Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज गुरुवार, 17 नोव्हेंबर 2022. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येलाच शिंदे गटाचा मुंबईत मेळावा झाला. तर आज ठाकरे गटाकडून स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येईल. तर दुसरीकडे श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी आज नवे काय खुलासे होतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. भारताला अध्यक्षपद मिळाल्यानंतर नरेंद्र मोदील यांच्या जी-20 परिषदेकडेही जगाचं लक्ष लागलंय. राज्यासह देशातील मोठ्या राजकीय घडामोडींसह महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागासह महत्त्वाच्या शहरांमधील मोठ्या बातम्या, ताज्या घडामोडी आणि ब्रेकिंग न्यूजचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
भारतातील Meta चा भार महिलेच्या खांद्यावर
Marathi News LIVE Update
भारतातील Meta चा भार महिलेच्या खांद्यावर
संध्या देवनाथन लवकरच मेटाच्या उपाध्यक्षपदी
1 जानेवारी 2023 रोजी स्वीकारतील पदाची जबाबदारी
मेटा संकटात असताना देवनाथन यांच्या खाद्यांवर मोठी जबाबदारी
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगारांची बैठक बोलावली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगारांची बैठक बोलावली उद्या सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडेल एसटी कामगारांसाठी मोठा निर्णय उद्या होणार या बैठकीला एसटी कामगारांचे आयुक्त शेखर चेन्ने हे उपस्थित राहणार आहेत DA च्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता डिझेल गाड्या महाराष्ट्रात वाढवण्यासाठी परवानगी अहवाल सादर करणार एसटी कामगारांच्या 16 मागण्यांवर उद्या तोडगा निघण्याची शक्यता
-
-
एलॉन मस्कचा पुन्हा एक निर्णय
Marathi News LIVE Update
एलॉन मस्कचा पुन्हा एक निर्णय
Twitter संबंधी एलॉन मस्क करणार घोषणा
ट्विटरच्या सीईओ पदी नवीन व्यक्तीची करणार निवड
ट्विटरच्या सीईओ पदी कायम न राहण्याचा घेतला निर्णय
-
2020 च्या पीएसआय पदाचा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे :
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
2020 च्या पीएसआय पदाचा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
650 पदांसाठी एमपीएससीनं जाहिरात काढली होती
आज मुख्य परीक्षेचा निकाल केला जाहीर.
2616 विद्यार्थी मुलाखतीसाठी झाली उत्तीर्ण
लवकरच मुलाखतीचं वेळापत्रक जाहीर होणार
-
एमपीएससी आयोगानं बोलावली महत्वाची बैठक
पुणे :
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
उद्या एमपीएससी आयोगानं बोलावली महत्वाची बैठक
विद्यार्थ्यांचे असणारे प्रलंबित प्रश्न आणि इतर आयोगाच्या समस्येसंदर्भात होणार चर्चा
विद्यार्थी संघटनांनीही बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय
एमपीएससी आयोग विद्यार्थ्यांचे प्रश्न घेणार जाणून
आयोगाचे अध्यक्ष सचिव राहणार उपस्थित
उद्या मुंबईत पार पडणार बैठक
आयोग उद्या महत्वाची घोषणा करण्याची शक्यता
-
-
IND vs NZ 1ST T20: ओपनिंगला कोण येणार? उमरानला संधी मिळेल? अशी असेल Playing 11
IND vs NZ 1ST T20: न्यूझीलंड विरुद्ध पहिला T20 सामना, भविष्याची अनेक उत्तर या सीरीजमध्ये मिळू शकतात. वाचा सविस्तर….
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली गोवर रुग्णांची भेट
Marathi News LIVE Update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली गोवर रुग्णांची भेट
कस्तुरबा रुग्णालयात गोवरचे 74 रुग्ण
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी केली चर्चा
वॅक्सिनबाबतही घेतली माहिती,रुग्णांची केली विचारपूस
-
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात उद्या दिवसभर पाणी नाही!
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात उद्या दिवसभर पाणी नाही!
एमआयडीसीचा पाणीपुरवठा उद्या तब्बल १७ तास बंद!
अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्पाची होणार दुरुस्ती
अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण- डोंबिवली, ठाण्यात उद्या पाणी नाही!
तर मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि औद्योगिक क्षेत्राचाही पाणीपुरवठा राहणार बंद!
