Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज मंगळवार, 15 नोव्हेंबर, 2022. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेल्या विनयभंगाच्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष राज्यात पाहायला मिळतोय. या घडामोडीच्या अनुषंगाने आजचा दिवसही महत्त्वाचा असणार आहे. एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. या राजीनाम्याबाबत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचंय. तर दुसरीकडे सोमवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठक पार पडली. राज्यातील राजकीय घडामोडींसह ग्रामीण तसंच शहरातल्या महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूजचा आढावा या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
तर पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत
Marathi News LIVE Update
तर पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत
इंधन आणि दारु जीएसटी कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची घोषणा
आता चेंडू राज्यांच्या कोर्टात, राज्य सरकार महसूलावर पाणी का सोडणार?
-
विनाअनुदानित शिक्षकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
विनाअनुदानित शिक्षकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची आज भेट घेणार
दहाच्या सुमारास वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिक्षक शिष्टमंडळ भेट घेणार
गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर शिक्षक आंदोलन करत आहेत,
तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी बोलविलेला आहे
शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता
-
-
अस्वस्थेमुळे अजित पवार यांचे आरोप
Marathi News LIVE Update
अस्वस्थेमुळे अजित पवार यांचे आरोप
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
सत्ता गेल्यामुळे पवार अस्वस्थ, बावनकुळे यांचा दावा
अजित पवार यांनी केली होती टीका़
अजित पवार अस्वस्थेततून आरोप करत आहेत pic.twitter.com/MzDE5PuLvq
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 15, 2022
-
केंद्र सरकारने 384 औषधांची किंमत घटवली
Marathi News LIVE Update
केंद्र सरकारने 384 औषधांची किंमत घटवली
दुर्धर आजारांवरील औषधे एकदम स्वस्त
गरिबांचा औषधांवरील खर्च होणार कमी
क्षयरोग, हृदयरोग, कर्करोग, मधुमेहासह अनेक आजारांचा समावेश
-
IPL 2023 Retained and Released players List: IPL मधल्या सर्व टीम्सची रिटेन, रिलीज खेळाडूंची यादी एका क्लिकवर
IPL 2023 Retained and Released players List: CSK, RCB तुमच्या आवडत्या टीम्समध्ये काय बदल झालेत, ते जाणून घ्या…वाचा सविस्तर….
-
-
दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीसाठी तीव्र स्पर्धा
Marathi News LIVE Update
दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीसाठी तीव्र स्पर्धा
अदानी-अंबानी यांच्यात कंपनी खरेदीसाठी रस्सीखेच
Future Retail कंपनीसाठी अनेक कंपन्या बाजारात
एकूण 15 कंपन्या बिग बाजारची मूळ कंपनी खरेदीसाठी स्पर्धेत
-
धैर्यशील माने यांच्या मतदारसंघात सुषमा अंधारे यांची तोफ धडाडणार
कोल्हापुरात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघात सुषमा अंधारे यांची तोफ धडाडणार
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा व निर्धार मेळावा
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे जाहीर सभा
सुषमा अंधारे काही वेळात उपस्थित होणार
शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा
-
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा मोठा निर्णय
– रायगड पायथ्याजवळील अफजल खानच्या कबर जवळील अतिक्रमण हटवल्यानंतर सरकारचा अजून एक मोठा निर्णय
– अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी आता अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याचा देखावा असणारा छत्रपतींचा भव्य पुतळा उभारणार
– पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा अजून एक मोठा निर्णय
-
MI Retained Players, IPL 2023: मुंबई इंडियन्सने कुठल्या खेळाडूंना सोडलं? आता कशी असेल टीम?
MI Retained Players, IPL 2023: मुंबई इंडियन्सने कुठल्या खेळाडूंना रिलीज केलय? कुठल्या खेळाडूंना रिटेन केलं? जाणून घ्या एका क्लिकवर.
