमर्यादा
तर 9 पेक्षा अधिक प्रवासी क्षमतेच्या वाहनांना 80 किमी प्रतितास वेग मर्यादा
-
14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून रचला अपहरणाचा कट
नागपूर : स्वतःच्या 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून रचला अपहरणाचा कट
कृष्णकुमार राजकुमार कोसले या आरोपीचं कारस्थान अखेर उघडकीस
पोलीस तपासात बनवाबनवी उघड, मुलीचा शोध सुरु
नागपूर रेल्वे स्थानकावर आईचं लक्ष नसताना मुलीला जबलपूर-अमरावती एक्सप्रेसमध्ये बसवलं
-
शिंदे गटाचा 16 नोव्हेंबरला मुंबईत मेळावा
मुंबई : शिंदे गटाचा 16 नोव्हेंबरला मुंबईतील दादरमध्ये मेळावा
आमदार-खासदारांसह नगसेवक आणि पदाधिकारी सामील होणार
-
बरखास्त महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची आज पत्रकार परिषद
मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका करणार स्पष्ट
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा करण्याची शक्यता
बाळासाहेब लांडगे 5 वाजता घेणार पत्रकार परिषद
बरखास्त कुस्ती परिषद आणि रामदास तडस गटाचा वाद आता सुप्रीम कोर्टात
बाळासाहेब लांडगे गटानं सुप्रीम कोर्टात कॅव्हेट केलं दाखल….
-
गडचिरोलीत आरोग्य पथकाने पायदळी प्रवास करून गरोदर मातेला व बाळाला दिले जीवनदान
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कुदरी गावात सरिता नरोटे नामक गरोदर मातेला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या
बंड्या नदी ओलांडून कुदरी गावापर्यंत रुग्णवाहिका पोहचेना
गरोदर मातेला खाटेवरून उचलून आरोग्य पथक पायदळ प्रवास करून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचले
अहेरी ग्रामीण रुग्णालयात या गरोदर मातेची प्रसूती झाली असून माता व बाळ सुरक्षित आहेत
-
डोळ्यात मिरची पूड टाकत कोयत्याने वार
पुणे : डोळ्यात मिरची पूड टाकत कोयत्याने वार
पुण्यातील किरकटवाडीतील धक्कादायक घटना
हवेली पोलीस ठाण्यात राम कचरे या आरोपी विरोधात गुन्हा
स्वप्नील मधुकर कांबळे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव
घरगुती वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती, अधिक तपास सुरु
-
भारत जोडोला ठाकरे गटाची साथ
महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा आज पाचवा दिवस
यात्रा आज नांदेडमधून हिंगोलीत प्रवेश करणार
काँग्रेसच्या भारत जोडोला ठाकरे गटाची साथ
आदित्य ठाकरे आज राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होणार
-
वाशिमजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात
नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
वाशिमजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात
एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू
अपघातात एक ट्रक कारवर उलटला
-
रत्नागिरी पोलीस आज किरीट सोमय्यांचा जबाब नोंदवणार
रत्नागिरी पोलीस आज किरीट सोमय्यांचा जबाब नोंदवणार
अनिल परबांच्या साई रिसॉर्ट प्रकरणात सोमय्यांचा जबाब नोंदवला जाणार
बेकायदेशीर रिसॉर्ट अनिल परबांचं असल्याचा सोमय्यांचा आरोप
अनिल परबांना हिशोब द्यावाच लागणार-किरीट सोमय्या
किरीट सोमय्या रत्नागिरीच्या दिशेने रवाना
-
अफझल खानाच्या कबरीजवळच्या अतिक्रमणाचा वाद सुप्रीम कोर्टात
अफझल खानाच्या कबरीजवळच्या अतिक्रमणाचा वाद सुप्रीम कोर्टात
गुरूवारी राज्य सरकारनं कबरीजवळील अतिक्रमण हटवलं
अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
कारवाईविरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
-
भोगावती नदीत सापडली बॉम्ब सदृश्य वस्तू
रायगडच्या पेणमधील भोगावती नदीत सापडली बॉम्ब सदृश्य वस्तू
स्थानिक पोलिसांसहीत बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी
मात्र कांड्या डमी असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट
-
संजय राऊत यांच्या अटकेवरून सामनातून भाजपवर निशाणा
संजय राऊत यांच्या अटकेवरून सामनातून भाजपवर निशाणा
देशात कायद्याचे राज्य नाही, सामना अग्रलेखातून टीका
न्याययंत्रणेवर दबाव आहे, केंद्रीय यंत्रणा गुलाम बनल्यात- सामना
-
राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज सुनावणी
संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज सुनावणी
राऊतांच्या जामिनाला विरोध करत ईडीची मुंबई हायकोर्टात धाव
मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी संपूर्ण राज्याचं लक्ष
Published On - Nov 11,2022 7:18 AM