-
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली
पुणे :
– ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली,
– ग्रामपंचायत निवडणुकीच्या नियोजनासाठी भाजपची बैठक पार पडली,
– जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतीसाठी 221 प्रभारी नेमण्याचे आदेश,
– शिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीला पॅनल उभे करण्याचे आदेश,
– मागील ग्रामपंचायत निवडणुकीत 51 टक्के ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व
-
काँग्रेसविरुद्ध मनसे सामना रंगणार
Marathi News LIVE Update
काँग्रेसविरुद्ध मनसे सामना रंगणार
सावरकरांवरील वक्तव्यावरुन मनसे आक्रमक
राहुल गांधींचा मनसे स्टाईलने निषेध करणार
मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना
राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
तर मनसेला उत्तर देण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा
-
भारत जोडो यात्रा रोखून दाखवा
Marathi News LIVE Update
भारत जोडो यात्रा रोखून दाखवा
राहुल गांधी यांचे राज्य सरकारला आव्हान
माझ्यासोबत लाखो लोकं असल्याचा केला दावा
सावरकरांविरोधातील विधानावरुन राज्यात घमासान
मनसे, भाजप आणि सावरकर प्रेमींनी नोंदवला निषेध
-
भारतीय IT क्षेत्रात नोकऱ्यांची लाट
Marathi News LIVE Update भारतीय IT क्षेत्रात नोकऱ्यांची लाट
आयटी क्षेत्रात तब्बल 2 लाख तरुणांच्या हाताला रोजगार
इन्फोसिसचे सह संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांचा दावा
टेक कंपन्यांनी कपातीचे धोरण स्वीकारलेले असताना आयटी क्षेत्रात आनंदवार्ता
-
नवी मुंबईतील फ्रुट मार्केटमध्ये आग
Marathi News LIVE Update
नवी मुंबईतील फ्रुट मार्केटमध्ये आग
APMC च्या फळ बाजारातील N विंगला आग
आगीचा धूर दुरुपर्यंत, बघ्यांची एकच गर्दी
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, आग विझविण्याचे प्रयत्न सुरु
-
बँक कर्मचाऱ्यांची संपाची हाक
Marathi News LIVE Update
बँक कर्मचाऱ्यांची संपाची हाक
19 नोव्हेंबर रोजी देशभरात बंदची हाक
देशभरातील बँकांचे कामकाज होणार प्रभावित
कर्मचारी सुरक्षितता आणि अन्य मागण्यांसाठी व्यापक बंद
-
संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आक्रमक
Marathi News LIVE Update
संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आक्रमक
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी करणार आंदोलन
26 नोव्हेंबर रोजी देशभर आंदोलन करणार
राज भवनाबाहेर संयुक्त किसान मोर्चा करणार आंदोलन
Samyukta Kisan Morcha to hold nationwide marches to Raj Bhawans on Nov 26 alleging breach of assurance by Centre on farmers’ pending demands
— Press Trust of India (@PTI_News) November 17, 2022
-
केरळमध्ये सोन्याचा एकच दाम!
Marathi News LIVE Update
केरळमध्ये सोन्याचा एकच दाम!
राज्यातील प्रत्येक सराफाकडे सोन्याचा दर एकच
भारतातील एकच सुवर्ण दाम असणारे पहिले राज्य
916 शुद्धतेचे 22 कॅरेट सोने एकाच दरात उपलब्ध
-
राहुल गांधी यांच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याचे पडसाद
Marathi News LIVE Update
राहुल गांधी यांच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याचे पडसाद
मंत्रिमंडळ बैठकीत गांधींच्या वक्तव्याचा केला निषेध
सावरकरांविषयी राहुल गांधी यांचे आक्षेपार्ह विधान
सावरकर प्रेमीं आणि भाजपचे तीव्र आंदोलन
-
सोन्याचे दर वधारले, गुंतवणूकदारांना दिलासा
Marathi News LIVE Update
सोन्याचे दर वधारले, गुंतवणूकदारांना दिलासा
लग्न सराईत सोन्याचे दर वाढल्याने घाम फुटला
15 दिवसांत सोन्याच्या दरात 2500 रुपयांची वाढ
सोन्याचा दर 56,000 होण्याचा अंदाज
चांदीच्या दरात मात्र घसरण
-
Ravi Shastri: ‘तुम्हाला इतक्या….’ हेड कोच राहुल द्रविड यांच्यावर भडकले रवी शास्त्री
राहुल द्रविड यांच्यावर रवी शास्त्रींकडून प्रश्नचिन्ह. वाचा सविस्तर….