-
गोवर संसर्गप्रकरणी तात्काळ उपाय योजना करा
Marathi News LIVE Update
गोवर संसर्गप्रकरणी तात्काळ उपाय योजना करा
मुख्यमंत्र्यांचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश
मुंबईत गोवर संसर्गाचे प्रमाण वाढले
रुग्णालयात औषधांची उपलब्धता करा-मुख्यमंत्री
गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 15, 2022
-
IIT Guwahati मधील विद्यार्थ्याला लागली लॉटरी
Marathi News LIVE Update
IIT Guwahati मधील विद्यार्थ्याला लागली लॉटरी
विद्यार्थ्याला तब्बल 1.20 कोटी रुपयांचं पॅकेज
यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्री-प्लेसमेंट ऑफरमध्ये 21 टक्के वाढ
अनेक विद्यार्थ्यांना जागतिक ब्रँड्समध्ये काम करण्याची संधी
-
पुण्यातील नवीन पोलिस उपायुक्तांना देण्यात आलेले झोन
संदीप सिंह गिल्ल, (पोलिस उपायुक्त झोन 1)
स्मर्तना पाटील, (पोलिस उपायुक्त झोन 2)
सुहेल शर्मा, (पोलिस उपायुक्त झोन 3)
शशिकांत बोराटे, (पोलिस उपायुक्त झोन 4)
विक्रांत देशमुख, (पोलिस उपायुक्त झोन 5)
अमोल झेंडे, (पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा)
विजय मगर, (पोलिस उपायुक्त, ट्रॅफिक विभाग)
रोहिदास पवार (पोलिस उपायुक्त झोन 5 येथून मुख्यालय)
श्रीनिवास घाडगे (पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा ते आर्थिक गुन्हे शाखा)
-
पुणे शहरातील पाचही झोनला नव्या पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्या
पुणे शहरातील सर्व पोलीस उपायुक्तांच्या झाल्या बदल्या
शहरातील पाचही झोनला नव्या पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्या
केवळ दोन विद्यमान अधिकाऱ्यांचा चार्ज बदलला
-
नबाब मलिक यांच्या अडचणीत वाढ
Marathi News LIVE Update
नबाब मलिक यांच्या अडचणीत वाढ
मलिकांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा
वाशिम न्यायालयाचा दाखल याचिकेत आदेश
समीर वानखेडे यांनी घेतली होती वाशिम न्यायालयात धाव
-
FIFA World Cup 2022: फुटबॉलसमोर क्रिकेट फकीरांचा खेळ, बक्षिसाचा आकडा वाचूनच डोळे विस्फारतील
FIFA फुटबॉल वर्ल्ड कप 2022 मध्ये प्राइज मनीपोटी मिळणाऱ्या बक्षिसाचा आकडा ऐकून डोळे पांढरे होतील, वाचा सविस्तर….
-
अमित शहा 20 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर
Marathi News LIVE Update
अमित शहा 20 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर
शिवसृष्टीच्या प्रथम चरणाचे लोकार्पण
अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण
शिंदे, फडणवीस आणि उदयनराजे यांची उपस्थिती
-
4 जागांसाठी शिवसेनेने युती तोडली
Marathi News LIVE Update
4 जागांसाठी शिवसेनेने युती तोडली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
2014 मध्ये 4 जागांसाठी युतीला तोडली
288 जागा 1 दिवसात लढण्याचा निर्णय घेतला
फडणवीसांनी शिवसेनेवर फोडले खापर
-
Sania Mirza: दुबईमध्ये सानियाच बर्थ डे सेलिब्रेशन, वाढदिवसाला कोणा-कोणाची हजेरी?
Sania Mirza: शोएबने टि्वट करुन शुभेच्छा दिल्या, त्यावर सानियाने….वाचा सविस्तर….
-
रोबोट उठले मनुष्यांच्या मुळावर
Marathi News LIVE Update
Amazon करणार 10,000 कर्मचाऱ्यांची कपात
अॅमेझॉन रोबोटच्या मदतीने करणार काम
रोबोटच्या वापरामुळे अनेक टेक कंपन्यांमधील जॉब जाणार
अनेक टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची लाट
ट्विटर, मेटानंतर अनेक टेक कंपन्या कर्मचारी कपातीच्या वाटेवर
-
दिल्ली हायकोर्टात ठाकरे गटाला मोठा धक्का
Marathi News LIVE Update
दिल्ली हायकोर्टात ठाकरे गटाला मोठा धक्का
निवडणूक आयोगाविरोधातील याचिका फेटाळली
धनुष्यबाण चिन्हं गोठविण्याविरोधातील याचिका
ठाकरे गटाने दाखल केली होती याचिका
निवडणूक आयोगाला अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश
-
एका बाईला पुढे करुन महाभारतासारखं राजकारण केलं
Marathi News LIVE Update
एका बाईला पुढे करुन महाभारतासारखं राजकारण केलं
जितेंद्र आव्हाड यांची घणाघाती टीका
मला अडकविण्याचं हे षडयंत्र होतं
पोलिसांवरील दबावामुळे माझ्यावर गुन्हा दाखल
गुन्हा नोंदविण्यापूर्वी व्हिडिओ पहायला हवा होता
माझी अस्वस्थता अजूनही शांत झालेला नाही
आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
-
लवकरच वापरा डिजिटल रुपया
Marathi News LIVE Update
लवकरच वापरा डिजिटल रुपया
डिजिटल रुपया सर्वसामान्यांच्या हातात
डिजिटल चलनासाठी चार बँकांवर जबाबदारी
SBI, HDFC, ICICI IDFC First बँकेचा सहभाग
लवकरच पथदर्शी प्रकल्पात नागरिकांनाही डिजिटल रुपया
-
Hardik pandya ला कॅप्टन बनवायला इरफान पठानचा विरोध आहे का?
इरफान पठानचा नेमका मुद्दा काय आहे? आणि त्याला हार्दिकबद्दल असं का वाटतं? वाचा सविस्तर….
-
आज जगाची लोकसंख्या झाली 8 अरब
Marathi News LIVE Update
आज जगाची लोकसंख्या झाली 8 अरब
7 अरब हून लोकसंख्या 12 वर्षांत 8 अरब झाली
2023 पर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात भारत जगातील सर्वात मोठा देश
भारत पुढील वर्षी चीनला टाकणार मागे, अहवालात दावा
-
IPL 2023 आधी Kieron Pollard ने घेतला एक मोठा निर्णय
कायरन पोलार्ड हा Mumbai Indians चा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. वाचा सविस्तर….
-
खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
जात प्रमाणपत्राबाबतची सुनावणी लांबणीवर
सर्वोच्च न्यायालयाने पुढची तारीख दिल्याने खासदार राणा यांना मोठा दिलासा
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार सुनावणी
-
Shoaib Akhtar: शमीचा रिप्लाय शोएबच्या खूपच जिव्हारी लागला, मनातला राग काढताना म्हणाला….
Shoaib Akhtar: शोएब अख्तर आणि मोहम्मद शमीमध्ये सोशल मीडियावर एक वेगळच वॉर चालू आहे. वाचा सविस्तर….
-
सानियाच्या वाढदिवशी शोएबने उचललं एक वेगळच पाऊल, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सगळेच हैराण
सानियाच्या वाढदिवशी शोएबने उचललं एक वेगळच पाऊल, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सगळेच हैराण शोएब मलिकने जे पाऊल उचललय त्यामागे नेमका अर्थ काय? वाचा सविस्तर….