-
पुण्यामधील कोथरूड येथील श्रावणधारा सोसायटीतील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आग लागलेल्या घटनास्थळाची पाहणी
शॉटसर्किटमुळे आग लागल्याची चंद्रकांत पाटील यांची माहिती
शॉटसर्किटमुळे दोन दिवस सोसायटीतील लाईट नसणार
घटनेत कुणीही जखमी नाही
सोलर पॅनलच्या माध्यमातून सोसायटीतील विजेची व्यवस्था केली जाणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती
-
Danushka Gunathilaka: बलात्कार प्रकरणात जामिनासाठी श्रीलंकेच्या क्रिकेटपटूने मोजले इतके कोटी
T20 वर्ल्ड कप दरम्यान बलात्कार प्रकरणात श्रीलंकन क्रिकेटरला ऑस्ट्रेलियात झालेली अटक, वाचा सविस्तर…
-
20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विविध संघटनांचा विरोध
शाळा वाचवा, शिक्षण वाचवा यासाठी एसएफआय संघटनेच्यावतीने पुण्यातील भिडेवाडा ते शिवनेरी शिक्षणज्योत यात्रा काढण्यात आली
100 किमी मार्गावर विद्यार्थी चालणार आहेत
भिडेवाडा इथून या ज्योत यात्रेला सकाळी सुरुवात झालीये
-
ग्रामीण भागातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण 31 डिसेंबर 2022 पर्यंत हटवणार
सोलापूर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले
गायरान जमिनीवर बंगला असेल तर बुलडोजर फिरवणार आणि पिके असतील तर ट्रॅक्टर, नांगर लावून अतिक्रमण काढणार
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे
जिल्हा प्रशासनाचे आदेश निघताच ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली आहे
अनेक स्थानिक नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गायरान जमिनीवर अतिक्रमण करून बंगले उभारले आहेत
त्यामुळे ग्रामीण भागातील स्थानिक नेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे
-
Shraddha Murder Case: आफताबला फाशीची शिक्षा मिळावी, श्रद्धाच्या वडिलांची मागणी
दिल्ली प्रेयसी हत्याकांड
जबाब नोंदवताना आफताब कधी खरं तर कधी खोटं बोलत असल्याचा आरोप
दिल्ली पोलिसांनी नार्को टेस्टसाठी केला अर्ज
आफताबने गुन्हा केला असेल तर त्याला फाशीची शिक्षा मिळावी, श्रद्धाच्या वडिलांची मागणी
आफताबला मृत्यूदंड मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही- विकास वालकर, श्रद्धाचे वडील
-
मालेगाव : नवरा बायकोचा संशयास्पद मृत्यू
मालेगाव : नवरा बायकोचा संशयास्पद मृत्यू, मालेगावच्या हिंगलाज नगर येथील घटनेनं खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु
-
सातारा : बकासूर गँगची पुन्हा दहशत
सातारा : बकासूर गँगची पुन्हा दहशत, राधिका रोड ते बुधवार नाका रस्त्यावर युवकांचा एकावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात अल्पवयीन युवक जखमी, पोलिसांकडून अधिक तपास सुरु
-
प्रायोगिक नाटकांसाठी पुण्यात नवे नाट्यगृह उभारणार
महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे एका नवीन नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येणार
या नाट्यगृहासाठी डॉ श्रीराम लागू यांच्या कुटुंबियांकडून 60 लाख रूपयांची मदत
डॉ. श्रीराम लागू यांच्या जन्मदिनी डॉ. आनंद लागू यांनी ही घोषणा केली
-
तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू
वसई : पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, 22 वर्षीय हृतिक मेहेर या तरुणावर काळाचा घाला, अचानक झालेल्या तरुणाच्या मृत्यू कुटुंबीयांना मोठा धक्का
-
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 6 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय, आता मिळणार 34 टक्के महागाई भत्ता एसटी महामंडळाने पाठवलेला प्रस्ताव सरकारडून मंजूर
-
भंडारा – 390 जनावरांना लम्पीची बाधा
भंडारा – 390 जनावरांना लम्पीची बाधा, 57 जनावरांचा मृत्यू, लसीकरणानंतरही लम्पी रोगाचा
Published On - Nov 17,2022 7:21 AM