-
Shraddha Murder case: दिल्ली पोलीस आफताबच्या ‘बंबल’ प्रोफाइलची मिळवणार माहिती
दिल्ली प्रेयसी हत्याकांड
दिल्ली पोलीस ‘बंबल’ या डेटिंग ॲपला पत्र लिहिण्याची शक्यता
‘बंबल’वरील आफताबच्या प्रोफाइलची मिळवणार माहिती
श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये असताना कोणत्या महिलांनी आरोपीची भेट घेतली, याचा करणार तपास
श्रद्धाच्या हत्येमागे यापैकी कोणती महिला कारण असू शकते का, याच्या शक्यतेचा करणार तपास
-
दिल्ली हायकोर्टातील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता
हायकोर्टातील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता
कोर्टाने दुसरे खटले घेतल्याने ठाकरे गटाची याचिका लांबणीवर
दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता
खासदार अनिल देसाई दिल्ली हायकोर्टात उपस्थित
-
कोल्हापूर: संभाजीनगरच्या बस स्थानकाची पहिली झलक, 9 कोटी 80 लाख खर्च केले जाणार
कोल्हापूरच्या संभाजीनगर बस स्थानकाची पहिली झलक समोर आलीये.
9 कोटी 80 लाख खर्च करून हे बस स्थानक बांधलं जाणारे.
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडून कामाची पाहणी करण्यात आली
कामाचा दर्जा उत्तम ठेवण्याच्या सतेज पाटील यांच्याकडून सूचना
पाहणी दरम्यान कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील देखील उपस्थित
बस स्थानकात मॉल आणि मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिली जाणार
-
Shraddha murder case: जंगलात आढळले 10 अवशेष
दिल्ली प्रेयसी हत्याकांड
जंगलात आढळले 10 अवशेष
अवशेषांच्यां नमुन्यांचा फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून होणार तपास
मानवी शरीराचे अवशेष आहेत की नाही, याचा करणार तपास
श्रद्धांच्या वडिलांच्या DNA शी पडताळणी करून पाहणार
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांची माहिती
-
”त्या’ उद्देशाने आव्हाडांनी महिलेला स्पर्श केलेला नव्हता’
आव्हाडांवरील गुन्हा राजकीय सुडापोटी, ‘त्या’ उद्देशाने आव्हाडांनी स्पर्श केलेला नव्हता, आव्हाडांच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद
-
ठाकरे गटाच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणीला सुरुवात
ठाकरे गटाच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणीला सुरुवात
खासदार अनिल देसाई दिल्ली हायकोर्टात दाखल
निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गट दिल्ली उच्च न्यायालयात
आज दुसऱ्या दिवशी पुन्हा न्यायालय दोन्ही बाजू ऐकून घेणार
-
दिल्ली प्रेयसी हत्यांकाड: आरोपीला जंगलात नेऊन घटनास्थळी होणार चौकशी
दिल्ली प्रेयसी हत्याकांड प्रकरण
आरोपी आफताब पूनावाला याला मेहरौली पोलिस ठाण्याबाहेर आणलं
श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जंगलात ज्याठिकाणी फेकले, तिथे नेऊन होणार चौकशी
प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा आरोप
Shraddha murder case | Accused Aftab Poonawala, being brought out of Mehrauli Police Station. He is now being taken to the spot in the jungle where he allegedly disposed off parts of Shraddha’s body.#Delhi pic.twitter.com/3iqtdpehzQ
— ANI (@ANI) November 15, 2022
-
अरविंद सावंत यांचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला
अरविंद सावंत यांचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला, ‘माजी मुख्यमंत्री सौजन्याची मूर्ती नाही, सूडाची मूर्ती आहे’ तर एकनाथ शिंदे यांना विरोध झोंबला, अरविंद सावंत यांची टीका
-
जितेंद्र आव्हाड यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी
जितेंद्र आव्हाड यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी
ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात 11 वाजता सुनावणी
आव्हाड यांना जामीन मिळतो का? याकडे लक्ष
-
चिंताजनक! मुंबईत गोवर आजाराचा पहिला बळी
चिंताजनक! मुंबईत गोवर आजाराचा पहिला बळी
कस्तुरबा रुग्णालयात दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू
मुंबईत गोवरच्या रुग्णांची वाढली संख्या चिंताजनक
-
दहिसरमध्ये भरलेल्या बसवर दगडफेक
मुंबईतील दहिसर पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पायल हॉटेलजवळ काही लोकांनी खचाखच भरलेल्या बसवर दगडफेक केली.
दहिसर चेक नाक्याकडे जाणाऱ्या बेस्टच्या बसची कारला किरकोळ धडक बसली.
गाडीतील प्रवाशांनी आपल्या साथीदारांना बोलावून बसवर दगडफेक सुरू केली.त्यात अनेक प्रवासी जखमीही झाले.
सध्या या घटनेनंतर स्थानिक पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
-
नवनीत राणा जात प्रमाणपत्रप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
नवनीत राणा जात प्रमाणपत्रप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा हायकोर्टाचा आदेश
आज होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष
-
ठाणे : 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल
ठाणे : किसन नगरमधील शिंदे वि. ठाकरे गट राडा प्रकरण, 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती, अधिक तपास सुरु
-
महेश बाबूला पितृशोक; साऊथ सुपरस्टार कृष्णा यांचं निधन
दिग्गज दाक्षिणात्य कलाकार आणि अभिनेता महेश बाबूचे वडील कृष्णा यांचं निधन
हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
कार्डिॲक अरेस्टमुळे झालं निधन
-
प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक
दहिसरमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक
पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पायल हॉटेलजवळ घटना
दहिसर चेक नाक्याकडे जाणाऱ्या बेस्टच्या बसची कारला किरकोळ धडक
गाडीतील प्रवाशांची साथीदारांना बोलावून बसवर दगडफेक
दगडफेकीत काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती
-
धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी
धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी
ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर आज पार पडणाऱ्या सुनावणीकडे लक्ष
दोन्ही बाजूंना लिखित स्वरुपात आपली बाजू मांडण्याचे कोर्टाचे आदेश
-
व्हॉट्सॲपवर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट
गोंदिया : व्हॉट्सॲपवर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट
तक्रारीनंतर गुन्हा दाखल, अधिक तपास सुरु
नंगपुरा येथे तणाव, गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त
दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं
-
चेंबूर येथील शिवाशीष कॉन्प्लेक्समध्ये अग्नितांडव
चेंबूर येथील शिवाशीष कॉन्प्लेक्समध्ये अग्नितांडव
बेसमेंटच्या बाटा शोरूममधील गोडाऊनला मध्यरात्री आग
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
-
Delhi Murder Case: दिल्ली पोलिसांकडून आफताबचं सोशल मीडिया अकाऊंट स्कॅन
Delhi Murder Case: दिल्ली पोलिसांकडून आफताबचं सोशल मीडिया अकाऊंट स्कॅन
इतर मित्रांशी संपर्क साधण्याचा पोलिसांचा प्रयत्न
श्रद्धासोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यापूर्वी आफताबचे जे चार मित्र होते, त्यांच्याशीही संपर्क साधणार
दिल्लीतील प्रेयसी हत्याकांडप्रकरणी पोलिसांची माहिती
-
अंबादास दानवे आज परभणीत
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज परभणीत
परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
शेतकर्यांना पीक विम्याचे पैसे त्वरीत देण्यात यावेत
शेतकरी प्रश्नांसाठी ठाकरे गटाचा आज धडक मोर्चा
शनिवार बाजार मैदान येथुन सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र वायकर यांचीही उपस्थिती
-
ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
पोलिसांच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
-
अंबरनाथ : भरधाव अर्टीगा कारचा अपघात
अंबरनाथमध्ये भरधाव अर्टीगा कारचा अपघात
एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ अपघात
गाडीतील चौघे जखमी झाल्याची माहिती
-
भारत जोडो यात्रा वाशिममध्ये दाखल
भारत जोडो यात्रा वाशिममध्ये दाखल
भारत जोडो यात्रेचा आजचा राज्यातील नववा दिलस
विदर्भात भारात जोडो यात्रेचा प्रवेश
मोठ्या संख्येनं लोकं भारत जोडो यात्रेत सहभागी
Published On - Nov 15,2022 7:20 AM